ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरील मनोरंजन - कार्यक्रम आणि शुल्क

Primary tabs

पैलवान's picture
पैलवान in काथ्याकूट
21 Feb 2019 - 12:36 pm
गाभा: 

प्रेरणा : तुम्ही अजूनही केबल/ टाटा स्काय / डिश tv असे वापरता कि ऑनलाइन tv ला शिफ्ट झाले आहेत?

आजकाल लोक मनोरंजनासाठी केबल/डिशवरचे पारंपारिक कार्यक्रम सोडून विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर नवनवीन कार्यक्रम बघण्याकडे वळत आहे.

गेम ऑफ थ्रोन्स पासून हिंदीमधील अपहरण्/मिर्झापूर/सॅक्रेड गेम्स ते अगदी मराठीत भाडीपा/स्त्रीलिंग-पुल्लिंग पर्यन्त प्रचंड प्रमाणात ऑनलाईन कंटेंट उपलब्ध होतंय जे बहुतांश पारंपारिक माध्यमातील कंटेंटपेक्षा अधिक दर्जेदार/मनोरंजक आहे.

पण हे सर्व मनोरंजन वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर असल्याने कुठे काय चाललंय याचा ट्रॅक ठेवणं बर्‍याचदा अवघड होतंय.

तर त्यासाठी हा धागा...

कुठल्या प्लॅटफॉर्मवर कोणता कार्यक्रम उपलब्ध आहे, प्लॅटफॉर्मचे मसिक/त्रैमासिक/वार्षिक शुल्क, कार्यक्रम कुठे मोफत उपलब्ध आहे का (शक्यतो टोरंटसारखे बेकायदेशीर मार्ग सोडून), इत्यादी माहिती शेअर करण्यासाठी.

कुणीतरी म्हटलेलंच आहे.... ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

21 Feb 2019 - 1:52 pm | प्रचेतस

प्राईमवर नुकतीच पर्सन ऑफ इंटरेस्ट बघून संपवली.
आता हॉटस्टारवर गॉथमचा पहिला सीजन सुरु केलाय. जिम गॉर्डनचे सुरुवातीचे दिवस आणि बॅटमॅनचे व्हिलन्स पेन्ग्विन, रिडलर आदींच्या ओरिजीन स्टोरीज आहेत.
ह्याशिवाय हॉटस्टारवर सोप्रेनॉस, गेम ऑफ थ्रोन्स, प्रिजन ब्रेक, बिलियन्स, वेस्टवर्ल्ड, द फ्लॅश, गिफ्टेड अशा उत्तमोत्तम सिरिज आहेत.

लई भारी's picture

21 Feb 2019 - 2:54 pm | लई भारी

प्राईमवर मला 'Marvelous Mrs. Maisel' आवडली, हळू हळू बघतोय त्यामुळे आता दुसरा सिझन सुरु केलाय. हलकी फुलकी आहे, १९६० च न्यूयॉर्क चांगलं उभारलंय.
'Bosch' पण चांगली वाटली; पहिला सिझन. क्राईम थ्रिलर आहे.
'Jack Ryan' बेस्ट आहे.

हॉटस्टार वर 'Sharp Objects' बघितली काही भाग, आवडली. सायको थ्रिलर आहे.

Alt Balaji/Jio वर 'अपहरण' बघितली. एकदम भारी नाही पण एकदा बघू शकतो. हिंसा आणि न्यूडिटी जरा कमी आहे त्यामानाने त्यामुळे घरी बघू शकतो.
प्राईम ची 'मिर्झापूर' सोडली मध्येच.

बाकी 'sacred games', 'lust stories' बद्दल बरीच चर्चा झाली आहेच.

लई भारी's picture

21 Feb 2019 - 2:58 pm | लई भारी

'भाडिपा' आवडत.
'स्त्रील्लिंग पुल्लिंग' ठीक आहे. बोल्ड आहे बरीच.

टवाळ कार्टा's picture

24 Feb 2019 - 5:23 pm | टवाळ कार्टा

'स्त्रील्लिंग पुल्लिंग' लैच बोल्ड आहे.....टिपिकल मराठी मनाला लै झिणझिण्या आणेल =))

पैलवान's picture

24 Feb 2019 - 7:02 pm | पैलवान

माझं टिपिकल मध्यमवर्गीय मन पहिल्याच भागात पार झिणझिणून गेलं.

धर्मराजमुटके's picture

21 Feb 2019 - 7:16 pm | धर्मराजमुटके

ऑनलाईन मधे शामळू नसलेले साहित्य फारच थोड्या प्रमाणावर उपलब्ध आहे. दर दोन मिनिटाने घाणेरड्या शिव्या, पाच मिनिटाने तोंडात तोंड घालणे, सेन्सॉर नसल्यामुळे काय वाट्टेल तो धींगाणा हे सर्व प्रकार एकटे प्रौढ बघू शकतात पण कुटूंबासोबत बघायला आपल्याला अजून काही दिवस साधना करुन स्थितप्रज्ञ बनावे लागेल, शिवाय ऑन लाईन साठी चाईल्ड लॉक प्रकार कसा वापरायचा ते समजावून घ्यावे लागेल. तोपर्यंत तरी छत्र्यांना मरण नाही असे म्हणावे लागेल. सगळ्यांक्डे सगळे एक्स्लुजिव. म्हणजे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वर पैसे भरायचे म्हणजे ते उत्तरोत्तर खर्चिक होत जाणार हे नक्कीच. आणि एकदा सवय लागली की मग त्या शिवाय जगणे अवघड होत जानार. थोडक्यात म्हणजे इथून पुढे जन्ता आपल्या कमाईचा एक मोठा भाग मनोरंजनावर खर्च करणार. ज्यादा पैसे मोजून आपण मनोरंजन खरेदी करणार म्हणजे भारतातील बहुसंख्य गट सुबत्तेकडे वाटचाल करतो आहे ह्याचा पुरावा आहे. ह्यात कोणावर टीका करत नाही पण जे वास्तव माझ्या नजरेने समजते ते व्यक्त करण्याचा प्रयत्न आहे. धन्यवाद !

त्या धाग्यावर माझा प्रश्न वेगळा होता.
कायकाय वस्तु घ्याव्या लागतात आणि पुढे दर महिना किती रुपये भरल्यास कोणकोणती दुकाने उघडतात.

लेखात कोणत्या दुकानात कोणता माल आहे यावर चर्चा आहे.
असो.

लई भारी's picture

21 Feb 2019 - 9:27 pm | लई भारी

http://misalpav.com/comment/1026064#comment-1026064
मी थोडाफार अंदाज येईल अशा हिशोबाने काही गोष्टी मांडल्या आहेत.

फायर टीव्ही स्टिक ची किंमत ४००० रुपये असते पण ऍमेझॉन च्या 'Big Indian Sale' मध्ये कॅशबॅक मिळून ती शक्यतो २५००-२७०० ला मिळते. आता तर नवीन रिमोट वाली आलीय किंवा 4K पण आहे, अर्थातच किंमत जास्त.

आपल्याकडे चांगले ब्रॉडबँड असणे ही बेसिक गरज आहे. त्यासाठी महिना किमान १००० रुपये लागू शकतात. फक्त यासाठी इंटरनेट घ्यायचं म्हटलं तर थोडं खर्चिक होऊ शकत.
आता एयरटेल ब्रॉडबँड च्या बऱ्याच प्लॅन सोबत(किंवा व्होडाफोन पोस्टपेड) सोबत प्राईम मोफत मिळते. त्यामुळे तो खर्च वाचू शकतो.

त्यामुळे त्या लेखात चर्चा झाल्याप्रमाणे: स्टिक, HDMI इनपुट असलेला टीव्ही(HD येतोच बहुधा आजकाल किमान), एक HDMI केबल(२००-३०० रु.), चांगले ब्रॉडबँड कनेक्शन आणि ज्या सेवा वापरू त्यांची मासिक/वार्षिक फी या गोष्टी आहेत.

धर्मराजमुटके साहेब म्हणताहेत त्याप्रमाणे आता बऱ्याच सेवा सवलतीचे दर किंवा मोफत कंटेन्ट देत आहेत, पण सवय लागली की दणकून पैसे घेतीलच.
नेटफ्लिक्स बघा ना!
प्राईम पहिल्यावर्षी ५०० रु घेत होते आता १००० आहे. तरी प्राईम मध्ये 'ऍमेझॉन म्युजिक' आणि त्यांच्या शॉपिंग मध्ये प्राईम ला फायदा या गोष्टींमुळे त्यांचं सदस्यत्व बरंच परवडत(शॉपिंग करत असला तर)

दुसरा मुद्दा म्हणजे साधारण आधीच्या पिढीतल्या लोकांना ह्या सेवा वापरणं कटकटीच वाटू शकत. सर्च वगैरे अगदी सोपं नाही आहे अजून सगळ्यांसाठी.
फायर टीव्ही स्टिक चा रिमोट वापरून सर्च करणं त्रासदायक आहे. आणि बॅटरी खूप खातो.
त्याला पर्याय म्हणजे त्यांचं मोबाईल अँप सुद्धा वापरणे. यूट्यूब च integration सुद्धा होत त्यामुळे मोबाईल वरून प्ले-लिस्ट तयार करता येते.

खंडेराव's picture

22 Feb 2019 - 2:49 pm | खंडेराव

बऱ्याच वेळा क्रेडिट कार्ड किंवा फ्लिपकार्टवर हॉटस्टार अगदी स्वस्त किंवा फ्री मिळते - मला पहिले सहा महिने फ्री मिळाले. आता फ्लिपकार्ट प्लस वर पुढचे एक वर्षही फ्री मिळेल. कायम काहीतरी स्कीम असतातच..

धन्यवाद,लइ भारी. धन्यवाद!

पैलवान's picture

22 Feb 2019 - 7:52 am | पैलवान

पाहिले दोन भाग पाहिले. मध्यमवर्गीय मुलींच्या तोंडी जितक्या शिव्या आहेत तितक्या मुलांच्याही तोंडी ऐकल्या नाहीत.
कथानकात विशेष काही नाही. पुढचे भाग पाहिल की नाही शंका आहे.

पैलवान's picture

22 Feb 2019 - 7:59 am | पैलवान

या दोन आवडल्या होत्या.
मिर्झापूर तितकी आवडली नव्हती.
शार्प ऑब्जेक्ट्स पुस्तक वाचलं होतं, मालिका चांगली आहे पण पुस्तक जास्त चांगलं आहे.

लई भारी आणि पैलवान दोघांच्या प्रतिसादात Sharp Objects चा उल्लेख पाहून आनंद जाहला.

त्याच दिगदर्शकाची Big Little Lies देखील बघून घ्या. निकोल किडमन, रीज वेदरस्पून, शैलीन वूडली वगैरे आहेत. दुसरा सीझन मे महिन्यात येईल, त्यात मेरील स्ट्रिपदेखील असेल.

===
जमलेच तर https://www.maayboli.com/node/67808 या माझ्या धाग्याकडेदेखील लक्ष ठेवा.

पैलवान's picture

23 Feb 2019 - 9:49 am | पैलवान

युट्युबवरच गाव लै झ्याक हे एक आहे. मस्त विनोदी मालिका आहे.
सध्यातरी युट्युबवर मराठी नाटकांचं बिंजिंग चालू आहे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

24 Feb 2019 - 11:09 pm | अनिरुद्ध.वैद्य

डी टू एच पेक्षा स्वस्त पडतंय अन जे दाखवलं जाईल तेच बघावं लागेल असली सक्ती नसल्याने प्राईम प्रचंड बघणेबल वाटतंय.

सध्यातरी प्राईमवर एलिमेंटरी नावाची अमेरिकन स्पिन ऑफ शेरलॉकची सिरीज बघतोय. 24 24 भागांचे बक्कळ 6 सिझन्स आहेत.

नंतर जॅक रायन चा प्लॅन आहे.

लई भारी's picture

25 Feb 2019 - 11:58 am | लई भारी

Marvelous Mrs Maisel बघा आवडते का.

सुखी's picture

25 Feb 2019 - 11:17 pm | सुखी

Prime war young Shelden Che 2 seasons आहेत... छान आहे serial

सुधीरन's picture

1 Mar 2019 - 11:07 am | सुधीरन

मोबाईलवर एमएक्स प्लेयरमध्ये खूपसं ऑनलाईन कंटेंट चकटफू पहावयास मिळते. काही डाउनलोड करूनही पाहता येते.

पैलवान's picture

8 Apr 2019 - 12:59 pm | पैलवान

आता फक्त 250 रुपयांत महिनाभर चालणार नेटफ्लिस, भारतीयांसाठी सर्वात स्वस्त प्लान
नेटफ्लिक्सचा हा नवीन प्लान केवळ मोबाईल आणि टॅब्लेट युजर्ससाठी आहे. 250 रुपयांच्या या प्लानमध्ये एचडी किंवा अल्ट्रा एचडी कंटेंट मिळणार नाही. तसेच एकावेळी एकाच डिव्हाईसवर नेटफ्लिक्स वापरता येणार आहे. नेटफ्लिक्सचा हा जगभरातला सध्याचा सर्वात स्वस्त प्लान आहे. आतापर्यंत नेटफ्लिक्सचे 500,650 आणि 800 रुपये असे तीन वेगवेगळे प्लान होते.