माझ्या ब्लाॅगचा उदयास्त

Primary tabs

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
7 May 2018 - 9:03 am

तेव्हा डोळ्यात लोलक होते
समोर निळी स्वप्नं होती
बोटाबोटात परीस होते
ओठी अनवट गाणी होती

आव्हानांची करंदकाळी
धोंड वाट अडवायची
लेखनलाट भिडून तिला
नेस्तनाबूत करायची

कीबोर्डावर माझी बोटं
वीज लाजेलशी लहरायची
उमटायची मग स्क्रीनवरती
भळभळ शब्दापल्याडची

पोटामागे आज धावतो
वेगाने, पण विझली आग,
धार विसरली बोथट छिन्नी,
सरणावरती माझा ब्लाॅग

अजून जेव्हा कुंद सकाळी
माझा ब्लाॅग साद घालतो
लाॅगिन करून सृजनचितेला
मीच चुपचाप चूड लावतो

कविता

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

7 May 2018 - 3:55 pm | श्वेता२४

अजून जेव्हा कुंद सकाळी
माझा ब्लाॅग साद घालतो
लाॅगिन करून सृजनचितेला
मीच चुपचाप चूड लावतो

खास आहे

अनन्त्_यात्री's picture

7 May 2018 - 5:05 pm | अनन्त्_यात्री

धन्यवाद.