* * *
दंग्यात लुटल्या गेलेला माल जप्त करण्यासाठी पोलिसांनी छापे मारायला सुरवात केली. लोक घाबरले, लुटीचा माल रात्रीच्या अंधारात घराबाहेर फेकू लागले. काहींनी तर स्वतःचाच माल फेकून दिला, उगाच पोलिसांचे झेंगट नको म्हणून.
* * *
एका माणसाची मात्र पुरती गोची झाली. त्याच्याकडे साखरेच्या दोन गोण्या होत्या, किराणा मालाचे दुकान लुटताना त्याचा हाती तेव्हढेच लागले. रात्रीच्या अंधारात एक गोणी त्याने शेजारच्या विहिरीत कशीबशी ढकलली, पण दुसरी ढकलतांना तोल गेला आणि तोही विहिरीत ! आवाज ऐकून लोक गोळा झाले. दोरखंड टाकून दोन उत्साही वीर विहिरीत उतरले, त्याला बाहेर काढले. पण थोड्याच वेळात शेवटचे आचके देत तो देवाघरी गेला.
* * *
दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांनी विहिरीतून पाणी शेंदले तर ते चवीला अगदी गोड !
* * *
रात्री बघतो तर काय - त्या माणसाच्या कबरीवर दिव्यांची आरास !
* * *
ज्यांनी इथवर वाचलंय त्यांच्यासाठी :-
‘सआदत हसन मंटो’ ह्या अत्यंत प्रिय लेखकाच्या 'करामात' ह्या लघुकथेचा मराठीत अनुवाद करण्याचा माझा पहिलाच प्रयत्न. मोजके चार शब्द पदरचे लिहिण्याची आगळीक केली आहे, पण ती मराठीत वाचण्याच्या सुगमतेसाठी.
* * *
प्रतिक्रिया
13 Aug 2018 - 1:05 pm | कुमार१
तुमचा प्रयत्न. छान.
येऊद्यात अजून.
13 Aug 2018 - 5:48 pm | अनिंद्य
येऊद्यात अजून......
अवश्य प्रयत्न करीन, आभार !
13 Aug 2018 - 1:43 pm | कपिलमुनी
* * * कमी असरे तर उत्तम झाले असते.
13 Aug 2018 - 5:45 pm | अनिंद्य
सूचनेबद्दल आभार _/\_
13 Aug 2018 - 1:53 pm | टर्मीनेटर
प्रयत्न चांगलाच जमलाय. कमीत कमी शब्दात आणि वाक्यात मनाला चटका लावणाऱ्या लघुकथा लिहिण्याची मंटो साहेबांची होतोटी विलक्षण होती. या आधी मिपावर जयंत कुलकर्णी साहेबांनी अनुवादित केलेल्या काही कथा वाचल्या होत्या. हि कथा आधी नव्हती वाचली ती अनुवादित केल्याबद्दल आभार.
13 Aug 2018 - 5:28 pm | अनिंद्य
आभारी आहे.
कुलकर्णी साहेबांनी केलेले अनुवादही वाचून बघतो. मला आवडलेल्या काही कथांचा पुढे अनुवाद केलाच तर इथे रिपीट होणार नाही.
13 Aug 2018 - 2:11 pm | जेम्स वांड
म्हणलं का विषयच संपला, कमीतकमी शब्दात समर्पक अर्थ!
13 Aug 2018 - 5:12 pm | अनिंद्य
Absolutely !
13 Aug 2018 - 2:48 pm | सस्नेह
चांगला प्रयत्न.
तथापि कथा काहीशी तुटक वाटली.
13 Aug 2018 - 5:03 pm | अनिंद्य
आभार !
मंटोंची मूळ कथाच तशी आहे, आटोपशीर - एक एक शब्द ताशीव, भारदस्त.
13 Aug 2018 - 3:36 pm | ज्योति अळवणी
छान अनुवाद आणि कथा पण वेगळी... खोल अर्थ असलेली
13 Aug 2018 - 5:07 pm | अनिंद्य
थँक्यू !
चमत्काराला नमस्कार असतो, मग कर्म चोराचे का असेना :-)
13 Aug 2018 - 7:49 pm | नाखु
एक चांगला प्रयत्न.
नाखु कोंडके
14 Aug 2018 - 1:18 pm | अनिंद्य
@ नाखु,
आभार !
बरेच दिवसांपासून तुम्हाला एक सांगायचे होते - तुमची ती 'वाचकांची पत्रे वाला नाखु' अशी सही मला आवडते :-)
14 Aug 2018 - 8:29 am | प्रचेतस
उत्तम लघुकथा.
14 Aug 2018 - 1:19 pm | अनिंद्य
_/\_
14 Aug 2018 - 4:48 pm | मित्रहो
आणि अशा सुंदर कथेचा आटोपशीर अनुवाद
15 Aug 2018 - 11:26 am | अनिंद्य
@ मित्रहो
मला मंटोंच्या लघुकथा फार आवडतात. किमान शब्द आणि कमाल आशय.
प्रतिक्रियेबद्दल आभार !
अनिंद्य
14 Aug 2018 - 4:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चांगला प्रयत्न.पुलेशु.
-दिलीप बिरुटे
15 Aug 2018 - 11:22 am | अनिंद्य
@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे,
आपल्यासारखे मराठी भाषेचे प्राध्यापक म्हणताहेत तर जमला असावा प्रयत्न.
आभार !
14 Aug 2018 - 6:43 pm | विवेकपटाईत
आवडली
15 Aug 2018 - 11:22 am | अनिंद्य
आभार !
11 May 2020 - 8:27 pm | अनिंद्य
आज साहित्यप्रेमी मंटोंचा वाढदिवस साजरा करताहेत.
त्या कारणे मंटोंचे बावनकशी लेखन पुन्हा एकदा पुढ्यात आले.
_/\_
12 May 2020 - 5:41 pm | चौथा कोनाडा
जबरदस्त कथा !
मंटोंचं फारकाही वाचण्यात आलेलं नाही !
मंटोंच्या आणखी कथा वाचायला आवडतील !
12 May 2020 - 8:31 pm | शेखरमोघे
कथा आवडली.
12 May 2020 - 9:04 pm | बिपीन सुरेश सांगळे
वा सुरेख
कथा आवडली.
16 May 2020 - 10:06 am | अनिंद्य
@ चौथा कोनाडा
@ शेखरमोघे
@ बिपीन सुरेश सांगळे
आभार.
मिपा/माबो वर काही मंटोकथा मराठीत आहेत.
17 May 2020 - 9:35 pm | रुपी
छान कथा. आवडली.