कोणीतरी असावे.......
ओठात नाव ज्याचे श्वासासमान यावे ।
नात्यामधे असेही कोणीतरी असावे ।।
रेखाटल्या चित्रांचे रंग फिकेच भासावे ।
अधुऱ्या स्वप्नांनी आता कुंपणांतच रहावे ।।
एकरूप या मनांचे, वचन वेगळे नसावे।
जीवघेणे प्रश्न तरी, उत्तराने हसत असावे ।।
आयुष्यांचे नकाशे, दूर देशांत दिसावे ।
भाग्यांमधल्या रेषांनी, क्षितिजांवरी जुळावे ।।
घाव हे जखमांचे, त्याच्या फुंकरीने मिटावे ।
निखारे ओले वाहती, कुणा न ते दिसावे ।।
सौद्यात स्वप्नांच्या त्याच्या, अजून काय हरावे ।
गहाण ठेवले श्वासही , काय उधार मागावे ।।
----फिझा