राजे तुम्ही स्वराज्य निर्माण केल
पण आम्ही स्वराज्याच वाटिळ केल ।१।
राजे तुम्ही उत्तम आदर्श व्यवस्था निर्माण केलीत.
पण आम्ही ती आज आम्ही ती मोडीत काढली. ।२।
राजे तुम्ही उत्तम आदर्श निर्माण केलेत.पण आम्ही ते पायदळी तुडवले।३।
राजे तुम्ही गडकोट मंदिरे बांधली
त्या ऐतिहासिक वास्तुंची आज पडझड झाली ।४।
राजे तुम्ही रयतेवर प्रेम केलत
आम्ही त्यांना आज देशोधडीला लावल ।५।
राजे तुमच्या राज्यात सुख शांती नांदत होती.
पण आज बेकारी गरीबी नांदते।६।
राजे तुमच्या पदरी सर्व जाती समान.
पण आज सर्वत्र जाती जातीचे आरक्षण ।७।
राजे परस्री तुम्हा मातेसमान.
पण आज नाही कुणाला त्याचे भान ।८।
राजे तुम्ही लोकशाहिची संकल्पना मांडली.
पण आज तिची फार वाट लागली ।९।
राजे तुमच्या राज्यात गुन्हेगारांना कडक शासन.
पण आज गुन्हेगार्हांना राज्यकर्त्यांचे अभयदा । १० ।
राजे तुम्ही मठ मंदिरे यांना वर्षासने दिलीत.
पण पुढच्या पिढ्यांनी ती विकुन खाली ।११।
राजे तुम्ही गरिबांचे कैवारी
आज गरीब फिरतात दारोदारी ।१२।