हिंडताना दूर देशी, गर्द रानी हरवलेला
कोणत्या वाटे इथे येऊन मज मी भेटलो
निसरड्या वाटेवरी, हलकेच पाऊल टाकता
मखमलीचा पायगोवा सोडुनी गुंगावलो
वाटले विहिरीत वाकून डोकवावे मोडल्या
चाहुलीने कोणत्या बोलाविले मज ना कळे
वर्तुळे पाण्यावरीची स्तब्ध होऊ पाहता
दिसत शेवाळातले आकाश निळसर बावरे
घेता विसावा सावली पारावरी रेंगाळली
ऊन कुरवाळीत होते कुरण हिरवे कोवळे
दूर कोठे वाजणारी बासरी मी ऐकताना
स्पर्शली कविता मनोमन मोरपंखासारखी
सांजवेळी गोधुली घरट्यात पक्षी पावता
मिटुनी डोळे सूर शोधत बैसलो तेजाळले
प्रतिक्रिया
15 Nov 2018 - 10:38 am | यशोधरा
चित्रदर्शी सुंदर कविता.
15 Nov 2018 - 2:32 pm | अत्रुप्त आत्मा
पांडू मोड ऑन
छाण!
पांडू मोड ऑफ! ;)
15 Nov 2018 - 3:29 pm | अनन्त्_यात्री
अंतर्नाद असलेली कविता!
10 Dec 2018 - 7:05 pm | पिंट्याराव
सुंदर रचना
10 Dec 2018 - 7:05 pm | पिंट्याराव
सुंदर रचना
10 Dec 2018 - 7:05 pm | पिंट्याराव
सुंदर रचना