पत्रकार परिषदेपासून दूर राहण्यामागील मुत्सद्देगिरी ...

Primary tabs

mrcoolguynice's picture
mrcoolguynice in राजकारण
25 Dec 2018 - 11:37 am

फेब्रुवारी २०१७

डो ट्र : हा ( माझा ) रोनाल्ड रिगन नंतरचा सर्वात मोठा इलेक्टॉरेट कॉलेज विजय आहे. (३०४-३०६ च्या आसपास मते)

पत्रकार : तुम्ही वरील दावा केला आज खरा, पण (माजी) राष्ट्रपती ओबामा यांनी २००८ मध्ये ३६५ मते मिळवून विजय मिळवला होता !!

(पत्रकाराचा प्रश्न पूर्ण होण्या आधीच त्याला काटून)

डो ट्र : मी रिपब्लिकन पार्टीच्या संधर्भात वक्तव्य केलं होतं हे .....

पत्रकार : (माजी) राष्ट्रपती ओबामा यांनी २०१२मध्ये ३३२, (माजी) राष्ट्रपती जॉर्ज डब्लू बुश (रिपब्लिकन पार्टी) यांनी १९९८मध्ये ४२६ मते मिळवून (राष्ट्रपतीपदासाठी) विजय मिळवला होता !!...

(पत्रकाराला काटून टाकण्याचा प्रयत्न हाणून पाडत .. )

पत्रकार : अमेरिकन जनतेने का तुमच्या फेक बातम्यांवर / वक्तव्यांवर विश्वास करावा ? (तुमच्या फेकूगिरीवर का जनतेने विश्वास करावा ?)

(पत्रकाराचा प्रश्न पूर्ण होण्या आधीच त्याला काटून)

डो ट्र : हे पहा मला ही माहिती पुरवण्यात आलीये ... आमचे मार्जिन खूप मोठ्ठे आहे म्हणून ..

पत्रकार : मी माझा प्रश्न परत विचारतो की, अमेरिकन जनतेने का तुमच्या फेक बातम्यांवर / वक्तव्यांवर विश्वास करावा ? (तुमच्या फेकूगिरीवर का जनतेने विश्वास करावा ?) जेव्हा तुम्ही पत्रकार मीडियावर आरोप बेछूट आरोप (फेक न्यूज बद्दलचे) करता , पण स्वतःच चुकीची (फेकू) माहिती जनतेसमोर सादर करता

डो ट्र : हे पहा, मला माहिती नाही, मला ही माहिती पुरवण्यात आलीये ... इनफॅक्ट ही माहिती आजूबाजूला (राष्ट्रपती ऑफिस) पाहण्यात आली ...
परंतु (विषय बदलत) माझा हा विजय, सबस्टॅन्शिअल (भल्ला मोठ्ठा) विजय होता , याबाबत तुम्ही सहमत असाल ...
घाईगडबडीत पत्रकार परिषद आटोपती घेतली..

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नवी दिल्ली, 19 डिसेंबर : 'मी असा पंतप्रधान होतो जो पत्रकार परिषद घेण्यासाठी घाबरत नव्हतो,' असं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. या वक्तव्यातून मनमोहन सिंग यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. कारण पंतप्रधान झाल्यापासून मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही.

मनमोहन सिंग यांच्या 'चेंजिंग इंडिया' या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन झालं. यावेळी त्यांनी देशातील विविध प्रश्नांवर आपली भूमिका मांडली.

'मी मौन बाळगणारा पंतप्रधान होतो, असं लोक म्हणतात. पण माझं पुस्तकच याला उत्तर देईल. मी कधीच असा पंतप्रधान नव्हतो, जो मीडियासमोर यायला घाबरतो. मी नियमितपणे पत्रकारांना भेटत होतो आणि प्रत्येक परदेश दौऱ्यानंतर पत्रकार परिषद घेत होतो,' असं मनमोहन सिंग म्हणाले.

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

25 Dec 2018 - 11:49 am | माईसाहेब कुरसूंदीकर

पुस्तक आवर्जून वाचायला हवे रे कूलगायनायस्या. मनमोहन सिंग हे धीर गंभीर वृत्तीचे. चटपटीत विनोद, शाब्दिक कोट्या असल्या भानगडीत न पडता "आपण व आपले काम" ह्या स्वभावाचे. जे काही घोटाळे उघडकीस आले तेव्हा हे काहीतरी बोलतील अशी अपेक्षा लोकांना असायची. पण घोटाळेबाजांची चौकशी मनमोहन पंप्तप्रधान असतानाच चालू झाली हेही लक्षात घेण्यासारखे.

घोटाळेबाजांची चौकशी मनमोहन पंप्तप्रधान असतानाच चालू झाली हेही लक्षात घेण्यासारखे.
>>

अगदी खरे माई. त्यांच्या कार्यकाळात सुरू झाले. त्यांनी सुरू केले नाहीत, तर कोर्टाने केले. बाकी त्यांच्या कार्यकाळात तपस झाला तेच तर त्यांच्या पथ्यावर पडले असे म्हणावे लागेल. कारण तपासाच्या निमित्ताने अडचणीचे पुरावे फिरवता आले. अन्यथा ज्या प्रकरणात कोर्टाने दखल घेऊन तपास सुरू केला अशी प्रकरणे संबंधितांना थेट निर्दोष मुक्त करण्याइतपत जाती ना.

बाकी मनमोहनसिंगांचं आत्मचरित्र त्यांनीच लिहिलंय की त्यांचं नुसतं नाव लावलंय हे पण एकदा व्यवस्थित पाहून घ्या म्हणतो. नाहीतर ते पण एखाद्या सल्लागार समितीने लिहिलेले असायचे.

राहता राहिला प्रश्न पत्रकारांचा - माझे वैयक्तिक मत असे आहे की त्याने माझे काहीही बिघडत नाही. मुळात स्वतःच्या वाईटावर टपलेल्या सो कोल्ड एलिट क्लासची मोदी दखल घेत नाहीत हाच तर त्यांचा प्रॉब्लेम आहे ना. मोदी भारंभार मंत्रिमंडळ विस्तार करत नाहीत, त्याच्या टिप्स देत नाहीत, आपल्याशी बोलत नाहीत, त्यामुळे एखादे विधान मोडून तोडून वादग्रस्त करता येत नाही, आणि असे अनेक प्रॉब्लेम यामध्ये आहेत.
परंतु काही मूठभर पत्रकार बाजूला टाकलेत तर सरकार accessible आहे अशीच भावना सर्वसामान्य नागरिकांच्यात आहे, त्यामुळे अजेंडावाल्या पत्रकारांकडे दुर्लक्ष करायला काहीच हरकत नाही असे माझ्या हिचे मत!!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

25 Dec 2018 - 6:28 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

बरोबर बोललास. मोदी सरकारच्या योजना व ईतर कामे पाहिली तर ते प्रामाणिक प्रयत्न करत आहेत हे नक्की.

मिडियाच्यापासून नाही, तर पत्रकार परिषदेपासून घाबरतात काही लोकं. .....

ad

सुबोध खरे's picture

25 Dec 2018 - 6:31 pm | सुबोध खरे

१० नोव्हेंबर २०१८ ते १६ नोव्हेंबर २०१८ हा काळ तीन राज्याच्या निवडणुकीच्या अगोदरचा होता.

मानभावीपणा करण्यासाठी असा "निवडक डेटा" टाकून काय सिद्ध करू इच्छित आहात?

गब्रिएल's picture

25 Dec 2018 - 9:23 pm | गब्रिएल

उगा नस्ता अत्रंगपना करून तोंडावर आपटून घेयाची त्येंची जुनी खोड हाय. आनि आनेक जल्म घेऊन्बी ती जात नाय. =)) =)) =))

आनन्दा's picture

25 Dec 2018 - 9:42 pm | आनन्दा

शांत व्हा.. या आयडीचा हेतू खोडसाळ आहे हे एव्हाना सिद्ध झालेले आहे.. त्यामुळे आता आरडाओरडा करून काही फायदा नाही.

प्रत्येकाची विचार करायची एक वेगळी पद्धत असते. उच्चविद्द्याविभूषित माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आपली जाहिरात करण्याठी सर्व पत्रकारांना राजकीय खर्चाने आपल्यासोबत परदेश दौर्यांवर घेउन जात होते. तर सध्याचे कमीशिक्षित पंतप्रधान राजकीय खर्चाने माध्यमांत जाहिरात बाजी करतात. आता आपल्याला विनंती आहे की या दोन पध्दतीत कमी खर्चाची पध्दत कोणती ते वरील तक्त्या प्रमाणे आकडेवारी सह सर्वांसमोर मांडावे. धन्यवाद

माहितगार's picture

25 Dec 2018 - 10:23 pm | माहितगार

प्रश्न नेतृत्व करत असलेल्या घटकांच्या विपरीत वागण्या बद्दल मौन पाळण्याचा असतो आणि निवडून सत्तास्थानी गेलेल्या कोणत्याही नेत्याला हे मौन सोडता येत नाही मग ते मनमोहन असोत की केजरीवाल आणि मोदी असोत की फडणवीस .

या मौनाचा पत्रकार परिषदा घेतल्या का नाही ह्याच्याशी संबंध नसतो, मुद्यांना बगल मारलेल्या पत्रकार परिषदांनाही अर्थ नसावा असो.

माहितगार's picture

25 Dec 2018 - 10:28 pm | माहितगार

उदाहरणार्थ सध्या रागा बरेच बोलू लागले आहेत पण बहिणीच्या नवर्‍याने लावलेल्या नैतीक दिव्यांबाबत कुठे काही भाष्य केल्याचे अद्यापतरी वाचनात नाही त्यावर ते बोलणार नाहीत तो पर्यंत त्या विषयावर मौनच समजायचे कि नाही, असेच मौनाचे विषय भारतातल्या बहुसंख्य पक्षातील बहुसंख्य नेत्यांकडे असणार. उडदामध्ये काळे गोरे कसले शोधताय इथे सगळा उडीद आंबलेला आहे :)

मामाजी's picture

25 Dec 2018 - 10:27 pm | मामाजी

नवी दिल्ली, 19 डिसेंबर : 'मी असा पंतप्रधान होतो जो पत्रकार परिषद घेण्यासाठी घाबरत नव्हतो,' असं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. या वक्तव्यातून मनमोहन सिंग यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. कारण पंतप्रधान झाल्यापासून मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही.
आश्चर्य आहे, खरतर दोन पंतप्रधानांच्या कारकिर्दींची तुलना ही त्यांनी राबवलेल्या योजनां वर व्हायला हवी. परंतू उच्चविद्द्याविभूषित माजी पंतप्रधानांनी तुलनेसाठी मुद्दा कोणता निवडला तर त्यांनी ( न घाबरता ) घेतलेल्या पत्रकार परिषदांचा. तसेच पुढे ते मोठ्या अभिमानाने सांगतात की मी नियमितपणे पत्रकारांना भेटत होतो आणि प्रत्येक परदेश दौऱ्यानंतर पत्रकार परिषद घेत होतो,
आता हे सर्वश्रुत आहे की मनमोहन सिंह परदेशी दौर्यावर जाताना सरकारी खर्चाने (दुसर्या शब्दात सांगायचे म्हणजे करदात्यांच्या पैशांवर मौजमस्ती करण्यासाठी) आपल्यासोबत पत्रकारांचे लटांबर घेउन जात होते. स्वाभाविकच आहे की असे फुकटात सरकारी खर्चाने मौजमस्ती करून आलेले पत्रकार मनमोहन सिंह यांची तोंड फाटेपर्यंत स्तुतिच करणार. आणि पत्रकारांनाही हे चांगल माहीत होत की जर आपण वेडावाकडा प्रश्न परिषदेत विचारला तर पुढच्या दौर्यातून आपला पत्ता कट होईल. ऐवढ सगळ सेटिंग करून मगच मनमोहन सिंह न घाबरता पत्रकार परिषदेला सामोरे जायचे. खरोखरच त्यांच्या धैर्याला सलाम..
मोदिं बाबत बोलायच झालं तर त्यांनी २००४/०५ पासुनच तथाकथित पत्रकारांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. त्याचा ठाम विश्वास आहे की त्यांनी राबवलेल्या योजनां लोकांपर्यंत पोहोचवायला असल्या दिडदमडीच्या फूकटखाऊ व एकांगी पत्रकारांची त्यांना आवश्यकता नाही. अन्य मार्गानी ते आपल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवतात. किंबहुना ते पत्रकाराच्या तालावर न नाचता पत्रकारांना आपल्या तलावर नाचायला लावतात. ऐक नंबरचे घाबरट.
हा धागा आपण काढलात त्यावरून असे लक्षात येते की या दोन पंतप्रधानांच्या कारकिर्दींची तुलना करण्यात आपल्याला जरा जास्तच स्वारस्य आहे. तर आपण सुरूवात करू वीजपुरवठ्या पासून..
आपल्याला विनंती आहे की मनमोहन सिंहाच्या कारकिर्दित होत असलेली वीज निर्मिती, वीजेची मागणी व पुरवठा, भारनियमन. आणि मोदिंच्या कारकिर्दित होत असलेली वीज निर्मिती, वीजेची मागणी व पुरवठा, भारनियमन यासंबंधीची आकडेवारी जालावरून शोधुन काढून सर्वांसमोर ठेवावी..(जसा आपण मिडियाचा तक्ता ठेवला आहे तसा)
.

कूल गाय अडचणीचे प्रश्न आले की कूल (पक्षी - थंड) पडतात. तेव्हा ते उत्तर देणार नाहीत.
अजून मागच्या जन्मीचे संस्कार कसे उफाळून आले नाहीत देव जाणे

Blackcat's picture

26 Dec 2018 - 2:56 pm | Blackcat (not verified)

छान

पुंबा's picture

26 Dec 2018 - 5:35 pm | पुंबा

पुस्तक वाचायला आवडेल.
मनमोहनसिंगांबद्दलचा आदर फार वाढला आहे सध्या सर्वत्र भारून राहिलेला ढपणा, अँटी- इंटेलेक्च्युअलीझम बघून.

सोइची व्यक्तिपूजा आणि व्यक्ति चारीत्र्यहनन हि ज्याची त्याची मक्तेदारी असते. स्वतःच्या व्यक्तिगत मतांना एखादे बिरुद लावून मिरवणे आणि दुसर्‍यां मताच्या गटास हिनवणे यात कोणता इंटेलेक्च्युआलीझम फॉर दॅट मॅटर अँटी इंटेलेक्च्युएलीझम असतो ते अनाकलनीय असावे किंवा कसे.

व्यक्तिगत मतांना एखादे बिरुद लावून मिरवणे आणि दुसर्‍यां मताच्या गटास हिनवणे ..
यात कोणताही इंटेलेक्च्युआलीझम नसतो , तसच कोणती राष्ट्रभक्तीही नसते ....

पत्रकार परिषद म्हटलं की मला रागा ने मनमोहन सिंग सरकार चा भ्रष्ट्राचारी नेत्यांना निवडणुक बंदी चा अध्यादेश कसा टर्रटर्र करून फाडला होता ते आठवले .
त्या वेळी रागा पक्षाध्यक्ष नव्हता तरी ' रागाच बरोबर आहे '
हे मिडिया समोर सांगून म्याडम च्या नजरेत उठून दिसन्याची स्पर्धा तमाम सीनियर काँग्रेसजनात लागली होती . त्यामध्ये केविलवाने मनमोहनसहित दिग्गी , सिब्बल , एंटनी हे सगळे वयस्कर दिग्गजनीं विधिनिवेश गुंडाळला होता . अक्षरशः लाज वाटत होती ते टीवी वर पाहताना .
त्या मुळे तुमचे सिंग साहेब पत्रकार परिषद का ? कोणाला खुश करण्यासाठी घ्यायचे हे आमच्या लक्षात आहे .
सिंग साहेबांच्या 10 वर्षाच्या कालावधितिल प्रत्येक वर्षाच्या प्रत्येक महिन्यातील घटनाचा क्रम जुळवून आणून एखादा माहितिपट बनवला तर 2019 च काय पुढील किमान 20 वर्ष काँग्रेस सत्तेत येवू शकणार नाही .

प्रसाद_१९८२'s picture

28 Dec 2018 - 3:22 pm | प्रसाद_१९८२

सिंग साहेबांच्या 10 वर्षाच्या कालावधितिल प्रत्येक वर्षाच्या प्रत्येक महिन्यातील घटनाचा क्रम जुळवून आणून एखादा माहितिपट बनवला तर 2019 च काय पुढील किमान 20 वर्ष काँग्रेस सत्तेत येवू शकणार नाही .
--

मार्मिक गोडसे's picture

28 Dec 2018 - 4:31 pm | मार्मिक गोडसे

बुडत्याला काडीचा आधार.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

28 Dec 2018 - 5:23 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

चित्रपटाचा ट्रेलर आल्यावर अर्ध्या तासातच काँग्रेस्वाले कोर्टात गेले! "बदल केल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही" असे ते म्हणतात. चित्रपट संजय बारू ह्यांच्या पुस्तकावर आधारित आहे.
पुढचे १५ दिवस करमणूकीची निश्चिंती झाली असे आमचे मत. अग्रलेख, चॅनेलिय हाणामारी, निदर्शने, "तेव्हा तुम्ही कुठे होतात?" अशी चर्चा मागे जात जात..१८८५ काँग्रेस स्थापनेपर्यंत जाईल .. सगळे काही बघायला मिळणार आहे.. असे ह्यांचे मत.

Blackcat's picture

28 Dec 2018 - 5:54 pm | Blackcat (not verified)

Congress foundation दिनाच्या शुभेच्छा

28 December

सुबोध खरे's picture

28 Dec 2018 - 8:34 pm | सुबोध खरे

how green was my valley

mrcoolguynice's picture

30 Dec 2018 - 9:48 am | mrcoolguynice

tr

हरीश जोशी (महाराष्ट्रटाईम्स पान ८, डिसेंबर ३०, २०१८)

राज्यकर्त्यांचा मीडियामधील वाढता हस्तक्षेप व प्रतिकूल टीकेसंदर्भातील असहिष्णुता ही मुक्त पत्रकारितेच्या संकोचाची सुरुवात असते. चढत्या क्रमाने एकाधिकारशाही राज्यव्यवस्थेत स्वतंत्र माध्यमांचे रूपांतर अखेर बिन चेहेऱ्याच्या सरकारी मुखवट्यात होते.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अडचणीचे प्रश्न विचारणारे पत्रकार जिम अकॉस्टा यांच्यावर व्हाईट हाऊसने प्रवेशबंदी घातली होती. त्याविरोधात याचिका दाखल करणाऱ्या सीएनएन च्याबाजूने न्यायालयाने निकाल दिला आहे. ट्रम्प यांना ही चपराक मानली जाते. मात्र त्यानंतरही ट्रम्प यांनी पत्रकारितेवर नवे निर्बंध आणले आहेत.

mrcoolguynice's picture

18 May 2019 - 1:26 pm | mrcoolguynice

इकड़े भारतात,
कालच रिलीज़ झालेला “द अक्सिडेंटल प्रेस कॉन्फ़रन्स” चा शो
कितीजनांनी पाहीला ? प्रॉडक्षण ला ५ वर्षें कालावधी लागला.

भंकस बाबा's picture

18 May 2019 - 7:41 pm | भंकस बाबा

जेवनावळी संपल्यावर मिळणाऱ्या शितावर विरोधी पक्षांची भुकेलेल्या कुत्र्यासारखी नजर होती. तिथेपण हाती निराशा आली

२३ मे नंतर “द अक्सिडेंटल प्रेस कॉन्फ़रन्स” चा sequel,trilogy,tetralogy,pentalogy,hexalogy,heptalogy पण येउद्या- पाहिजे तर आम्ही produce करतो म्हणून मागे लागतील हि लाचार मिडिया हाउसेस :-)) आणी राज ठाकरे बोलतील >>>बंद करा रे ती सीरीज>>> :-)) :-))

मोदी जी हे खर म्हणजे पुरूष नाही आहेत तर महा-अवतारी पुरूष आहेत.

मगर्,पकोडा,कॅमेरा,ढग्,रडार्,चाय्,गटार गॅस,....... वगैरे शब्दांचा संबंध कळण्यासाठी तुम्हाला भक्तीयुक्त मनाची व डोळ्यांची गरज आहे नाहीतर तुमच मन अस्वच्छ आहे व त्यासाठी तुम्हाला वाराणासीला जाउन स्वच्छ झालेल्या गंगेत डुबकी मारावी लागेल किंवा योगा व ध्यान् धारना करावी लागेल.

मोदी नाथ की जय
आए गा तो मोदीच

डँबिस००७'s picture

19 May 2019 - 10:35 pm | डँबिस००७

आए गा तो मोदीच !

आगया मोदी !!

गड्डा झब्बू's picture

19 May 2019 - 10:56 pm | गड्डा झब्बू

आणी इतकी वर्षे ज्याला शिव्या शाप दिले त्यालाच जनतेने परत पंतप्रधान म्हणून निवडून दिले तर? शिकंजी, आलू डालके सोना निकालना वग्रे वर श्रद्धा असलेल्या तुमच्या सारख्या स्वच्छ मनाच्या आणि द्वेषयुक्त डोळ्याच्या लोकांनी काय गटारात डुबकी मारायची कि चुल्लूभर पाण्यात जीव द्यायचा?

त्यासाठी तुम्हाला वाराणासीला जाउन स्वच्छ झालेल्या गंगेत डुबकी मारावी लागेल 

कधी नव्हे ते वड्रा, गांधी इत्यादि मंडळी गेली, तशी?

गोंधळी's picture

20 May 2019 - 1:16 pm | गोंधळी

ह्या वर्षी आम्ही मोदींची प्रतिक्रुतीवाला बाप्पा आणणार आणि खास पकोड्यांचा नैवेद्यपण दाखवणार.