तुम्ही अजूनही केबल/ टाटा स्काय / डिश tv असे वापरता कि ऑनलाइन tv ला शिफ्ट झाले आहेत?

Primary tabs

खंडेराव's picture
खंडेराव in काथ्याकूट
19 Feb 2019 - 5:33 pm
गाभा: 

आम्ही आधी टाटा स्काय वापरायचो. आवडती चॅनेल्स जवळ जवळ ६०० रुपये महिना पडायची. घरातला TV संच मोठ्या स्क्रीनचा पण नॉन स्मार्ट आहे.

ऍमेझॉन ने फायर स्टिक बाजारात आणल्यावर आम्ही ती पहिल्याच आठवड्यात विकत घेतली, आणि लक्षात आले, हे प्रकरण टाटा स्काय पेक्षा फारच चांगले आहे.
१. जुना TV स्मार्ट झाला.
२. भरपूर सिनेमे, सिरिअल्स यांचे कलेक्शन मिळाले.
३. youtube TV वर बघता यायला लागले.
४. सगळ्यात मोठा फायदा - शून्य जाहिराती.

तेव्हा गेम ऑफ थ्रोन्स ची चलती होती, म्हणून हॉटस्टार चे एक वर्षाचे पैसे भरून तेही आमच्या TV वर दिसू लागले. prime आणि हॉटस्टार मिळून इतके कन्टेन्ट मिळाले कि आम्ही टाटा स्काय काढायचा निर्णय घेतला. एका महिन्यानंतर नार्कोस मुळे नेटफ्लिक्स सुद्धा सुरु झाले.

आता, आम्ही हे तीन वापरतो - prime , हॉटस्टार आणि नेटफ्लिक्स, आणि घरातल्या सगळ्यांच्या आवडीचे कार्यक्रम बघता येतात, सगळ्या भाषांमध्ये! अगदी मसाला सिनेमा पासून मराठीतल्या अस्तु सारख्या आशयगर्द सिनेमांना ऍक्सेस मिळाला. थिएटर मध्ये जाऊन सिनेमा बघण्याची गरज पूर्ण संपली.

यातला खर्च -
१. टाटा स्काय ला आम्ही ६०० रुपये द्यायचो महिन्याला
२. वरच्या तीन ला मिळून ४०० रुपये लागतात.
३. इंटरनेट, जे आम्ही तसेही वापरायचो, महिन्याला 900 लागतात - यात ५० MB वेग आणि अनलिमिटेड डेटा आहे. आणि कामाची गरज म्हणून आम्ही २ इंटरनेट सर्विस प्रोविडर ठेवले आहेत, त्यामुळे हा खर्च मी ० गृहीत धरतोय.

तर, असे आमचे पैसे आणि मौल्यवान वेळ, जो जाहिरातींमध्ये जायचा दोन्हीही वाचत आहे. आणि, जागतिक सिरियल्स व सिनेमे बघायला मिळतात जे आपल्या बहुतांशी कन्टेन्ट च्या तुलनेत खूपच चांगले आहेत ( नार्कोस, GOT , मार्वलस मिस मेसाईल्स, यंग शेल्डन, बिग बँग थेअरी, माईक अँड मौली आणि इतर अनेक!)

सध्या अजूनही लोक टाटा स्काय किंवा केबल ला इतके पैसे देतात, ते जर इंटरनेट स्वस्त असलेल्या भागात असतील तर हा उत्तम पर्याय आहे.

प्रतिक्रिया

तुमच्या गरजा आणि आवड पाहता पटण्यासारखे आहे.

---
इंटरनेट फास्ट,स्वस्त आणि चालू हवे मात्र.

सोन्या बागलाणकर's picture

20 Feb 2019 - 2:24 am | सोन्या बागलाणकर

उत्तम पर्याय! दुर्दैवाने अजूनही बहुतांश लोक (खासकरून मागच्या पिढीतील) त्याच त्याच रटाळ मराठी आणि हिंदी मालिका बघण्यात धन्यता मानतात त्यामुळे हा पर्याय तितका रुजेल आणी रुचेल का हे पाहावे लागेल.

खंडेराव's picture

20 Feb 2019 - 12:45 pm | खंडेराव

सध्या हॉटस्टार आणि सोनी वगैरेंच्या अँप्स वर या मालिकाही उपलब्ध आहेत, त्यासुद्धा सर्व भाग आणि बिना जाहिरातींच्या! माझ्या घरातले ज्येष्ठ तिथेच बघताय..मोठा फायदा म्हणजे रोज बघायची गरज नाही, वेळ असेल तेव्हा बघता येते..

श्रीरंग_जोशी's picture

20 Feb 2019 - 2:44 am | श्रीरंग_जोशी

आशयगर्द? कदाचित तुम्हाला आशयघन किंवा आशयगर्भ म्हणायचे असावे.

कॉर्डकटर बनल्याबद्दल अभिनंदन.

खंडेराव's picture

20 Feb 2019 - 12:46 pm | खंडेराव

आशयगर्भ म्हणायचे होते :-)

सरनौबत's picture

24 Feb 2019 - 12:11 pm | सरनौबत

मला वाटलं संजय दत्त चे चित्रपट बघता म्हणून आशय 'गर्द' म्हणालात ;-)

लई भारी's picture

20 Feb 2019 - 8:28 am | लई भारी

मला पण व्यक्तिशः टाटा स्काय चालू ठेवण्यात काही अर्थ वाटत नाही आहे. घरच्यांना वळवायचे प्रयत्न करतोय पण सध्या दोन्ही चालू आहेत.
वरच्या ३ सर्व्हिस मिळून ४०० मध्ये कसे काय होऊ शकत? की तुम्ही नेटफ्लिक्स ८०० चा प्लॅन ४ लोकांमध्ये वाटून घेतलाय? नेटफ्लिक्स एकट्याने घेणे शक्य नाही, खूप महाग आहे.
रच्याकने, टाटा स्काय चा रेकॉर्डिंग बॉक्स असल्यामुळे जाहिरातींचा मारा कमी करता येतो. मात्र लाईव्ह नाही :)

खंडेराव's picture

20 Feb 2019 - 12:48 pm | खंडेराव

४ जणांचा प्लॅन आहे, तो २०० प्रति महिना पडतोय.
हॉटस्टार आणि प्राईम दोन्ही प्रत्येकी ८०/९० रुपये महिना आहेत.

जर घराचे स्टार समूहाच्या मालिका जास्त बघणारे असतील तर हॉटस्टार घेऊन बघा, हळू हळू शिफ्ट होतील..

जग झपाट्याने बदलतंय काही दिवसांनी आपोआप केबल, डिश बंद होणार आहे आता परिवर्तन प्रधम स्तरावर आहे

सोन्या बागलाणकर's picture

21 Feb 2019 - 2:19 am | सोन्या बागलाणकर

एकंदरीत amazon सगळ्यांचे धंदे बसवणार म्हणता!
तसेही हे होणे गरजेचेच आहे. आतापर्यंत या डिश/केबलवाल्यानी मनमानी करून लोकांकडून भरमसाठ पैसे उकळले.

now it's payback time!

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Feb 2019 - 2:30 am | डॉ सुहास म्हात्रे

जोपर्यंत, लोकप्रिय टिव्ही चॅनल्सचे सर्व प्रोग्रॅम्स (विशेषतः सिरियल्स व रिअ‍ॅलिटी शोज), नेटवर (विशेषतः ब्रॉडबँडवर) रियल टाईम / स्ट्रिमिंगने मिळत नाहीत, तोपर्यंत केबल/डिटिएच ला मरण नाही.

सिरियल्स व रिअ‍ॅलिटी शोज पाहणारी मंडळींची बहुसंख्या आहे हे विसरून चालणार नाही.

वरील म्हणण्यात बर्‍याच त्रुटी आहे :
1. कोणतेही reality shows or daily soaps live nasun recorded असतात.
2. Firestick हा streaming platform आहे.
3. Firestick, Android बॉक्स ह्यामुळे चॅनल ने दिलेल्या वळेल बांधिल नसतो ⏰, आपल्या सवडीने सर्व Daily soaps व reality shows बघता येतात. हो अगदी सर्व चॅनेल्स बघता येतात, live न्यूज आणि मॅच सुध्दा.

जाता जाता, Netflix Hotstar आणि prime असताना तेचतेच रटाळ Daily सोप बघणे माझ्या आकलन शक्ति पलीकडे आहे.

प्रसाद_१९८२'s picture

17 Mar 2019 - 8:22 pm | प्रसाद_१९८२

डॉ. म्हात्रे सरांना कदाचित असे म्हणायचे असावे की कोणतीही सिरियल किंव्हा रियालिटी शो आधी केबल/डिटिएच वर प्रसारित होतो मग इतर स्ट्रिमिंग प्लेटफॉर्मवर. असे प्रोग्राम, स्ट्रिमिंग प्लेटफॉर्मवर जोपर्यंत रियल टाईम मधे प्रसारित होत नाहीत तो पर्यंत केबल व डिटिएचला मरण नाही.

पाषाणभेद's picture

20 Feb 2019 - 2:09 pm | पाषाणभेद

अ‍ॅमेझॉन म्हणते आहे की, "Connect Amazon Fire TV Stick to your HDTV and start streaming movies, TV shows and songs from Amazon Prime Video, Hotstar, Netflix, Gaana and many more ...."

तर या आगदुचीकाठीसाठी जास्त घनतेचा दुरचित्रवाणी संचाची आवश्यकता असते काय? कमी घनतेचा दुरचित्रवाणी संच चालू शकणार नाही काय?

खंडेराव's picture

20 Feb 2019 - 3:14 pm | खंडेराव

माझ्या माहितीप्रमाणे - तुमच्या टीव्हीला HDMI पोर्ट असणे पुरेसे असावे. ते असे असते -

https://www.google.com/search?q=tv+hdmi+port&safe=active&rlz=1C1GGRV_enI...६१०

जर माहितीत कोणाकडे स्टिक असेल तर तरी करून बघा.

सोन्या बागलाणकर's picture

21 Feb 2019 - 2:15 am | सोन्या बागलाणकर

कुठल्याही रेसोलुशनचा tv चालेल फक्त चित्राचा स्पष्टपणा कमीजास्त असेल.
शिवाय hdmi पोर्ट नसेल तर hdmi to rca connector मिळतं बाजारात ते वापरूनही काम होऊ शकतं.

चौथा कोनाडा's picture

20 Feb 2019 - 4:20 pm | चौथा कोनाडा

आगदुचीकाठी...... मस्त शब्द ! :))

त्यापेक्षा सरळ आगपेटी म्हणा असे सुचवतो

5 वर्षा पुर्वी एलसीडी टीव्ही घेतला पण केबल, डिश काही घेतले नाही, भरमसाठ पैसे भरून (2000 प्रति महिना- पगार 18500 प्रती महिना ) airtel चे इंटरनेट घेतले. त्यावरून torrent वापरून चांगले चित्रपट व टीव्ही सिरीज डाऊनलोड करून टीव्ही वर usb द्वारे बघायचो.
नंतर firestick आले आणि सगळेच बदलले. Pirated content पूर्ण बंद केले बघायचे, 43" full hd led घेतला, इंटरनेट ही स्वस्त झाले.
सध्या Netflix, hotstar आणि prime सुरू आहे, गरजेनुसार hotstar सुरू बंद करतो(मॅचेस, got इत्यादी).
अतिशय उत्तम content, चांगल्या क्वालिटी मध्ये बघण्याची सवय झाल्याने आता पुन्हा डिश, केबल वैगेरे कडे वळणे अशक्य.

इंटरनेट आणि इतर महिना फी( नेटफ्लिक्स हॅाटस्टार वगैरे) धरून रु ५००/१०००/२००० मध्ये कायकाय करमणूक मिळू शकते यावर धागा काढा कुणी.

पियुशा's picture

21 Feb 2019 - 10:51 am | पियुशा

firestick लय भारी ओप्शन आहे , अमेझोन ,नेटफ्लिक्स वर तर ख्जाना आहे वेब सेरिज , मुव्हिज चा
लहान मुलासाठीसुद्धा बरच काय काय आहे मला तर खुप आवडलय :)

प्रचेतस's picture

21 Feb 2019 - 11:42 am | प्रचेतस

अभिनंदन पिवशे :)

का रे दादुसअन्भिनन्न्दन ? :०

खंडेराव's picture

22 Feb 2019 - 3:03 pm | खंडेराव

माझ्या गेल्या २-३ वर्षातल्या त्रांत्रिक खरेदीतली फायरस्टिक नंबर एक ला..

प्रचेतस's picture

21 Feb 2019 - 11:44 am | प्रचेतस

फायर स्टिक वापरतो, प्राईम आणि हॉटस्टारचं वार्शिक सदस्यत्व देखील आहे. जर घरी उत्तम इंटरनेट बॅण्डविड्थ असेल तरच हे घ्यावे. फुल एचडी मधे बघतना मजा येते.

लई भारी's picture

21 Feb 2019 - 12:04 pm | लई भारी

जवळपास सगळे हिंदी मराठी शो/सिरीयल मिळतात स्ट्रीमिंग ऍप वर. बहुधा थोड्या उशिराने येतात लाईव्ह शो.

voot - कलर्स हिंदी/मराठी (मोफत आहे)
zee 5 : झी मराठी आणि झी वर आलेले नवीन चित्रपट. बहुधा झी(हिंदी) चे पण आहे कंटेन्ट. (५० रु महिना बहुधा, पण बरेच शो मोफत पण मिळतात)
हॉटस्टार - स्टार नेटवर्क च्या सिरीयल/शो आणि बऱ्यापैकी स्पोर्ट्स (९९९ रु. वार्षिक)
sony liv : सोनी मराठी, सब, सेट(केबीसी, कपिल शर्मा शो दिसतंय). वापरलं नाही.
ही सगळी ऍप(इतर पण आहेतच, प्राईम, नेटफ्लिक्स आणि युट्युब सह) फायर टीव्ही स्टिक वर मस्त चालतात.

Jio TV -चिक्कार कंटेन्ट दिसतंय पण बहुधा फक्त मोबाईल वरच चालतंय

आपल्या सोयीनुसार बघता येतात हा खूप मोठा फायदा आहे. आणि साधारण १००० रुपयांमध्ये चांगल ब्रॉडबँड कनेक्शन मिळू शकत आजकाल.
१५-२०Mbps पुरतो स्पीड(प्रत्यक्षात यायला हवा).
भरपूर वेळ(४ तास?) घालवणार असाल, ते पण HD मध्ये तर महिन्याला किमान २००-३००GB चा प्लॅन पाहिजे.

आता 4G मोबाईल डेटा वर कितपत नीट चालतंय हे बघायला हवं, कारण दिवसाला १-१.५GB जवळपास सगळ्यांच्या प्लॅन मध्ये आहेच. त्यामध्ये तस तासभरच चालेल म्हणा.

वगिश's picture

21 Feb 2019 - 9:16 pm | वगिश

Jio Cinema Firestick वर आहे.

लई भारी's picture

21 Feb 2019 - 9:31 pm | लई भारी

ते वापरतोच, पण Jio TV नाही सापडलं.
Jio Cinema वर टीव्ही चे कार्यक्रम बहुधा नाही आहेत.

समीरसूर's picture

21 Feb 2019 - 10:26 pm | समीरसूर

एवढं सगळं कंटेंट बघायला वेळ आहे? आणि आधीच कमी असलेला वेळ एवढं कंटेंट बघण्यात घालवायचा?

अजूनही आपल्याकडे मालिका नियमितपणे बघणारे आणि त्याभोवती आपले दैनंदिन जीवन गुंफणारे लोक खूप मोठ्या प्रमाणात आहेत. माझ्यामते अजून तरी ९०% लोक नियमितपणे टीव्ही बघतात. नेहमीची कामे करता करता टीव्ही बघता येतो; खूप बारकाईने लक्ष देऊन बघायची गरज नसते. हा प्रेक्षकवर्ग ठराविक साच्याच्याच मालिका बघणं पसंत करतो. हा प्रेक्षकवर्ग पस्तिशीच्या पुढे आहे. त्यामुळे केबल/डिश टीव्हीला माझ्यामते अजून किमान २०-२५ वर्षे तरी मरण नाही असे मला वाटते. आता साठीत असणारे प्रेक्षक अजून जवळपास १५-२० वर्षे तरी मालिका बघणारच आहेत.

मला एका दृष्टीने ते बरे वाटते. ठराविक वेळेत माफक मनोरंजन बघून मोकळे व्हायचे. एक शिस्त आहे. तासंतास, रात्रभर, सिझन पाठोपाठ सिझन, येता-जाता बिंज वॉचिंग करायचे हा प्रकार मला भयानक वाटतो. आपल्यातली सगळी ऊर्जा शोषून घेणारा हा प्रकार आहे. बकाबका वेळ खाणारा बकासूर आहे हा...

चित्रपट - मी नेहमी थिएटरला जाऊनच बघतो. ती मजाच निराळी! आतापर्यंत कधीही डाऊनलोड करून चित्रपट पाहिलेले नाहीत.

कुठल्याही साधन-सामुग्रीची अमर्याद उपलब्धता आपली किंमत वसूल केल्याशिवाय राहत नाही!

लई भारी's picture

22 Feb 2019 - 11:19 am | लई भारी

कुठल्याही साधन-सामुग्रीची अमर्याद उपलब्धता आपली किंमत वसूल केल्याशिवाय राहत नाही!

अगदी खरं आहे. पण शेवटी आपण कसा वापर करू त्यावर आहे सगळं. आपल्या दिमतीला आहे सगळं, मग आहारी जायचं की 'मापात' वापरायचं हे भान निश्चित ठेवायला पाहिजे.

समीरसूर's picture

25 Feb 2019 - 11:06 am | समीरसूर

मुबलक उपलब्धता असल्यामुळे कित्येकांना 'मापात' रहायला आवडतं पण बहुतेकांना जमत नाही. "पुढचा एकच भाग बघून बंद करू...एवढा इंटरेस्टिंग भाग कसा सोडायचा?..." असं म्हणत म्हणत बरीच कामे बाजूला राहतात आणि वेळ मात्र मजबूत जातो.

दोन-चार दिवसांपूर्वी टाईम्सला एक लेख आला होता. आजकाल तरुण मुले-मुली नेहमीची किरकोळ कामे खूप कमी प्रमाणात करतात. मोठ्या लोकांमध्येदेखील हा प्रकार वाढतोय. घर आवरून ठेवणे, कपाट नीट लावणे, कपडे इस्त्री करणे, झाडांना पाणी घालणे, बाजारातून किरकोळ सामान आणणे, पाहुण्यांना घ्यायला-सोडायला जाणे, पाहुणे आल्यास त्यांची व्यवस्था ठेवणे, अंथरुणं आवरून ठेवणे, गरज पडल्यास धुणी-भांडी करणे, घरात मदत करणे, वगैरे वगैरे. ही कामे सतत टाळली जातायेत. याला कारण आजकाल फोफावलेले मोबाईल, सोशल मीडिया, गेम्स, इंटरनेटचे प्रचंड वेड!

आजच्याच टाईम्समध्ये एक सर्वेक्षण आले आहे. लहान मुलांमध्ये गॅजेट्सचे वाढणारे व्यसन! त्यात एक निरीक्षण असे आहे की ज्या घरात पालक स्वत: या व्यसनात गुंतलेले आहेत, त्या घरातली मुलेदेखील या व्यसनाला विनासायास बळी पडतात. या व्यसनाचे दुष्परिणाम आहेतच. बेजबाबदारपणा, आळस, ध्येयांपासून दूर गेलेली नजर, प्रत्यक्ष जगापासून तुटलेला संपर्क, एकलकोंडेपणा, आत्मकेंद्री वृत्ती, लठ्ठपणा, एकाग्रतेचा अभाव, विविध प्रकारच्या शारिरीक आणि मानसिक व्याधी, हट्टीपणा, वगैरे वगैरे. असो.

खंडेराव's picture

22 Feb 2019 - 2:58 pm | खंडेराव

एवढं सगळं कंटेंट बघायला वेळ आहे? आणि आधीच कमी असलेला वेळ एवढं कंटेंट बघण्यात घालवायचा?

हे टीवीलाही लागू होतेच कि.. जेव्हा दूरदर्शन वर एकाच चॅनेल होते तेव्हाही दुसरे आल्यावर हा प्रश्न वाचकाची पत्रे सदरात आला असेल वर्तमानपत्रांच्या :-)

अजूनही आपल्याकडे मालिका नियमितपणे बघणारे आणि त्याभोवती आपले दैनंदिन जीवन गुंफणारे लोक खूप मोठ्या प्रमाणात आहेत. माझ्यामते अजून तरी ९०% लोक नियमितपणे टीव्ही बघतात. नेहमीची कामे करता करता टीव्ही बघता येतो; खूप बारकाईने लक्ष देऊन बघायची गरज नसते. हा प्रेक्षकवर्ग ठराविक साच्याच्याच मालिका बघणं पसंत करतो. हा प्रेक्षकवर्ग पस्तिशीच्या पुढे आहे. त्यामुळे केबल/डिश टीव्हीला माझ्यामते अजून किमान २०-२५ वर्षे तरी मरण नाही असे मला वाटते. आता साठीत असणारे प्रेक्षक अजून जवळपास १५-२० वर्षे तरी मालिका बघणारच आहेत.

हे सर्व स्ट्रीमिंग लाही लागू आहे. नेहमीची कामे करतांना बघता येते, पॉस करता येते. बारकाईने काय, कोणत्याही मालिका बघायची गरज नसावी. तुम्ही दुसरी गल्लत हि करताय, हे दोन्हींचे कंटेंट म्हणजे दोन कंपार्टमेंट नाहीयेत. मालिका ज्या स्टार प्लस च्या आहेत त्या तशाच हॉटस्टार वर आहेत.

मला एका दृष्टीने ते बरे वाटते. ठराविक वेळेत माफक मनोरंजन बघून मोकळे व्हायचे. एक शिस्त आहे. तासंतास, रात्रभर, सिझन पाठोपाठ सिझन, येता-जाता बिंज वॉचिंग करायचे हा प्रकार मला भयानक वाटतो. आपल्यातली सगळी ऊर्जा शोषून घेणारा हा प्रकार आहे. बकाबका वेळ खाणारा बकासूर आहे हा...

टीव्हीला तंतोतंत लागू..ससुराल सिमर का चे २००० वर एपिसोड आलेत :-)

blockquote>चित्रपट - मी नेहमी थिएटरला जाऊनच बघतो. ती मजाच निराळी! आतापर्यंत कधीही डाऊनलोड करून चित्रपट पाहिलेले नाहीत.

शेकडा एक सिनेमा बघायच्या लायक असतो थिएटरात..गैरलागू आहे.

आनन्दा's picture

22 Feb 2019 - 7:36 pm | आनन्दा

कंटेंट ची क्वालिटी जितकी चांगली तितका तो इंटेन्स असतो..
करण थोडेसे दुर्लक्ष झाले तरी डिटेल्स सुटायची शक्यता असते.

त्यामाणे डेलीसोप चांगल्या.. एखादा आख्खा एपिसोड चुकला तरी काहीही फरक पडत नाही..

मी घरी बायको असली की डेलीसोप बघतो, नसेल तेव्हा नाही बघत.. आठ दिवसाचा गॅप पडला तरी सिरीयल तिथेच असते.. वेब मालिका अश्या असतात का?

खंडेराव's picture

22 Feb 2019 - 11:17 pm | खंडेराव

मालिका या कायम उपलब्ध असतात. तुम्ही आज एक भाग बघायचा चुकले तर सहा महिन्यांनी बघून पुन्हा पुढचे भाग बघू शकता..

उगा काहितरीच's picture

22 Feb 2019 - 9:18 am | उगा काहितरीच

Amazon fire stick आणि Google chromecast यापैकी काय घ्यावं ? नुकताच HD TV घेण्यात आला आहे. वरची चर्चा वाचुन डिश/ टाटा स्काय न घेता हॉटस्टार वगैरे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाटी Amazon fire stick आणि Google chromecast यापैकी काय चांगलं राहिल ?

मी क्रोमकास्ट खूप आधी वापरला होता पण आता सुद्धा बहुधा तसाच interface आहे.
महत्वाचा फरक म्हणजे क्रोमकास्ट वापरण्यासाठी नेहमी कुठलंतरी डिव्हाईस पाहिजे ज्यावरून कास्ट करायचं आहे. म्हणजे मोबाईल/टॅब्लेट/लॅपटॉप. आता काहीजणांना हेच सोयीचं वाटू शकत.
एका रिव्ह्यू मधलं वाक्य बघा:

The Chromecast (2018) is a Rs 3,499 streaming media player that supports apps like Netflix, Hotstar, YouTube and more. But there is no support for Amazon Prime Video.

दुसरीकडे फायर टीव्ही स्टिक ला रिमोट आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे रिमोट कटकटीचा आहे पण जुगाड आहेत उदा. मर्यादित 'voice command' चा वापर किंवा मोबाईल अँप वरून रिमोट वापरणे(ज्यामध्ये पूर्ण किबोर्ड वापरता येतो). त्यामुळे रिमोट वापरून मोबाईल च्या वापराशिवाय स्टिक वापरता येऊ शकते. मला ते जास्त intuitive वाटत. आणि मोबाईल वरून यूट्यूब तरी कास्ट करता येत. बाकी फोन अक्खा कास्ट करता येत नाही हा तोटा आहे(म्हणजे तसे 3rd party apps निश्चित असतील, मी तरी नाही वापरलं आणि गरज नाही वाटली)
स्टिक वर यूट्यूब च अँप officially नाही आहे, पण काही 3rd party apps यूट्यूबची लिंक वापरून ब्राऊजर मध्ये ओपन करतात आणि आपल्याला फरक सुद्धा कळत नाही एवढं smooth चालतं.

त्यामुळे माझं मत तरी स्टिक ला आहे.

रच्याकने, तुम्ही नवीन टीव्ही घेतला तो नॉन-स्मार्ट आहे का? कारण स्मार्ट टीव्ही हे खूपच कॉमन झालय आणि त्यामुळे वरच्या दोन्ही पर्यायांची गरजच उरत नाही.
माझ्या माहितीप्रमाणे अगदी अलीकडे पर्यंत LG webos मध्ये हॉटस्टार मात्र नाही आहे :)

उगा काहितरीच's picture

22 Feb 2019 - 12:32 pm | उगा काहितरीच

धन्यवाद !

TV smart आहे पण त्याचा UI वगैरे खूप गैरसोईचा वाटत आहे. म्हणून वरच्या पर्यायाचा विचार चालु आहे.

खंडेराव's picture

22 Feb 2019 - 3:01 pm | खंडेराव

+ १. माझा अनुभव अगदी चांगला आहे. रिमोट मजबूत ब्याटरी खातो हे सोडून दुसरा कोणताही निगेटिव्ह अनुभव नाही..

हे दोन वेगवेगळे उत्पादन आहे, तुलना होऊ शकत नाही. Firestick हा standalone streaming platform आहे, Chromecast हे तुमचा मोबाईल स्क्रीन TV वर कास्ट (प्रक्षेपित) करण्यासाठी आहे.
Firll

खंडेराव's picture

22 Feb 2019 - 3:06 pm | खंडेराव

आम्ही गेल्या २ वर्षात किमान २५ चांगले इतर भारतीय भाषांमधले सिनिमे बघू शकलो, मल्याळम, बांगला आणि तामिळ..
आईला नाटके आवडतात, हॉटस्टार वर खूप चांगले भारतीय भाषांमधील नाटकांचे कलेक्शन आहे ते पहिले..

केबल/ टाटा स्काय / डिश tv असे वापरता कि ऑनलाइन tv . यापैकी आपल्याकडे काहीच नाही.. बरेच पैसे वाचतात आणि डोक्याला शांतता मिळते

कुमार१'s picture

10 Mar 2019 - 9:03 pm | कुमार१

विकास,
१. तुम्ही या अवस्थेला पोचला असाल तर अभिनंदन ! डोळे व डोक्याला शांतता खरेच. याचा अर्थ तुम्ही घराबाहेर पडून खेळ वा इतर करमणूक करीत असावेत. छान.

२. मी संयम ठेवून या जाल प्रकारांचा आनंद घेतो. महिन्यातून १० दिवस NF व U T पासून पूर्ण अलिप्त, तर १५ दिवस टीव्हीला हातही लावत नाही.

३. दिवसात ३ तास रेडिओ (काम व व्यायाम करताना) ही माझी सर्वात आवडती करमणूक.

समीरसूर,
सहमत. चांगली करमणूक मुबलक मिळाली की व्यसन लागते हे मान्य. त्यामानाने टीव्ही चा दर्जा व जाहिरात-व्यत्यय बघता माणूस त्याला जास्त चिकटत नाही. तरीसुद्धा हे वय व व्यक्तीसापेक्ष आहेच.

इतर सदस्यांनी चांगली नवी तांत्रिक माहिती (ते आगकाठी, इ) अनेक आभार. माहितीत भर चांगली.

सुखी's picture

25 Feb 2019 - 10:47 pm | सुखी

Android box ha सुद्धा एक उत्तम पर्याय आहे, अमेझॉन किंवा गूगल अस कुणाच्या अंगचटीला जायची गरज नाही

लई भारी's picture

26 Feb 2019 - 8:44 am | लई भारी

हे जरा इस्कटून सांगाल का?
म्हणजे वरती चर्चिलेल्या गोष्टींसाठी कुठला Android box चांगला पर्याय आहे? साधारण किंमत काय आहे? यांच्या तुलनेत काय फायदा आहे?
हे कंटेन्ट कसं बघायचं? किंवा अजून काही पर्याय आहे का ऑनलाईन शो/चित्रपट बघण्यासाठी?

सुखी's picture

27 Feb 2019 - 10:04 pm | सुखी

Fire stick la पर्याय आहे, वर सांगिल्याप्रमाणे Chromecast hi वेगळीच system असून, त्याला sourcing device म्हणून मोबाईल अथवा दुसरं device लागतं.

Fire stick la ji os aste to Amazon chya control madhye aste, an apla त्याच्यावर काही कंट्रोल नसतो, एखादं अॅप अमेझॉन वाले ब्लॉक करू शकतात.

अँड्रॉइड बॉक्स हा एक जवळपास without screen Android phone असतो. त्यावर गूगल play warch almost सगळी entertainment chi apps download करून वापरता येतात. याची किंमत 3हजारापासून सुरू होऊन 20000 पर्यंत जाते...

घरगुती वापरासाठी 3k wala योग्य आहे je 2gb ram an 16gb internal memory sobat येईल. मी पण हाच वापरतो.
माझ्याकडे नुसता led lcd TV ahe jo budhdhu ahe, त्याला या बॉक्स मुळे स्मार्ट करता आलं.

आता त्याच्या peripherals connectivity बद्दल थोडेसे, तुम्ही त्याला कीबोर्ड, माऊस, एअर माऊस, hdmi, component out, optical out, USB ports, ir ports for remote असतात.

Usb पोर्ट मुळे external HDD laun हवा तो content TV war बघू शकता... Wistarbayastav इथेच थांबतो.

पैलवान's picture

28 Feb 2019 - 2:35 pm | पैलवान

Wistarbayastav इथेच थांबतो.

तुम्ही रशियात मुक्काम केलात की काय असं वाटून गेलं!

सुखी's picture

28 Feb 2019 - 10:26 pm | सुखी

खी खीं खी

अभ्या..'s picture

7 Mar 2019 - 9:26 pm | अभ्या..

मारमीक बोललास्की

पैलवान's picture

7 Mar 2019 - 11:46 pm | पैलवान

:P

युएसबी वाइफाइ अडॅप्टर वापरून साधा स्मार्ट नसलेला टिवी ( युएसबी पॅार्ट असलेला) स्मार्ट होतो का? मोबाइलमधले कॅान्टेन्ट टिविवर दिसते का?

वगिश's picture

28 Feb 2019 - 7:53 am | वगिश

नाही, HDMI पोर्ट असलेलेच टीव्ही स्मार्ट होऊ शकतात

सुखी's picture

28 Feb 2019 - 10:10 am | सुखी

USB port नाही, पण टीव्ही ला dvd player Che ports असतील तर Android box ना स्मार्ट करता येईल

सुबोध खरे's picture

28 Feb 2019 - 10:42 am | सुबोध खरे

मी दिवसात फक्त सात तास काम करतो( जाण्यायेण्याचा वेळ जास्तीत जास्त १५ मिनिटे) तरीही मला दूरचित्रवाणी पाहायला वेळ मिळत नाही.
लोकांना सिरीयल किंवा नेट कन्टेन्ट पाहायला वेळ कसा मिळतो हेच एक कोडे आहे.
मी निवृत्त लोकांचे म्हणत नाहीये.
माझ्याकडे दोन FULL HD LED दूरचित्रवाणी संच आहेत १ ५५ इंचाचा आणि दुसरा ४२ इंचाचा. घरात ५० एम बी पी एसचा अमर्यादित रुंद पट्टा आहे. तरीही अजून क्रोमकास्ट किंवा फायरस्टिक घ्यावी असे वाटत नाही.

कदाचित मनोरंजन, विरंगुळा, छंद यासाठी तुम्ही दुसरे काही करत असणार,
किंवा TV बघणे हे तूच्छ / cheap लोकांचे लक्षण असून स्वतः ला तुम्ही उच्च अभिरुची असणारे समजत असणार.

सुबोध खरे's picture

30 Mar 2019 - 12:44 pm | सुबोध खरे

नाही हो. इतका हुच्चभ्रू नाही मी

टीव्ही वरच ३०० चॅनेल आहेत त्यात ४५-५० एच डी चॅनेल आहेत.

वैद्यकीय साहित्य, विविध विषयाचे वाचन, मिपा, संगणक, शेअर बाजार आणि सार्वजनिक न्यास (व्हॉट्स अँप) यातून वेळ मिळतो त्यात डिस्कव्हरी, नॅट जिओ किंवा क्रिकेट मॅच एवढेच टीव्ही वर पाहतो.
एवढं सोडून अधिक कुठे आणि कसं करायचं?

माध्यमाचा उपयोग माहितीसाठी नक्कीच आहे पण त्यावेळेस गरज पडेल तेव्हा युट्युब विडिओ बघतो. मोबाइल माध्यम आणि रोज चार जीबी पुरतं. टिविवर फक्त मोठे दिसते.

करमणूक म्हणून काहींना गरज असते. तेव्हा मोठा पडदा ओके. मराठी मालिकांमध्ये संवाद महत्त्वाचे असतात. परदेशी चित्रपटांत अॅक्शन.

लई भारी's picture

17 Mar 2019 - 8:41 am | लई भारी

जुना धागा उकरून काढतोय :)
या विषया संदर्भातली ही बातमी बघा.

https://www.loksatta.com/manoranjan-news/over-the-top-in-entertainment-1858974/

चौथा कोनाडा's picture

18 Mar 2019 - 12:59 pm | चौथा कोनाडा

@लई भारी , माहितीपुर्ण लेख आहे. पुढील दिवस याण्चेच असतील याअत शन्का नाही !

खंडेराव's picture

18 Mar 2019 - 2:49 pm | खंडेराव

चांगला लेख, आपल्या इथल्या चर्चेतले बरेच मुद्दे आहेत.

"आधी प्रेक्षक सवयीने मालिका ज्या वेळी प्रसारित होते, त्याच वेळेत ती पाहायचे. आता याचे प्रमाण सुमारे ७५ टक्क्यांनी कमी झाले असून मालिकांचे पुन:प्रसारित भाग किंवा पाहायचे राहिलेले भाग ‘ओटीटी’वर जाऊन पाहणारा प्रेक्षकवर्ग वाढला आहे"

हा ७५% आकडा चुकीचा वाटतोय, प्रमाण कमी झाले असावे हे नक्की..

स्नेहांकिता's picture

18 Mar 2019 - 11:51 am | स्नेहांकिता

कुणीतरी या अग्निकांडी/ अग्निखोका आणि अँड्रॉईड खोका याबद्दल तपशिलात सांगेल काय ?
यासाठी काय काय साहित्य लागते आणि कुठे कुठे काय काय जोडावे लागते ?
(केबल आणि डीटीएच मुळे संत्रस्त) स्नेहा.

प्रचेतस's picture

18 Mar 2019 - 1:18 pm | प्रचेतस

वायफाय आधारित कमीत कमी ४ एमबीपीएस वेग असलेले अमर्यादित इंटरनेट, एचडीएमआय पोर्ट असलेला एलसीडी/एलईडी टिव्ही.

फायर स्टीक टीव्हीच्या एचडीएमआय पोर्टला जोडून कॉन्फिग्यर करायची. सोपे आहे खूप.

खंडेराव's picture

18 Mar 2019 - 2:46 pm | खंडेराव

तुमचे जर ऍमेझॉन अकाउंट असेल तर फायर स्टिक अकाउंट लिंक होऊनच आलेली असते. तिला फक्त घरातील वाय फाय शी कनेक्ट करावे लागते. एक इलेक्ट्रिक सॉकेट लागते विजेसाठी, जे टीव्ही जवळ असतेच बहुतेक वेळा.

५ मिनिटात सेट अप पूर्ण होऊन तुम्ही बघायला सुरुवात करू शकता..

घरातले चारपाच लोक - आई वडील ,मुले स्मार्ट टिवी / इंटरनेट आधारित विडिओ / स्टि्रिमिंग करून कार्यक्रम बघतील तर रोजचा ८ - १० जिबी डेटा लागेल ना?

खंडेराव's picture

18 Mar 2019 - 2:43 pm | खंडेराव

कमी डेटा मधेही भागेल. फायर स्टिक मध्ये quality कंट्रोल करायची सोय आहे. तुम्ही तुमच्या इंटरनेट पॅक नुसार मॅनेज करू शकाल.. दिवसाला २-३ जीबी पुरावा..
मला महिन्याला ८५० जीबी डेटा मिळतो, त्यातला २०० सुद्धा वापरला जात नसावा सर्व पकडून

स्नेहांकिता's picture

18 Mar 2019 - 4:49 pm | स्नेहांकिता

Android बॉक्स बद्दल कुणी सांगू शकेल काय ?

अजय देशपांडे's picture

18 Mar 2019 - 6:22 pm | अजय देशपांडे

हो मी सध्या वापरत आहे ..,,,, साधारण किमत 2500 ते 3500 या रेंज मध्ये मिळतो वापरण्यासथी अतिशय सोपा , वायरलेस कीबोर्ड माऊस वापरता येतो
नेट वापरता येते मोबाइल फोन कास्ट करता येतो

अतिशय छान आहे वापरा

स्नेहांकिता's picture

18 Mar 2019 - 8:55 pm | स्नेहांकिता

यावर काय काय पाहता येते नि तो टीव्ही व ब्रॉडबँड ला कसा जोडतात ?

पैलवान's picture

19 Mar 2019 - 7:55 am | पैलवान

सिपीयू मोठ्या टीव्हीला जोडलाय असा विचार करा.
हा झाला विंडोज बॉक्स.

आता एक अँड्रॉइड स्मार्टमोबाईल(स्क्रीन नसलेला) मोठ्या टीव्हीला जोडलाय अशी कल्पना करा. याला अँड्रॉइड बॉक्स म्हणता येईल.

किंवा अँड्रॉइड बेस्ड सेटटॉप बॉक्स पण डिशऐवजी इंटरनेट कनेक्शनवर चालणारा.

यात युट्युब, अमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, अल्ट बालाजी असे ऑनलाईन स्ट्रीमिंग चे अँप मोबाईल सारखे इन्स्टॉल करायचे. (बऱ्याचदा प्रीलोडेड असू शकतात).

हा वायफायने इंटरनेटला जोडायचा, hdmiने टीव्हीला जोडायचा अन करायचं सुरू.

यात फारसे ब्रँडेड पर्याय दिसले नाहीत आता.
1
काही वर्षांपूर्वी लेनोवो ने एक आणला होता. अजूनही मिळतो पण अँड्रॉइड ५ लॉलीपॉपवर असल्याने फारच आउटडेटेड आहे.
1

मुळात फायरस्टिक, क्रोमकास्ट, अँड्रॉइडबॉक्स, हे नॉनस्मार्टटीव्हीसाठी आहेत.
स्मार्टटीव्ही असेल तर यातील कशाचीही गरज नाही.
त्यावर थेट अँप टाकून किंवा मोबाईल कास्ट करून बघता येईल.
1

स्नेहांकिता's picture

19 Mar 2019 - 12:22 pm | स्नेहांकिता

ओक्के आणि धन्स पैलवानजी.
यापैकी फायरस्टिक अधिक उपयुक्त आणि वापरण्यास सुटसुटीत आहे की अँड्रॉईड बॉक्स ?

स्नेहांकिता's picture

19 Mar 2019 - 12:25 pm | स्नेहांकिता

आणखी म्हणजे समजा सोनी मराठीचे किंवा न्यूज चॅनलचे अ‍ॅप डालो केले तर लाइव्ह कार्यक्रम पाहता येतील का ?

लई भारी's picture

5 Apr 2019 - 12:17 pm | लई भारी

माझ्या माहितीप्रमाणे बरेच न्यूज चॅनेल लाईव्ह बघता येतात. टीव्ही शोज लाईव्ह माझ्या पाहण्यात नाही, पण हॉटस्टार वाल्यानी जाहिरात केलीय की टीव्ही च्या आधी बघा म्हणून. किमान त्या दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी बघता येतात असा अनुभव आहे.

सध्या हॉटस्टार ची चांगली ऑफर चालू आहे. मी आधीच प्रीमियम घेतलंय; नाहीतर भारतीय प्रेक्षकांसाठी हा बेस्ट प्लॅन आहे.

Hotstar VIP – ₹365/year
Live Sports: Including Cricket, Premier League & Formula 1
Latest episodes of Indian TV Shows at 6 AM everyday
New Indian Movie Premieres
Exclusive Hotstar Specials

https://www.hotstar.com/subscribe/get-started

मला एकंदरीत ऍमेझॉन स्टिक हा चांगला पर्याय वाटतो. अँड्रॉइड बॉक्स मी वापरला नाही, पण मी काही गोष्टींचा विचार केला
एक म्हणजे कन्टेन्ट साठी कुठले तरी पेड अँप घ्यावे लागणारच. मग ज्याच्यावर सपोर्ट चांगला मिळेल(विनासायास अपडेट वगैरे) तो पर्याय बरा म्हणजे नंतर काही कटकट नाही. दुसरं म्हणजे आपण खरेच सगळे फिचर वापरणार आहोत का बॉक्स चे? म्हणजे तुम्हाला अगदी घरगुती रिमोट वाला सेटअप चालणार असेल आणि कीबोर्ड, माउस, हार्ड डिस्क ची गरज नसेल तर स्टिक बेस्ट आहे. तसंही आजकाल टोरंट वगैरे वापरायचं प्रमाण कमी होतंय.

आणि मी तरी ऑनलाईन बघायचं तर चांगली क्वालिटी असेल तरच बघतो, म्हणजे पायरेटेड चित्रपट(थेटरात आल्यावर लगेच वगैरे) ची गरज मला तरी नाही त्यामुळे इंटरनेट कनेक्शन चांगले आणि किमान २००-३०० GB महिन्याला हवे असे माझे मत आहे. (मी गाणी पण यूट्यूब वरच ऐकतो बहुतांश वेळा)
मी स्टिक AVR ला जोडलीय आणि आजकाल बरेचसे content provider Dolby/5.1 साउंड आउटपुट देतात जे माझ्यासाठी बरे पडते. (बॉक्स वर सुद्धा असेल, माहित नाही)
माझं म्हणणं आहे कि बॉक्स च्या वेगळेपणाचा उपयोग होणार असेल तरच घ्यावा कारण माझ्यामते थोडा अधिक त्रास निश्चित आहे. वरती लिहिल्याप्रमाणे ब्रँडेड पर्याय कमी आहेत, नवीन अपडेट्स मिळतील का? कितपत जागा खाणार? (स्टिक अगदीच छोटी आहे)

आणि स्टिक घ्यायची तर प्राईम अकाऊन्ट असायलाच पाहिजे, तर उपयोग होईल. मला एयरटेल च्या ब्रॉडबँड प्लॅन सोबत मोफत आहे. बऱ्याच पोस्टपेड मोबाईल सोबत पण मिळतो. हॉटस्टार vip घेऊ शकता. नेटफ्लिक्स शेरिंग करूनच घेऊ शकतो कारण खूप महाग आहे. ते पण आपल्याला कितपत गरज आहे त्यावर ठरवता येते. मी नाही घेतलं अजून. झी५ लागेलच.
स्टिक वापरून अजून तरी कुठली अडचण किंवा हे चालत नाही असं झालेलं नाही आहे.

आपली गरज ओळखून घ्यावं. आणि स्मार्ट टीव्ही असेल तर शक्यतो गरज नाही लागत या सर्वांची.
(AVR असेल तर टीव्ही पासून reverse optical cable वापरू शकता. पण मला स्टिक थेट AVR ला लावणं आवडत :) )

या जोडण्यांवर युट्युबवर विडिओज आहेत पण कुणी मराठीत चिकटवा इथे फोटोंतून.

स्नेहांकिता's picture

19 Mar 2019 - 12:23 pm | स्नेहांकिता

तूनळीवर काय म्हणून सर्च करावे लागेल ?

कंजूस's picture

19 Mar 2019 - 12:51 pm | कंजूस

"how to use chromecast"

How to make your tv smart

How to stream / mirror phone on tv
इत्यादी.

आॅगस्ट, २०१८पासून अॅमेझाॅन फायर स्टिक आणली व अॅमेझाॅन प्राईमची वार्षिक वर्गणी भरली. स्मार्ट टीव्ही नाही. केबल जानेवारी, २०१८ पासून बंद केले होते. बातम्या व सिरियल्स पहाणे यात सवयीने ठराविक वेळ जायचा पण गेलेला वेळ फार काही चांगला गेला नाही हे सतत जाणवल्याने केबल बंद केलं होतं.
केबल बंद केल्यावर वेळ मिळाला. यूट्यूबवर शोधून पाहिल्यावर "वंशवृक्ष" https://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b62301&lang=marathi या आवडलेल्या अनुवादित कादंबरीवर आधारित कानडी सिनेमा इंग्रजी सबटायटल्ससह पहायला मिळाला. कादंबरी अधिक आवडली पण सिनेमाही चांगला आहे.
अॅमेझाॅन प्राईमवर गेल्या आठवड्यात कादंबरीवर आधारित
https://en.m.wikipedia.org/wiki/Mithunam_(2012_film)
हा तेलगु सिनेमा सबटायटल्ससह पाहिला. गायक एस पी बालसुब्रहमण्यम् व (ज्यूली)लक्ष्मी या दोघांच्याच भूमिका असलेला सिनेमा कथा, फोटोग्राफी, संगीत, अभिनय, इ. सर्व बाबतीत त्या नायकाच्या भाषेत "अद्भुतम्" वाटला.
वेगवेगळ्या प्रकारची करमणूक, माहिती, इ. हव्या त्या वेळेत उपलब्ध होणं नव्या व्यवस्थेत शक्य झालं आहे. वाहिन्या विविध गोष्टी आपल्या डोक्यात कळतनकळत भरवत असतात ते बंद झालं आहे. आदल्या दिवसापर्यंतच्या सिरियल्स जाहिरातींशिवाय उपलब्ध आहेत असं आत्तातरी दिसत आहे. बरंच काही उपलब्ध आहे.
जे काही आवडतं ते "शोधाल तर सापडेल" हे इथेही खरं आहे.

मालिकांचे मोठे गिऱ्हाइक कुटुंबातले कोण असतात ते सर्वांनाच माहीत आहे.

स्नेहांकिता's picture

25 Mar 2019 - 11:28 am | स्नेहांकिता

धन्यवाद सर्व प्रतिसादक आणि धागालेखक.
सध्या चांगल्या इन्टरनेट कनेक्शनच्या शोधात आहे.

डीटीएच सेवा वापरत असलो तरी ऑनलाईन कंटेंट पाहण्यात बराच वेळ जातो.
डीटीएच सेवा खर्‍या स्वस्त व्हायला हव्या होत्या ! चॅनलवर जाहिरातीतुन प्रचंड उत्पन्न मिळत असताना लोकांनी वेगळे पैसे का ध्यायचे ? पेड चॅनलवर जाहिराती असता कामा नये ! नेट कनेक्टेड स्मार्ट फोनमुळे नेट कनेक्टेड राहणार्‍यांची संख्यां वेगाने वाढत आहे,त्यामुळे डीटीएच वाल्यांनी काळाची पाउले ओळखली पाहिजेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- लख मेरा टुनू टुनू करता है... ;) :- Sherlyn Chopra feat. Vicky & Hardik | Sukriti Kakar |4K |

भारतात नव्वदीच्या दशकात सर्व वाहिन्या फुकटच होत्या. पहिल्यांदा स्टार टीव्हीने शुल्क आकारायला सुरुवात केली. तेव्हा आम्ही जाहिराती दाखवणार नाही, असे जाहीर केले होते. पण कालांतराने हळू हळू शुल्क + जाहिराती असं सुरु झालं. मग सगळ्याच वाहिन्यांनी शुल्क +जाहिराती असं दुहेरी उत्पन्न सुरू केलं.

मराठी_माणूस's picture

13 Apr 2019 - 5:00 pm | मराठी_माणूस

नेटफ्लिक्स ला डेबीट्/क्रेडीट कार्ड वापरणे आवश्यक आहे का ? नेट बँकींग चालत नाही का ?

कंजूस's picture

16 Apr 2019 - 6:30 am | कंजूस

केबल असणारे ग्राहक --
ज्यांना निरनिराळे स्पोर्टस चानेलस, एंटरटेनमेंट चानेल्स पाहायचे असत त्यांच्यासाठी केबलचे तिनशे रुपये वसुल होते.

जे ग्राहक मोजकेच म्हणजे फक्त मराठी चानेल्स पॅकेज पाहात त्यांना टाटास्काय डिटीएच १३९ रुपयात देत असे.
-------
ट्राइ आल्यावर टाटास्काई, डिशटिवीचे फक्त मराठी पॅकेजचे २६० होतात.

केबलवाला फक्त मराठी पॅकेज देत नाही सर्वांबरोबर त्याचेकडूनही ३५० घेत आहे.

------------
चानेल अधिक अथवा वजा करणे डिशटीवीमधून चुटकीत होते. त्यांच्या साइटवर सबमिट बटण दाबले की लगेच चानेल्स चालू/ बंद.

मी डिशटिवीचे - १०० फ्रीटुएर अधिक १९रुपयेवाले पाच, अधिक इतर पाच ते आठ रु वाले वीस अधिक रेकॅार्डिंग सर्विसचे तीस मिळून ३२० रु देतो.

---------

इंटरनेट आधारित ओनलाइन सर्विस हे संपुर्ण वेगळे आहे ते सॅटेलाइट डिटिएचला पर्याय नाहीच. ती अधिकची सोय आहे.