कविते......!.
तू, तुला हवं तसं जग !!
उमलत राहा, फुलत रहा,
कागदांवरून मनांवर बहरत रहा, नेहमी सारखीच!
पण एक लक्षात ठेव आता ......
तू ना माझी , ना त्याची !
मी लिहिलं तुला म्हणून तो वाचेल तुला,
एवढाच काय तो उरलेला दुआ !
कारण भेटलो तर , स्वप्न वाटेल,
नाही भेटलो तर, विरक्त वाटेल !
नव्याने काही केलं तर पाप वाटेल,
जुन्यातच अडकुन राहीलो तर श्राप वाटेल!
हात दिला तर स्वार्थ वाटेल,
ढळणारा अश्रूच, सार्थ वाटेल!
काही केलं तर...काय केलं? वाटेल
नाही केलं तर...का नाही केलं? वाटेल !
आमचं काय ??...... आम्हाला काहीही वाटेल...!
तर कविते, तू जगलीस काय आणि मेलीस काय !
आता आम्हाला पर्वा नाही कशाचीच
सगळेच दुवे संपलेत कदाचित !
सगळ्या वाटाही बंद झाल्यात
एकमेकांपर्यंत जाण्याच्या !!
--------------फिझा.
प्रतिक्रिया
23 Nov 2018 - 7:40 am | विजुभाऊ
ही कविता " मला लागली कुणाची उचकी " या चालीवर म्हणता येवू शकते
23 Nov 2018 - 12:23 pm | खिलजि
मान राखून गुरुजनांचा
दिला निरोप मी कल्पनांना
कसा उडू मी इथेतिथे ?
छाटून त्या पंखांना
शब्द गहन भार वाही ,
नाळ जरी तुटलेली
सुबक काही येत नाही ,
अशीच आत घुस्मटलेली
सरण रोज रचितो ,
रोज देतो भडाग्नी
नित्य नवी कल्पना
असे चितेवर पहुडलेली
28 Nov 2018 - 10:55 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
जमलिये..
8 Dec 2018 - 2:07 pm | वन
जमली आहे. आवडली
9 Dec 2018 - 7:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली कविता.
-दिलीप बिरुटे