अपूर्ण आयुष्याची कविता

Prakashputra's picture
Prakashputra in जे न देखे रवी...
25 Aug 2018 - 12:02 pm

दोन पेग झाल्यानंतर, जेव्हा दोन पेगचे लिमिट म्हणून तिसरा प्यायचा नव्हता, पण ग्लासात काहीतरी पाहिजे होते, म्हणून मी नुसताच सोडा ओतला तेव्हा सुचलेली कविता

मी स्वतःला फसवायला खूप प्रयत्न करतो !
आणि दरवेळेला स्वतःच फसतो !!
दरवेळी जिंकायचा प्रयत्न करतो, !
मग मीच जिंकतो आणि मीच हरतो !!

स्पर्धा कुणाशी आहे तेच कळत नाही !
तरी उगाचच लढत बसतो !!
मी शहाणा म्हणून मलाच समजावत बसतो !
मी वेडा म्हणून माझ्याशीच भांडत बसतो !!

क्षुद्र आयुष्याला अर्थ द्यायचा म्हणून !
भव्य तत्वज्ञान मांडत बसतो !!
शिस्तीच्या नावाखाली तिसऱ्या पेगला !
नुसता सोडा म्हणत बसतो...... !!

सगळ्याचाच उबग येऊन चौथा पेग ओततो !
मग एक कविता राहते अपूर्ण
अपूर्ण आयुष्याची कथा सांगत…….

कविता