फूटपट्टी

चाणक्य's picture
चाणक्य in जे न देखे रवी...
5 Aug 2018 - 9:48 pm

माझ्याकडे ना भेंचोद
एक फूटपट्टी आहे
कायम असते माझ्या सोबत..
विशेषतः चार लोकात जायचं असेल तर,
न विसरता घेतो मी तिला.
.
.
माझ्या फूटपट्टीने
अनेक गोष्टी मोजू शकतो मी
उदाहरणार्थ,
समोरच्याची लायकी...
त्याची अक्कल...
त्याची दांभिकता...
त्याची एकूणच समज...
वगैरे वगैरे.
.
.
फूटपट्टीचा अजून एक उपयोग म्हणजे,
मला माझ्या रेषेशेजारी
दुस-याची लहान रेष काढता येते बरोब्बर
......बरं असतं ते.
.
.
कधी कधी माझी फूटपट्टी
तोकडी वाटू लागते मला
पण डगमगत नाही मी
माझ्याकडे असणा-या अनेक चष्म्यांपैकी एखाद्यातून
बघत राहतो मी माझ्या फूटपट्टीकडे
....ती मोठी वाटेपर्यंत
.
.
गरज नसते तेव्हा
फूटपट्टी पाठीच्या कण्याला बांधून ठेवतो मी
त्यामुळे होतं काय,
की समोरासमोर दिसत नाही ती कुणाला
आणि माझा कणाही राहू शकतो ताठ
.
.
.
फूटपट्टी अमर रहे

मुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

6 Aug 2018 - 11:58 am | प्राची अश्विनी

जबरदस्त!

अनन्त्_यात्री's picture

6 Aug 2018 - 1:50 pm | अनन्त्_यात्री

ही फूटपट्टी !

खिलजि's picture

6 Aug 2018 - 7:47 pm | खिलजि

आज शिणलों असलो जरी

बघुनी तुझी नववारी

पुन्हा उठली शिरशिरी

ठेवला बासनात बांधून तो च्यवनप्राश नि मुसळी

फेकून दिली काठी हातातली नि कवळी

तो आधीच उठलेला पण मी उठता उठता पडलो

पडल्यावर दिसली साक्षात छोटी फुटपट्टी

लावली पाठीला , ताठ केला आधी कणा

नि मारला सूर पुन्हा यौवनात

यौवनाफुटपट्टी अमर रहे

सस्नेह's picture

6 Aug 2018 - 10:29 pm | सस्नेह

भारी !

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

7 Aug 2018 - 7:05 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

क्या बात! जरा गद्य झालीये, पण पर्वा इल्ले...

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Aug 2018 - 9:25 am | ज्ञानोबाचे पैजार

कविता आवडली लैच आवडली
पैजारबुवा,

अत्रुप्त आत्मा's picture

8 Aug 2018 - 8:48 pm | अत्रुप्त आत्मा

येक नंबर.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Aug 2018 - 9:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारी !

नाखु's picture

8 Aug 2018 - 9:06 pm | नाखु

कविता आवडलीच आहे

खरडपट्टी ते रखडपट्टी मधला नाखु पांढरपेशा

रंगीला रतन's picture

8 Aug 2018 - 9:10 pm | रंगीला रतन

मूळ कविता आणि त्यावरचा खिलजींचा शीघ्र कविता रुपी प्रतिसाद दोन्ही एकदम बेष्ट!

पाषाणभेद's picture

15 Aug 2018 - 3:06 am | पाषाणभेद

सहमत. दोन्ही मस्त.

सतिश गावडे's picture

8 Aug 2018 - 9:55 pm | सतिश गावडे

जबरदस्त कविता.

दुर्गविहारी's picture

11 Aug 2018 - 1:48 pm | दुर्गविहारी

मस्तच लिहीली आहे. आवडली.

जव्हेरगंज's picture

11 Aug 2018 - 9:28 pm | जव्हेरगंज

मस्त!!

चिगो's picture

13 Aug 2018 - 4:55 pm | चिगो

मार्मिक कविता.. आवडली..

कपिलमुनी's picture

13 Aug 2018 - 6:23 pm | कपिलमुनी

आवडली

आगाऊ म्हादया......'s picture

17 Aug 2018 - 5:10 pm | आगाऊ म्हादया......

जमलीय, माझ्याकडे पण आहे फुटपट्टी.