एक कविता हवी आहे

पथिक's picture
पथिक in जे न देखे रवी...
30 Oct 2018 - 10:11 am

नमस्कार मंडळी !
एका निसर्ग-पर्यावरण कविता अंकासाठी (व्यावसायिक नाही) एखाद्या सुप्रसिद्ध मराठी कवीची एक कविता निवडायची आहे. जरा मदत करता का ? अभंग पण चालेल.

साहित्यिक

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Oct 2018 - 12:57 pm | ज्ञानोबाचे पैजार

मिपावरच्या कोणत्याही कवीच्या कविता घ्या, चांगल्याच असतात...
.
.
पण
.
.
सुप्रसिध्द, वलयांकीत, नामवंत, सकस, दर्जेदार आणि अफाट लोकप्रिय कवीची कविताच हवी असेल तर....
.
.
.
म्हणजे तुम्हाला तुमच्या अंकाच्या करोडो प्रति हातोहात खपवायच्या असतील.....
.
.
.
तर मग तुमच्या पुढे एकच पर्याय आहे....
.
.
.
माझ्या मिपावरच्या कवितांपैकी कोणतीही कविता घ्या (फुकट)

पैजारबुवा,

पथिक's picture

30 Oct 2018 - 1:12 pm | पथिक

:) :)
प्रति खपवण्याचा प्रश्नच नाही. सॉफ्ट कॉपी मेल करायची आहे लोकांना मोफत.

अभ्या..'s picture

30 Oct 2018 - 1:54 pm | अभ्या..

अरेवा,
आमच्याकडे याला "वाळूत *तले, ना फेस ना पाणी" म्हणतात.

खिलजि's picture

30 Oct 2018 - 3:33 pm | खिलजि

माझी मदत चालेल का ?
कंच्या टाईपची कविता पाहिज्ये त्ये जरा व्यनि करा राव.

एकापेक्षा एक न्हाय दिली तर "बा" चं लावणार नाय नाव ...

मगर डुक्कर माळढोक पक्षी सारेच इथे थांबतात

आत कहीतरी सांगून सावरून हळूच बाहेर पडतात

पूर्वी सारे ऐकून, टंकून सोडत होतो आंजावर

थांबण्यासाठी रिक्वेस्ट आली, मग आलो कुठे भानावर

असं काहीसं वाचून, साल्या भावना परत उचमळल्या

इथे गळ्याशी पूर आला बघा , बोटं झालीत अनावर

व्यनि करा साहेब व्यनि करा , सत्वर मांडा आपुले म्हणणे

मलाबी जरा वाव द्या कि राव , ते कवितेचं घ्या मनावर

ह्ही ह्ही ह्ही

खिलजी उर्फ सिद्धेश्वर विलास पाटणकर उर्फ कुप्रसिद्ध कल्पनाधारक उर्फ वाचकांसाठी मारक उर्फ उर्फ उर्फ तारक उर्फ .....

पथिक's picture

31 Oct 2018 - 10:05 am | पथिक

:)
नमस्कार ! कविता एखाद्या सुप्रसिद्ध कवीची आणि ती पण निसर्ग, पर्यावरण या विषयांना धरून असावी.

खिलजि's picture

31 Oct 2018 - 1:22 pm | खिलजि

हलकेच घ्या राव ,, मज्जाक करत होतो . तसाही जिथे " सु " हा शब्द येतो , तिथे आम्ही कधीच नसतो .. आम्हाला " कु " हा शब्द नेहेमी जवळचा वाटत आलाय .. एक मानाचं बिरुद म्हणौन बाळगलाय त्याला .. कधी " कु " ची गरज लागली तर व्यनि करा .. पण तेव्हढं कवितेचं मनात धरा..