संताप

कुसुमिता१'s picture
कुसुमिता१ in जे न देखे रवी...
15 Apr 2018 - 2:06 am

नंदनवनातली ती कोवळी कळी..
ती खुडण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?

तुमच्या विखारी वासनेसाठी तिच्या देहाची लक्तर करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?

असाल धर्मद्वेष्टे तुम्ही..
तुमच्या धर्मांधतेसाठी तिचं आयुष्य कुस्करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?

बाईच्याच पोटी जन्म घेतला ना?
तुमच्या आई ची कूस अशी अपमानित करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?

असेल तुमचीही एखादी बहीण
बांधली असेल मनगटावर राखी
त्या राखीचे असे धिंडवडे काढण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?

इतकं नीच अधम क्रुत्य करुन ही अजून श्र्वास चालू आहे तुमचा..
हा जगण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?

वाद होतील..विवाद होतील..खटले चालतील.. शिक्षाही होईल.. इथं काय होईल ते होईल पण त्या परमेशाच्या दरबारात तुम्हाला कधीही क्षमा नाही..
कधीही नाही
कधीच नाही...

मुक्तक

प्रतिक्रिया

संताप पुरेपूर उतरला आहे. केवळ हेच एक नाही तर जेव्हा जेव्हा असहाय्य जीवांवर जेव्हा वासनांध अत्याचार करतात तेव्हा तेव्हा मन खवळून उठते.

कुसुमिता१'s picture

17 Apr 2018 - 2:41 pm | कुसुमिता१

धन्यवाद! खरच खूप संताप येतो आणि हतबल वाटत की आपण काहीच करू शकत नाही!