मधुकर
जरी पिऊनी आता
झालास तू बेहोष..
शोषून फुलांचे सारे
जरी मधुकोष ..
हा व्यर्थ तुझा आवेश,
तुझा हा अंध..
पाकळया फुलांच्या
तुजसाठी झाल्या बंद
रुसलेले गीत
रुसले गीत
शब्दात अडखळे शब्द
ओठावर ये ऊन
झाले ते नि:शब्द
येऊन तळमळे
अधरावरती गाणे
नशिबात कळीच्या
निर्माल्याचे जिणे
प्रतिक्रिया
31 Oct 2008 - 5:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दोन्ही कविता आवड्ल्या !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
31 Oct 2008 - 6:41 pm | मनीषा
कविता...
हा व्यर्थ तुझा आवेश,
तुझा हा अंध..
पाकळया फुलांच्या
तुजसाठी झाल्या बंद .........खूपच छान !
1 Nov 2008 - 12:32 am | विसोबा खेचर
नशिबात कळीच्या
निर्माल्याचे जिणे
वा!
1 Nov 2008 - 1:27 am | शितल
दोन्ही ही कविता सुंदर आहेत.
:)
1 Nov 2008 - 4:38 am | मदनबाण
दोन्ही कविता सुंदर आहेत..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
1 Nov 2008 - 2:18 pm | विजय पाटील
दोन्ही कविता सुंदर आहेत..