नमस्कार,
खरे तर हा धागा श्रीगुरुजी काढतील असे वाटले होते, पण ...असो...
आत्ता पर्यंत तरी ४ मॅचेस झाल्या आहेत.
भारताच्या दृष्टीने आनंदाची बातमी म्हणजे, हरमनप्रीत कौरने काढलेले शतक...फक्त ५१ बॉलमध्ये १०३ धावा..
आस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजने आपापल्या मॅचेस जिंकल्या आहेत तर, इंग्लंड आणि श्रीलंका ह्यांच्या मधली मॅच पावसामुळे वाया गेली...
अजून अर्ध्या तासाने, भारत विरूद्ध पाकिस्तान मॅच सुरु होईल.
रात्री १:३० वाजता, ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड ह्यांच्या मध्ये सामना होईल.
हरमनप्रीत कौर आणि भारतीय टीमला शुभेच्छा....
अधिक माहितीसाठी खालील लिंक बघा...
https://www.cricbuzz.com/cricket-series/2724/icc-womens-world-t20-2018/m...
ह्या सगळ्या मॅचेस, हॉटस्टार वर लाइव्ह दाखवत आहेत...
प्रतिक्रिया
11 Nov 2018 - 8:39 pm | मुक्त विहारि
https://www.hotstar.com/sports/cricket/icc-womens-world-t20-2018/india-w...
11 Nov 2018 - 11:36 pm | मुक्त विहारि
भारतीय महिला जिंकल्या....
12 Nov 2018 - 1:06 am | मुक्त विहारि
आयर्लंडची बॅटिंग...
22 Nov 2018 - 3:41 pm | मुक्त विहारि
अपेक्षेप्रमाणे, भारत, वेस्ट-इंडिज, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ उपांत्य फेरीत दाखल झाले.
भारताच्या दृष्टीने जमेची बाजू म्हणजे, स्मृती मानधनाच्या खेळात होत असलेली सुधारणा आणि पाकिस्तान बरोबरच्या मॅच नंतर क्षेत्ररक्षणातली सुधारणा.
वेस्ट इंडिज बद्दल काय बोलणार? प्रत्येक खेळाडू जीव तोडून खेळत आहे.शिवाय स्थानिक प्रेक्षकांचा वाढता सहभाग आहेच.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे अनुक्रमे जरी वेस्ट इंडिज आणि भारता बरोबर हरले असले तरी, एखाद-दुसर्या सामन्यामुळे खचून जाणारे हे संघ नाहीत.
आज रात्री १:३० वाजता, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट-इंडिज मधला थरार तर उद्या पहाटे ५:३० वाजता, भारत आणि इंग्लंड मधली लढत...कुणीही जिंको, एक मात्र नक्की... पुढल्या ३ही मॅचेस नक्कीच रंगतदार होणार.