पावसाचं गीत

चांदणशेला's picture
चांदणशेला in जे न देखे रवी...
18 Aug 2018 - 2:41 pm

हिरव्या रानात पाखरांची वस्ती
पावसाचं गीत कंठातून गाती

नभात उतरले रंग सावळे
मेघात लपले आभाळ निळे

पसरला माथ्यावर ढगांचा मांडव
पिसाट झाडांवरती विजांचे तांडव

शिवारात सरकते वाऱ्याची लाट
माती पाहते पाऊसओली वाट

कविता

प्रतिक्रिया

VINOD J. BEDGE's picture

21 Aug 2018 - 6:33 pm | VINOD J. BEDGE

खूपच सुंदर !

विवेकपटाईत's picture

25 Aug 2018 - 8:43 am | विवेकपटाईत

सुंदर आवडली

चांदणशेला's picture

26 Aug 2018 - 5:38 pm | चांदणशेला

धन्यवाद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Aug 2018 - 6:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रचना आवडली. निसर्ग अजून फूलला असता असेही वाटले.

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

26 Aug 2018 - 6:46 pm | यशोधरा

आवडली कविता

चांदणशेला's picture

2 Sep 2018 - 10:30 am | चांदणशेला

मनापासून धन्यवाद

नाखु's picture

2 Sep 2018 - 12:28 pm | नाखु

कविता आवडलीच आहे.

भिजपावसातला नाखु