आर्जव

Primary tabs

अबोलघेवडा's picture
अबोलघेवडा in जे न देखे रवी...
12 May 2018 - 3:28 pm

गिरनारला दत्तगुरूंच्या दर्शनाला जाण्यापूर्वी केलेली कविता...

तुझ्या दर्शनाची लागलिया ओढ,
कधी भेटशील गुरुराया |
उजाडला तो दिस येई अग्निरथे,
भेटीचा योग सुखेनेची यावा ||१||

भेटशील गिरनारी कधी नच कल्पिले,
कृपेनेची तुझिया झाला चमत्कार |
मनी पाहे तुझिया त्या डोंगरावरी,
बोलाविलेस का रे मजला तू उद्धराया ||२||

मानले या जन्मी तुज गुरुस्थानी,
का लाविलास भेटी तू इतुका वेळ |
आनंदाचा क्षण आला आता हाती,
येतो तुझ्या चरणी माथा टेकवाया ||३||

डोईजड झाला मज पापांचा हा भार,
करशील का हलका तुझिया कृपेने |
असेना कसाही जरी मी या जन्मी,
घेशील का उरी तू मला सावराया ||४||

देऊ नकोस अंतर लोटू नकोस दूर,
हेच या जन्मी माझे रे मागणे |
तुझ्याविना जगणे होईल कचकड्याचे,
आता मजला उद्धारा कवी म्हणे ||५||

कविता

प्रतिक्रिया

शाली's picture

12 May 2018 - 6:32 pm | शाली

सुंदर!