( कणा )

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in जे न देखे रवी...
3 Nov 2008 - 11:53 am

( कणा )
कवी - कुसुमाग्रज
------------------------------------------
ओळखलस का देवा मला?'- स्वर्गात आला कोणी
शरीर होते सोडलेले, आत्म्याचीच वाणी
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
पृथ्वीवरुन आत्ताच आलो. आलो स्फोटात मरुन;

रविवारच्या सुट्टीमध्ये बाजाराला गेलो
स्त्यावरच्या स्फोटाने धाडकन मेलो
नेते आले, पैसे दिले, सांत्वन थोडे केले,
सरणावर जळूनी जाता विसरुन सारे गेले.

कारभारणीला सोडून देवा इथे आता आलो आहे;
संपलेल्या स्वप्नांचा विचार सतत करतो आहे.
देवीकडे वळून पाहताच हसत हसत उठला
वर नको देवा, जरा एकटेपणा वाटला.
संपून गेले जीवन तरी सुटली नाही आशा
पाठीवरती हात ठेउन, फक्‍त शांती म्हणा!

-----------------------------------------------------------------------
मुळ कविता-

ओळखलत का सर मला?’ - पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा’!

विडंबन

प्रतिक्रिया

चन्द्रशेखर गोखले's picture

3 Nov 2008 - 1:43 pm | चन्द्रशेखर गोखले

अविस्मरणीय.... लगे हो !

चेतन's picture

3 Nov 2008 - 1:48 pm | चेतन

१+

अविस्मरणीय

चेतन

विसोबा खेचर's picture

3 Nov 2008 - 5:15 pm | विसोबा खेचर

पाठीवरती हात ठेउन, फक्‍त शांती म्हणा!

वा!

प्राजु's picture

3 Nov 2008 - 8:57 pm | प्राजु

मस्त कविता..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सुक्या's picture

4 Nov 2008 - 2:17 am | सुक्या

सुंदर . . खुप सुंदर कवीता. दोन्ही कवीता वाचल्या अन् डोळ्यात टचकन पाणी आले. काळजाला हात घातलास.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)