एव्हाना सुर्य मावळतीला आला होता.सर्व बांधाबांध होउन आमची पालखी स्मशानाकडे मार्गस्थ झाली होती.आमची काही ठराविक लोकप्रियता आक्रंदत आणी बाकी बघे आणी टगे फॉर्मलिटी म्हणुन पालखीत सामिल झालेले.मजल दरमजल करत पोहचलो एकदाचे मुक्कामी.आमच्या जाण्याने घरातही तसा काही फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला नव्हताच.सर्व वातावरण साधारण स्थिर होतं .आमच्या एकंदरीत वर्तणुकीचा परिणाम .
त्यामुळे झाल्या गोष्टीचं दुःख न बाळगता आम्हीही सुर्यास्ता कडे डोळे लावुन बर्याच वेळानंतर पुन्हा एकदा मानवी रुपात परत येण्याची आणी राहिलेल्या इच्छापुर्ती करण्यासाठी आमच्याच अंत्यविधीची वाट बघत बसलो होतो.
शंभ्याने ठरवुन ओली लाकडे आणुन नेहमीचा नालायकपणा केलेलाच होता. साल्याला ओढावा का आपल्याबरोबर अश्या विचारात असतानाच बाबल्याने पुन्हा त्याच्या माणसाकरवी नविन बाटली तीथे आणुन ठेवली.
पण अजुनही सुर्यास्त झाला नसल्याने आम्हाला मानवी रुप मिळालेले नव्हते.
"कब होगा इंतजार खतम ?"
बाबल्या थोडा डँबिसच होता तसा .म्हणजे आमची शेवटृची इच्छा म्हणुन गोखल्याकडुन पैसे उकळुन तीथे बाटली ठेवली होती.आणी मी कसं लक्षात ठेउन काही गोष्टी करतो असा देखावा निर्माण केला होता त्याने.सर्व उरकल्यावर ती ओल्डमंक तोच गट्टम करणार होता.
एक नंबर हरामी राजकारणी होता बाबल्या .थांब जरा येउ दे मला मानवी रुपात मग दाखवतो असं म्हणुन आम्ही पश्चिमेकडील आकाशातील लाली गडद होत जाताना बघत बसलो.
मगाशी आमची पालखी उचलायच्या टायमाला आमचा कुटुंब कबिला आणी नातेवाईकांबरोबर जयडीही तिथे आलेली.रडारड आणी बोंबाबोब याची तुंबळ चढाओढ चाललेली.त्याक्षणी प्रथमच आम्ही खुप सज्जन ,सत्शिल ,मनमिळाउ ,समाजप्रिय ,कुटुंबाच प्रेमळ छत्र आधार वगैरे असल्याचं आम्हाला समजलं.
फक्त जयडी तेवढी मनापासुन दुःख व्यक्त करत होती.आत्ता दिसत असलेल्या पश्चिमेकडील आकाशातली लाली तेव्हा तिच्या डोळ्याता खुप जवळुन बघितली होती.प्रथमच मन थोडं कातर झालं .
तेवढ्यात नाना पाडेगावकराचा आवाज ऐकु आला .हा पाड्या आमच्या प्रिंटींग प्रेसचा मालक.
आप्पा गोखल्याला तो सांगत होता .
"अप्पा ! अहो कालच बोनस आणी पगार घेउन गेला बापु .आणी आमदाराच्या लेकाच्या लग्नाच्या पत्रिकांच काम ताटकळवत ठेवलं हरामखोरानं." नान्या बोलला
"बाप्या हलकटच होता .तुम्ही उगाच ठेवलात कामावर" आप्प्या बरळला
"नाही हो ! कंपोझींग मधे एकदम मास्टर होता तो .पण कामं आडवायचा स्साला संधी साधुन" नान्या
च्यायला ! नान्या निचा काल ते काम निपटुन नंतर बोनस मागितला तुला तर नाही म्हणालास पगार पण अर्धाच दिलास .आणी इथे येउन खोटं बोलतोस ?
तु थांबच आता बघतोच तुलापण .नाही तुझ्या प्रेसचे खीळेँन खीळे हालवले ना तर बापु जोशी नाव ड्रेनेजमधे सोडेन.
माझ्या राहिलेल्या कामात भर पडली होती.
चिरंजीवांनी चुड लावला होता आणी चिता धडधडु लागली होती.आणी आमच्या मनात सुडाची आग धगधगु लागली होती.
सुड! बाप्या सुड!! आमचं मन आक्रंदत होतं.
प्रतिक्रिया
16 Nov 2018 - 5:39 pm | हतोळकरांचा प्रसाद
अप्रतिम, सहज, सुलभ लिखाण! पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत. पुढच्या लेखनासाठी अनेकानेक शुभेच्छा!
अवांतर सूचना : भाग थोडे मोठे मोठे किँवा एकत्रित करून टाकले तर वाचायला सोपं जाईल.
16 Nov 2018 - 5:58 pm | प्रमोद पानसे
वेळ मिळेल तसा प्रयत्न चालू आहे.धन्यवाद
16 Nov 2018 - 5:51 pm | प्रमोद देर्देकर
लय खुशखुशीत. येवू दे अजून.
आमच्या गुरुजींनी म्हंजे अतृप्त आत्म्याने असंच 50 भाग लिहून पछाडले होतं .
तुम्ही पण करा तेव्हढेच भाग .
16 Nov 2018 - 5:57 pm | प्रमोद पानसे
आत्मु गुरुजी तर आमचे प्रेरणास्थान
16 Nov 2018 - 8:59 pm | पद्मावति
खुप आवडतेय मालीका. लेखनशैली भन्नाट आहे तुमची.
16 Nov 2018 - 9:24 pm | प्रमोद पानसे
थँक्स ....
16 Nov 2018 - 9:32 pm | सस्नेह
मस्त चाललीये मालिका :)