दिवाळी
दिवाळीची खरेदी आटपून केशव घरात आला व आई शेजारी येऊन बसला
पाठोपाठ शकू रोहन मनू पण पिशव्यांचे ओझे सांभाळत आल्या
व सर्वजण आई भोवती कोंडाळे करून बसले
खरेदी मनासारखी झाल्याने सा-याचे चेहरे आनंदाने फुलले होते
झाली का खरेदी मनासारखी ? आईने विचारले
हो आज्जी मस्त मनासारखी झाली रोहन म्हणाला
आणि सुनबाई खुश आहेत ना?
हो आई -शकू म्हणाली म्हणताना तिचा चेहरा फुलला होता
सा-यांनी ब्यागा उघडत खरेदी दाखवली
लहानगा रोहन फटाके मनासारखे आणले म्हणून खूष होता
जा ब्यागा जागेवर नीट ठेवा उद्यापासून दिवाळी चालू होत आहे
होय सासूबाई म्हणत ते त्रिकुट पिशव्या उचलत आतल्या खोलीत गेले
केशव आईला सांगत होता
हिला २ साड्या घेतल्या एक वापरातली अन एक भारी -रोहन ला शाळेचे नवे शूज शाळेचा ड्रेस व एक बाहेर जाण्यासाठी भारीतला शिवाय फटाके
मनूला २ ड्रेस फ्याशनेबल शूज -अन तुझ्या साठी २ नऊ वारी साड्या
अन हो गोदाताई साठी साडी अन एक हजार ओवाळणीचे बाजूला काढून ठेवले आहेत
आई ऐकत होती म्हणाली मला मेलीला कश्याला साड्या ?
असू देत सगळे जण नव्या कपड्यात नटणार -तिला पण नव लुगडं हवाच की
बरे ते राहू देत -तुला शर्ट विजार आणली ना ?
केशव काहीच बोलला नाही
आग बोनस मिळाला पण तुझ्या आजारपणा साठी उचल घेतली होती सोसायटी वाल्यांनी त्यांनी पैसे वळते केले -पगार व ऍडव्हान्स होता त्यात दिवाळीची खरेदी शिवाय मुलांच्या फिया रिक्षा किराणा आदी खर्च आहेतच
केशव म्हणाला
ते मला सांगू नकोस -मी विचारले स्वताला कि घेतलेस का नाही ? आई म्हणाली
आग मला कशाला हवे नवे ? मागच्या महिन्यात शर्ट घेतला होता
तोच धुवून इस्त्री करून वापरिन
आई म्हणाली असा कसा रे केशव तू? सर्वासाठी राबतो सारे करतो तू अन स्वताचा विचार पण करत नाही ?
आई दिवाळीत तुम्हा सर्वांच्या चेहे-यावर आनंद पाहिला कि मला दिवाळी साजरी झाल्या सारखे वाटते केशव म्हणाला
हे ऐकून आईच्या डोळ्यात पाणी तरारले
केशव ला जवळ घेत त्याच्या केसावरुन तिने मायेने हात फिरवला
आईचा तो मायेचा स्पर्श होताच केशवच्या अंतरंगात दीपावली चे लक्ष लक्ष दीप उजळले व त्याच्या चेहरा आनंदाने उजळून निघाला
प्रतिक्रिया
5 Nov 2018 - 5:56 pm | यशोधरा
आवडले. जुनी एखादी कथा वाचल्यासारखे.
5 Nov 2018 - 5:58 pm | मुक्त विहारि
कथा आवडली...
(अकुक फॅन) मुवि....
6 Nov 2018 - 2:24 am | जुइ
कथा आवडली!
6 Nov 2018 - 4:43 pm | समीरसूर
आवडले. साधे पण मनाला भिडणारे.