असं वाटतं !

Primary tabs

श्वेता२४'s picture
श्वेता२४ in जे न देखे रवी...
25 Apr 2018 - 11:19 am

असं वाटतं सारं काही मनासारखं व्हावं...............
निळंभोर आभाळ सगळं कवेमध्ये घ्यावं......................

गडबडीची सकाळ अन ठरलेलं रुटीन
सोबत भाजी-पोळीने भरलेला टीफीन
साडेआठची लोकल कधीच चुकवून चालत नाही
इकडे तिकडे पाहायला मुळी वेळच मिळत नाही
कशाला मग पहाटेची किलबिल ऐकू येईल?
फुलणाऱ्या फुलांसोबत मनही फुलुन येईल?
म्हणून वाटतं पहाट बनून आपणच उजळून यावं...................
असं वाटतं सारं काही मनासारखं व्हावं ............................

तीचतीच तोंडे तेचतेच काम मशीन बनवून टाकते
ऑफीसच्या चार भिंतीत जग बंदीस्त होऊन जाते
मग वाटतं घडयाळाचा काटाच उपटून घ्यावा
बॉसचा हळूच डोळा चूकवून चक्क पळ काढावा
मग मला खुल्या हवेत श्वास घेता येईल?
रानामधलं गवत बनून मंद डोलता येईल?
वाटतं झऱ्याचं पाणी बनून खळखळ वाहत जावं.....................
असं वाटतं सारं काही मनासारखं व्हावं ........................

कधीतरी वाटतं जरा वेड्यासारखं वागू
गरमगरम शिऱ्यामध्ये सॉस घालून खाऊ
किंवा सगळेच सरळ चालतात आपण उलटे चालू
निरर्थक..., अकारण...., उगीच भटकत राहू
मनसोक्त भटकून मात्र थेट घरी येईन
आईच्या मांडीवर गाढ झोपून जाईन
तेवढ्या काळापुरतं माझं बालपण मला मिळावं...................
असं वाटतं सारं काही मनासारखं व्हावं ............................

- श्वेता

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

25 Apr 2018 - 1:34 pm | पद्मावति

छान लिहिलंय.

arunjoshi123's picture

25 Apr 2018 - 1:37 pm | arunjoshi123

मस्त कल्पनाविलास.

श्वेता२४'s picture

25 Apr 2018 - 1:42 pm | श्वेता२४

प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.

एस's picture

25 Apr 2018 - 3:18 pm | एस

मन वढाय वढाय...

छान कविता. आवडली.

बालपण देगा देवा

मुंगी साखरचा रवा

आपण पुढे व्हा

आम्ही येतोय मागून

हे बघा आलोच

सिद्धेश्वर विलास पाटणकर

सस्नेह's picture

25 Apr 2018 - 7:49 pm | सस्नेह

छान !
लहान झाल्यासारखं वाटलं !

श्वेता२४'s picture

25 Apr 2018 - 8:27 pm | श्वेता२४

प्रतिसाद देणार्यया सर्वांचे आभार!

पुंबा's picture

26 Apr 2018 - 6:52 pm | पुंबा

खुप सुंदर कविता..
आवडली.

श्वेता२४'s picture

27 Apr 2018 - 11:24 am | श्वेता२४

आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल

Secret Stranger's picture

18 Jul 2018 - 12:15 pm | Secret Stranger

खूप छान..

विनोदपुनेकर's picture

25 Jul 2019 - 3:22 pm | विनोदपुनेकर

खूप छान

बंधमुक्त जगावंसं वाटतं. खूप खूप छान!

गड्डा झब्बू's picture

26 Jul 2019 - 6:13 pm | गड्डा झब्बू

कधीतरी वाटतं जरा वेड्यासारखं वागू
गरमगरम शिऱ्यामध्ये सॉस घालून खाऊ

:-)) :-)) :-)) आमच्या हापिसातली एक महिला सहकारी नुसत्या भातात सफरचंद आणि अननसाच्या फोडी घालून खाते ते आठवलं एकदम :-))
छान लिहिलंय!

जॉनविक्क's picture

27 Jul 2019 - 11:31 pm | जॉनविक्क

भातात सफरचंद आणि अननसाच्या फोडी वगैरे काश्मिरी पुलावात पण घालतात :).

श्वेता२४'s picture

26 Jul 2019 - 8:04 pm | श्वेता२४

:)))