हे ही खरंय !

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
6 Apr 2018 - 6:03 pm


हे ही खरंय !

मनात नेहमी तीच हुरहूर
काहूर करून टाकणारी !
तीच आठवण मन व्यापून टाकणारी ,
रोज आठवण काढायलाच हवी ....... असं नाहीये खरं तर
पण रोज आठवण येते ..... हे ही खरंय !

पाण्याने वाहतं असलं पाहिजे
त्याने सगळं पुसलं गेलं पाहिजे
डोळे, मन, अंगण, आभाळ
ते नेहमी भरून वाहीलंच पाहिजे....... असंही नाहीये खरं तर
पण रोज आसवे भिजवून जातात ..... हे ही खरंय !

विरह विसरता आला पाहिजे,
नवा डाव मांडता आला पाहिजे,
आचारात, विचारात, वागण्यात, जगण्यात,
नेहमी हसणं जमलंच पाहिजे....... असंही नाहीये खरं तर
पण रोज हसून फक्त क्षण साधायचे ...... हे ही खरंय !

प्रत्येक कविता रेखाटली पाहिजे ,
तुझ्या आठवणीने ती शहारली पाहिजे,
वहीमध्ये कागदावर, ओळींवरच्या शब्दांवर
नेहमी तू असलाच पाहिजेस ..... असंही नाहीये खरं तर
पण तुझ्याशिवाय कविता अपूर्ण असते ... ...... हे ही खरंय !

बरीच वर्ष उलटून गेलीत .......असं आहे खरं तर
आठवांचे क्षण पुसट झालेत ..... असंही आहे खरं तर
तो आता वहीमध्ये बंद आहे ...... असंही आहे खरं तर

पण वहीवर धूळ साचली तरी ........ वहीतली गोष्ट बदलत नाही ..... हे ही खरंय !!

------------फिझा

कविता

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

6 Apr 2018 - 9:39 pm | मदनबाण

सुरेख...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोहराच्या दारावर कैर्‍या मागनं... [ * काय बाई एका-एकाच वागनं ] :- बबन

चांगली आहे कविता. आवडली.

अह्ह्ह्ह्ह,
सुरेख लिहिलंय.

अभिजीत अवलिया's picture

8 Apr 2018 - 3:20 pm | अभिजीत अवलिया

दर्जेदार...

श्वेता२४'s picture

11 Apr 2018 - 2:01 pm | श्वेता२४

फिजा तूमची कविता म्हणजे मला माझा मनोगतच वाटतंय. सगळ्यांनी कविता वाचली असेल पण मी अनुभवली आणि छान वाटलं. अजुन नव्या कवितांच्या प्रतिक्षेत

सत्यजित...'s picture

14 Apr 2018 - 4:22 am | सत्यजित...

>>>प्रत्येक कविता रेखाटली पाहिजे ,
तुझ्या आठवणीने ती शहारली पाहिजे,
वहीमध्ये कागदावर, ओळींवरच्या शब्दांवर
नेहमी तू असलाच पाहिजेस ..... असंही नाहीये खरं तर
पण तुझ्याशिवाय कविता अपूर्ण असते ... ...... हे ही खरंय !>>> क्या ब्बात! कविता आवडलीच!