कधी असतेस, कधी नसतेस,
तरीही मला सगळीकडे तूच दिसतेस...
कधी कारवा होतेस, कधी मारवा होतेस,
कधी मनाला धुंद करणारा गारवा होतेस..
कधी ऊन होतेस, तर कधी पाऊस होतेस,
कधी त्याच वेड्या पावसाची चाहूल होतेस..
असंच कधी असतेस, कधी नसतेस,
तरीही मला सगळीकडे तूच दिसतेस...
कधी शब्द होतेस, कधी भावना होतेस,
कधी प्रेरणा देऊन जगण्याची साधना होतेस..
कधी रंग होतेस, कधी तरंग होतेस,
कधी या मनातून दरवळणारा सुगंध होतेस...
असंच कधी असतेस, कधी नसतेस,
तरीही मला सगळीकडे तूच दिसतेस...
तुझाच .... Mahesh
प्रतिक्रिया
14 Dec 2018 - 12:50 pm | पद्मावति
आवडली कविता.