जिंकण्याची, हारण्याची सारखी भाषा कशाला?
तारण्याची, मारण्याची सारखी भाषा कशाला?
देव अथवा देश दोन्हीं कल्पना या माणसांच्या
व्यर्थ त्यांनी भारण्याची सारखी भाषा कशाला?
माणसांनी घेत जावी काळजी; पण - माणसांची
देवळे उद्धारण्याची सारखी भाषा कशाला?
रोज थोड्या मिळकतीने जुळवतो मी दोन टोके
कर नवे आकारण्याची सारखी भाषा कशाला?
मानतो मी एक बिंदू-मात्र आहे या जगी पण -
सूक्ष्मता स्वीकारण्याची सारखी भाषा कशाला?
- कुमार जावडेकर
प्रतिक्रिया
25 Feb 2019 - 9:40 am | वन
छान !
25 Feb 2019 - 3:31 pm | प्राची अश्विनी
सुरेख!