पावलांना अंत नाही
वेदनेला गाव नाही
चालते ही व्यर्थ चिंता
थांबण्याचे नाव नाही
दूर काळोखात कोणी
गुंफली माझी कहाणी?
त्या तिथे सूर्यास सुद्धा,
उगवण्याचे ठाव नाही..
लाख स्तोत्रे अर्पुनी मी
मांडले वैफल्य माझे..
टेकला मी जेथ माथा,
मंदिरी त्या देव नाही!
अंतरीच्या शून्यतेला
गीत मी कैसे म्हणावे
गोठलेले शब्द नुसते
छंद नाही, भाव नाही!
अदिती
प्रतिक्रिया
28 Nov 2018 - 10:54 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
रेखिव!
29 Nov 2018 - 10:56 am | चांदणे संदीप
.
Sandy
29 Nov 2018 - 3:45 pm | वन
छान !