प्रेरणा :
https://www.misalpav.com/node/44145
घटना "ती" ऐकताच आम्ही पेटलो..
कॅण्डल लावुनी आलो...अन मग विझलो..|
स्वप्नातही अणुबॉम्ब बघुनी "झिरपलो"
असे षंढ आम्ही कैसे निपजलो ||
घेतला ग्लासात सोडा अन म्हणालो युद्धाच्या बाता सोडा..
जास्तीत जास्त "त्यांच्याशी" क्रिकेट खेळणं सोडा...|
बीयर चिल्ल्ड नाही म्हणून ओरडाया लागलो..
असे षंढ आम्ही कैसे निपजलो ||
म्हणे राजकारण नको ह्या विषयी..
'युती'च्याच गोष्टीत घेऊ "आघाडी"...|
गळ्यात पडून सेल्फ्या लगेच घेऊ लागलो..
असे षंढ आम्ही कैसे निपजलो ||
नको तिथे "तुका" आम्हाला आठवतो..
उगी राहून मग आम्ही जे होईल ते बघतो..|
नाठाळा माथी काठी, हाणणेही विसरलो..
असे षंढ आम्ही कैसे निपजलो ||
होऊच द्या पुन्हा एकदा सव्हिस अकरा..
बिर्याणीला आहेच पुन्हा तयार बकरा...|
अवस्थेला व्यवस्थेचे कोंदण देऊ लागलो..
असे षंढ आम्ही कैसे निपजलो ||
महाराज..स्वराज्य निर्मिले तरी कशास?
इथे घाबरतो आम्ही पाहुनी सश्यास..|
घायाळ हरिणी बघून पळू लागलो..
असे षंढ आम्ही कैसे निपजलो ||
कविता पोस्टवुनी कर्तव्य केले | अन लगेच "लाईक" मोजाया घेतले |
कमेंट अन स्मायल्या रोजच्याच आम्हा | हेच आमुचे शस्त्र अन हाच अमुचा बाणा |
नेत्यांवर चर्चा हीच आमची भाकर | त्यांनाच देतो शिव्या अन त्यांचेच आम्ही चाकर |
काय विचारता आम्हा षंढ कैसे निपजले |
जिथे पेरले वेगळे अन रोपटे भलंतेच उगवले ||
प्रतिक्रिया
19 Feb 2019 - 2:04 pm | ज्ञानोबाचे पैजार
हे व्हर्जनही आवडले
लगे रहो
पैजारबुवा,
19 Feb 2019 - 2:20 pm | नाखु
जिथे पेरले वेगळे अन रोपटे भलंतेच उगवले ||
वैचारिक गाजरगवत निर्मूलन ही सद्य परिस्थितीत एक मूलभूत गरज आहे.
मुवि संपादित बाबा वचने प्रकरण सतरा पृष्ठ अठरा.
नितवाचक अडाणी नाखु पांढरपेशा
19 Feb 2019 - 4:43 pm | चिनार
धन्यवाद !!
19 Feb 2019 - 4:57 pm | मोहन
फारच सुंदर !