(भाषा एका नदी सारखी आहे, सोबतीचे नदी, नाले समाहित करून सतत पुढे जाणारी- दिल्लीतली एक आई आपल्या बाळाला गोष्ट सांगत आहे)
एक होती चिव. तिचे काय नाव होते, स्पैरो. एक होता काऊ त्याचे नाव होते क्रो. एकदा काय झाले. काऊचा बंगलो पाऊसात डेमज झाला. काऊ चिवताईच्या घरी गेला आणि दार वाजवले, "स्पैरो स्पैरो ओपन द डोर".
स्पैरो म्हणाली, "थांब मी आपल्या बाळाची मालीशी-मालीशी करते", प्लीज वेट.
थोड्या वेळानी क्रो पुन्हा दार वाजविले, "स्पैरो स्पैरो ओपन द डोर".
"थांब मी आपल्या बाळाची न्हाई न्हाई करते", प्लीज वेट.
थोड्यावेळ आणिक वाट पाहून क्रो दार वाजवतो "स्पैरो स्पैरो ओपन द डोर". स्पैरो डोर उघडते. क्रो म्हणतो, चिवताई माझा बंगलो पाऊसात वाहून गेला. मला घरात घेशील का?
स्पैरो म्हणाली ठीक आहे, आजच्या नाईट इथेच रहा, उद्या दुसरे घर बघ.
"थेंकस् थेंकस् स्पैरो", क्रो म्हणाला.
क्रो होता गंदा बच्चा, त्यानी रात्री बिस्तरावर पोट्टी केली.
बाळ - मग चिवताईला गुस्सा आला असेल.
हो न! चिवताईला भयंकर गुस्सा आला, तिने क्रोचे कान पकडले आणि म्हणाली डर्टी क्रो गेट आउट.
बाळ- ममा, मी तर पॉट मध्ये पोट्टी करते, अच्छी बच्ची आहे न मी.
माझी सोनी, किती शहाणी, स्मार्ट-स्मार्ट बेबी, म्हणत आईने बाळाचा प्रेमाने गालगुच्चा घेतला.
गोष्टीत अनेक भाषा आणि बोलीचे शब्द आले असले तरी हि गोष्ट मराठी भाषेत आहे, हे नक्कीच. भाषा अशीच बदलणार, कुणी कितीही थांबविण्याचा प्रयत्न केला तरी.
प्रतिक्रिया
18 Sep 2018 - 12:19 pm | खिलजि
चिऊ काऊची गोष्ट आठवतेय
आठवून मन खातंय
लहान मन मोठं का होतंय ?
निर्मळ गंगेवानी ते लहानपणी
मोठाले जहरी होतंय
त्या गोष्टीतच ती पायरी होती
नाही ती गोष्टच विषारी होती
कावळा जरी धूर्त असला
तरी चिऊ त्याला भारी होती
शेण काय न मेण काय ?
दरवाजा उघडायचा नाय
आंघोळ घाला , तेल लावा
कसा पण वेळ काढा
बाहेरच्याला बाहेरच ठेवा
हाच होता त्या गोष्टीचा मेवा
लहानपणी सर्व ऐकतात
मोठे होऊन अंमल करतात
आयुष्यभर काव काव करून
कायमचे वर जातात
सिद्धेश्वर विलास पाटणकर
18 Sep 2018 - 2:20 pm | श्वेता२४
धागाही व त्यावरचा प्रतिसादही
19 Sep 2018 - 4:06 pm | खिलजि
अग्ग्ग्ग्ग्ग्ज करायला काय झालं श्वेताताई ? कळ मारतेय का कुठे ?
18 Sep 2018 - 3:01 pm | महासंग्राम
अरे वेड्या मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात रे त्यांना असली कसली क्रो आणि स्पॅरो ची भाषा शिकवता रे. किती नाजूक मन असतं त्यांचं, अगदी हळुवार फुंकर घालावी तसं शिकवायचं असतं रे त्यांना.
दवणीय नाना आमटे पाटील
19 Sep 2018 - 9:24 am | ज्योति अळवणी
भाषा बदलते; म्हणजे तिचा लहीजा बदलतो.मरागही भाषेत आंग्ल शब्द वापरणे म्हणजे भाषा बदलणे होत नाही असं मला वाटतं
19 Sep 2018 - 5:35 pm | अनन्त्_यात्री
हा शब्द कोणत्या भाषेतून आलाय?
21 Sep 2018 - 11:16 am | विवेकपटाईत
दिल्लीत हि नव्हे पुण्या मुंबईत हि नवीन पिढी मराठी सोबत आंग्ल भाषाची गुटी जन्मताच बाळाला पाजायला सुरुवात करतात. हिंदी हि आलीच. त्याचाच परिणाम अशी भाषा जन्म घेत आहे. दिल्लीत हि हिंदी माध्यमातून शिकलेला तरुण हि ४ वाक्य शुद्ध हिंदीत बोलू शकत नाही.
समाहित: हिंदी भाषेचा शब्द व्यवस्थितपणे सामावून घेणे / एकत्र करणे.
24 Sep 2018 - 7:50 am | अरविंद कोल्हटकर
आमच्या नात्यातील एक लहान मुलगा शाळेतून येऊन मम्मीला सांगतो मम्मी मम्मी आम्हाला आमच्या मिसनं उद्यासाठी काय प्रॉजेक्ट करून आणायला सांगितलाय म्हैत आहे? मम्मी विचारते काय? मिस म्हणाल्या डिफरंटडिफरंट कण्ट्रीमध्ल्या डिफरंटडिफरंट बर्डची पिक्चर्स ड्रॉ करून न्यायची आहेत.