लफंगा भूंगा

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
3 Nov 2008 - 11:34 pm

रोज रोज ह्या फूलावरून त्या फूलावर गुणगुण गुंजन करणार्‍या भुंग्याला पाहून मनात आलं की एखाद्या लफंग्या व्यक्तिला जसं ह्या गल्लीतून त्या गल्लीत जाण्याची मौज वाटत असते तसंच ह्या भुंग्याला पण एका फूलावरून दुसर्‍या फूलावर जाऊन गुंजन करावं असं वाटत असणार.

रोज रोज ह्या फूलावरून त्या फूलावर
फिरे हा लबाड भूंगा
गुंजन करुनी काय सांगे कळ्याना
हा निर्लज्य लफंगा

देइ का हा कुणाचा निरोप
का उघड करी अपुले स्वरूप
गुंजन करूनी काय सांगे कळ्याना
हा लबाड भूंगा

देई का हा गतऋतुची स्मृति
का सांगे काही पुराणी किर्ती
असेल कसली रचलेली कथा
का दूसरी कसली व्यथा
गुंजन करुनी काय सांगे कळ्याना
हा लबाड भूंगा

आठवे हा कसले पुराणे वचन
का असेल आली कसली स्फुर्ती
करावया त्याचीच वचनपुर्ती

रोज रोज ह्या फूलावरून त्या फूलावर
जाई हा बिचारा भूंगा
गुंजन करुनी काय सांगे कळ्याना
हा बापुडा लफंगा

श्रीकृष्ण सामंत

कविता

प्रतिक्रिया

अवलिया's picture

4 Feb 2011 - 5:39 pm | अवलिया

मस्त कविता !!

(लफंगा) नाना

टारझन's picture

4 Feb 2011 - 7:08 pm | टारझन

सामंत सरांचे लेखण म्हणजे पर्वणी असते. नानांनी पर्वणी उपलब्ध करुन दिल्या बद्दल आभार !!

संजय अभ्यंकर's picture

4 Feb 2011 - 7:14 pm | संजय अभ्यंकर

आपले लेखन पुन्हा मिपावर पाहुन आनंद झाला!