आज मिपावर फिशिंग अलर्ट संदेश वाचला आणि खूप दिवसापासून चुटपुट लागून राहिलेल्या भावनांना वाट मिळाली आणि जी माहिती किंवा लेख सगा सरांनी दाखवला(हा लेख कोणीतरी मायबोलीवर लिहिला आहे) तो पाहून मी उडालेच. कारण मी पण अगदी याच अनुभवातून गेले आहे. सबब समस्त मिपाकरांना सावध करण्यासाठी खासकरून महिला सदस्यांसाठी हा लेख.
डॉ. स्पर्शिका जोशी यांनी मला 7 जुलै च्या आसपास व्यनि केला की त्यांना माझ्या काही पाककृती आवडल्या. त्याला प्रतिसाद देण्यासाठी मी टिचकी मारली पण एक अशा आशयाचा संदेश झळकला कि त्यांना कुणीही प्रति संदेश पाठवू शकत नाही. मला हे विचित्र वाटलं. पण अशी काही सेटिंग करता येत असेल व मला माहित नसेल असं वाटलं. त्यानंतर लगेचच मला मेल आला की आपण बोलू शकतो का ? मला तुमची मदत हवी आहे. त्यावर मी त्यांना मला जमेल तशी करेन असा मेल पाठवला. त्यावर त्यांनी आपण चॅट वर बोलू असं सांगितलं. मी त्यांना शक्य नसल्याचे कळवले. त्यावर दुसरे दिवशी त्यांनी विंडो ओपन करून त्याचा पासवर्ड दिला पण मी त्यांना मला जमणार नाही आपण मेल वर बोलू असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी मी स्त्रीरोगतद्न्य असून वेदना न होणारे जेल शोधून काढले आहे जेणेकरून इंजेक्शन दिल्यावर वेदना जाणवत नाही असे सांगितले. मी या जेलचे काय घटक आहेत व याची काय साईड इफेक्ट आहेत ते विचारले . त्यांनी त्याचे नीट स्पष्टीकरण दिले. त्यांनी मला इंजेक्शन बाबतचे अनुभव विचारले मीही त्याची प्रामाणिकपणे उत्तरे दिली. हे तीन चार दिवस चालू होते कारण मला जमेल तसे मी मेल वर मराठी टाईप करून उत्तरे देत होते. मला त्यांनी कोल्हापुरात त्यांची मावशी राहते व त्यांचे क्लिनिक बांद्रा वेस्ट ला असल्याचे सांगितले. एव्हाना आम्ही बऱ्यापैकी सरावले होतो एकमेकींना. टाइपिंग चा कंटाळा असल्याने व मेल वरचेवर पाहण्याची सवय नसल्याने मी त्यांना माझा मोबाइल नं देऊन त्यावर वॉट्स अँप करा असे सांगितल्यावर माझा फोन मी केवळ imergency ला वापरते असं सांगितलं. मी जरा दुखावले गेले होते . त्यांचं असं वागणं अपेक्षित नव्हतं. कदाचित त्यांनाही हे जाणवलं असेल. त्यानंतर आजतागायत माझा त्यांच्याशी संपर्क नाही. पण खरा धक्का अजून मला बसायचा होता......
आज मी मिपावरचा संदेश वाचताच क्षणात मला स्पर्शिका आठवली. मी सरपंच ना संदेश पाठवला. खफ वर सगा सरानी त्यांचा उल्लेख केल्यावर त्यांनी माबो वरचा लेख जोडलेला वाचला आणि लक्षात आलं की मी पण हेच अनुभवलंय. पण खरं धक्का पुढे आहे.....
हा लेख लिहायचा म्हणून gmail वरचे तिचे reply इथे पेस्टवण्यासाठी शोधले तर आमचे सर्व संभाषण उडवले गेले आहे.........
मी अगदी trash फोल्डर हि तपासले. आमचे संभाषण झालयाचा एकही पुरावा शिल्लक नाही......
केवळ एक draft आहे पण त्यात काहीही लिहिलेले नाही. फक्त तिचा gmail address सापडला sparshika@ gmail.com
...........
प्रतिक्रिया
14 Aug 2018 - 8:25 pm | प्रचेतस
भयंकरच प्रकार दिसतोय,
तुमचा जीमेल आयडी हॅक झाला असावा अन्यथा संभाषण डिलीट होणे शक्य दिसत नाही.
तातडीने पासवर्ड बदलून घ्या.
14 Aug 2018 - 8:46 pm | सतिश गावडे
तातडीने पासवर्ड बदलून घ्या.
होय. कुणीतरी तुमच्या अपरोक्ष तुमचं जिमेल खाते हाताळत आहे. त्याशिवाय संभाषण आपोआप गायब होणार नाही.
14 Aug 2018 - 8:30 pm | खटपट्या
रोचक.
सर्वांनी सावध रहा.
बाकि मिपाकरांना असे अनुभव आले असल्यास इथे द्यावेत.
14 Aug 2018 - 8:39 pm | सतिश गावडे
तुम्ही लेख लिहीलात हे उत्तम झाले. इतरांना सावध होता येईल. तसा मिपा व्यवस्थापनाने ईशारा दिला आहेच. मात्र मिपाच्या कारवाईसंबंधीच्या सहिष्णू धोरणामुळे हा ईशारा मोघम शब्दांत आहे. तुम्ही स्वानुभव व्यक्त केल्याने तो अधिक प्रभावी संदेश देईल.
अगदी असेच अनुभव मायबोलीकरांना आले आहेत: https://www.maayboli.com/node/66780
14 Aug 2018 - 8:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
जालावरच्या बिनचेहर्याच्या आणि विनाओळखिच्या संवादात आपण स्वतः एक लक्ष्मणरेखा आखून घ्यावी हेच उत्तम. अश्या संवादांत, जेव्हा जेव्हा खाजगी माहिती देण्याची वेळ येते आणि "ती द्यावी की नाही ?" असा संभ्रम असतो, तेव्हा तेव्हा त्या प्रश्नाचे उत्तर नेहमी "नाही" असेच असते.
15 Aug 2018 - 11:26 am | प्राची अश्विनी
खरंय.
7 Sep 2018 - 6:12 pm | लौंगी मिरची
सहमत
14 Aug 2018 - 9:43 pm | कंजूस
माझ्या बायकोला मायबोलीवर मेल आला होता. त्याचे उत्तर " प्रतिसादाबद्दल धन्यवाद पण मला हँगआउट गुगल वगैरे अनुभव नाही." असे दिले होते. तिचे जीमेल नावापुरतेच आहे आणि क्वचितच वापरते.
आता हा लेख आणि मेलमधल्या पोस्ट्स गायब हे वाचल्यावर मेल उघडून पाहिला. सर्व आलबेल आहे आणि "लगेच उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद" दिले आहेत.
१३ जुलै, २७ जुलै,२७जुलै संभाषणे अजून आहेत.
आता त्या सावध झाल्या असाव्यात.
---
आमचा डिवाइस : विंडोज मोबाइल.
---
रिमोटली संभाषण काढता येत नाही असे सगा आणि प्रचेतस म्हणताहेत तर काही कराच. पासवर्ड दिला म्हणजे काय? गुगल हँगाउटबद्दल काही माहिती नाही कारण ते विंडोजमध्ये नाहीये.
एक अॅन्ड्राइड फोन घरात आलाय पण त्यावरही हे हँगाउट वापरून पाहिले नाही. ते इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे का आणि त्याचाच आग्रह जोशिबाई ( मायबोलीवरचा आइडी नं ६८६२४) का धरत असाव्या?
------
पुढे काही प्रगती झाल्यास कळवेनच परंतू आता शक्यता कमी वाटते.
14 Aug 2018 - 10:38 pm | श्वेता२४
मलापण विचारला होतं. पण मी hangout वर नाही सांगितलं. त्यांनी गूगल वर चॅट विंडो ओपन करून त्याचा पासवर्ड दिला होता. ती कन्सेप्ट मला पण माहित नाही.
एकंदरीत-
त्यांनी मला injection च्या अनुभव सोडून इतर काहीही विचारले नाही. मी त्यांना माझा मोबाइल नं देऊन चूक केली इतर कोणतीही माहिती खूपच मोघम दिली. उदा. कुठे राहता ? ठाणे , काय करता? सरकारी नोकरी इ। मुळात त्यांनी कोणतीही आक्षेपार्ह माहिती किंवा चौकशी केलीय असं मला जाणवलं नाही त्या इंजेक्शन बद्दलच बोलत होत्या. सगळंच विचित्र आहे. यातून काय साध्य होणार होत कुणास ठाऊक. इतरांना काही अनुभव असेल तर जरूर कळवा. आणि अजून हि इतर कोणी अशाप्रकारचा काही करत असेल तर लिहा
14 Aug 2018 - 11:07 pm | नाखु
धन्यवाद
15 Aug 2018 - 1:40 am | मास्टरमाईन्ड
https://plus.google.com/109349816857938415737
15 Aug 2018 - 11:25 am | प्राची अश्विनी
मलाही व्यनि आला होता, "नमस्कार प्राची ताई, छान लिहिता तुम्ही. तुमचा मिसळपाव वर "मणगण " हा आणि इतर लेख वाचले. तुमच्याशी गप्पा मारायला आवडेल मला. मी डॉक्टर स्पर्शिका जोशी. मी मुंबई ला असते.
मला तुम्ही hangout वर sparshika@gmail.com इथे संपर्क करू शकता. म्हणजे आपण बोलू.
धन्यवाद ,
डॉक्टर स्पर्शिका जोशी.
स्त्री रोग तज्ज्ञ
M.D. D.G.O..मुंबई
मी म्हटलं, "इथंच व्यनि त बोला". पण पुढे काही उत्तर नाही.
15 Aug 2018 - 3:43 pm | सस्नेह
Same to same शब्दात मलाही आला होता.
मी अर्थात काहीही उत्तर दिले नाही.
13 Sep 2018 - 1:56 pm | स्वाती दिनेश
नमस्कार स्वाती ताई,
छान लिहिता तुम्ही. तुमचा मिसळपाव वर "अँपल पाय " हा आणि इतर लेख वाचले.
तुमच्याशी गप्पा मारायला आवडेल मला. मी डॉक्टर स्पर्शिका जोशी. मी मुंबई ला असते.
मला तुम्ही hangout वर sparshika@gmail.com इथे संपर्क करू शकता. म्हणजे आपण बोलू.
धन्यवाद ,
डॉक्टर स्पर्शिका जोशी.
स्त्री रोग तज्ज्ञ
M.D. D.G.O.
मुंबई
असाच व्य नि मलाही आला होता पण मीही जास्त लक्ष दिले नाही.
स्वाती
15 Aug 2018 - 7:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपला अनुभव वाचला इतर मिपावरील महिला सजग होतील अशी अपेक्षा. अनुभव इथे लिहिल्याबद्दल आभार.
जीमेल चॅट डिलीट झाले याचं आश्चर्य वाटलं. एक तर दोन्ही बाजूचे पासवर्ड त्या व्यक्तिकड़े असल्याशिवाय असे होऊ शकत नाही असे वाटते.
जीमेल हॅकिंग ही प्रोसेस मला अवघड वाटते, पण हॅकिंग होऊच शकत नाही असे म्हणनेही धाडसाचे झाले आहे. हॅकर्स जेव्हा बॅंक ट्रांजेक्शन करू लागले म्हटल्यावर तंत्रजगतात काहीही होऊ शकते, असे वाटायला लागले आहे.
सर्वांनी जालावर सावध असलेच पाहिजे, इतका बोध पुरेसा आहे.
-दिलीप बिरुटे
15 Aug 2018 - 7:38 pm | टवाळ कार्टा
जीमेल अकाउंट हॅक झालेले मी स्वतः बघितले आहे त्यामुळे जीमेल सुरक्षीत आहे हा भ्रम आहे :)
15 Aug 2018 - 8:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जीमेल आणि अनेक तत्सम गोष्टी जालावर आता सुरक्षित राहिलेले नाही, हे खरं आहे. वेगवेगळी ड्राइव्ह, वेगवेगळी इमेल्स खाती आता सुरक्षित नाही असे समजूनच जालकरांनी नेटवर वागले पाहिजे. आपला जालावरचा कोणताही डाटा सुरक्षित नाही, तो केव्हाही नष्ट होऊ शकतो किंवा तो सार्वजनिक होऊ शकतो, तेव्हा काय काळजी घ्यायची ती स्वत: घेतली पाहिजे.
बाय द वे, हॅकिंगची वेगवेगळी टूल्स सतत वेगवेगळ्या ग्रुपवर येत असतात, जीमेल, फेसबुक, तुमचं एटीएम कार्ड वगैरे सर्व जपलं पाहिजे. कार्डिंग वगैरे भयंकर प्रकरणे वाचत असतो. तेव्हा काही लोकांच्या जालावरचा भोंगळा कारभार पाहता जागरूकता आणि सुरक्षितता या विषयावर खरं तर मिपावर धागा यायलाच हवा.
-दिलीप बिरुटे
16 Aug 2018 - 2:27 pm | अमर विश्वास
Gmail वापरायला खूप सुरक्षित आहे
Gmail च्या सुरक्षेकरिता २ स्टेप ऑथेंटिकेशन वापरावे ....
सेटीन्ग्स जर योग्य प्रकारे केले तर जीमेल एकदम सेफ आहे. लॉगिन च्या वेळेस मोबाईल वर कोड येतो ....
जर नेहमीचे डिव्हाईस सोडून वेगळे डिव्हाईस वापरले तरी मोबाईल वर ऑथेंटिकेशन रिक्वेस्ट येते ...
बऱ्याच सुविधा आहेत .. माहितीअभावी अनेक लोक वापरात नाहीत
17 Aug 2018 - 12:07 pm | मराठी कथालेखक
बरोबर.
२ स्टेप ऑथेंटिकेशन वापरावे
माझा जीमेल अकाउंट सुमारे पाच वर्षापुर्वी हॅक झाला होता. पण गुगल कडून मला त्याच वेळी एस एम एस मिळाला की आपले संशयास्पद लॉगिन झाले आहे आणि पासवर्डही बदलला गेला आहे वगैरे.. मी लगेच माझ्या पीसीवरुन अकाउंट रिकव्हर केले (माझ्या मोबाईल नंबरचा उपयोग करुन) आणि त्या दिवसानंतर २ स्टेप ऑथेंटिकेशन वापरण्यास सुरवात केली. त्या हॅकरने काही स्पॅम मेल्स पाठवल्या असाव्यात आणि त्या मला दिसू नयेत म्हणून Sent mails मधून एका पानावरच्या सगळ्याच मेल्स डिलीट केल्या होत्या. त्यामुळे माझ्या काही महत्वाच्या मेल्स गेल्यात बाकी काही नुकसान झाले नाही.
15 Aug 2018 - 7:40 pm | टवाळ कार्टा
इतर वेळी नुस्ते बोलणे सुरु करण्यासाठी आढेवेढे घेणार्या मुली/महिला वर्ग (ते सुद्धा जगप्रसिद्ध सिक्स्थ सेंस बरोबर असताना) इतक्या चिंधी प्रकारांना बळी पडतात हे पाहून मौज वाटली =))
15 Aug 2018 - 9:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आता उगा स्री-पुरुष वाद होईल म्हणून गप्प बसतो. पण आपल्या मुद्याशी सहमत आहे. महिला हळूच भावनिक आधार चाचपून बघतात, जीवाभावाच्या मैत्रीणीचा आणि आधाराचा शोध प्रत्येक नव्या क्षणाला सुरु असतो. (विदा नाही) माझं हे एक अंदाजपंचे मत आहे, ज़रा जिव्हाळ्याचं कोणी वाटलं की या सुरु होतात आणि फसण्याच्या पहिल्या पायरीवर त्यांचा पाय पडतो, पडत असावा. वेगवेगळ्या स्कीम्स, जड़ीबुटी, आयुर्वेदिक, अंगारे धुपारे, उपवास, बाबा-बुवा, वस्तु पुस्तके काही चमत्कारिक डॉक्टर्स वगैरे इत्यादि, हे माझं निरीक्षण चूकही असू शकतं आणि हे काही पुरुषांनाही लागू होऊ शकतं.
-दिलीप बिरुटे
15 Aug 2018 - 11:00 pm | पिलीयन रायडर
बळी कुठे पडल्यात? एक ह्या श्वेता बाई सोडल्या तर माबो वर तरी जवळपास सगळ्या बायकांनी इग्नोर मारलंय.. मला तर कुठे भयंकर फसवणूक झालीये असा प्रकार दिसला नाही. सगळ्या बायकांना शोधून शोधून व्यनि केलेत इतकंच काय ते.
16 Aug 2018 - 5:25 am | कंजूस
>>बळी कुठे पडल्यात>>
सहमत. फक्त जुजबी प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. जोशीबाईंच्या कोणत्या पिएचडी/मार्केट रिसर्चला ही हँगाउटमधली उत्तरे किती उपयोगी माहीत नाही.
कुठे इन्स्टंट मेसेजिंगला जॅाइन होणे म्हणजे त्याला जोडलले जीमेल हॅक होत असेल तर गुगलने ते केव्हाच आवरते घेतले असते.
आता या अनुभवावरून संस्थळे इमेल-जोडलेली व्यक्तिगत निरोपाची सोय काढून घेण्याचा विचार करतील. म्हणजे व्यनि इथेच येणार, इथूनच उत्तर असं ठेवतील.
वाटसप ग्रुपमध्ये जॅाइन व्हा या धाग्यांवरचाही विश्वास उडू शकतो.
एकाच्या संशयास्पद वागणुकीमुळे इतरांच्या सोयी जाणार हे नक्की.
16 Aug 2018 - 10:26 am | श्वेता२४
आता वाचून हसूच आलं. बळी पडले काय, सिक्सथ सेन्स काय. आता जर पुरेसं स्पष्टीकरण दिलं नाही तर तुम्ही लोक मला बळीचा बकरा बाणावल्याशिवाय राहणार नाही. आणि मी म्हणजे भावनिक आधार शोधणाऱ्या, सेन्स नसणाऱ्या, कोणतीही सावधगिरी न बाळगणाऱ्या "महिलेचं" प्रतीक बनून जाईन असं वाटू लागलंय.
1) तर मी एका अग्रगण्य राष्ट्रीय बँकेत अधिकारी पदावर तेही मार्केटिंग या क्षेत्रात काम केलंय. त्यामुळे आपले अत्यन्त खाजगी फोन नं देऊ नयेत याचा किमान सेन्स मला नक्कीच आहे.
2) मार्केटींग क्षेत्रात काम केल्याने कुणाला फोन नं देणे ही माझ्यासाठी भयंकर गोष्ट नाही. अशा प्रयोजनासाठी मी खास नं ठेवला आहे ,आजही. स्पर्शिका याना दिलेला नं याच सदरात मोडतो.
3)स्पर्शिका जोशी यांना व्यनि करण्याची सोय न ठेवल्यामुळे मला नाईलाजाने मेल वर बोलणे भाग पडले
4) त्यांना मदत हवी होती तीही त्यांच्या सं शोधन कार्यात. मी व माझे पती दोघेही संशोधन कार्यात असल्याने(इतर क्षेत्रात) साहजिकच त्यांना मदत करावीशी वाटली.
5) आम्ही दोघांनी मिळून त्यांच्या बहुतांशी प्रश्नांची उत्तरे दिली कारण बहुतेक संभाषण रात्री झाले
6) हे करत असताना स्पर्शिका यांनी स्वतःहून कोणतीही व्यक्तिगत माहिती खोदून खोदून विचारली नाही. तसेच जी माहिती मी दिली उदा कुठे राहता काय करता ती माहिती त्यांनी स्वतः ची पण दिली. खखोदेजा. पण मी जी काही मोघम माहिती दिली त्यावरही त्यांनी खोलात जाण्याचा प्रयत्न केला नाही.
6) त्यामुळे मला हानी पोचू शकेल अशी कोणतीही माहिती मी share केलेली नाही. राहता राहिला मेल चा तर माझा मेल id त्यांना मी दिला नव्हता. तो त्यांना मिपावरूनच मिळाला होता। कास काय ते स्पर्शिका आणि मिपावच जाणे.
16 Aug 2018 - 1:27 pm | पिलीयन रायडर
तेच तर! बळी वगैरे कुणीच पडलेलं नाहीये. आणि तसं तर आपण कुणीच इथे कुणालाच ओळखत नव्हतो. पण मिपावर एका आयडीने जुजबी ओळखीवर दुसऱ्या आयडीला संपर्क करणे, काही मदत मागणे पासून ते त्यांच्यात जिग्गी दोस्ती हो इ, कट्टे करणे सगळं होतं. त्यामुळे एखाद्या आयडीने संपर्क केला की त्याला उत्तर देणे हे काही लगेच बळी वगैरे पडल्याचे लक्षण नाही. त्यावरून लगेच समस्त स्त्रियांचा सिक्स्थ सेन्स काढणे फारच अति होतंय. मिपावर ह्याहून फार मोठे किस्से झालेत, तेव्हा स्त्री काय पुरुष काय, फसवणूक ह्या मुद्द्यावर कुणी पिंका टाकू नयेत. प्लिजच...
16 Aug 2018 - 11:30 am | सतिश गावडे
हा प्रतिसाद अस्थानी आहे असं माझं मत आहे.
खफवर चाललेल्या गप्पामधून या प्रकाराची अधिक माहिती मिळाली तेव्हा ईतर सावध होतील या हेतूने केलेल्या विनंतीवरुन श्वेता24 यांनी हा धागा टाकलेला आहे.
प्रत्येक व्यक्तीला सर्व काही कळते असे नाही. आणि काही वेळा माणूस समोरच्या व्यक्तीवर विनाकारण अविश्वास दाखवत नाही. आणि अशा वेळी एखादा विपरीत अनुभव आला तर तो इतरांना सांगून लोकांना वेळीच सावध करणे केव्हाही चांगले.
लोक तुम्हाला चंद्रावरील डाग दाखवत आहेत तर तुम्ही लोकांना तुमचे बोट वाकडे आहे म्हणून सांगत आहात :)
7 Sep 2018 - 6:21 pm | लौंगी मिरची
आवडला प्रतिसाद :)
15 Aug 2018 - 7:47 pm | कंजूस
पासवड ओळखण्याचे काही कोड असतात म्हणे. पण या जोशीबाई जिथे काम करतात त्या ग्रुपची त्यांना मदत मिळत असावी.
" मग ते गुगल अकाउंट साइनइन अटेम्प्ट फ्राम अ न्यु डिवाइस" मेसेज येण्याअगोदर हॅकरचे काम झालेले असणार.
तुमच्या मेलमध्ये काहीही बदल न करता कोणी पाहून जाणे हे फार धोकादायक वाटते आहे.
16 Aug 2018 - 7:37 am | सुधीर कांदळकर
तुमचा संगणक हॅक झाला आहे हे की नाही तज्ञांकडून तपासून घ्या.
आयपी अॅड्रेस् बदला आणि तो स्टॅटीक असेल तर शक्य असेल तर डायनॅमिक आय पी अॅड्रेस वापरा.
संगणकातला आवश्यक तो डाटा दुसरीकडे उतरवून घ्या.
हार्ड डिस्क फॉर्मॅट करून ओएस, व्हायरस स्कॅनर पुन्हा लोड करा.
उतरवलेला डाटा पुन्हा स्कॅन करूनच संगणकावर चढवा.
प्रत्येक ड्राईव्ह शेअरेबल ठेवू नका. आवश्यक डाटा नॉन-शेअरेबल ड्राईव्हवरच ठेवा.
शिवाय मिपावरचाच https://www.misalpav.com/node/42942 हा लेख वाचून गुगल खात्याला दुहेरी सुरक्षा द्या.
आणि सर्वात मुख्य म्हणजे रेलवे, बसेस, इ. सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेली वाय फाय वापरू नका. ती एसएसएल सुरक्षाप्रणाली प्रमाणित नसू शकते.
16 Aug 2018 - 1:42 pm | खटपट्या
हे कशासाठी? याने काय होणार?
17 Aug 2018 - 11:22 am | माहितगार
हे नेमके कसे आणि कुणाकडून करुन घ्यायचे. नाही म्हटले तरी पंचाईत होते . माझ्या विंडोज होम माझ्या एच पी संगणकासोबतच फ्री आलेली. मी क्रॅश झाल्या नंतर दुरुस्त केले तर दुरुस्ती करणार्याने कोणती व्हर्शन टाकली माहित नाही . पण फ्लांईग कर्विच, अपेक्षित नसलेले वेबसाईट उघडणे अशा नव्या समस्या आल्या आणि त्याचे विश्वासार्ह निराकरण कुणा कडून करुन घ्यावे समजत नाही. आपण म्हणता तसे आपला संगणक हॅक झाला नसल्याचे सुनिश्चित करुन घेण्या बद्दल अधिक माहिती मिळाल्यास बरे पडेल.
बाकी धागा वाचतो आहे.
17 Aug 2018 - 11:22 am | माहितगार
फ्लांईग कर्सर ,
17 Aug 2018 - 12:27 pm | कंजूस
>>दुरुस्ती करणार्याने कोणती व्हर्शन टाकली माहित नाही >>
दर मंगळवारी पुर्वी अपडेट्स येत होते का, आणि आता बंद झाले का?
17 Aug 2018 - 3:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
माझ्या विंडोज होम माझ्या एच पी संगणकासोबतच फ्री आलेली.
१. तुम्ही तुमच्या संगणकाचे एचपीच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केले असले तर तुम्हाला तेथून तुमच्या संगणकावर मुळात असलेल्या विंडोची ऑफिशियल कॉपी डाऊनलोड करता येईल (निदान डेलमध्ये अशी व्यवस्था आहे).
२, प्रथम तुमच्या हार्ड डिस्कवर असलेल्या तुमच्या कामाचा डेटा कॉपी करून घ्या.
३. हार्ड डिस्क फॉर्मॅट (C:) करून डाऊनलोड केलेल्या कॉपीवरून विंडो रिइन्स्टॉल करा.
४. विंडोज अपडेटच्या सेटिंग्जमध्ये जाऊन तुम्हाला योग्य असणार्या वेळेमध्ये "ऑटो अपडेट" ऑप्शन स्विकारा. पुढच्या २-३ दिवसांत, विंडोज तुमच्या मूळ कॉपीनंतर तुमच्या संगणकासाठी प्रसिद्ध झालेले सर्व अपडेट इन्टॉल करून, तुमच्या संगणकावरची विंडोज अप-टू-डेट करून देईल.
=========================
विंडोज सेटींग्जच्या, विंडोज रिकव्हरी ऑप्शनमध्ये "रिकव्हरी पॉईंट" सेट करता येतो.
तो, (अ) विंडोज उत्तम अवस्थेत चालू आहेत अश्या वेळेस सेट करावा व (आ) प्रत्येक मोठ्या अपडेटनंतर, विंडोज उत्तम अवस्थेत चालू असल्याची खात्री करून, रिसेट करत जावे.
विंडोज त्रास देऊ लागल्यास, रिकव्हरी ऑप्शनमध्ये जाऊन, विंडोज जेथवर उत्तम चालू होती त्या "रिकव्हरी पॉईंट"पर्यंत मागे नेता येते. मागे गेल्यामुळे नाहिसे झालेले अपडेट (वर सांगितल्या प्रमाणे "विंडोज अपडेट"चे सेटिंग ठेवल्यास) विंडोज आपोआप परत इन्स्टॉल करते.
=========================
ओएस बिघडली व हार्ड डिस्क फॉर्मॅट करायची पाळी आली तरी डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी, ओएस इन्टॉल करताना C: व D: अशी दोन पार्टीशन्स बनवा. ओएस C: वर आणि डेटा D: वर ठेवा. ओएस त्रास देऊ लागल्यास, केवळ C: पार्टीशन फॉर्मॅट करून ओएस रिइन्स्टॉल करता येते व D: वरचा डेटा सुरक्षित राहतो. अर्थातच, हा डेटा बॅकअपचा पर्याय नाही, तर ओएस झटपट रिइन्स्टॉल करण्यासाठी व डेटा वाचवण्यासाठीचा प्राथमिक स्तराचा सुरक्षा उपाय आहे.
=========================
17 Aug 2018 - 3:14 pm | कंजूस
रैट.
17 Aug 2018 - 12:14 pm | मराठी कथालेखक
घरच्या पीसी/मोबाईलकरिता कुणी स्टॅटिक अॅड्रेस वापरत असेल असे वाटत नाही. एकतर बहुतेकदा त्याचा वेगळा खर्च येतो आणि घरी तशी काही गरजही नसते.
16 Aug 2018 - 9:07 am | कंजूस
मी रेल्वेचे वाइफाइ वापरतो युट्युब डाउनलोडसाठी पण इमेल लॅागिन नाही करत.
16 Aug 2018 - 10:33 am | सुबोध खरे
मी जालावर वावरताना क्षकिरण वैद्यक शास्त्रातील एक मार्गदर्शक तत्व वापरतो. ALARA (ALARA is an acronym used in radiation safety for “As Low As Reasonably Achievable.”)
जेवढी अत्यंत आवश्यक आहे तेवढीच माहिती जालावर टाकायची. यात आपले फोटो पासून बँकेच्या व्यवहाराबाबत कोणतीही माहिती येते.
हि मी इ मेल वरही टाकत नाही. मी फोनवर/ संगणकावर चॅट करत नाही. स्वतःच्या बँकेचे सोडून दुसरे ए टी एम वापरत नाही.
एवढे असूनही मी सुरक्षित आहे असे मी अजिबात मानत नाही.
सदा सतर्क true spirit of the hallowed military-intelligence-corps motto, ''Sada Satark''.
हेच आपल्या सुरक्षिततेचे साधन आहे.
16 Aug 2018 - 10:38 am | श्वेता२४
आता वाचून हसूच आलं. बळी पडले काय, सिक्सथ सेन्स काय. आता जर पुरेसं स्पष्टीकरण दिलं नाही तर तुम्ही लोक मला बळीचा बकरा बनवल्याशिवाय राहणार नाही. आणि मी म्हणजे भावनिक आधार शोधणाऱ्या, सेन्स नसणाऱ्या, कोणतीही सावधगिरी न बाळगणाऱ्या बावळट "महिलेचं" प्रतीक बनून जाईन असं वाटू लागलंय.
1) तर मी एका अग्रगण्य राष्ट्रीय बँकेत अधिकारी पदावर तेही मार्केटिंग या क्षेत्रात काम केलंय. त्यामुळे आपले अत्यन्त खाजगी फोन नं देऊ नयेत याचा किमान सेन्स मला नक्कीच आहे.
2) मार्केटींग क्षेत्रात काम केल्याने कुणाला फोन नं देणे ही माझ्यासाठी भयंकर गोष्ट नाही. अशा प्रयोजनासाठी मी खास नं ठेवला आहे ,आजही. स्पर्शिका याना दिलेला नं याच सदरात मोडतो.
3)स्पर्शिका जोशी यांना व्यनि करण्याची सोय न ठेवल्यामुळे मला नाईलाजाने मेल वर बोलणे भाग पडले
4) स्पर्शिका यांना मदत हवी होती, तीही त्यांच्या संशोधन कार्यात. मी व माझे पती दोघेही संशोधन कार्यात असल्याने(इतर क्षेत्रात) साहजिकच त्यांना मदत करावीशी वाटली.
5) आम्ही दोघांनी मिळून त्यांच्या बहुतांशी प्रश्नांची उत्तरे दिली कारण बहुतेक संभाषण रात्री झाले
6) हे करत असताना स्पर्शिका यांनी स्वतःहून कोणतीही व्यक्तिगत माहिती खोदून खोदून विचारली नाही. तसेच जी माहिती मी दिली उदा कुठे राहता काय करता ती माहिती त्यांनी स्वतः ची पण दिली. खखोदेजा. पण मी जी काही मोघम माहिती दिली त्यावरही त्यांनी खोलात जाण्याचा प्रयत्न केला नाही.
6) त्यामुळे मला हानी पोचू शकेल अशी कोणतीही माहिती मी share केलेली नाही. राहता राहिला मेल चा. तर माझा मेल id त्यांना मी दिला नव्हता. तो त्यांना मिपावरूनच मिळाला होता। कसं काय ते स्पर्शिका आणि मिपावच जाणे.
16 Aug 2018 - 11:45 am | शब्दबम्बाळ
हा मुद्दा महत्वाचा वाटतो! तुमचा ई-मेल प्रोफाइल वरती दिसत नाही म्हणजे अर्थातच त्यांनी तो तिथून मिळवलेला नाही. मिपाचा डेटाबेस कोणी ऍक्सेस करू शकते का? किंवा माहिती बाहेर जाते आहे का हे कृपया तपासून घ्यावे.
16 Aug 2018 - 11:53 am | श्वेता२४
मिपावर मी माझी स्वताची कोणतीही वैयक्तिक माहिती इथे दिलेली नाही. मी मायबोली वर नाही. त्यामुळे तीथून काही माहिती मिळण्याचा प्रश्नच येत नाही. मी फेसबुक किंवा कोणत्याही सोशल नेटवर्कींग साईटवर नाही. तरीदेखील स्पर्शिका यांना माझा मेल आयडी मिळाला. हा मेल आयडी मी इथे खाते उघडण्यासाठी दिला होता. तसेच स्पर्शिका या मला व्यनि करु शकत होत्या पण मी त्यांना व्यनि करु शकत नव्हते हे त्यांनी कसे साध्य केले? याचा मिपा संपादक मंडळाने विचार करावा हे नक्की.
16 Aug 2018 - 10:58 am | कंजूस
@ श्वेता२४ ,
उगाच वाईट वाटून घेऊ नका. आम्हीही भरपूर चुका केल्यात. शिवाय इथे धागा टाकला कशाला असं झालं तर विनंती करून काढायला सांगा.
तिकडे मायबोलीवर 'मामी'ने चॅटचे सर्व डिटेल्स दिलेत त्यांच्या. थोडीफार माहिती तुम्ही दिलीत. तुमचे अकाउंट हॅक झालं हे त्यांनीच केलं असं नाही. "अनसेंड" फीचर जीमेलमध्येच आहे ते वापरलं असेल. ( त्यावर मर्यादा आहेत, परंतू मायबोलीवर धागा आल्यावर लगेच जमेल तसे मेल उडवले असतील.)
तुम्ही एका दुसऱ्या डिवाइसमधून मेल लॅागिन करून पाहा - लॅागिन अटेम्प्ट फ्राम अ न्यु डिवाइस हा मेल येईल.. ते नाही आले तर तुमचा संगणक /मोबाइल कुणी वाचतो हे नक्की.
( तीन मोबाइलांत वेगवेगळ्या ब्राउजरांतून लॅागिन केल्यावर मला अलर्ट मेल येतोच. )
16 Aug 2018 - 11:08 am | श्वेता२४
कुठुन धागा टाकला असं अजिबात वाटत नाही. विचारपूरर्वकच टाकलाय. मुळात काही महाभयंकर फसवणूक झालेली नाहीय माझी किंवा महाभयंकर चूक केलीय असं मला वाटत नाही. त्या बाईंनी कुणाची आर्थिक फसवणूक केलीय असंही वाटत नाहीय. पण एखाद्याची व्यक्तिगत माहितीचा असा गैरवापर करणे तोही स्वताची माहिती दडवून हे आक्षेपार्ह व संशयास्पद नक्कीच आहे. कुणाची फसगत होऊ नये हा स्वछ्छ व प्रमाणिक हेतू हा धागा काढण्यामागे आहे. मग भले कुणी मला बावळट समजले तरी फरक पडत नाही. कारण कुणी काय समजुत करुन घेते यापेक्षा एखाद्याला होणाऱ्या नुकसानिपासून सावध करणं जास्त महत्वाचे आहे. वाईट याचे वाटले की माझ्या अनुभवांवरुन लगेच महिलाबाबत काही मतप्रवाहांचे सार्वत्रिकीकरण सुरु झाले. असे सेन्सलेस व उपरोधिक अभिप्राय मिपाकर देतील असं वाटलं नव्हतं इतकंच. बाकी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे इतर डिव्हाईसवरुन लॉग इन करुन बघेन म्हणते.
16 Aug 2018 - 2:02 pm | पिलीयन रायडर
ते नॉन सेन्स प्रतिसाद तर जाऊच द्या. वेगळेच हिशोब असू शकतात.
चॅट हिस्टरी ऑफ असेल तर ते सेव्ह होतच नाहीत ना.. तसं काही झालं असेल का?
16 Aug 2018 - 2:09 pm | श्वेता२४
त्या तारखेच्या आधिचे आणि नंतरचे सर्व मेल आहेत. केवळ हेच उडालेत. हा मेल आयडी सर्वसाधारण वापरासाठी आहे. त्यामुळे यावर खूप मेल्स येतात. त्यामुळे मी ते कधीकधी डिलिटही करते. पण ट्रॅश फोल्डर नाही कधी उडवला. कोणताही मेल डिलिट केला तरी ट्रॅश पोल्डरमध्ये असतो. तर ट्रॅश मध्ये सुद्धा त्या तारखेच्या आधिचे व नंतरचे सर्व डिलिट केलेले मेल आहेत. आणि मी स्वता असे संभाषण डिलिट केल्याचे अजिबात आठवत नाही.
16 Aug 2018 - 10:39 pm | पिलीयन रायडर
तुम्चा मेल आयडी दुसर्याकुणी वापरला तर डिव्हाईसचा अलर्ट येतो. तेव्हा तो आल्या शिवाय हॅक करणं कसं शक्य आहे हे मला कळलं नाहीये. ऑल मेल्स मध्ये जाऊन बघा एकदा.. मे बी सापडतील.
अजून एक, मेल्स रिकॉल करता येतात का जिमेल मध्ये? बहुदा ऑटलुक सारखे नाही, पण काही तरी सेटिंग असेलच. मला सेटिंग मध्ये अन्डु सेन्ड हा पर्याय दिसतोय, पण ते फक्त १० सेकण्दात करता येतं.
मला तर मुळात इतके उद्योग करुन काय साध्य होतंय हेच कळत नाहीये. म्हणजे ह्यातून आनंद मिळत असेल तर फारच लो लाईफ आहे रे बाबा ही स्पर्शिका. कीवच आली. समजा हॅक्च करयचं असेल काही तर जिमेल हॅक करायला गप्पा मारयची गरज का असेल आणि?
सगळ्यात महत्वाचा प्रश्न इतकाच उरतो की मेल आयडी मिळाला कसा?
16 Aug 2018 - 1:54 pm | कंजूस
।
।
इमेल कसा मिळतो --
सभासद[ 'न' धरा] होताना एक इमेल खाते,युजरनेम द्यावे लागते. मग संस्थळ तुमचे अकाउंट अॅक्टिव झाल्याचा मेल आणि एक तात्परता पासवड देते. हा वापरून आपले खाते चालू करताना १) इमेल नोटिफिकेशन येणे, मेल येणे हे हो/नाही बदलता येते.
२) दुसऱ्याने [ 'ब' धरा] ब'ने संपर्क केल्यास, मेसेज पाठवल्यास ब'चा इमेल अॅड्रस न'ला दिसतो परंतू ब'ला न'चा मेल अॅड्रेस कळत नाही. ( तिथे मिपामधून दिसते)
३) आता जर का न'ने या मेल'ला मेलमधूनच रिप्लाइ केला तरच ब'ला न'चा इमेल मिळतो. आणि ते दोघे नंतर एकमेकाशी स्वतंत्रपणे संपर्क करू शकतात.
या दोन्ही संपर्कांत मिपा अडमिनलाही मेसेज कळणार नाहीत.
४) जर का न'ने स्वत:च्या खाते सेटिंग्जमध्ये व्यक्तिगत संदेश सुविधा बंद ठेवली असल्यास त्यास मिपामधून संदेश पाठवता येणार नाही.
16 Aug 2018 - 2:13 pm | श्वेता२४
मला कुणाचा व्यनि आला कि मिपावरचा आठवण करुन द्यायला मेल येतो. पण त्यात पाठवणाऱ्याचा मेल आयडी दिसत नाही. हे संभाषण कसे सुरु झाले हे दाखवायला आता माझ्याकडे पुरावा नाहीय. कारण अख्खा मेल संभाषणच डिलिट झालंय.
16 Aug 2018 - 4:08 pm | कंजूस
ओके
16 Aug 2018 - 8:55 pm | पियुशा
नमस्कार पियुशा ताई,
छान लिहिता तुम्ही. तुमचा मिसळपाव वर "सुके प्रॉन्स कोळंबी मसाला" हा आणि इतर लेख वाचले.
तुमच्याशी गप्पा मारायला आवडेल मला. मी डॉक्टर स्पर्शिका जोशी. मी मुंबई ला असते.
मला तुम्ही hangout वर sparshika@gmail.com इथे संपर्क करू शकता. म्हणजे आपण बोलू.
धन्यवाद ,
डॉक्टर स्पर्शिका जोशी.
स्त्री रोग तज्ज्ञ
M.D. D.G.O.
मुंबई
मला पण सेम पण मी काहिच रिप्लाय दिला मैत्रिनिनि आधिच सावध केलेल कायतरी फिशी आहे .
16 Aug 2018 - 9:01 pm | कंजूस
hangout बोलण्यासाठी आहे का लिहिण्यासाठी?
त्यातून कॅाल/व्हिडिओ कॅाल होतो का?
16 Aug 2018 - 9:45 pm | राजेंद्र मेहेंदळे
हे व्हिडीओ कॉल करण्यासठी किवा चॅट करण्यासाठीचे अॅप आहे.
बाकी मेल वापरल्यावर लॉग आउट करणे, ब्राउझर नुसताच कट न करणे, इन कॉग्निटो मोड वापरणे, जीमेल/ गुगलवर लॉगिन असताना ईतर ब्राउसिंग न करणे, पासवर्ड वरचेवर बदलणे वगैरे योग्यच. पण मेल आपोआप कशी डिलीट झाली हे समजले नाही अजुन...
17 Aug 2018 - 3:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
हँगऑट्स हे गुगलचे "चॅट, व्हॉईस कॉल (फोन) व व्हीडिओ कॉल" करण्यासाठीचे अॅप आहे. माझ्या अनुभवात हे एक उत्तम अॅप आहे ! :)
17 Aug 2018 - 12:40 am | मास्टरमाईन्ड
हे प्रचन्ड मह्त्त्वाचं आहे.
बाकीच्या सूचना पण महत्त्वाच्या आहेतच.
17 Aug 2018 - 5:50 am | कंजूस
>>तुम्चा मेल आयडी दुसर्याकुणी
16 Aug 2018 - 10:39 pm | पिलीयन रायडर>>
१) हॅक झालं असेल खातं तर आता तसे नवीन डिवाइसचे नोटिफिकेशन येणार नाहीत. म्हणजे तसा कोड टाकला असावा. जुने नोटि० तसेच राहतील.
२) आउटलुकबद्दलचे सपोर्ट. माइक्रोसोफ्ट.कॅामवर लिहिले आहे पण सगळे प्रकार दिलेले आहेत.
३) मेललाच रिप्लाइ केल्याने मेल अॅड्रेस मिळाला असेल.
४)मेल डिलीट झालेत तर 'रिपोर्ट धिस प्रॅाब्लेम' करावे. " some of the conversations are found to have been deleted without any action on my part, how do I know that my gmail account has not been compromised?"
५) तुमचा संगणक/डिवाइस कोणता आणि ब्राउजर कोणता वापरला हे कोणा मिपाकराशी चर्चा करावी.
17 Aug 2018 - 10:33 am | पिलीयन रायडर
काका, हॅक झाल्यावर सेटिंगस बदलले तरी एकदा तरी नोटिफिकेशन येईलच की.
तुम्ही आपल्या मेल आयडीवर जे मिपाचे नोटिफिकेशन येते व्यनि आला की, त्याला रिप्लाय करण्याबद्दल बोलताय का? कारण तसं करून स्पर्शिकाबैंना मेल जात नाही, कारण ते मिपा अडमीन कडून नोटिफिकेशन असतं. त्यामुळे जीमेलला रिप्लाय केला तरी तो मिपा अडमीनच्या मेलला जातो.
मी प्रोफाईलवर डिस्प्ले केला नसेल तर सर्वसाधारण सदस्याला माझा मेल आयडी मिळणं अशक्य आहे.
17 Aug 2018 - 12:23 pm | कंजूस
क्र ५ आणि नोटिफिकेशनबद्दल त्यांनी तपास करायला हवा.
ही एक साधी केस नसून जीमेलसह मिपाही गुंतले गेले॥
* हँगाउट माध्यमातून मेल अॅड्रस पोहोचतो का?
*
17 Aug 2018 - 6:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
@ श्वेता२४
मोबाईलवरून पाठविलेल्या जीमेल्स मेल पाठविताना त्यांना ठरविलेल्या वेळी डिलीट करण्याची व्यवस्था "confidential mode" वापरून करता येते.
जीमेलमधील हा पर्याय एप्रिल २०१८ पासून उपलब्ध झाला आहे. तुम्ही सांगितलेली घटना त्यापूर्वी झाली आहे की त्यानंतर ?
17 Aug 2018 - 9:09 pm | श्वेता२४
9 जुलै 2018 च्या आसपास 2-4 दिवस हे सगळं घडलंय
17 Aug 2018 - 10:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
म्हणजे स्पर्शिकाने, तिच्याकडून तुम्हाला आलेले जीमेल संदेश डिलीट करण्यासाठी, मी वर लिहिलेला पर्याय वापरला असण्याचीच दाट शक्यता आहे.
आपल्या मोबाईलवरून जीमेलने पाठवलेले संदेश रिसिव्हर व्यक्तीच्या जीमेल खात्यातून आपोआप डिलिट होण्यासाठी, "confidential mode" वापरून "१-२-३... दिवस / आठवडे असा पर्याय वापरून", तसे करणे कोणालाही सहज शक्य आहे.
ही ईमेल प्रणालीतल्या सुरक्षेतली कमतरता नसून, व्यावसायिक संदेशांना आवश्यक असलेली, बराच काळ मागणी असलेली आणि म्हणून मुद्दाम दिलेली सोय आहे. पूर्वीच्या कागदी व्यवहारात अश्या संदेशांत, "संदेश वाचून झाल्यावर तो फाडून नष्ट करा" अशी तळटीप असायची... तिचे हे संगणकीय रूप आहे.
17 Aug 2018 - 11:41 pm | श्वेता२४
आपण जी माहिती दिलीत त्याने त्यावरून स्पर्शीकने याचा वापर केला असण्याची दाट शक्यता आहे. कारण gmail login alert चा संदेश मला कधीही आला नाही . यावरून gmail हॅक झाला असण्याची शक्यता कमीच वाटते. पण प्रश्न रराहतो कि स्पर्शिकाला माझा ई-मेल मिपावरून कसा मिळाला. पी. रा यांच्या सूचनेवरून मी नीलकांत ना व्य नि केलाय . पाहू काय उत्तर येतंय. माझे मेल परस्पर कसे delet झाले याचं टेन्शन आला होतं. पण तुमच्या या माहितीमुळं मी जरा निश्चिनंत झाले . आपण सर्व, कंजूसजी व पिरा हे गेले दोन दिवस या अनुषंगाने जे सहकार्य करत आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद
18 Aug 2018 - 5:29 am | रुपी
तुम्ही आधी तुमचा इमेल आयडी मिपाच्या प्रोफाइलमध्ये सर्वांना दिसू शकेल असा ठेवला होता का?
मिपाच्या सिक्युरिटीबद्दल मला फार कल्पना नाही.
पण तिथे नसला तरी तो दुसरीकडून मिळू शकतो हे आजच्या जमान्यात तरी मला फार अशक्य वाटत नाही. इथे मिपावर आणि इतरही बर्याच ठिकाणी आपण कळत-नकळत कितीतरी वैयक्तिक माहिती देऊन जातो. खास करुन गूगल, फेसबूकसारख्या कंपन्या आपले वेगवेगळे अकाउंट लिंक करतात त्यामुळे तर हे बरंच सहज साध्य होऊ शकतं.
18 Aug 2018 - 2:07 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१
मिपा किंवा इतर कोणत्याही सामाजिक संस्थळावरची ईमेल असलेली प्रोफाईल "पब्लिक" असली, तर तिच्यातला ईमेल अॅड्रेस सगळ्यांना दिसतो.
gmail login alert चा संदेश मला कधीही आला नाही
यावरून माझा वरचा अंदाज खरा ठरत आहे.
18 Aug 2018 - 1:36 am | कंजूस
फक्त यांचेच मेल का काढले अथवा काढता आले हा प्रश्न उरतो.
17 Aug 2018 - 6:57 pm | आदूबाळ
कोणी स्पर्शिका जोशींनाच असे व्यनि पाठवून पाहिलं आहे का?
17 Aug 2018 - 8:17 pm | नाखु
परीक्षा कोण घेईल?
कंठात नीळ नसलेल्या संघाचा किरकोळ सदस्य नाखु
17 Aug 2018 - 8:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
समजा स्पर्शिकाकूनी तुम्हाला तुमचे लेखन आवडले तुम्ही छान लिहिता तुमच्याशी गप्पा मारायला आवडेल असं म्हटलं असतं तर... तुम्ही-
१) त्या व्य.नि कड़े दुर्लक्ष केले असते ?
२) गप्पा मारायला गेले असता ?
उत्तराच्या प्रतिक्षेत.
-दिलीप बिरुटे
17 Aug 2018 - 10:25 pm | नाखु
दुर्लक्ष केले असते
एकतर सहा महिने मी ई-मेल वापरतच नाही आणि मिपावावर,कायप्पा फक्त भ्रमणध्वनीवर आहे त्यामुळे फार संथगतीने वाटचाल.
असल्या अनाकर्षक संथ मनुष्यावर वेळ वाया घालवण्यापेक्षा तितक्याच वेळात चार-पाच ठिकाणी स्पर्ष लाघव करतील त्या!!!!
17 Aug 2018 - 9:35 pm | चामुंडराय
एकंदरीत या स्पर्शिका ताईंनी बऱ्याच मिपाकरणींच्या आयडी ला स्पर्श केला आहे तर !
त्या खऱ्या असतील तर हि सगळी चर्चा वाचून व्यथित झाल्या असतील आणि ट्रोल असतील तर फिदीफिदी हसत असतील.
मज्जानु लाईफ !!
17 Aug 2018 - 10:01 pm | पिलीयन रायडर
माबोचा धागा वाचलात का?मी अगदी सुरुवातीला वाचला होता, पुढे काय प्रगती झाली ते पाहिलं नव्हतं. अत्ता श्वेता व्यास आणि मामी ह्यांचे प्रतिसाद वाचल्यावर आणि अजून एका आयडीने दिलेले स्पष्टीकरण वाचल्यावर हे प्रकरण बरंच विचित्र आहे असं दिसतंय. निव्वळ ट्रोल किंवा टाईमपास नसून कदाचित ही विचित्र मनोवृत्ती दिसतेय.
तिथल्या स्त्री आयडींनी कडक फाईट दिलीये! सिक्स्थ सेन्स अगदीच निरुपयोगी नसतो तर...
19 Aug 2018 - 7:39 pm | श्वेता व्यास
त्यानंतर आजपर्यंत हॅकिंग वगैरे इतर काहीही नुकसान झालेलं नाहीये. त्यामुळे "एका विचित्र मनोवृत्तीच्या माणसाशी झालेलं संभाषण" असं समजून आता विषय सोडून दिलाय.
18 Aug 2018 - 5:51 pm | दुर्गविहारी
गुगलने जी-मेल साठी ऑटो-डिलीट सुविधा आणलेली दिसते, त्याचा वापर स्पर्शिका जोशी यांनी केला असावा असे वाट्ते.
जीमेलचं नवं फिचर: आपोआप डिलीट होणार मेल
20 Aug 2018 - 1:02 pm | प्रसाद_१९८२
जीमेलचं नवं फिचर: आपोआप डिलीट होणार मेल
--
हे फिचर फक्त मोबाईलसाठी आहे का ?
कारण पीसीतून जीमेल ओपन केल्यास ते "Confidential" ऑप्शन, COMPOSE मेल मध्ये दिसत नाही.
22 Aug 2018 - 12:09 am | डॉ सुहास म्हात्रे
सद्या तरी फक्त मोबाईल (अँड्रॉईड आणि आयओएस) साठीच आहे.
6 Sep 2018 - 5:51 pm | गामा पैलवान
लोकहो,
इथला मिपावरचा व माबोवरचा असे दोन्ही लेख व प्रतिक्रिया वाचल्या. एकंदरीत हा पुरुष दिसतोय. याला टोचनोद्दीपनाचा ( = इंजेक्शन फेटीश ) विकार जडलेला वाटतो हे इथलं निरीक्षण बरोबर दिसतंय. विकार अशासाठी की केवळ कामोद्दीपन साधणं निरुपद्रवी असतं. पण त्याचा इतरांना किंवा स्व:ला त्रास होऊ लागला की त्याचा विकार होतो.
माझ्या मते तो अनेक बायकांशी बोलून घेऊन नंतर सावकाश स्वत:स उद्दीपित करीत असावा. २०१२ साली बायकांचा 'स्टॉक' करून ठेवला असावा. तो संपल्यावर परत साठा भरण्यासाठी सक्रीय झालेला आहे. ज्याअर्थी तो गूगल हँगाऊट वर बिनदिक्कीत बोलावतोय त्याअर्थी त्याच्याकडे पुरुषी आवाज स्त्रैण बनवण्याचं सॉफ्टवेअर असावं.
आ.न.,
-गा.पै.