फापटमुक्त तर्कसुसंगत रामायण, चर्चा भाग -२

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
5 Apr 2018 - 3:25 pm

* लेखात मांडलेले काही विचार तर्कसुसंगत असले, आणि लेखनाचा उद्धेश चांगला असला तरीही गैरसमज करून घेण्यास वेळा लागत नाही, त्यामुळे दोन्ही टोकांच्या व्यक्तींना काही मांडणी अवघड जाऊ शकतात. ज्यांच्या भावना वगैरे दुखावणारा नाहीत, आणि विचाराला विचाराने प्रतिवादावर विश्वास असेल अशांनीच पुढे वाचण्याचा विचार करावा इतरांनी टाळावे हि नम्र विनंती . .
* ज्यांना लेखाची लांबी खुपते त्यांच्यासाठी माझा लेखनाचा उद्देश संक्षेपाने शेवटच्या परिचछेदात जोडेन.

मला कल्पना असलेल्या रामायणावरील अर्धाडझन मोजक्या आक्षेपापैकी दोनांची चर्चा फापटमुक्त तर्कसुसंगत रामायण , चर्चा भाग -१ http://www.misalpav.com/node/42340 या भागात केली. ‘ उ
‘ प्रदेशातले ‘ सा ‘ नावाचे टीकाकार यांच्या टिकेची दखल या भागातून घेण्याचा मानस आहे. अशा तात्वीक चर्चेत डोके लावण्याआधी काही खट्टा-मिठा रोमँटीक बनाजाय असा विचार असा डोक्यात हलका फुलका विचार असेल तर काहीच हरकत नाही आंतरजालावर ओल्गा ते गंगा हिंदी कदंबरी मधून प्रभा नावाची कथा शोधून, त्यातील तरुण तरुणीं सोबत प्रत्यक्ष नदी स्नान करता येणार नाही -काल्पनिकेना म्हणून :) -- पण क्षणभर सुखद कल्पनेत रमण्यासाठी वाचल्यास खालील तात्वीक चर्चेचे आंशिक संदर्भ समजण्यास सोपेच जातील.

या चर्चेत येणाऱ्या पात्रांची थोडक्यात ओळख करून घेऊ .

* वाल्मिकी रामायण नावाच्या ग्रंथाचे लेखक
* पुष्यमित्र शुंग पहिल्या शतकाच्या आसपासचा मौर्य सम्राटास सत्तेवरून दूर करून सेनापतीचा सम्राट होऊन पाटलीपुत्र (म्हणजे आताचे पाटणा ) येथे पुढील थोडी शतके त्याच्या घराण्याची सत्ता आलेला सम्राट . याचे ऐतिहासिकत्व त्याच्या काळातील नाण्या वगैरेवरून सिद्ध होते पण बौद्ध धर्मीय भिख्खुम्वर केलेल्या अन्यायांची नोंद श्रीलंकेतील बौद्धधर्मीय ग्रंथातून मिळते . श्रीलंकाना बौद्ध धर्मीय ग्रंथहि पुराणामाप्रमाणे बर्याचदा अतिरंजन करता असले तरी नावे वर्षे इत्यादी माहिती बाबत स्थिती पुराणामापेक्षा स्थिती अल्पशी बरी असावी पण त्यासही दुजोर्याची गरज शिल्लक राहातेच
* ‘ उ ‘ प्रदेशातले ‘ सा ‘ नावाचे टीकाकार कोण : राहुल सांकृत्यायन मूळ नाव केदारनाथ पांडे , प्रवासवर्णनांबद्दल विशेष परिचित असलेले २० व्या म्हणजे मागच्या शतकांतच्या पूर्वार्धातील हिंदी साहित्यिक , ज्यांनी अधिकृत शिक्षणाचे मार्ग टाळून पर्यायी मार्गाने बऱ्याच भाषांचे ज्ञान मिळवले आधी आर्य समाज मग बौद्ध धर्म त्यानंतर साम्यवाद असा काहीसा प्रवास केला. ऐतिहासिक विषयावर काल्पनिक कथा लिहिल्या .

* विषयाची ओळख म्हणजे राहुल सांकृत्यायन यांच्या टीकेची ओळख : दशरथ जातक हा बौद्ध धर्मीय राम ग्रंथ, वाल्मिकी रामायणा आधी लिहिला गेला असू शकेल , रामायणाचे लेखक वाल्मिकी पुष्यमित्र शुंगांचा आश्रित राहिले असू शकतील, पुष्यमित्र शुंगाच्या महिमा मांडणासाठी दशरथ जातकावरून वाल्मिकींनी आपल्या रामायणाची रचना केली असू शकेल . आधी अशा शक्यतांचा पहाड रचायचा आणि मग असेच घडले असा दावा रेटायचा असे करणाऱ्या असंख्य प्रकारचे अनुयायी बऱ्याच जणांना भेटतात तसे यानांही दिसतात .

** हा दावा नेमका कुठून आला :

एका धाग्याच्या उपचर्चेतून ‘ उ ‘ प्रदेशातले ‘ सा ‘ नावाचे टीकाकार यांच्या टिके बद्दल चर्चेस सुरवात झाली तरी एक उपचर्चा एका विषयाला पूर्ण न्याय देऊ शकत नाही. म्हणून त्याचा या धाग हर्चेद्वारे उहापोह

राहुल सांकृत्यायन यांच्या 'वोल्गा से गंगा’ मधील , ऐतिहासिक दावे वगळून उर्वरित कथा ‘प्रभा’ समता बंधुता स्वातंत्र्य ह्या मूल्यांची पाठराखण करणारी म्हणून स्पृहणीय असली तरी,

१) राहुल सांकृत्यायनांचे संदर्भ दिलेले लेखन ऐतिहासिक कथा ललित साहित्य या प्रकारात मोडते त्या मुळे त्यांचे कथन ऐतिहासिक प्रमाण साधन म्हणून स्विकारणे कठीण जाते.

२) आणि डाव्या आणि बौद्धधर्मीय विशिष्ट दृष्टिकोन बाळगणार्याना राहुल सांकृत्यायनांचा अभिमान वाटला तरी ; त्यांचे
आदर्श जीवनासंबधीचा स्वप्न कल्पनारम्य असले तरी कम्युनिझम अथवा बौद्ध धर्मातूनच ते शक्य असल्याचा दृष्टिकोन एक तर वास्तवास धरून आहेच असे म्हणणे कठीण जाते ,

३) मुख्य म्हणजे त्यांच्या या दृष्टिकोनामुळे विश्लेषणातील निष्पक्षता हरवून दृष्टिकोन एकांगीपणे कलणे आणि एकदा कललेल्या दृष्टिकोनातून निष्कर्ष काढण्याचे ठरवले कि प्रमाण ऐतिहासिक साधनांचे दाखले आणि तर्कशुद्धतेपासून फारकत होणे हे दोन्ही दोषांवर पुढील इमल्यांची रचना होते आहे असे वाटत राहाते.

४) चौथी गोष्ट : आर्यन इन्व्हेजन थेअरी चा अप्रत्यक्ष प्रभाव या कथेवर जाणवतो मुख्य म्हणजे आर्य म्हणजे गोरे आणि द्रविड म्हणजे काळे हि आताशा काहीशी कालबाह्य झालेली थेअरी चा राहुल सांकृत्यायन लेखनावावर प्रभाव दिसतो. जिथ पर्यंत रामायणाचा संबंध आहे राम कृष्णाप्रमाणेच रंगाने सावळा असावा किंवा ब्राह्मणांमध्येही सावळ्या रंगाचे प्रमाण बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे वैदिक धर्मीय गोरे होते असा काही तर्क काढला तरी त्यांनी त्यांचे ज्ञान शेअर करताना किमानपक्षी रंगाचा विचार केला नाही असे नक्कीच म्हणता यावे.

५) त्यामुळेच कदाचित राहुल सांकृत्यायन यांच्या लेखनाची हिंदीसाहित्याने दाखल घेतली तरी, त्यांच्या विचारांना उत्तरभारतीय समाज कितपत स्वीकारू शकला या बाबत साशंकता राहते कारण त्यांचे तर्क जनतेने स्वीकारले असते तर अयोध्या विषय आंदोलन आणि समस्या आकारास येणे कठीण राहिले असते. पण सर्वसामान्य जनतेला तर्कातील पोकळता नेमक्या शब्दात व्यक्त नाही करता आल्या तरी कुठेतरी उमजताही असण्याची शक्यता असू शकते अथवा रामायण कथेचे मुल्य ते प्रत्यक्षात झाले किंवा नाही या पेक्षा अधिक महत्वाचे असावे.

हजारो लाखो शक्यता पैकी एका शक्यता म्हणजे एकमेव शक्यता नव्हे , तसा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष भास निर्माण करणे तार्किक उणिवेचा नसते किंवा कसे आणि नेमकी हिच तार्कीक उणीव राहुल सांकृत्यायन यांच्या दाव्यात जाणवत रहाते.

“साकेत (अयोध्या) कभी किसी राजा की प्रधान राजधानी नहीं बना। बुद्ध के समकालीन राजा प्रसेनजित की राजधानी श्रावस्ती (सहेट-महेट) वहाँ से छ: योजन दूर थी। प्रसेनजित के दामाद अजातशत्रु ने कौसल की स्वतन्त्रता का अपहरण किया। उसी समय श्रावस्ती का सौभाग्य लुट गया। ...वाल्मीकि ने अयोध्या नाम का प्रचार किया जब उन्होंने अपनी रामायण पुष्यमित्र या उसके शुग-वंश के शासनकाल में लिखी। कोई ताज्जुब नहीं यदि
वाल्मीकि शुग-वंश के आश्रित कवि रहे हों और शुग-वंश की राजधानी की महिमा

पुष्यमित्र या उसके शासन काल में रामायण लिखते हुए वाल्मीकि ने (साकेत की जगह) अयोध्या नाम का प्रचार किया. कोई ताज्जुब नहीं कि वाल्मीकि शुंग वंश
(पुष्यमित्र का वंश) के आश्रित कवि रहे हों जैसे कालिदास चंद्रगुप्त विक्रमादित्य के

शुंग वंश की राजधानी की महिमा बढ़ाने के लिए ही उन्होंने (वाल्मीकि न) जातकों के दशरथ की राजधानी वाराणसी से बदलकर साकेत या अयोध्या कर दी और राम
के रूप में शुंग सम्राट पुष्यमित्र की प्रशंसा की.’

दावा १ “साकेत = अयोध्या

पुष्यमित्र के शासनकाल में शुरुआती दिनों में अयोध्या का ख़ासा महत्व था और उस समय भी इसका नाम अयोध्या नहीं बल्कि साकेत था. जानकारों के मुताबिक जब यवन (यूनान) के राजा मिनांडर ने साकेत पर घेरा डाला तो पुष्यमित्र के गुरु पतंजलि ने भी इसी नाम (साकेत) से उसका ज़िक्र किया था.

: तार्किक उणीव :
जसे अयोध्या नावाची अजून गावे राहिली असू शकतात तसे साकेत नावाची आणखी गावे राहिली असू शकतात प्रमाण ऐतिहासिक साधनांची उपलब्धता हवी

दावा २ साकेत (अयोध्या) कभी किसी राजा की प्रधान राजधानी नहीं बना
: तार्किक उणीव : एखादी गोष्ट झाली असल्याचा पुरावा नसेल म्हणजे झालीच नाही असे हि ठामपणाने दावा करता येत नसतो .

दावा ३ : प्रसेनजित के दामाद अजातशत्रु ने कौसल की स्वतन्त्रता का अपहरण किया। उसी समय श्रावस्ती का सौभाग्य लुट गया

: उणीव : याचा आधार काय हे या काल्पनिक कथेत स्पष्ट केलेले नाही . (कुणा मिपाकरांना हा संदर्भ माहित असेल तर स्पस्।ट करुन मदत करावी)

दावा ४ : वाल्मीकि ने अयोध्या नाम का प्रचार किया
: उणीव : प्रमाण ऐतिहासिक साधनांची उपलब्धता हवी ( वाल्मिकींवर हवेत पंतग उडवण्याचा आरोप करण्यासाठी , आपणही हवेत पतंग उडवले तर कुणाला
कळणार नाही असा विश्वास असावा :) )

दावा ५ : जब उन्होंने (वालिमिकी ) अपनी रामायण पुष्यमित्र या उसके शुग-वंश के शासनकाल में लिखी

: उणीव : प्रमाण ऐतिहासिक साधनांची उपलब्धता हवी

दावा ६ : वाल्मीकि शुग-वंश के आश्रित कवि रहे हों
: उणीव : प्रमाण ऐतिहासिक साधनांची उपलब्धता हवी

दावा ७ : रामायण बुद्ध के बाद ‘दशरथ जातक’ से प्रेरणा लेकर लिखी गई

: उणीव : ‘दशरथ जातक हे वाल्मिकी रामायणाच्या आधीच लिहिले गेले याला प्रमाण ऐतिहासिक साधनांची उपलब्धता हवी, ती नाही आहे.

दावा ८ : शुंग वंश की राजधानी की महिमा बढ़ाने के लिए ही
: उणीव : अयोध्येत शुंगवंशीय असल्याचा दावा करणारा एका शिलालेख मिळाला पण त्यावरील राजाचे नाव पाटलीपुत्राहून कारभार करणाऱ्या पुष्यमित्र शुंगाच्या वंशजाच्या अधिकृत यादीत दिसत नाही. केवळ अत्यल्प पुराव्यावर असलेली पाटलीपुत्र हि राजधानी ऐवजी अयोध्या हि मुख्य राजधानी दाखवण्यासाठी आटापिटा फार ताणाला जातो आहे .

मुख्य म्हणजे वाल्मीकि शुग-वंश के आश्रित कवि होता यालाच प्रमाण ऐतिहासिक साधना नाही त्यामुळे त्यावर आधारित महिमामंडनाचा दावाही सुस्पष्ट पुराव्या अभावी टिकत नाही .

महिमा मडणं करण्यासाठी कोणत्याही कवीला डायरेक्ट पुष्यमित्राचे आणि सांकृत्यायन म्हणतात तसे साकेत गावाचे नाव घेऊन कौतुक करता आले असते कि त्या साठी वाल्मिकी किंवा कोणताही कवी नावे बदलण्याचा आटापिटा का करेल ? बरे तेही सत्तेचा लोभा साठी सबकुछ पुष्यमित्र शुंगा पुढे सत्तेचा त्यागाचे उदाहरण आश्रमात बालकांना देणे वेगळे आणि नुकताच सत्ता ओरबाडणार्या पुढे असे वर्णन करणारा वाल्मिकी बाकीचे रामायण लिहिण्या साठी कसा शिल्लक राहिल ? उलट वाल्मिकी ने रामायणात त्याग करणार्‍या क्षत्रियांना हिरो आणि ब्राह्मण असलेला रावण व्हिलन रंगवला आहे. अशा वाल्मिकी रामायणाने पुष्यमित्राचे महिमा मांडणं होण्या ऐवजी ब्राह्मण असल्याने पुष्यमित्रावर टीका होते. उलट ना टिकणारी टीका करून राहुल सांकृत्यायनांनां बौद्ध स्रोतातील त्रुटी उजागर करण्याची संधी जाणीवपूर्वक तर निर्माण करायची नाही कि सांकृत्यायना हे काम नकळत करत आहेत अशी शंका वाटते.

आता पहिल्या परिच्छेदात उल्लीखेल्या नदी स्नानाचा वरील चर्चेत काही संदर्भ लागतो का तर मुळीच नाही, कारण काल्पनिक आहे ना दुसर्‍यांवर काल्पनिकतेचे आरोप करताना आपल्या कल्पनांचे वारु कुठून कुठेही पोहोत गेले तरी चालते. कल्पनांचे वारु कुठेही पोहोत गेले तरी अमुक तमुक धर्मीय अथवा कम्युनीस्ट तसले नदी स्नान प्रतय्क्षात करु देतील अशी शक्यता कमीच असते पण दुरुन डोंगर साजरे दिसते त्याला इलाज नसतो.

टीकेसाठी टीका करणाऱ्या आधुनिक आनुयायींनचा आजून एका प्रकार म्हणजे राहुल सांकृत्यायना आणि पेरियार दोघांच्याही टीकांचा संगम करणे राहुल सांकृत्यायन वाल्मिकी रामायण झालेच नाही म्हणतात कारण दशरथ जातकातला राम दक्षिणेकडे जातच नाही तर पेरियार रामायण झाले आणि रामायणात रामाने दक्षिणेत येण्याचा अन्याय केला म्हणतात परस्पर विरोधी तर्कांचा संगम कसा होईल ?

वावर

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

5 Apr 2018 - 6:02 pm | पगला गजोधर

पुष्यमित्र शुंग पहिल्या शतकाच्या आसपासचा मौर्य सम्राटास सत्तेवरून दूर करून सेनापतीचा सम्राट होऊन पाटलीपुत्र (म्हणजे आताचे पाटणा ) येथे पुढील थोडी शतके त्याच्या घराण्याची सत्ता आलेला सम्राट . याचे ऐतिहासिकत्व त्याच्या काळातील नाण्या वगैरेवरून सिद्ध होते पण बौद्ध धर्मीय भिख्खुम्वर केलेल्या अन्यायांची नोंद श्रीलंकेतील बौद्धधर्मीय ग्रंथातून मिळते . श्रीलंकाना बौद्ध धर्मीय ग्रंथहि पुराणामाप्रमाणे बर्याचदा अतिरंजन करता असले तरी नावे वर्षे इत्यादी माहिती बाबत स्थिती पुराणामापेक्षा स्थिती अल्पशी बरी असावी पण त्यासही दुजोर्याची गरज शिल्लक राहातेच

A Concise History of Afghanistan in 25 Volumes, Volume 1
By Hamid Wahed Alikuzai

ps

माहितगार's picture

5 Apr 2018 - 6:10 pm | माहितगार

साहेब माझ्या माहिती नुसार मूळ दाखला केवळ एका बौद्ध धार्मीक स्रोतातून येतो तोच सर्वजण एका नंतर एक उगाळतात, मी दुजोरा म्हणजे स्वतंत्र प्रमाण ऐतिहासिक साधनाची अपेक्षा बाळगतो.

पगला गजोधर's picture

5 Apr 2018 - 7:08 pm | पगला गजोधर

The Orifice As Sacrificial Site: Culture, Organization, and the Body
By James Alfred Aho

ps2

मी माझा मुद्दा सविस्तर नंतर मांडतो. Hamid Wahed Alikuzai आणि James Alfred Aho हे इस्विसनाच्या पहिल्या शतकाच्या आधी स्वतः जन्मले नसतील ना ? त्यांचा पुष्यमित्र शुंगाच्या कालीन मूळ संदर्भ काही त्यांनी नमुद केला असल्यास सांगाल ? मग पुढचे बोलतो.

पगला गजोधर's picture

5 Apr 2018 - 8:03 pm | पगला गजोधर

पुष्यमित्र शुंगाच्या कालीन मूळ संदर्भ काही त्यांनी नमुद केला असल्यास सांगाल ?

माझ्या वाचनात आलेले टेक्स्ट (संदर्भ नाही),

वाल्मिकी रामायण (तथाकथित पुष्यमित्र शुंगाच्या कालीन)
===============================

In the Ayodhya Kaanda of Valmiki Ramayana, a Buddhist was compared to a thief
and the Tathagatas to atheists (Naastiks). It said:

यथा हि चोर स्स तथा हि बुद्धस्तथागतं नास्तिकमत्र विद्धि।

As a thief, so is Buddha. Know that Tathagatas are atheists. [Sarga 109; shloka 34]

साहेब (या विषयाची खाली वेगळी चर्चा करतो), पण या क्षणी इथे गोलपोस्ट शीफ्ट होतीए. मी आपणास 'भिख्खूंना मारण्यासाठी पुष्यमित्राने नाणी देऊ केली ' या दाव्या साठी (जो आपण वरच्या दोन पुस्तकांच्या हवाल्याने दिलात ) त्यांचा मूळ संदर्भ स्रोत मागतो आहे.

(मला माहिती आहे की तो स्रोत शेवटी अशोकवदना/ दिव्यवदना या श्रीलंकेतील बौद्ध धार्मीक पुराणापर्यंत जाऊन पोहोचेल, पण या शिवाय काही वेगळा मिळाला तर तो तुम्ही शोधून पहावा. अशोकवदना/ दिव्यवदना या श्रीलंकेतील बौद्ध धार्मीक पुराणातील भिख्खूंना मारण्यासाठी पुष्यमित्राने नाणी देऊ केली ' या उल्लेखा करता मी स्वतंत्र (म्हणजे बौद्ध स्रोतांशिवाय) पुष्यमित्र शुंगमित्राच्या समकालीन प्रमाण ऐतिहासिक साधन विचारतो आहे. (आपल्या माहिती साठी आपण दिलेल्या रामायणातील वाक्याचा भिखूंना मारा नाणी देतो असा अर्थ होत नाही)

पगला गजोधर's picture

6 Apr 2018 - 12:36 pm | पगला गजोधर

सर,

अग्रीम क्षमस्व ...
बराचसा फाफट पसारा सहित आलो त्याबद्दल,

अशोकवदना/ दिव्यवदना या श्रीलंकेतील बौद्ध धार्मीक पुराणातील भिख्खूंना मारण्यासाठी पुष्यमित्राने नाणी देऊ केली ' या उल्लेखा करता मी स्वतंत्र (म्हणजे बौद्ध स्रोतांशिवाय) पुष्यमित्र शुंगमित्राच्या समकालीन प्रमाण ऐतिहासिक साधन विचारतो आहे.

"सम्राट बृहदत्त याचा पुष्यमित्र शुंग ने वध केला व स्वता: सम्राट बनला, त्याच्या राज्यकालात त्याने मागील शतकात बौद्ध धर्माचे वाढलेले प्रस्थ कमी करण्याचा प्रयत्न केला व वैदिक धर्माला चालना दिली. त्याने अनेक बौद्ध स्तूपांची नासधूस केली." याबाबत माहिती बौद्ध ग्रंथात मिळणार हे स्वाभाविकच आहे.
बौद्ध ग्रंथात लिहिलेलं धादांत खोटं आहे , असं कोणाचे म्हणणे असेल तर त्यांनींच सप्रमाण सिद्ध करावे.

* दुय्यम पुरावा गरज

"अगा जे झालेची नाही" असा पवित्रा हॉलोकास्ट डिनायर घेतात, त्याची आठवण मला झाल्याशिवाय राहत नाही. हॉलोकास्ट डिनायर यांचे मुद्दे
- हॉलोकास्ट झालंच नाही , "नरसंहार करा" असा लेखी आदेश असणारे पत्र अस्तित्वात नाही
- फायनल सोलुशन (ज्यूंचा बंदोबस्त) हा एक युफेमीजम आहे
-युद्धकाळातील हवाई पाहणीत कुठेही Chimney (गॅस चेंबरचा भाग) आढळली नाही
-लाल सेनेने औशविट्झ कब्ज्यात घेतल्याव, त्यांनी गॅस चेंबरअसल्याचा उल्लेख कुठेही आढळत नाही (त्यामुळे दुय्यम पुरावा नाही, प्राथमिक अमेरिकन पुरावा हा तेथील ज्यू बहुसंख्य उपस्थितीमुळे दुय्यम पुरावा आवश्यक)* आपणही जसे समकालीन दुय्यम पुरावा मागत आहात पुष्यमित्राच्या आदेशाबाबत.

आता काही दशकापूर्वी झालेल्या ज्यूंच्या नरसंहाराबाबत उलट सुलट शंका कुशंका घेतल्या जात असतील,
तर त्याच न्यायाने काही हजार वर्षे पूर्वी झालेल्या हत्याकांडा बाबत उलट सुलट शंका कुशंका घेतल्या जाउ शकतात
किंवा निर्माण केल्या जाऊ शकतात काय ? काही स्कोप होऊ शकतो का याबाबत ?
बरं शंका कुशंका घेण्याची प्रवृत्ती मानवी स्वभावात त्याकाळीही (साहित्य निर्मित काळी) होती (रेफ रामायणातील कुंभार )

(आपल्या माहिती साठी आपण दिलेल्या रामायणातील वाक्याचा भिखूंना मारा नाणी देतो असा अर्थ होत नाही)

.
आता पुष्यमित्रसमकालीन वाल्मिकी रामायणातील उल्लेख बाबत,

-ज्यूंबद्दल हिटलर जे म्हणायचा ते तेव्हाच्या जर्मन समाजात लोकप्रिय असलेले समज होते. एखादी जात कंजूष असते, एखादा धर्म क्रूर असतो असे समज हा प्रोपगंडाचाच भाग असतो. विरोधकांची एकसाची टाकसाळी प्रतिमा तयार करण्याच्या तंत्राची ती उपज असते. या प्रोपगंडामुळे त्या जातीचे, वंशाचे वा धर्माचे जे रूप उभे राहते, तेच सत्य असा समज समाजात दृढ होतो. त्यासाठी मग कोणतेही बाह्य़ पुरावे असण्याची आवश्यकता नसते. ते गैरसमज हेच स्वयंप्रकाशी सत्य असते.

*(जरी पुष्यमित्राचा बुद्ध भिक्कू हत्या व बक्षिशीचा प्रत्यक्ष पुरावा नाही मानता आला तरी )बुद्ध /बौद्ध धर्माबद्दल जर समकालीन वाल्मिकी साहित्यातील उल्लेख हे डेरोगेंटरी /प्रोपगंडाचाच भाग होता का ? याबद्दल विचार व्हायला हवा हे निश्चित.

माहितगार's picture

6 Apr 2018 - 1:38 pm | माहितगार

साहेब,चर्चेत प्रश्न विचारला भात शिजला की कच्चा आहे ? एवढाच विचारला - भाताचे कच्चेपण किंवा शिजलेपण नीट जेवणास घेण्यापुर्वी तपासहोकवे लागते, ( 'भातात खडे आहेत तुम्ही का नाकारताय ?' हे ह्या प्रश्नाचे उत्तर नव्हे - हा आपण मनात आधीच कल्पिलेला निष्कर्ष आहे. खडे आहेत हे अद्याप पूर्णतः नाकारलेले नाही , पूर्ण होकार हि अद्याप भरलेला नाही केवळ त्याची वेगळी चर्चा खाली करू असे म्हटले आहे . एककेका विषयाची चर्चा करत पुढे जाऊ एवढेच म्हटले आहे. )

आपल्या एकुण उपरोक्त प्रतिसादावरुन विनंती केलेले प्रमाण ऐतिहासिक साधने पुरवण्यास आपण तुर्तास तरी समर्थ नाही आहात असे गृहीत धरले तर चालावे असे वाटते. त्या नंतर पुढच्या चर्चेकडे सरकतो. आणि भाताच्या शिजलेपणा बद्दलच्या माझ्या शंका मांडतो.

पगला गजोधर's picture

6 Apr 2018 - 1:54 pm | पगला गजोधर

ठीक आहे, तुर्तास तुम्हास मान्य होतील अशी प्रमाण ऐतिहासिक साधने पुरवण्यास, मी तरी असमर्थ आहे, असे गृहीत धरून ,
आपण आपला पुढील चर्चेचा टप्पा विशद केलेले, वाचण्यास उत्सुक आहे.

धन्यवाद विषय निघालाच आहे तर , इतिहास साधने आणि विश्लेषणात शक्य तेवढा काटेकोरपणा अभ्यासकांनी बाळगावा असे मला वाटत असते म्हणून असा आग्रह असतो. मी मिपावर अगदी गुरुगे नावाच्या श्रीलंकन अभ्यासक विश्लेषकाच्या टिकेची दखल घेऊन हा धागा लेख मिपावर लिहिला होता-त्यांची (गुरुगेण्ची) ती पिडीएफ मात्र या क्षणी उघडत नाहीए नाही तर त्यांचा दाखला उपरोकत्चर्चेत उपयूक्त ठर्ला असता . मी बाकीची मांडणी करे पर्यंत कदाचित आपणास माझा धागा लेख चाळणे रोचक वाटेल.

पगला गजोधर's picture

6 Apr 2018 - 3:25 pm | पगला गजोधर

मिनव्हाईल मी इतर माहिती वाचत असताना मला एक प्रश्न पुन्हा सतावतोय...

पुष्यमित्राकडून मीनांडर याने लढाईत, सगल / सकल नावाची भूमी जिंकून घेतली , (पुढे ति त्याची राजधानीचा झाली)
लढाई नंतर त्याने इंडोग्रीक स्टाईल ने नाणी पाडली,
नाण्यावर आपले चित्र व 'मीनांडर द सेव्हिअर' असे छापून घेतले.
युद्ध केल्यावर त्याने स्वतःला अरीदमन / शत्रूंजय / अमुक निर्दालक वैगरे न म्हणवून घेता,

'मीनांडर द सेव्हिअर' असे म्हणवून घेणे पसंत केले ? सगलचे लढाई, कुणाचे निर्दालन नव्हे तर रेस्क्यू मिशन होते का ?
कुणाला वाचवलं मीनांडर ? कुणापासुन वाचवलं त्याने ?

'मीनांडर द सेव्हिअर' असे नाणं अस्तित्वात आहे बहुतेक ब्रिटिश म्युझिअममधे , याला दुय्यम पुरावा मानू शकतो का ?

ms

पैसा's picture

7 Apr 2018 - 5:54 pm | पैसा

एखादी जात कंजूष असते, एखादा धर्म क्रूर असतो असे समज हा प्रोपगंडाचाच भाग असतो. विरोधकांची एकसाची टाकसाळी प्रतिमा तयार करण्याच्या तंत्राची ती उपज असते. या प्रोपगंडामुळे त्या जातीचे, वंशाचे वा धर्माचे जे रूप उभे राहते, तेच सत्य असा समज समाजात दृढ होतो. त्यासाठी मग कोणतेही बाह्य़ पुरावे असण्याची आवश्यकता नसते. ते गैरसमज हेच स्वयंप्रकाशी सत्य असते.

तुमच्या १० पैकी ९ प्रतिक्रिया /पिंका एका विशिष्ट जातीबद्दल विखार ओकणाऱ्या का असतात हे तुम्हाला चांगले ठाऊक आहे हे आवर्जून सांगितल्याबद्दल धन्यवाद!

सामाजिक असमानता मुद्दाम कुणी घुसडली याबाबतीत 'कुणी' महत्त्वाचे नसून ती त्यावेळी असणार. आणि त्यामुळेच रामायण हे बुद्धकालाअगोदरचे ठरेल.

असमानता काल्पनिक करणे वगैरे अशक्य वाटते कारण त्यावेळी हिंदी चित्रपटसृष्टी नव्हती.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Apr 2018 - 2:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

असमानता काल्पनिक करणे वगैरे अशक्य वाटते कारण त्यावेळी हिंदी चित्रपटसृष्टी नव्हती. :)