राष्ट्रभूल जर कुठे जराशी
शोधून काढा शेजारी
इथे महोदय कारक वृष्टी
विचित्र पुष्कळ अंधारी
गगनी होता उच्च विनवणी
प्रचंड घोडा आवडतो
ग्रीक आणखी रोमन असुनी
खुळा कोंबडा आरवतो
धूर्त महाली रुष्ट होऊनी
राणी मग शेंगा खाते
घडेल कधीही असली घटना
जोगेश्वरिला ती जाते
सतत बावरे नेत्र दुपारी
रिमझिम संध्या राग पहा
नयन लागले दूरदर्शनी
कपात पडतो गोड चहा
बोल्शेव्हिक तो सुमार थोडा
मेन्शेव्हिक मग मवाळ हा ?
मार्क्सही करतो आर्त विनवणी
पटपट शेअर विकाल का
भविष्य सांगा अति-भराभर
राहू केतू पिसाटले
ग्रहणालाही ग्रहणच उत्तर
इंद्र चंद्र त्यां विचारले
आम्हा नसे का अशी अनुज्ञा
खंत दाटते रोजच ही
विचित्र असती आपुले दिसती
माने म्हणती कधीतरी
इति.
प्रतिक्रिया
13 May 2018 - 2:18 pm | एस
भरदिनीकाव्य.
15 May 2018 - 12:13 am | भृशुंडी
ते तर असते आमुचे दैवत
नाव घेऊ ना अम्ही कधी
विचित्र गहिवर शून्य उमाळा
मेंदूला हुंदके येति
15 May 2018 - 7:53 am | प्राची अश्विनी
वा! कविता , प्रतिसाद दोन्हींसाठी.
भरदिनीताईच.:)
14 May 2018 - 10:47 am | ज्ञानोबाचे पैजार
काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि आम्ही भावविभोर झालो...
लिंगपिसाटी काढा घोडा
शत्रूकापे चळा चळा
चावट रस्से नरडी ओता
पर्शा आला पळा पळा
चोखत बसतो बाठी मी तर
सांगा आंबा खाल्ला कोणी?
धूवता धुणे कफन ध्वजाचे
सूरवर मुनीजन गाती गाणी
ठोकून मडके थापटण्याने
कुंभाराला काय कळे
जरतारी पण झुल घालूनी
श्लेश्म लोंबता गगनी गळे
बार मळता गायछापचा
राष्ट्रकाकूंच्या भाळी मळवट
हात हलविता वादळ उठते
काका असती भलते चावट
भोकामधे बोट घालूनी
ठिगळांचेही लोचे व्हावे
दात घासता दंतकांतीने
ठुमकत ठुमकत पिरकत जावे
पैजारबुवा,
14 May 2018 - 11:59 pm | भृशुंडी
कितीक असती मानव प्राणी
केवळ बघून असले उत्तर
देऊन आलो काळीज माझे
थंड वाटले गार्डन गार्डन
इति
14 May 2018 - 12:59 pm | खिलजि
पैंबुकाका मजा आणलीत . या आठवड्याची सुरुवात एकदम धमाकेदार म्हणायची . छान :D:D:D:D
14 May 2018 - 7:25 pm | मारवा
आवडली.
15 May 2018 - 12:08 am | भृशुंडी
इति