.

महागाईच्या गप्पा

Primary tabs

बी.डी.वायळ's picture
बी.डी.वायळ in जे न देखे रवी...
22 Apr 2019 - 1:06 pm

ऑफिसमध्ये काल बायका मारत होत्या गप्पा |
महागाईचा विषय होता साधा आणि सोपा |

काल जेंव्हा बाई मी मार्केटला गेले |
भाज्यांचे भाव बघुन हैराणच झाले|

पंधरा रुपयाला एक होती मेथीची जुडी|
एक रुपयाला एक कोथिंबीरीची काडी |

एकरुपयाचे लिंबु पाच रुपयाला झाले |
कांदे व बटाटे पंचविस रुपयावर गेले |

बारा रुपये पाव किलो वांगी व कारले |
फ्लावर व कोबी बघुन डोकेच फिरले |

पंचविस तीस रुपये किलो होते तेथे गहू |
तांदुळ म्हणाला मला हातच नका लावू |

शंभर रुपये किलो झाली तुरीची डाळ |
भडकलेले होते हरबरे आणि वाल |

साखरेचा भाव तर चाळीसवर गेला |
तेलाचा डबा पण किती महाग झाला|

दुध झाले महाग पन्नास रुपये लिटर |
विचारायलाच नको चीज आणि बटर |

सगळीकडेच भडकलिय अशी महागाई|
काय खावं काय पिवं तेच कळत नाही |

बी.डी.वायळ

कविता

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

22 Apr 2019 - 1:40 pm | श्वेता२४

बाई दोन लिंबू झेलू या चालीवर ही कविता चपखल बसतेय. छान. मजेशीर

अभ्या..'s picture

22 Apr 2019 - 1:48 pm | अभ्या..

गली बॉयच्या रॅप स्टाईलमध्ये पण म्हनता येतंय.
अधून मधून अं, अं. योय् यो, कमऑन असले अ‍ॅडिशन टाकावे लागतील.

श्वेता२४'s picture

22 Apr 2019 - 3:37 pm | श्वेता२४

खरंय, खरंय. मी रॅपसारखं पण म्हणून बघितलं. जमतंय. थोडक्यात या कवितेला गेयता आहे. ;)

बी.डी.वायळ's picture

22 Apr 2019 - 5:01 pm | बी.डी.वायळ

धन्यवाद !