नाही, हि जीनांच्या ए एम यु मधील फोटोची चर्चा नाही. हुसेन हक्कानी नावाचे , सध्या पाकिस्तानातून बेदखल झालेले, मुळचे कर्मठ पण संधीसाधू पणे जरासे आमेरीका धार्जीणे विचार व्यक्त करणारे अगदी थोडीशी वर्षे पाकीस्तानचे आमेरीकेतील अल्पकालीन माजी राजदूत आणि पाकीस्तानात जे कुणी सत्तेत असेल त्याच्यासाठी थोडे थोडे काम केलेले माजी पत्रकार अशी यांची त्रोटक ओळख आहे. सध्या बेदखल झाल्यामुळे परदेशात राहून जरासे लिबरल झाले आहेत . त्यांचे एक नवे म्हणजे एप्रिलात प्रकाशित झालेले पुस्तक सध्या Reimagining Pakistan: Transforming a Dysfunctional Nuclear State ईग्रजी वृत्त माध्यमातून थोडे फार चर्चेत आहे . गूगल बुक्सवर त्याची पहिली एकदोन प्रकरणे वाचता येतात आणि त्यांनी भारतीय माध्यमांना बर्या पैकी मुलाखती दिल्याने , उर्वरीत मांडणीची थोडी फार माहिती त्यातून मिळते.
त्यांचे मुख्य मुद्दे पाकीस्तानची समस्या हि तो देश आकारणीस येण्या पुर्वीच झाली , आपणही सर्व हेच मानतो पण हुसेन हक्कानींनी असे काही होईल असे प्रेडीक्ट करणारे तेव्हाच्या फाळणीच्या आधीच्या मुस्लीम आणि इतर लेखकांचे संदर्भ दिले आहेत ते रोचक आहे.
अगदी देशाच्या निर्मिती पासूनच देशाच्या आर्थीक क्षमते पेक्षा मोठी फौज इनहेरीटन्समध्ये ब्रिटीशांकडून मिळणे आणि मग फौजेचा खर्च चालवायचा तर पैशासाठी बाहेर मदत मागितली पाहिजे आणि त्यासाठी भारता सोबतच्या समस्या वाढवून दाखवल्या पाहिजेत . म्हणून भारता सोबत व्हिक्टीम कार्ड खेळले पाहीजे यात पुन्हा नवीन काही नाही फक्त त्यांच्याच देशातला माजी अमुक तमुक आकडेवारी देऊन संगतवार मांडतो .
पाकीस्तानातल्या आतंकवाद, आर्मी आय एस आय , आणि आयडियालॉजीकल प्रॉब्लेम स्विकारतो. तसेच पाकीस्तानने बेल्जियम प्रमाणे आयडीयालॉजीकल प्रॉब्लेम बाजूला ठेवावेत आणि केवळ टेरीटोरीअल स्टेट म्हणून रहावे, भारता सोबतच्या काश्मिर प्रश्नावर जसेच्या तसे स्थिती राहू देऊन व्यापार संबंध वाढवावेत अशी काहीशी थेअरी यातून दिसते. पाकीस्तानी लोक स्वतःच्या वेगळ्या ओळखीवर अजून तरी विश्वास ठेऊन आहेत तेव्हा पाकीस्तानला तोडण्याचा अथवा विसर्जीत केला जाण्याचा विचार करु नये असे त्यांचे मत आहे.
आता माझे मत, पाकिस्तानींनी त्यांचा देश फेल्यूअर आहे म्हणून स्विकारले तरी भारतीयांना हुरळून जाण्यासारखे काही नाही . पाकीस्तानच्या फेल्युअरच्या भिती ने नेमकी त्यांना कोणत्या न कोणत्या देशाची मदत मिळत रहाते . एक अण्वस्त्र सज्ज देश अगदीच टॉपच्या पूर्ण लेव्हलवरुन आपल्या गुप्तचर यंत्रणेला फोडता आला तरच त्यांच्या अण्वस्त्रांना निकामी करता येईल पण हे अगदी कमी शक्यता असलेली केस असेल. किंवा मग आपली युद्ध विषयक टेक्नॉलॉली अशा लेव्हल ला जावयास हवी कि त्यांची अण्वस्त्रे सहज निकामी करता येतील. पाकीस्तानपेक्षा भारत टेक्नॉलॉजीत पुढे असला तरी तेवढ्यावरच भारतीय समाधानी असतात अफलातून वेगळे काही करुन पाकीस्तानला पूर्ण नेस्तनाबूत करावे अशी पूर्ण क्षमतेचा ही अभाव आहे. अजूनही बर्याच मोठ्या वर्गास काँग्रेस सत्तेत होती म्हणून हे जमू शकले नाही असे वाटते , त्यामुळे भाजपास अजून पाच एक वर्षे मिळावयास हवीत म्हणजे पाकीस्तानला युद्धात एकतर्फी नेस्तनाबूत भाजपा सरकारांनाही करता आले नाही हे पटेल मगच त्यांच्या कडून इतर उपायांवर अधिक गंभीर विचार होऊ शकेल.
वस्तुतः १९४७ मध्ये-फाळणी नंतर हिंसेने माणसे मरायची तेवढीच मेली - पेक्षा एक पूर्ण नागरी यादवी होऊन जाऊ दिली असती आज ह्या अण्वस्त्रीय डोके दुखी शिल्लक राहील्या नसत्या . -आता कोणत्याही साईडने अण्वस्त्र वापरले तर जेवढी माणसे मरू शकतात त्यापेक्षा १९४७ मध्ये किती मोठी यादवी झाली असती तरी कमी माणसे मेली असती , हि प्रॅक्टीकल असली तरी पश्चात बुद्धी आहे आता ते शक्य नाही .
व्यापारी संबंध वाढवण्यात एकतर पाकीस्तानच हात मागे ठेवते , आणि व्यापारी संबंधानी बर्याचदा संघर्ष टोकाची पातळी गाठत नाहीत पण ह्याची पूर्ण गॅरंटी ही देता येत नसते. हजार वर्षाच्या सानिध्यात इस्लामिक आयडीयॉलॉजीचे तार्कीक खंडन भारतीयांना अशक्य नव्हते पण ते विवीध कारणांनी हजार वर्षे सोबत राहून केले /झाले नाही. खरे म्हणजे आजूनही पाकीस्तानातील शाळातून भारता विरोधी जे काही शिकवले जाते त्याचे मिडीयाच्या माध्यमातून व्यवस्थीत मुद्देसूद खंडन व्हावयास हवे होते. दुसरा मार्ग सांस्कृतीक स्वातंत्र्याची पाकिस्तानी लोकांना चटक आणि सवय लावणे. पण या बाबतीत कर्मठ हिंदू त्यांना आपले सांस्कृतीक स्वातंत्र्य शिकवण्या एवजी स्वतःच त्यांची संकुचितता घेऊन बसतात त्यामुळे त्यांच्यातल्या कर्मठांचे अधिकच फावते असे वाटते असो.
* Reimagining Pakistan: Transforming a Dysfunctional Nuclear State
गूगल बुक्सवर
* मुलाखत १
* मुलाखत २
* मुलाखत ३
* दैनिक हिंदू मधील लेख
* इंडिया टूडेतील लेख
* जी पार्थसारथी यांचा लेख
* Husain Haqqani
इंग्रजी विकिपीडियातील लेख
प्रतिक्रिया
7 May 2018 - 7:09 pm | भंकस बाबा
निर्वासितांचा प्रश्न आपल्या बोडक्यावर मारून घेणे , त्यापेक्षा त्यांची आपसात यादवी झाली आणि भारत जर त्यांना नवीन देशाचे गाजर दाखवत राहिला तर हे येड्या डोक्याचे पाकिस्तानला बेचिराख करून दाखवतील
7 May 2018 - 8:25 pm | तुषार काळभोर
दुसरा मार्ग सांस्कृतीक स्वातंत्र्याची पाकिस्तानी लोकांना चटक आणि सवय लावणे. पण या बाबतीत कर्मठ हिंदू त्यांना आपले सांस्कृतीक स्वातंत्र्य शिकवण्या एवजी स्वतःच त्यांची संकुचितता घेऊन बसतात
8 May 2018 - 5:27 pm | गामा पैलवान
माहितगार,
तुमचं हे विधान रोचक आहे :
अशा कर्मठ हिंदूंची यादी मिळेल काय? आणि अशांनी पाकिस्तानला सांस्कृतिक स्वातंत्र्याची चटक व सवय का लावीत बसायचं? त्यापेक्षा पाकिस्तानचं स्वतंत्र देश म्हणून अस्तित्व मिटवणं सोपं असावं.
आ.न.,
-गा.पै.
8 May 2018 - 5:38 pm | माहितगार
भाजपाला मिळालेली पाच वर्षाची दुसरी संधी संपत आली आहे, आपण म्हणता ते सत्कार्य पूर्ण करुन दाखवण्याच आपल्या लाडक्या पक्षा अजून किती वर्षाम्च्या सत्तेची गरज आहे असे वाटते ?
8 May 2018 - 9:20 pm | गामा पैलवान
माहितगार,
भाजप माझा लाडका पक्ष नाही. हां पण मोदी पाकिस्तान संपवू शकतात अशी भीती हक्कानींच्या उपरोल्लेखित लेखातनं व्यक्त होते आहे. ती साधार असावी असं माझं मत.
आ.न.,
-गा.पै.
10 May 2018 - 9:38 am | माहितगार
ठिके खाली प्रतिसादात मदनबाण तोच प्रश्न विचारताहेत ? मोदींना अजून किती वर्षांची सवलत / सत्ता इप्सित साध्य करण्यासाठी आपल्या मता प्रमाणे लागेल ? आणि तेवढ्या वर्षात मोदींना किंवा आपल्या ज्या कोणत्या लाडक्या नेत्यास पक्षास जमले नाही तर पुढे काय ?
10 May 2018 - 12:16 pm | गामा पैलवान
माहितगार,
हक्कानी म्हणतात ५ वर्षं. बहुधा बरोबर आहे. पण अर्थात आंतरराष्ट्रीय संबंध आपण समजतो त्यापेक्षा बरेच जास्त गुंतागुंतीचे असतात.
जर ५ वर्षात मोदींना किंवा आपल्या ज्या कोणत्या लाडक्या नेत्यास पक्षास जमले नाही तर पुढे पप्पूला मत देऊन काँग्रेस सत्तेत आणायची. आणि मग पाकिस्तानच्या ऐवजी भारताचे तुकडे पाडवून घ्यायचे.
आ.न.,
-गा.पै.
10 May 2018 - 12:52 pm | माहितगार
पप्पूला निवडून येण्याची काही ना काही शक्यता शिल्लक रहातात कारण आपलेही वैचारीक आधार कुठेतरी कमकुवत रहातात मग मतांचे खंडन जमत नाही , तेच परधर्म परदेशांबद्दल हिंदूचे होत आले असावे. आपल्या मांडणीचे आत्मपरिक्षण सुधारणा यांचा ते विचारच करत नाहीत , न संरक्षण सिद्धतांचा अभ्यास असतो ना सामरिक आव्हानांचे आकलन असते. आभिमानाचे रुपांतरण गर्वात आणि त्यातून अज्ञानात होऊ नये आणि अज्ञानाने आधार कमकुवत रहातात यशाच्या शक्यता दूर जातात.
मग कुंथनातून केवळ व्यक्तिगत टिका होत रहातात आणि मग राहुल गांधीला पप्पू म्हणूनही म्दलातला प्रश्ना पासून दूर रहातात . असो.
जो जे वांछिल तोते लाहो मोदींना आणखी ५ वर्षे मिळोत पण एकदा सरळ युद्धाने नेस्तनाबुत करता येते म्हटल्यावर " आंतरराष्ट्रीय संबंध आपण समजतो त्यापेक्षा बरेच जास्त गुंतागुंतीचे असतात. " वगैरे एक्सक्युजेस देऊ नयेत . क्षमता असेल तर सर्व अडचणींचहीत करुन दाखवावे .
खरे म्हणजे साम दाम दंड भेद या निती क्रमाने योजावयाच्या असतात हे सांगून ठेवायचे श्रीकृष्ण आणि चाणक्य विसरले , त्यामुळे जिंकण्यासाठी वैचारीक आणि सासंकृतीक स्तरावरील प्रयत्न चालू ठेवायचे असतात हे सध्यातरी कुणास लक्षात घ्यायचे नाहीए, कॉम्रेस सत्तेवर आली की खापर त्यांच्या डोक्यावर फोडणे सोपे जाणार आहे ना मग डोक्याला बाकी त्रास कशाला असा साधा सरळ हिशेब आहे .
मुख्य म्हणजे भाजपा लाडक्यांच्या यादीतून मागे पडल्यावर मोदी पंतप्रधान पदावर टिकून कसे रहातील हे लॉजीकही उमगले नाही .
8 May 2018 - 9:32 pm | मदनबाण
सातत्याने जवानांच्या शवपेट्या येत असतात... त्यात खंड नाही, अजुन किती शवपेट्या आल्यावर देश / लष्कर पाकिस्तानला चांगलं भाजुन काढेल ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- भोर भये पनघट पे मोहे नटखट श्याम सताये मोरी चुनरिया लिपटी जाये... :- Shikari
10 May 2018 - 2:47 pm | एस
भारताची युद्धविषयक मानसिकता अशी आहे, की कितीही माणसे आणि कितीही जवान वगैरे मेले तरी शांत बसेल, पण एक इंचही भूमी कुणी हिरावले की लगेच युद्ध पुकारेल. भारताला मनुष्यजीवाची किंमत फारशी वाटत नाही. परंतु जमिनीबाबत आणि हद्दीबाबत हा देश प्रचंड संवेदनशील आहे.
हे खुद्द पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांंचे विश्लेषण आहे. आणि मी याबाबत त्यांच्याशी दुर्दैवाने सहमत आहे.
10 May 2018 - 3:08 pm | माहितगार
ते अगदीच बरोबर असते तर १९४७ मध्ये यादवी झाली असती
10 May 2018 - 3:43 pm | एस
१९४७ साली भारत ह्या भूभागाचे एक राष्ट्र म्हणून अस्तित्त्व नव्हते. ते भारत आणि पाकिस्तान ह्या दोन राष्ट्रांच्या रूपाने उदयास आले. मी जो भारत म्हणतो आहे तो स्वातंत्र्यानंतरचा आहे. तेव्हा आपण केलेले वरील विधान गैरलागू आहे.
10 May 2018 - 3:50 pm | माहितगार
( काँग्रेसला अंहिसावादी गांधिचे नेतृत्व लाभले नसते , काँग्रेसने फाळणी मान्य न करता यादवी होऊ देण्याचा निर्णय घेतला असता ..) आणि फाळणी न होता एकसंघ भारत्तास स्वातंत्र्य मिळाले असते तर ? आपले हे विधान लागू झाले असते ?
10 May 2018 - 4:06 pm | जेम्स वांड
जर-तर असणारी विधाने चर्चेत रुजू केली जाऊ शकतात का माहितगारजी?
10 May 2018 - 4:12 pm | माहितगार
जर तर , का नाही ?
जर मुस्ल्मिम धर्म भारतात आलाच नसता तर किमान फाळणीचा हाच आकार राहीला नसता नाही का ? फाळणी शब्दही वापरावा लागला नसता कदाचित !
सम्राट चंद्रगूप्त ते अशोकाच्या काळात सध्याचा पाकीस्तानचा भूभाग भारताचा भाग नव्हता का ?
10 May 2018 - 5:26 pm | एस
भारत हे 'राष्ट्र' कधीपासून बनले? 'राष्ट्र' म्हणजे काय? सम्राट चंद्रगुप्ताच्या काळातील कोणत्या भूभागाला तुम्ही 'राष्ट्र' म्हणाल? भारतीय उपखंडाचा कोणता भाग हा आजच्या भारताच्या अधिकृत सीमांमध्ये मोडू शकला असता किंवा नसता?
तुमच्या प्रश्नाचा दुसरा भाग : समजा स्वातंत्र्यपूर्व भारत अखंड राहिला असता (आणि समजा असेही मानून चालूयात की त्या भारतातील सर्वांचा धर्म एकच असता, तुमच्या आवडीचा कोणताही धर्म मानून चाला) तर आज मी जे विधान वर केले आहे की भारताला युद्धास प्रवृत्त करण्यास (ट्रिगर करण्यास) माणसांच्या जिवापेक्षा भूभाग बळकावणे हा जास्त खात्रीचा मार्ग आपल्या शत्रूंसाठी आहे, ह्या विधानाची सत्यता तशीच लागू झाली असती का?
उत्तर : होय. फाळणीचा आणि आजच्या भारताच्या युद्धविषयक या मानसिकतेचा काहीही संबंध नाही. याची पडताळणी १९४७ नंतर १९६२, १९६५, १९७१ आणि १९९९ या सर्व युद्धांचा अभ्यास केल्यास करता येईल. आजही जर पाकिस्तानने अथवा चीनने आपला काही भूभाग अजून बळकावला तर आपण नक्कीच तो परत मिळवण्यासाठी युद्ध करण्यास मागेपुढे पाहणार नाही. पण तेच जर मुंबई अतिरेकी हल्ल्यांसारखी घटना पुन्हा घडली तरीसुद्धा पाकिस्तानला पोकळ धमक्या देण्यापलीकडे जाऊन युद्ध पुकारणार नाही.
येतंय का लक्षात मला काय म्हणायचंय ते?
10 May 2018 - 6:59 pm | माहितगार
* सीमांच्या बाबतीत सहसा चर्चेतून सोल्यूशन निघे पर्यंत स्टेटस क्वो पाळला जातोय . सिमे बाबत केवळ युद्धच केले असते तर बांग्ला देशा सोबत करार कसा झाला असता ?
मोदी भक्तांच्या हिशेबानी तरी अशा युद्धासाठीच मोदींना निवडून दिले आहे , आणि मोदी भक्तांच्या विस्वासानुसार अशा युद्धाची शक्यत नको म्हणून उर्वरीत भारतातील आतिरेकी कारवाया पाकीस्तान ने कमी केल्यात ! काय मोदी भक्तांनो असेच वाटते ना ?
10 May 2018 - 7:40 pm | एस
तुमच्या मूलभूत संकल्पनांचा जर एव्हढा घोळ असेल तर मग मला वाटते मी तुमच्या संकल्पना सुस्पष्ट होईपर्यंत थांबावं. शुभेच्छा! :-)
10 May 2018 - 8:05 pm | माहितगार
:)) आपणास वाटणारा घोळ, हि आमची सुस्पष्टता आहे
10 May 2018 - 4:12 pm | माहितगार
संकल्पनांची क्लॅरिटी तपासताना जर तर चालतेच
10 May 2018 - 12:11 pm | डँबिस००७
Out on bail, 26/11 Mumbai attacks mastermind Zaki-ur Rehman Lakhvi raising funds
According to intelligence inputs with the Indian agencies, Lakhvi - a most-wanted terrorist in India - continues to head the outfit's operations despite being away from the public eye since his release from Rawalpindi's Adiala jail in April 2015. He resurfaced in February 2018 and is actively organising collection of donations in Punjab coinciding with the wheat harvesting season, sources told TOI .
LeT continues to raise finances through various charities, with new names lately being added to the list, despite the sword of Financial Action Task Force (FATF) hanging over Pakistan. In February this year, FATF had said it would put Pakistan back on its watch-list or "greylist" from June 2018 over its failure to crack down on terrorist outfits.
10 May 2018 - 12:23 pm | माहितगार
विनोदी आहे, अफगाणिस्तानातील अतिरेकी मादक द्रव्यांच्या व्यापारात गुंतलेले असताना शस्त्र आणि मादकद्रव्य आणि पैशाची मोठी आवक जावक पाकिस्तानातून होत असणार हे सांगायला कोणी भविष्यवेत्ता लागतो का ? नेहमीच लक्ष हवे ना ? आणि ते असते तर आमेरीकेला अफगाणिस्तान एवढा जड गेला असता का ? आमेरीका, चीन, इराण सौदी अरेबीया असे सांभाळून घेणारे कोण ना कोण पाकीस्तानला नेहमी भेटत रहाते .
आमेरीक्च्या अफगाणिस्तानातील सैन्याला पुरवठा चालू रहावा म्हणून आम्रेरीकेला किती भारताच्या समाधाना साठी जाहीरपणे काही म्हटले तरी प्रत्यक्षात फार हात लावता येत नाही, जरासाही हात आमेरीकेनी काढून घेतला की चीन मदतीला तयार उभे असते
10 May 2018 - 12:33 pm | माहितगार
अतिरेकी काही पैसा दहशतीने अथवा फसव्या नावांनी जमा करु शकतात हे खरे असले तरी , पैसा जिथून मिळवला जातो तेथील लोकातील तत्वज्ञान आणि नरेटीव ( कथा/विचारसूत्र) सुद्धा कुठेतरी साहाय्यकारी असते ना ? किंबहूना पाकिस्तानची निर्मिती आणि अस्तीत्वच हिंदू आणि भारत विरोधी फसव्या तत्वज्ञान आणि नरेटीव वर अवलंबून आहे .
सशस्त्र संघर्षातील हार जित काय ती होत राहील. फंडींग आणि वैचारीक आश्रयाला प्रबोधन आणि संस्कृतीच्या मार्गाने खोडल्याने मदत करणार्ञांची संख्या कमी झाली तर पहावयास हवे पण त्या दिशेने पाऊल टाक्णे दूर हिंदू कर्मठता विचारही करावयास तयार होत नाही उलट भारताची निंदा नालस्ती करण्यात पाकीस्तानी आणि दहशतवादी नरेटीव्ह जिंकत रहातो.
ठिके चालायचेच हिंदूंना हे वैचारीक दृष्ट्या खंडन जमले असते आणि चिनी लोकांसारखे देशप्रेम असते तर भारतात इतर कुणी फारकाळ तगाव धरु शकले नसते पाकीस्तान निर्मिती दूर राहिली असती . असो .
10 May 2018 - 1:17 pm | डँबिस००७
पाकिस्तान ही जगाला लागलेली कीड आहे. पाकिस्तानला छोट्या छोट्या देशात विभागण हेच पाकिस्तान ह्या समस्येवरच निदान आहे.
ह्याची सुरुवात श्रीमती ईंदिरा गांधींजींनी केलेली आहेच, तेच आता श्री मोदीजी पुढे नेत आहेत.
पुर्व पाकिस्तान बांग्लादेश बनला. तो बांग्लादेश पाकिस्तानच्या कित्येक पटीने आता पुढारलेला आहे. तयार कपडा निर्यात उद्योगात बांग्लादेश जगात अव्वल नंबर आहे. चांगल्या निर्याती मुळे बांग्लादेशाची आर्थिक परिस्थीती पाकिस्तानपेक्षा चांगली आहे.
आशियातील सर्व देश पाकिस्तान पेक्षा चांगल्या परिस्थीतीत आहेत, भारताला पाकिस्तानची गरज नाही, उलट पाकिस्तानला भारताची गरज आहे, अमेरीका, चीन व रशिया पाकिस्तानचा वापर करत आहेत, आणी करत रहाणारच. पाकिस्तानातील शिकलेला समाजाला ह्याची जाणीव व्हायला लागलेली आहे.
पाकिस्तानात वेगवेगळ्या संस्कृतीचे, भाषेचे लोक जबरदस्तीने एकत्र आणुन त्यांच्यावर उर्दु भाषेची सक्ती करण्यात आली. त्यांच्या स्वतःच्या भाषेची गळचेपी करण्यात आली. पंजाब म ध्ये पंजाबी बोलण्यास सक्ती, सिंध मध्ये सिंधी. सर्वाच हाईट म्हणजे पु र्ण पाकिस्तानात सक्ती केलेली उर्दु भाषा ही त्यांची भाषा आहे असा त्यांचा गोड गैर समजुत आहे. पुर्ण पाकिस्तानपेक्षा जास्त लोक भारतात उर्दु बोलतात.
आता, पाकिस्तानातल्या सर्व राज्यात उठाव सुरु आहेत, सिंध, पश्तुन , बलुच, पंजाबी सर्व लोकांना स्वतंत्र व्हायचय !
भारताने ह्या लोकांना स्वतंत्र व्हायला मदत केली पाहीजे !
10 May 2018 - 1:47 pm | माहितगार
:) या विषयावर आधी परिस्तलिहिले आहे , पाकीस्तानचमः या विषयावर आधी पण लिहिले आहे , पाकीस्तानच्या पंजाबींचे मन / मत परिवर्तन झाले तर प्रश्नच मिटला - पण तेच गेल्या हजार वर्षात जमलेले नाही. :) बाकी गट परिस्थिती अशांत ठेवण्यास मदत करु शकतात , तुटण्या एवढे प्रबळ नाही :(
अपुर्या / चुकीच्या माहितीवर आधारीत विचारसरणीने यश दूर रहाते , मुख्य म्हणजे इतर मार्गांच्या प्रयत्नां विषयी दुर्लक्ष होते . असो मोदी अजून ५ वर्षे सत्तेत राहीले आणि त्यांना तसे जमले नाही तर त्यांच्या समर्थकातील गैरसमज तरी दूर होतील.
10 May 2018 - 3:17 pm | जेम्स वांड
आपण ह्या क्षेत्रात प्रचंड पुढे होता, थँक्स टू मोरारजी देसाई अन इंद्रकुमार गुजराल, आपण मागे पडलो, पण आता परत पेस पकडला जातोय (आता म्हणजे २०१४ नंतरच नाही, तर वाजपेयी काळापासून परत एकदा भारत एग्रेसिव्ह इंटेल मध्ये पुढे जातोय असे म्हणता येईल)
10 May 2018 - 3:19 pm | माहितगार
रिझल्ट कधी पर्यंत ?
10 May 2018 - 3:37 pm | डँबिस००७
काय रीझल्ट अपेक्षित आहे ?
10 May 2018 - 3:42 pm | माहितगार
पाकीस्तान जगाच्या नकशावर न दिसण्याचा ! (वाक्यात राष्ट्र शब्द टाळल्याचे उमगले असेलच )
10 May 2018 - 4:09 pm | जेम्स वांड
पाच वर्षे, पन्नास वर्षे, पाचशे वर्षे... कितीही लागू शकतो. नेटवर्किंग हे काम मुळात हळूहळू चालते खूप जपून पावलं टाकायला लागतात. त्यातही ऑपरेशन स्पेसिफिक नेटवर्क अन लॉंगटर्म नेटवर्क कल्टीवेट करण्याच्या पद्धती अन कालखंड वेगवेगळा असतो, लॉंग टर्म मध्ये आपण एखादं नेटवर्क कल्टीवेट करत आणणे वेगळे पण त्या कालखंडात बाकी परिस्थिती सुद्धा झपाट्याने बदलत असतात. अश्यावेळी आपण जमवून आणलेलं नेटवर्क ऐन ऑपरेशन लॉन्च करायच्या वेळी कामाचे असेल की नाही हे कधीच सांगता येत नाही
10 May 2018 - 5:41 pm | माहितगार
आता चला तुम्ही पण मागच्या दाराने कल्टी मारली ;) - ५० ५०० वर्षात मागे पडायला पाकीस्तानातले तो पर्यंत झोपा काढतील असे वाटते ?- आता लोकांनी भाजपा सरकार ठेवले तरी मोदी ५०० वर्षे उदंड आयुष्य लाभो पण सोबत राहतील का माहित नाही मुख्य मोदींच्या हयातीतली तुम्ही ग्यारंटी देत नै, भारतीय जनता ५०० वर्षे भाजपाला सतत निवडून देईल का मैत नै .
५०० वर्षात कोण साध्य करेल कोण नाही आता सांगण्यात पॉईंट पण न मग जे आपण ठराविक कालावधीत करु शकत नाही अशा युद्धाच्या वल्गना कशा साठी - युद्ध टेक्नॉलॉजी साठी तयारीत रहावे पण ते मालदिव्ज एवढे छोटे असल्या सारखे का बोलतात लोक ? शत्रुला कमी लेखणे चातुर्याची गोष्ट आहे का ?आले
इथे एलट्टीटीई विरोधात यश आले नाही . प्रत्येक यशाची गॅरंटी देऊन चालता येते का ?
10 May 2018 - 3:56 pm | डँबिस००७
मोदी अजून ५ वर्षे सत्तेत राहीले आणि त्यांना तसे जमले नाही तर त्यांच्या समर्थकातील गैरसमज तरी दूर होतील.
जे गेल्या ६० ७० वर्षात झालेल नाही ते आता ५ वर्षात होईल अशी अपेक्षा ईथे कोणीही ( सामान्य जनता सुद्धा) करत नाही.
त्यातल्या त्यात पाकिस्तानशी सामान्य जनतेला काहीही देण घेण नाहीय, फक्त आपल्या सैनिकांना मारतात त्यावेळेला जनतेचे रक्त खवळुन उठत कारण सैनिकही सामन्य जनतेतुनच आलेले असतात,
२६ /११ च्या मुंबई हल्ल्यानंतर काँग्रेसच्या (घड्याळ पार्टीच्या सुद्धा) दिग्गज लोकांनी याचा संबंध आर एसएस बरोबर जोडलेले होते.
अतिरेकी ईशन जहान . बाटला एंनकॉऊंटर नंतर सोनिया गांधीच्या डोळ्यातुन अश्रु वहात होते ते देशाने पाहीलेले,
अश्या लोकांकडुन काही झाले नाही हे सुद्धा लोकांनी पाहीले आहे.
10 May 2018 - 4:02 pm | माहितगार
अटल बिहारी ४ + मोदी सध्या ५ + पुढचे ५ = एकुण १४ होतील नाहिशे
एनी वे तुमच्या हिशेबाने अजून किती वर्ष हवेत ?
10 May 2018 - 4:04 pm | माहितगार
* नाहिशे नव्हे, नाहित पुरेसे ? असे वाचावे
10 May 2018 - 4:05 pm | डँबिस००७
पाकिस्तान जगाच्या नकाशात न दिसण हे पॉसिबल नाहीय ! कारण लोक तिथेच रहाणार !! तिथल्या लोकांची मानसिक स्थीती ईतकी खराव आहे की विदेशात पाकिस्तानच्या लोकांना कोणीही उभ करत नाही. गल्फ मधल्या सर्व चुकीच्या मार्गाने पैसे कमवणार्यात पाकिस्तानी लोकांचा नंबर पहीला आहे. शाळेतुन, बालपणा पासुन हिंदु विरोध त्यांच्यात कुटुन भरलेला आहे.
पाकिस्तानच्या सर्व टीव्ही वाहीनीवर भारताच्या काश्मिर भागात भारत सरकार अत्याचार करत आहे अस ठासुन सांगत असतात, पण स्वतः पाकिस्तानात गेल्या ७० वर्षांत पाकिस्तानात मागे राहीलेल्या हिंदु समाजाची गणना ४०% वरुन आता २% वर आलेली आहे. ह्या
वरुन त्या लोकांनी किती हिंदु ख्रीश्चन लो कांना मारुन टाकलेल आहे त्याची गणतीच नाही.
10 May 2018 - 4:08 pm | माहितगार
मग पॉसीबल काय आहे ?
किंवा
मग काय पॉसीबल आहे ?
10 May 2018 - 4:08 pm | डँबिस००७
पाकिस्तान जगाच्या नकाश्यावर नसला तरी तो देश व तिथल्या लोकांना कुठे नेणार ? त्यांची मानसिक तेच काय करणार ?
अखंड भारत ह्या संकल्पनेचा मी विरोधी आहे ह्याच कारण पाकिस्तानातले लोक मनाने कधीही भारतात सामावुन जाणार नाहीत.
10 May 2018 - 4:14 pm | माहितगार
कॉम्ग्रेस पेक्षा कायच वेगळ पॉसीबल नै तर मोदी आणि भाजपा कशासाथी हवेत ?
10 May 2018 - 4:47 pm | डँबिस००७
काय पॉसिबल आहे ?
पाकिस्तानला पैश्यान मारुन टाकायच,
सौदी व युएई गेले ४०- ५० वर्षे पाकिस्तान धार्जीणे होते. पाकिस्तानच्या सैन्याचा तिथे बोलबाला होता. पण सौदीच्या संरक्षणार्थ पाकिस्तान कटीबद्ध होता. पण यमन युद्धात पाकिस्तानने भाग न घेण्याच ठरवल्यावर खेळ बदलला.
पाकिस्तानातले लोक भारता प्रमाणेच गल्फ मध्ये, युरोप मध्ये व अमेरिकेत काम करुन पैसा मायभुमी पाकिस्तानला पाठवत असतात.
पाकिस्तानला रेमिटंसच्या रुपात दोन वर्षापुर्वी २० बीलीयन रु ईतका होता. अनिवासी भारतीयांच्या लोकसंख्याच्या सारखेच
पाकिस्तानी लोक गल्फ देशात रहात असतात. मुस्लिम लोकांचे श्रद्धा स्थळ मक्का मदिना हे साऊदी अरेबियात असल्याने त्या देशावरचे संकट हे आपल्या वरचे संकट अस पाकिस्तानातले धर्मांध लोक मानतात. त्यामुळे पाकिस्तानातली सैन्य कारवाई साठी सौदी अरेबीया
च्या सैन्याच्या खांद्याला खांदा लावुन लढायला जात. पाकिस्तानातला मुख्य खर्च हा सैन्यावर होतो. व तो पैसा अमेरीकेकडुन पाकिस्तानला मिळत होता. आता तो पैसा मिळण बंद झालेल आहे.
त्यात मोदीजींनी ह्या दोन्ही देशाबरोबर भारताचे संबंध मजबुत बनवले. सौदी अरेबीयाने गेल्या वर्ष भरात ४०,००० लोकांना परत पाठवल आहे. युए ई मध्ये पाकिस्तानी लोकांना व्हीजा देण्यावर निर्बंध आणलेले आहे. त्यामुळे पाकिस्तानचे रेमिटंस वेगाने खाली आलेल आहे. पाकिस्तानने खुप पैसे लोन वर घेतलेले आहेत. गेल्या दोन वर्षांत ह्या लोनच्या व्याज भरण्यासाठी पाकिस्तानला लोन घ्यायला भाग पडलेल आहे.
पाकिस्तानचा सर्वात मोठा व्यापार आहे तयार कापड ! पण ह्या कापडाच्या मार्केट मध्ये पाकिस्तानात तयार झालेल्या उठाव नाही. कारण पाकिस्तानच्या कपडा महाग आहे. ह्या महाग कपड्याच कारण महाग वीज. सरकार वीज पुरवत नसल्याने लुम मालक
जनरेटर वापरुन काम करतात त्यामुळे तयार माल महाग होतो. त्यात ह्या कामाला लागणारे सुत पाकिस्तानात महाग मिळते म्ह णुन
स्वस्त सुत हे भारतातुन आयात केल जाते. आता तर भारतातल्या फळाला ही पाकिस्तानात खुप मागणी आहे.
पाकिस्तानात कर वसुली खुप कमी आहे. त्यामुळे आय एम एफ वल्ड बँक वैगेरे पाकिस्तानला लोन द्यायला उस्तुक नाहीत. भारताच्या युद्ध सामुग्रीच्या खरेदीचा मोठ ओझ पाकिस्तानच्या मानेवर आहे. भारताने १००० कोटीची खरेदी केली की पाकिस्तानला किमान ५०० कोटीच्या युद्द सामुग्रीची खरेदी करण्याची खुम खुमी येते. त्यामुळे भारत बर्याच प्रकारे पाकिस्तानवर दबाव आणत आहे !!
फक्त भारतातले राजकीय पक्षाचे लोक पाकिस्तानचे गुण गान करतात त्यावेळेला पाकिस्तानच्या मिडीयातले लोक त्याचाच दाखला देत म्हणतात भारत चुकीचा वागत आहे. आज काँग्रेसला चांगेल म्हणणारे पाकिस्तान भारताशी चांगले कधी वागुच शकत नाही. काँग्रेसला ह्याची कधी खंत वाटेल का ?
10 May 2018 - 5:19 pm | माहितगार
या धाग्यावरुन काँग्रेस प्रेमी मोदी /भाजपा विरोधक का गायब आहेत ? आता डँबीस सायबांनी आकडेवारी दिली आहे , तपासायची आहे का कुणाला ?
10 May 2018 - 4:48 pm | डँबिस००७
लैच घाई आहे बुवा तुम्हाला !
10 May 2018 - 5:30 pm | माहितगार
हो आता तुम्ही अचानक रस्त्याच्या कड ने वळले , पण बाकी सगळे मोदी भक्त मला वाटते अजूनही पाकीस्तानला युद्धाच्या माध्यमातून नकाशावारुन मोदी काढतील अशी आश बाळगून असावेत , मी त्यांच्या वतीने घाई करतोय , कारण माझही पाकीस्तानवर काडीच प्रेम नाही , युद्धानी मोदी / भक्तांनी पाकीस्तान नकाशावरुन काढला तर मला मनातन आनंद आहे. पण ते आता (अण्वस्त्रोत्तर) युद्धातन जमेल यावर माझा अद्याप विश्वास नाही. - मला सुचणारे मार्ग निराळे आहेत.
तुम्ही म्हणतातसे पूर्ण आर्थीक नाकेबंदीसाठी मोदींना अजून किती वर्षे द्यावीत ?
युद्ध प्रेमी मिपाकरहो तुमचा एक गडी रस्त्याच्या कडेने गळतोय डँबीसरावाचे युद्धाने शक्य नाही म्हणणे खोडून त्यांचा आत्मविश्वास जागृत करुन दाखवा नाहीतर ते कड्याच्या रस्त्यावरुन काँग्रेस च्या रस्त्यावर पोहोचतील एक दिवस ;) ( डेंबीस राव ह घ्या)
10 May 2018 - 4:55 pm | डँबिस००७
कॉम्ग्रेस पेक्षा कायच वेगळ पॉसीबल नै तर मोदी आणि भाजपा कशासाथी हवेत ?
का बुवा ? देशाने मोदी व भाजपाला निवडुन दिलय !
काँग्रेस सारखे राजकारणी लोक देशाने नाकारले तरी सुद्धा पाकिस्तान सारख्या दुश्मन देशात जाऊन मोदी सरकारला उलथण्यासाठी मदत मागणारे नीच काँग्रेसचेच नेते निघाले ! तरी सुद्धा मोदी आणि भाजपा कशासाथी हवेत ?
जाउदे ह्या मुखवट्या मागचा खरा चेहरा उजेडात आलाच म्हणायचा !
10 May 2018 - 5:42 pm | जेम्स वांड
असले छपरी नेते तसेही त्यांच्या पार्टीच्याही कामाचे नाहीत. एकवेळ पार्टीच्या सदस्यत्वावरून हाकलले तरी त्यांना समज नाही. ह्यांना उलट अजून प्रोत्साहन द्यायला हवं. कारण हे जितकी बाष्कळ बडबड करतील तितके सुजाण मतदार मोदींचेच हात मजबूत करतील. त्यामुळे पाकिस्तानात जाऊन बरळणारे मणिशंकर वगैरे नेते अजून पुढे जाऊन अशीच खोडसाळ विधाने करत राहोत हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
10 May 2018 - 6:01 pm | माहितगार
काँग्रेस सारखे राजकारणी लोक देशाने नाकारले तरी सुद्धा पाकिस्तान सारख्या दुश्मन देशात जाऊन मोदी सरकारला उलथण्यासाठी मदत मागणारे नीच काँग्रेसचेच नेते निघकले ! तरी सुद्धा मोदी आणि भाजपा कशासाथी हवेत ?
दोष कशात आहे ? गांधी घराण्याच्या रक्तात की काँग्रेस पक्षाच्या हवेत ? - काँग्रेसच्या हवेत प्रॉब्लेम असता तर भारताचा गेल्या पन्नास वर्षात पाकीस्तान झाला नसता का ? ( मी सातत्याने सर्व घराणेशाहीची निंंदा करतो) भाजपत हवा पालट करायला आलेल्या बर्याच जंणांना समाविष्ट करुन घेताना दिसतात , नाही का ? आणि भाजपा सत्तेत आल्या .आल्या पाकीस्तानात अतिरेक्या स भेटणारा पत्रकार , चीनच्या बाजूला पलटी मारणारा हुशार मंडळी भाजपात पण दिसतात त्याचे काय करायचे ? हे सर्व असू द्या. प्रश्नाचा उद्देश बरेच मोदी भक्त मोदी पाकीस्तान युद्धाने जिंकतील आशा वल्गना सांगतात म्हणून विचारला गेला आहे .
आपण मांडलेली आर्थीक गणिते कोणत्याही राजकीय पक्षाचे सरकार असले तरी होउ शकतील की , मणि शंकर म्हणजेच काही काँग्रेस नसावी .
पाकीस्तान शी युद्ध करुन नेस्त नाबूत करण्यासाठी नाही का ?
10 May 2018 - 6:04 pm | डँबिस००७
पाकीस्तान शी युद्ध करुन नेस्त नाबूत करण्यासाठी नाही का ?
देशाच सरकार पाकीस्तान शी युद्ध करुन नेस्त नाबूत करण्यासाठी निवडतात का ?
10 May 2018 - 6:08 pm | डँबिस००७
आपण मांडलेली आर्थीक गणिते कोणत्याही राजकीय पक्षाचे सरकार असले तरी होउ शकतील की
होऊ शकली असती , पण आता पर्यंत असा प्रयत्न केला गेला नाही. किंबहुना आता तो प्रयत्न केला गेला म्हणुन पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदीही करता येऊ शकेल व तसा प्रयत्न हा सरकार करत आहे हे उजेडात आलेल आहे.
10 May 2018 - 6:17 pm | डँबिस००७
तुम्ही कितीही भारत पाकिस्तान करा !! माझा दावा हिंदु समाजाच्या भल्यावर आहे.
पण हिंदु समाजाची न भरुन येणारी हानी काँग्रेसने गेले ८० - ९० वर्षे केलेली आहे . पाकिस्तानची निर्मिती केली तर हिंदु देश का निर्माण केला गेला नाही. सिंध प्रदेश जिथुन हिंदु संस्कृती जन्म घेते तीच तुम्ही पाकिस्तानात घातली ह्या पेक्षा मोठा अन्याय तो कोणता ?
राम जन्म भुमी सारख्या आस्थेच्या स्थानाच्या मुक्ततेसाठी सुद्धा गेले ७५ वर्षे हिंदु समाजाला झगडावे लागत आहे पण देशाचे माजी पंतप्रधान स्वतः बोलले होते की भारतातल्या रिसोर्सेसवर पहीला अधिकार हा मुस्लिम समाजाचा आहे !
10 May 2018 - 6:26 pm | जेम्स वांड
प्रतिवाद करू नका,
ह्या पूर्ण धाग्याचा कार्यकरणभावच खोडसाळ आहे, युद्धप्रेमी मिपाकर वगैरे म्हणून ज्यांना शेलकी आवाहने केली जातायत तो प्रतिसाद तर अक्षरशः हीन आहे. हल्लीच दिलेल्या नवीन सुचनेबरहुकूम मिपा मालक-संपादकांनी माहितगार ह्यांना लवकर समज द्यावी/कारवाई करावी अशी विनंती करून मी माझ्यापुरता हा धागा गाडतोय.
ओम शांती
युद्धप्रेमी मिपाकर म्हणून ज्यांची संभावना केली जाते आहे, कदाचित ते एकांगी असतील, कदाचित मी बहुसंख्य ठिकाणी त्यांना कडाडून विरोध पण केला असेल भूतकाळात. पण तरीही असे खोडसाळ वागणे मी निषिद्ध मानत राहीन. माहितगारांकडून अशी अपेक्षा नव्हती, हे खेदाने नमूद करून थांबतो.
10 May 2018 - 7:12 pm | माहितगार
एक मिनीट, अण्वस्त्रे नसती तर मीही बर्या पैकी युद्धप्रेमी राहीलो असतो. युद्धप्रेमी नसणार्यांपेक्षा युद्ध प्रेमीं वर त्यम्च्या देशाभिमानाबद्दल मला नितांत आदर आहे . युद्धप्रेमी हा शब्द तुम्हाला हिनत्वाचा वाटण्यात माझी काय बी चूक नाही . गापैंनी चर्चा ....त्यापेक्षा पाकिस्तानचं स्वतंत्र देश म्हणून अस्तित्व मिटवणं सोपं असावं. या वाक्याच्या दिशेने नेण्यास चालू केली.
गापै युद्धाने म्हणतात, डँबीस आर्थीक म्हणतात, तुम्ही तंत्रज्ञान म्हनता, मी सांस्कृतिक आणि वैचारीक विवादाचा मार्ग म्हणतो आपल्या पैकी पाकीस्तान प्रेम कुणाचेच नाही .पण मोदी आणि भाजपाची पाक निती कट्टर राष्ट्रवदाच्या संकल्पनेची असेल आणि त्या संकल्पनेतून अभिप्रेत रिझल्ट अमुक असे दावे असतील तर त्याम्चे परिक्षण आणि चर्चेत काही वावगे असण्याचे कारण नाही .
10 May 2018 - 7:34 pm | पुंबा
मला वरील चारही मार्ग सुयोग्य वाटतात आणि भारताने पाकिस्तानवर वचक ठेवण्यासाठी चारही मार्ग सुसुत्रपणे वापरत राहिले पाहिजेत. अर्थात बळाचा वापर स्वसंरक्षणासाठी करताना जनता युद्धखोर बनणे गरजेचे नाही. युद्धनितीची, आप्ल्या बलस्थानांची तसेच उणीवांची जाणीव लष्कर, शासन व सिव्हिल सोसायटी या तीनही घटकांना असायला हवी पण यापैकी कुणीच युद्धपिपासू असू नये याची काळजी आपण घ्यायला हवी. पाकिस्तानची निर्मिती ही एकूणच मानवाच्या आधुनिकतेकडील प्रवासाच्या मार्गातील मोठी धोंड आहे. परंपरा, कला व संस्कृती, आपापसातील सहस्त्रकांपासूनचे सहजीवन आदी सर्व धागे तोडून एका भव्य समाजाला निव्वळ खुज्या धर्मवादाच्या आधारे फोडण्यात आले. आता, पाकिस्तान सुधारेपर्यंत आपणाला पाकिस्तानपासून सावधच रहायला लागणार आहे. सेक्युलरिझम, आधुनिकता, उदारमतवाद, लोकशाही यापैकी कुठल्याही तत्वाला मानणार्या शहाण्या व्यक्तिस पाकिस्तान हे राष्ट्र म्हणून फेल गेले आहे यात शंका वाटणार नाही, हे राष्ट्र म्हणून इतक्या संकुचित पायावर उभे राहिले की तेच त्याचे भविष्य होते.
'सांस्कृतिक आणि वैचारीक विवादाचा मार्ग' म्हणाव्या इतक्या समर्थपणे वापरण्यात भारताला यश मिळाले नाही असे मलाही वाटते.
मागासाहेब, आपण ओळख करून दिल्याने पुस्तक घेतले आहे, वाचल्यास आणखी काही अॅड करावे वाटले तर करेन.
10 May 2018 - 9:42 pm | माहितगार
नमस्कार,
पुस्तकाचा उर्वरीत भाग वाचल्या नंतर आम्हा मिपाकरांना अजून जराशी माहिती द्यावी हि विनंती. बाकी समतोल प्रतिसादासाठी अनेक आभार .
10 May 2018 - 7:00 pm | खिलजि
अरे हाय काय नि नाय काय
खरा पाकिस्तान कुणी पाहिलाय काय ?
इथली गंगा तिथे वहाते अन बनते सिन्धुमैय्या
का आपटता डोकं आपलं , सारा भुलभुलैय्या
सॅण्डीभाय सांगून गेला मागे सर्वात मोठी कविता
झोपण्यासाठी आपल्याला अशी किती लागते जागा ?
पाकिस्तानातून पक्ष्यावरती सारे पक्षी आले
संपादकही फळ्यावरती सूचना देउनी गेले
तरी उसळला आगडोंब तो, चाले त्यावर त्रागा
मन गाये उत्साद आपको , काय काढल्यात तुम्ही हा धागा ?
10 May 2018 - 7:17 pm | माहितगार
मिपा संपादक आम्हाला सेंसॉर करायचे तर जरुर करा त्या आधी , पोकळ वल्गना करणारे रलू रलु करु लागले एवढे वाक्य गालातल्या गालात हसून नोंदवावे . व्यक्ति लक्ष्य तर्कदोषाचे उत्तर व्यक्ति अल्क्ष्यतर्क दोषाने देण्याबद्दल क्षमस्व .
10 May 2018 - 8:59 pm | गामा पैलवान
माहितगार,
कुठे म्हंटलंय असं मी?
आ.न.,
-गा.पै.
10 May 2018 - 9:34 pm | माहितगार
अच्छा आपण पण रस्त्याच्याकडेने ! अभिनंदन !! मग मोदींच्या साहाय्याने पाकिस्तानचे अस्तित्व मिटवण्याचा आपला तो अद्भूत मार्ग कोणता बरे ?
आपण मोदींचे नाव घेतले नव्हते असे रच्याकने बदलायचे असेल तर आमची ना नाही हां ;)
10 May 2018 - 10:08 pm | गामा पैलवान
माहितगार,
माझ्या आकलनानुसार हक्कानी म्हणताहेत की पाकिस्तान अंतर्गत लाथाळ्यांनी जर्जर होऊन फुटेल.
आ.न.,
-गा.पै.