अतृप्त आत्मा -९

प्रमोद पानसे's picture
प्रमोद पानसे in जनातलं, मनातलं
17 Nov 2018 - 5:47 pm

आप्पाला चाळीपाशी सोडुन नानाच्या गाडीने यु टर्न घेतला आणी ती प्रेसकडे पळु लागली.उद्या दोन तीन डिलीव्हरीज द्यायच्या असल्याने आणी आमदारपुत्राच्या लग्नपत्रीका प्रिंट करायच्या असल्याने नानाने रात्रपाळी चालु ठेवलेली.दिवाळीच्या काळात ही धावपळ नेहमीचीच होती.

मागच्या सिटवरुन आम्ही नानुच्या शेजारी स्थानपन्न झालो.आणी आमचं अस्तित्व जाणवुन देण्यासाठी आम्ही एकच क्षण नानाच्या खांद्यावर हात टाकला.

दचकलेल्या नानाने एकदम डावीकडे बघीतले .आमच्या अर्धाच सेकंदाच्या दर्शनाने नाना नखशिखांत हादरला होता.आणी ब्रेक सोडुन त्याने एक्सेलवर पाय दाबला .कंट्रोल सुटुन गाडी बाजुच्या गटारात आदळुन कलती झाली.लघुशंकेला उभ्या असलेल्या श्वानाच्या स्टाईल मधे कलंडलेल्या गाडीतुन नाना धडपडत बाहेर पडला .आदळल्यामुळे नान्याच्या चेहऱ्यावर उजव्या बाजुला सुज आलेली.कादरखानी चेहऱ्याचा नाना त्यामुळे अधीकच भेसुर दिसत होता.

शरीरावर बर्याच ठिकाणी मुकामार बसल्याने कळवळत नाना रस्त्याच्या पलीकडे असलेल्या पाराकडे बसण्यासाठी चालु लागला.कमरेत लचक भरल्याने ,पाय मुरगळलेला आणी एकदोन बरगड्याची वाट लागलेल्या नानाची चाल एखाद्या हॉंटेड फिल्ममधल्या भुताने झपाटलेल्या कॕरेक्टर सारखी दिसत होती.याक्षणी त्याला कुणी जरी बघीतलं असतं तर ते नक्कीच घाबरलं असतं.थोडसं तर आम्हीही दचकलो होतो त्याचं फुटुन काळनीळं पडलेलं थोबाड बघुन.

नानाची चालतानाची लटके झटके भरलेली अदा मागुन बघुन करमणुक होत होती.जरा पुढुनही बघावं म्हणुन आम्ही त्या पारावर आधीच जाउन बसलो.पिंजरा मधल्या संध्याचे नाचतानाचे हावभाव जर कादरखानने केले असते तर तो जसा दिसला असता तसेच हावभाव करत नाना आमच्या शेजारी येउन बसला.

कण्हत कुंथत आमच्या नावाने अर्वाच्य शिव्यागाळी चाललेली त्याची.आमचं दर्शन हा भास होता असा त्याचा समज झालेला.आणी त्यामुळे त्याने शिव्यांशापांचा सपाटा लावलेला.

खरं तर आमचंही थोडसं चुकलच .वाहन चालकाला असं डिस्टर्ब करु नये ,त्यामुळे ड्रायव्हींगकडे दुर्लक्ष होउन अपघाताची शक्यता वाढते.प्रवाश्यांच्या जीवाला धोका निर्माण होउ शकतो हे आम्हाला समजायला हवं होतं.

पण थोडसंच चुकलेलं.कारण गाडीत नाना आणी आम्ही दोघंच तर होतो.आणी आम्ही आधीच मेलेलो असल्याने आमच्या जीवाला धोका असा नव्हताच.रहाता राहिला नाना ,तो मेल्यामुळेही कुणाचं काही खास बिघडणार नव्हतं.

हां त्याची प्रेस आणी प्रेसमधे आलेली कामं खोळंबली असती एवढंच.पण आम्ही होतो ना संभाळायला आणी आमचे चिरंजीवही होते आमच्या मदतीला.

मगाशी दोघांच आमच्या कुटुंबाबाबतचं बोलणं ऐकुन आमच्या मनात हा विचार आलेलाच होता.

नानाची एकंदरीत दयनीय अवस्था बघुन शेवटी आमचं मन द्रवलं.तसें आम्ही खुप हळव्या मनाचे.कुणाचं दुःख बघीतलं की फार वाईट वाटायचं आम्हाला. सहानुभुतीदाखल जमेल तशी मदतही करायचो.

आताही नानाच्या फुटलेल्या नाकातुन वहाणारं शेंबुडवजा रक्त बघुन आमचं हृदय कळवळलं.जवळच्या सुगड्यात आडाचं पाणी काढुन घेउन ते आम्ही नानासमोर धरलं.

पण आधी पारा मागे असलेल्या आडाच्या रहाटाचा अचानक येणारा आवाज आणी तरंगत येणारं पाणी भरलेलं सुगडं बघु नाना फेफरं येउन पडला.

आता या नानाला आमच्या अस्तित्वाची पुर्ण जाणीव करुन देण्याची वेळ आली होती.कारण पडताना त्याने छातीवर हात दाबलेला.

शेवटी आम्ही त्याच्या तोंडावर पाणी मारुन आणी पाठीला हात देउन त्याला शुद्धीवर आणत बसता केला.

आमच्याकडे बघताना नानाची नजर आजीबात स्थिर नव्हती.भयचकीत नजरेने आणी विदीर्ण चेहऱ्याने बघत नाना किंचाळला.
"बाप्या भडव्या ! हा काय चावटपणा लावलायस "

नाट्य

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

17 Nov 2018 - 10:01 pm | प्रमोद देर्देकर

जाम धमाल येतेय .

diggi12's picture

17 Nov 2018 - 11:50 pm | diggi12

अजुन एक येउद्या

अमित खोजे's picture

18 Nov 2018 - 12:11 am | अमित खोजे

सगळे भाग आत्ता वाचले. कथा छान चालू आहे. पु ले शु

पद्मावति's picture

18 Nov 2018 - 12:22 am | पद्मावति

तूफानी लिहिताय हो. मस्तं, मस्तं.