अतृप्त आत्मा -10

प्रमोद पानसे's picture
प्रमोद पानसे in जनातलं, मनातलं
18 Nov 2018 - 3:19 pm

आमच्याकडे बघताना नानाची नजर आजीबात स्थिर नव्हती.भयचकीत नजरेने आणी विदीर्ण चेहऱ्याने बघत नाना किंचाळला.
"बाप्या भडव्या ! हा काय चावटपणा लावलायस "

" हॕ हँ !! मालक माझा बोनस आणी मागच्या महिन्याचा पगार राहिलाय तो घ्यायला आलोय. देताय ना ?" आम्ही विचारलं

"पण तु इथं कसा आला परत ? तु तर मेलायस ?? आत्ताचा तर तुला पेटवुन आलो आम्ही " नाना गोंधळल्या घाबरल्या आवाजात बोलला.

" नाना ! तु आणी तो म्हातारा गोखल्या जो पर्यंत जिवंत आहात ना तो पर्यंत या बापु जोश्याला मुक्ती नाही. तुझं आणी आप्प्याचं सगळं बोलणं ऐकलय मी " आम्ही जरा जरबेतच बोललो.

"म्ह..म्हणजे तु भु..भुत " नाना तातरायला लागला

होय ! मी भुत बनुन आलोय .आता गप गुमान माझा हिशोब घरी पोहचव.दिवाळी नाहिये यंदा पण माझे दिवस घालायचेत घरच्यांना " नानाचं गचुंड धरत आम्ही बोललो.

बाबल्यानंतर आता नाना सुटकेचा प्रयत्न करायला लागला होता.

" देतो बाबा ! सकाळीच पाठवुन देतो पण मला सोड " नाना रडकुंडीला आला होता.घामाने गच्च भिजलेला आणी डोळ्यात भिती ,गोंधळ आणी अश्रुंनी तुंबलेल्या अवस्थेतला नानाचा अवतार बघुन आम्हाला जाम हसु येत होतं.

मागचे विस एक मिनीट आम्ही उभ्या आयुष्यात न झालेली करमणुक अनुभवत होतो.

आम्ही गेली कित्येक वर्षे इमाने इतबारे या नान्याची चाकरी करत होतो. बोलणी आणी शिव्या खात होतो.

येताजाता अपमान करत बोलणारा आणी गरज असली की गोड बोलणारा हा नान्या महाव्यवहारी होता.त्यमुळे आत्ता जरी तो घरी आमच्या हिशोबाचे पैसे पाठवायला तयार झाला होता ,तरी आम्ही त्याला इतक्या सहजी सोडणे शक्यच नव्हते.

जीवाच्या भितीने घाबरलेल्या नानाला आम्ही सोडायला तयार झाल्यावर थोडासा धीर आला .पण आता जाणार कसं हा प्रश्न त्याला सतावत होता,एक तंगड वर करुन गटारात कलंडलेल्या कारकडे तो हताशपणे बघत होता.

संपुर्ण गावात या नानाची धरुन फक्त तीनच कार होत्या. साठे डॉक्टर ,परब वकील आणी हा नान्या हेच तीघे कारवाले होते.

एरवी कुणाला इमर्जंन्सीत गरज पडली तर कुरकुर करत माजुरड्या पद्धतीने मदत करणारा नान्या .त्याची गरज असताना मात्र मिठ्ठास बोलायचा.

आपल्या गाडीचा त्याला भलताच माज होता.पण आत्ता मात्र तो जवळच्या नातेवाईकाच्या मयताकडे बघीतल्यासारखा गाडीकडे बघत होता.

घरी जाण्याची त्याची अडचण लक्षात घेउन मग आम्हीच ते चालू अवस्थेतलं धुड गटारातुन ओढुन रस्त्यावर आणले .बॉनेट डाव्यासाइडने चेंबटुन वर आलेल्या नान्याच्या गाडी ला थोड्या ओरखड्यां व्यतिरिक्त बाकी काहीच झाले नव्हते.पण सुजलेला आणी तीनचार ठिकाणी मोडलेला नाना ती गाडी चालवायच्या स्थितीत नव्हता.मग आम्हीच त्याला कसाबसा उचलुन गाडीत टाकला .आणी विना ड्रायव्हर ती गाडी हळुहळु प्रेसकडे मार्गस्थ झाली.

रात्रीची वेळ असाल्याने तो नजारा बघायला त्यावेळी कुणीही नव्हतं. नाहीतर........

त्या वडाच्या पारापासुन नानाच्या प्रेसपर्यंतचा अद्भुत प्रवास नाना त्याच्या डोळ्याने बघत होता.आम्ही भुतच असल्याची त्याची आता पक्की खात्री झाली होती.

गाडी प्रेसपाशी पोहचताच "बाप्या ! माझं चुकलं मला माफ कर .उद्याच्या उद्या तुझे पैसे पोहचवतो.पण मला परत दिसु नकोस" नाना केविलवाणा चेहरा करुन बोलायला लागला.

आतुन गाडीचा आवाज ऐकुन प्रेसमधे नाइटला असलेले बाळ्या आणी संतु धावत गेट उघडायला बाहेर आले.

नानाची अवस्था बघुन त्यांनी त्याला आधार देत आता नेलं.आणी त्याच्या केबिनमधल्या खुर्चीत नेउन बसवलं.बाळ्या वरती नानीला बोलवायला घराकडे पळाला.आणी संतुने साठे डॉक्टरला फोन लावला.

आम्ही हे सगळं नानाच्या साइड टेबलवर बसुन बघत होतो.प्रेसच्या जागेवरच वरच्या मजल्यावर रहायचा नान्या.

नानी धावत खाली आली आणी काय झालं कसं झालं हे विचारतच तीने रडायबोंबलायला सुरुवात केली.

नाना काही सांगणार एवढ्यात आम्ही त्याच्या दुखर्या गालाचा गालगुच्चा घेत त्याला दर्शन दिले.आणी डोळ्यांनीच त्याला गप्प रहाण्यासाठी खुणावले.

भेदरलेल्या नानाने न घडलेल्या अपघाताची एक स्टोरी रचुन सांगितली आणी आमचं अस्तित्व लपवलं.

एवढ्यात डॉक्टर साहेब आले आणी सर्व चेकअप करुन मुकामार असल्याचे सांगुन गोळ्या औषधं लिहुन दिली.काय झालं कसं झालं हे विचारुन आणी नानाला आराम करायला सांगून ते गेले.

"मला थोडं काम आहे ,तु जाउन झोप .बाळू मला वर सोडेल " असं सांगून नानाने नानीला परत वर पिटाळलं.
उगाचच मुसमुसत आणी बडबड करत नानी वर चालती झाली.बाळु आणी संत्या देखील सर्व नमक हलाली करुन प्रेसमधे शिरले.आता केबिन मधे नाना आणी आम्ही दोघंच शिल्लक होतो.

"बाप्या ! तु कुठं आहेस ?? समोर ये .तुझा हिशोब करतोय " नाना आम्हाला हाका मारु लागला

नान्या हिशोब करतोय म्हंटल्यावर आमची उत्सुकता वाढली होती.नाना लोकांचे पगार कसे काढतो ते बघायचचा होतं.दर महिन्याला त्याच्या आणी आमच्या पगाराच्या हिशोबात दिडदोनशे रुपयांच अंतर असायचं.

च्यायला ! चिंधी साला कधी पंधरा विस मिनीट लेट झाला किंवा काही कामासाठी लवकर जावं लागलं तर पैसे कापायचा हरामखोर.

आता यावेळी देखील तो असंच वागणार होता हे नक्की.म्हणजे आम्ही मेल्यानंतर भुत बनुन आमचा हिशोब मागत असतानाही ,आणी आमच्या दर्शनाने त्याचा बद्धकोष्ठाचा त्रास बरा झालेला असतानाही तो पुन्हा एकदा चिंधीचोरी करणारच होता.
साला कुत्र्याच्या शेपटासारखा वाकडा होता नाना पाडेगावकर.

खुप हाका मारुनही आम्ही ओ देत नाहीये हे बघुन नाना थोडा रिलॕक्स झाला.आणी त्याच्या अॉफीसचेअरवर मागे रेलुन ऐटीत आम्हाला शिव्या देउ लागला.

थोड्यावेळाने त्याची आम्ही तेथे नसल्याची खात्री झाली पण तरीही सुरक्षीतता म्हणुन साइड टेबलवरच्या मारुतीच्या मुर्तीसमोर
अगरबत्ती लावुन तो मारुती स्तोत्र म्हणु लागला .आणी मुर्तीच्या शेजारील रिकाम्या जागेत बसुन आम्ही ते तल्लीन होउन ऐकत राहीलो.

नाट्य

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Nov 2018 - 3:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं चाललंय ! =)) पुभाप्र.

आनन्दा's picture

18 Nov 2018 - 5:30 pm | आनन्दा

मस्तच.
थोडे मोठे भाग टाका ना प्लीज

ज्योति अळवणी's picture

18 Nov 2018 - 7:27 pm | ज्योति अळवणी

झक्कास मजा येते आहे.

मोठे भाग टाकलेत तर बरं होईल

अनिंद्य's picture

19 Nov 2018 - 11:42 am | अनिंद्य

@ प्रमोद पानसे,

सगळे भाग वाचले. गचकलेल्या माणसाचे आत्मकथन खुसखुशीत शैलीत लिहिताय.

ह्याच थीमवर सतीश आळेकर यांची 'महानिर्वाण' ही कृष्णसुखात्मिका / ब्लॅक कॉमेडी आहे - ते आठवले :-)

पु भा प्र

अनिंद्य

प्रमोद देर्देकर's picture

19 Nov 2018 - 1:47 pm | प्रमोद देर्देकर

मस्त.
वाचतोय .

आनन्दा's picture

24 Nov 2018 - 5:07 pm | आनन्दा

काका मोठे भाग टाका म्हटलं म्हणून रागावला वाटतं?

रागावू नका हो, मी वाट बघतोय पुढच्या भागाची