शांतीदूत भारत
भारत अमुचा जगात साऱ्या,विश्वशांतीचा देतो नारा ,
शांतीदूत हा, या जगताचा
बहुधर्माचे बहुवंशाचे, भारतवासी एक दिलाचे,
विविधतेत शोधून एकता पालन करिती सहिष्णुतेचे
देव धर्म अन ऐक्याची, शिकवण एका गंगेची
पवित्र गंगा आणि तिरंगा, वंदन करीतो भारत सारा
शांतीदूत हा, या जगताचा
हिमालयातून उगम पावती, अवखळ खळखळ नद्या वाहती,
पावन तिर्थी मंगल क्षेत्री ,गंगेमध्ये विलीन होती,
सवे घेउनी सर्व नद्यांना ,गंगा मिळते थेट सागरा,
भारतदेशा दयासागरा,वैश्विकतेचा तुला किनारा,
. शांतीदूत हा, या जगताचा
सूर्य तळपतो चंद्र झळकतो,मेघ वाहतो सागरवारा,
समानतेचे सहिष्णुतेचे दान अर्पिती सारीताधारा ,
सहा ऋतुंच्या रंगी रंगत निसर्ग रक्षी चराचरा ,
विश्वची अपुले घर मानी तो तसाच भारत अजिंक्यतारा .
प्रतिक्रिया
4 Aug 2018 - 5:38 am | प्रचेतस
तुमचा आयडी बघून 'तुंबाडचे खोत' मधील देहाडराय आठवले.
6 Aug 2018 - 1:23 pm | माहितगार
या दोन ओळी विशेष आवडल्या. अर्थात 'दयासागरा' शब्दावर किंचीतसा अडखळून विचारात पडलो.
8 Aug 2018 - 9:18 am | विवेकपटाईत
कविता आवडली.