ताज्या घडामोडी - भाग २५

गामा पैलवान's picture
गामा पैलवान in काथ्याकूट
11 Mar 2018 - 12:01 am
गाभा: 

लोकहो,

अखेरीस ट्रंपूबाबांनी उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किममामा यांच्यासोबर चर्चा करायचं ठरवलं. संदर्भ : http://www.bbc.co.uk/news/world-us-canada-43353274

याआधी शड्डू ठोकून युद्धाच्या डरकाळ्या फोडणारे ट्रंपूपापा अचानक म्यावम्याव का बरं करू घातले?

याचं कारण अगदी उघड आहे. दिनांक ०१ मार्च रोजी पुतीननानांनी रशियाकडील ६ नवी अस्त्रे विशद केली. संदर्भ : http://theduran.com/6-new-weapons-putin-revealed-state-nation-address/

मग मात्र निरुपायाने ट्रंपूबाबांना वाटाघाटींच्या टेबलावर चढावं लागलं.

एकंदरीत आंतरराष्ट्रीय राजकारणांत मर्कटचेष्टा फार वाढल्या आहेत. त्यांना तात्पुरता का होईना पायबंद घातल्याबद्दल पुतीननानांना अभिवादन.

जाताजाता : अणुशक्तीप्रेरित क्षेपणास्त्र म्हणजे उडणारी अणुभट्टी. साली ही संकल्पनाच खतरनाक आहे. उडणाऱ्या अस्त्रावर अणुध्वम बसवणं फार सोपं आहे. पण त्याच्या बुडाशी अणुभट्टी बसवून ती कार्यरत ठेवणं म्हणजे कर्मकटकट आहे. भारताने या दिशेने गांभीर्याने विचार करायला हवा. कोणास ठाऊक, चालू असेलही.

आ.न.,
-गा.पै.

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

13 Mar 2018 - 8:18 am | जेम्स वांड

किती इंची स्क्रीन असलेला मोबाईल गरिबी रेषेच्या वरती/खाली असणे/नसणे डिफाईन करत असावा असे आपल्याला वाटते श्रीगुरुजी?

श्रीगुरुजी's picture

13 Mar 2018 - 8:46 am | श्रीगुरुजी

विचार करा. उत्तर मिळेल.

श्रीगुरुजी's picture

12 Mar 2018 - 10:58 pm | श्रीगुरुजी

कंठलंगोट परीधान केलेला एक शेतकरी सुद्धा दिसतोय.

विशुमित's picture

12 Mar 2018 - 11:28 pm | विशुमित

कंठलंगोट घालणारे सेल्समेन पोरे कटाकटी ५-६ हजार महिना कमावतात हे पाहिले आहे.

श्रीगुरुजी's picture

13 Mar 2018 - 6:53 am | श्रीगुरुजी

पण ते प्रत्येक गोष्ट फुकट मागत नाही.

जेम्स वांड's picture

13 Mar 2018 - 8:20 am | जेम्स वांड

सगळ्या गोष्टी फुकट मागतात असे आपले मत आहे का श्रीगुरुजी?

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2018 - 9:25 am | श्रीगुरुजी

जेमतेम ५-६ हजार मिळविणारे कंठपट्टीवाले कर्जमाफी, फुकट वीज, नुकसान भरपाई इ. ची सातत्गणीयाने केल्याचे ऐकिवात नाही.

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2018 - 9:26 am | श्रीगुरुजी

सातत्याने

विशुमित's picture

14 Mar 2018 - 8:22 am | विशुमित

LLRC

श्रिपाद पणशिकर's picture

13 Mar 2018 - 3:26 pm | श्रिपाद पणशिकर

कंठलंगोट ??????

हे काय आहे कोणि जरा सांगाल का

manguu@mail.com's picture

13 Mar 2018 - 3:33 pm | manguu@mail.com

टायसाठी मराठी शब्द - कंठलंगोट.

अहो त्या राहुलच्या आयटीआयची काय भानगड आहे?

बिटाकाका's picture

13 Mar 2018 - 1:59 pm | बिटाकाका

कोणती भानगड?

श्रिपाद पणशिकर's picture

13 Mar 2018 - 3:31 pm | श्रिपाद पणशिकर
श्रिपाद पणशिकर's picture

13 Mar 2018 - 3:32 pm | श्रिपाद पणशिकर

तो आयटिआय चा कोर्स करतोय.

मशिन तयार करणार आहे.

ईकडुन बटाटा टाकायचा तिकडुन सोने बाहेर.

पुण्यनगरीमध्ये सोनारांनि बटाटाच्या गोदामे भरुन घ्यायला सुरुवात केलिय. २०१९ नंतर बटाट्याचे सोने होणार।

श्रीगुरुजी's picture

13 Mar 2018 - 2:06 pm | श्रीगुरुजी

एकीकडे स्वामीनाथन् आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीची मागणी करतात तर दुसरीकडे सातत्याने कर्जमाफी मागतात. परंतु कर्जमाफी हा उपाय नाही असे स्वामीनाथन् म्हणतात.

विशुमित's picture

14 Mar 2018 - 10:08 am | विशुमित

स्वामीनाथन कर्जमाफीला विरोध नाही असेही म्हणतात.

श्वेता व्यास's picture

13 Mar 2018 - 2:47 pm | श्वेता व्यास

मोर्चासाठी लाखोंचे फंडींग करणाऱ्यांना काही अनवाणी लोकांना साध्या चपला नाही पुरवता आल्या? की हा मोर्चा पायी असणार आहे हे त्यांना माहितीच नव्हतं? पण लाल टोप्या पुरवण्याऐवजी चपला पुरवल्या असत्या तर असे फोटो दाखवून त्याचं राजकीय भांडवल कसं करता आलं असतं ना.

श्रीगुरुजी's picture

13 Mar 2018 - 3:12 pm | श्रीगुरुजी

चपलांऐवजी लाल टोप्या आणि लाल झेंडे पुरवून स्वपक्शाची जाहिरात करणे जास्त सोपे होते.

श्वेता व्यास's picture

13 Mar 2018 - 3:21 pm | श्वेता व्यास

सहमत. चपला पुरवल्या असत्या तर त्यात काही राजकीय लाभ नाही ना. मग ज्यांचा इतका कळवळा आला आहे त्यांचे हाल होईनात का .

manguu@mail.com's picture

13 Mar 2018 - 3:53 pm | manguu@mail.com

रथयात्रेत सामील झालेल्याना झेंडेच पुरवले होते ना ? की खडावा अन वल्कले पुरवली होती ?

श्वेता व्यास's picture

13 Mar 2018 - 4:46 pm | श्वेता व्यास

त्याचा इथे काय संबंध? आपण शेतकऱ्यांविषयी आणि त्यांच्याबद्दल असलेल्या कळवळ्याविषयी बोलत आहोत ना

बिटाकाका's picture

13 Mar 2018 - 5:09 pm | बिटाकाका

बाजीरावाची शेंडी अहमदशहा अब्दालीला नाही लावली तर मजा कशी येणार? हवेत गोळ्या मारायच्या आणि विचारले कि उत्तर नाही द्यायचे हा मोडस ऑपरेंडी दिसतोय.
--------------------------------------------
बाकी एवढा नकारात्मक प्रचार करून, मोर्चे वगैरे काढून हाताशी काही लागत नाही म्हटल्यावर काय चडफडाट होत असेल नाही?

रथयात्रेतले लोक मुलायम सिंगाला नैवेद्याचे पैशे मागायला गेले होते हे नविनच ऐकलं.
===============
मंजे त्यांना पैसे पुरवलेच असणार हे तुमचं म्हणनं मान्य केलं तरी ते "मागायला" गेले नव्हते.

कपिलमुनी's picture

13 Mar 2018 - 4:03 pm | कपिलमुनी

चप्पल घालून पायाला फोड येत नाहीत का ?
मोर्चासाठी लाखोंचे फंडींग करणाऱ्यांना ?? याबद्द्लचे पुरावे द्या .
उचलला हात , काढला आयडी आणि लागले पो टाकयला !

श्वेता व्यास's picture

13 Mar 2018 - 4:48 pm | श्वेता व्यास

इतकं कळतं तर पायाला फोड येईस्तोवर चालू नये, तेही स्वत:चं नुकसान करून दुसऱ्याच्या राजकीय फायद्यासाठी. आयडी काढण्यापूर्वी किंवा पो टाकण्यापूर्वी तुमची परवानगी घ्यावी लागते का? स्वारी मला माहिती नव्हतं

श्रीगुरुजी's picture

13 Mar 2018 - 4:57 pm | श्रीगुरुजी

सातत्याने पो टाकणे हा फक्त त्यांचाच जन्मसिद्ध हक्क आहे.

हे कोणी ठरवले ?
बाकी लाखोचा खर्च होता त्यचे पुरावे द्या !

श्वेता व्यास's picture

14 Mar 2018 - 1:00 pm | श्वेता व्यास

कॉमन सेन्सला पुराव्याची गरज नसावी. फंडिंग नसते तर टोप्या चालताना आकाशातून डोक्यावर येऊन पडल्या आणि झेंडे जमिनीतून उगवून हातात आले का? तेवढा कॉमन सेन्स नसेल तर मी तुम्हास पुरावे देण्यास बांधील नाही.

फोडांचं काय घेऊन बसलात. अगदी ऐश करत प्रचंड सुखाचं जीवन जगताना देखील नको नको तिथे फोड येतच असतात.
================
प्रश्न असा आहे कि शक्य तितके शारीरिक त्रास कमी करायचा तर बरं असतं. दूरून चालत येणंच मोप आहे, वर मुद्दाम बिनाचपलेचं येणं वा ती मिळत असताना न घेणं, वा तोच मुद्दा बनवायचा म्हणून त्रास करून घेणं एका माईल्ड आत्महत्येसारखं आहे.
===================
खर्च झालाय हे तर खरं आहे. तुम्ही देव मानत नाही तेव्हा ईश्वरानं तर फंडिंग केलेलं नसणार.

चिर्कुट's picture

14 Mar 2018 - 1:48 pm | चिर्कुट

मुंबईत आलेल्या फाटक्या माणसांच्या मोर्चाला झेंडे, टोप्या ,जेवण खाण ह्यासाठी “ यवडे पैशे कुठून आले ब्वा “ अस म्हणून बरेच काळजीवाहू लोक काळजीने डोक खाजवून त्यांचे प्रश्न सगळ्या रंध्रातून बदबदा वाहू राहिलेत.
तर “ यवडे पैशे कुठून आले ब्वा “ ह्या लाखमोलाच्या सवालासाठी आणि शेतकरी मोर्चाच्या खर्चाच पोस्टमार्टेम करणाऱ्या ह्या काळजीवाहू लोकांच्या मेंदूला अजून खाद्य पुरवायला कोरी करकरीत प्रश्नमंजुषा.

पोस्टमार्टेम क्रमांक एक

दिल्लीत भाजपने नुकतच नव ऑफिस बांधल. भाजपने हे ऑफिस १७०००० वर्गफूट जमिनीवर बांधलेलं आहे.तिथल्या सुविधा आणि बांधकामाचा दर्जा ह्यावरून सहजच किंमत काढता येईल.

भाजपला २०१६-१७ मध्ये कॉर्पोरेट देणग्या २९० कोटीच्या मिळाल्यात.सत्तेवर नसतानाही एवढ्याच देणग्या मिळत असतील अस गृहीत धरल आणि देशभरात होणाऱ्या पक्षीय निवडणुकाचा खर्च ह्याच निधीतून भागवला जात असेल अस गृहीत धरल तर दरवर्षी उरणारी श्रीशिल्लक नेमकी किती आणि ह्या नव्या ऑफिसच्या बांधकामाला खर्च किती आला ह्याच गणित मांडल तर “ यवडे पैशे कुठून आले ब्वा “ हा प्रश्न तिकडेही विचारायला पाहिजे.

पोस्टमार्टेम क्रमांक दोन

भाजपची मातृपितृ का काय म्हणतात अशी संघटना म्हणजे संघ.
संघाची नोंदणी भारतातल्या कुठल्या कायद्याने झालेली आहे.१५ ऑगस्ट १९४७ पूर्वी काहीही असल तर त्यानंतर देशातल्या सगळ्या स्वयंसेवी संस्थांनी नव्या भारतीय कायद्यांनी आपापली नोंदणी केलेली असावी तशी संघाची नोंदणी कुठल्या कायद्याने झालेली आहे ?
संघाला मिळणाऱ्या देणग्या नेमक्या कुठल्या कायद्याने स्विकारल्या जातात ?

आता विचारा , “ यवडे पैशे कुठून आले ब्वा “

पोस्टमार्टेम क्रमांक तीन

विवेकानंद फौंडेशन नावाची अजित डोभाल ( तेच ते गावठी जेम्स बॉंड ) ह्यांची संस्था अण्णांच्या आंदोलनात सक्रीय होती,तेच आंदोलन ज्यामुळे कॉंग्रेसला वेगवेगळे आरोप करून, लोकपालाचा बागुलबुवा उभारून सत्तेवरून खाली खेचल त्या आंदोलनात लोकांनी किती आणि कसा खर्च केला ? विवेकानंद फौंडेशन ला देणग्या कुठून मिळाल्यात ?

आता विचारा , “ यवडे पैशे कुठून आले ब्वा “

पोस्टमार्टेम क्रमांक चार

मार्च महिन्यात फक्त दहा दिवस ठराविक बँकामधून इलेक्ट्रोरल बॉंड ची विक्री सरकार करणार होत ज्याद्वारे राजकीय पक्षांना देणग्या मिळणार होत्या.
शौचालय बांधण्यापासून मर्तिकाच्या सामानापर्यंत आणि जन्मापासून माणूस सरणावर चढवेपर्यंत सगळ्या ठिकाणी आधारकार्डाची सक्ती करणार सरकार ह्या बॉंडच्या खरेदीला आधार कार्ड सक्तीच नाही म्हणतय ते का बुवा ?

आता विचारा , “ यवडे पैशे कुठून आले ब्वा “

आता “ हे त्यांना का विचारत नाही “ छाप प्रश्न घेऊन येणाऱ्या लोकांसाठी.
शेतकरी मोर्चाला पैसे कुठून आलेत ह्याची चिरफाड करणारी लोक सरकार समर्थक असण आणि विशिष्ट राजकीय पक्ष-विचारसरणी ह्यांच्याशी संबंधित असण हा योगायोग आहे अस आम्ही समजतोय.
म्हणूनच वरच सगळ पोस्टमार्टेम करायला घेतलेले पेशंट एकाच विचारसरणीशी संबंधित आहेत हाही योगायोग समजावा.

आता विचारा, “ यवडे पैशे कुठून आले ब्वा “

हे व्हाट्सपवर फॉरवर्ड करत आहे.

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2018 - 3:08 pm | श्रीगुरुजी

खालचे स्पष्टीकरणही व्हाट्सपवर फॉरवर्ड करा.

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2018 - 3:07 pm | श्रीगुरुजी

>>> श्रीशिल्लक नेमकी किती आणि ह्या नव्या ऑफिसच्या बांधकामाला खर्च किती आला ह्याच गणित मांडल तर “ यवडे पैशे कुठून आले ब्वा “ हा प्रश्न तिकडेही विचारायला पाहिजे.

गरज नाही. ते बांधकामाचा खर्च सरकारने द्यावा अशी मागणी करून आंदोलने करीत नाहीत.

>>> संघाची नोंदणी भारतातल्या कुठल्या कायद्याने झालेली आहे.१५ ऑगस्ट १९४७ पूर्वी काहीही असल तर त्यानंतर देशातल्या सगळ्या स्वयंसेवी संस्थांनी नव्या भारतीय कायद्यांनी आपापली नोंदणी केलेली असावी तशी संघाची नोंदणी कुठल्या कायद्याने झालेली आहे ?

RSS is already a registered organisation with registration number 08-D 0018394. The digit code of registration is 94910. The registration has been issued under section 1860 of Indian Government and Society Registration Law 1950.

https://www.google.co.in/amp/s/www.nagpurtoday.in/revealed-rss-is-alread...

>>> विवेकानंद फौंडेशन ला देणग्या कुठून मिळाल्यात ?

विवेकानंद फौंडेशनला देणग्या मिळाल्यात हे कोठून समजले?

>>> मार्च महिन्यात फक्त दहा दिवस ठराविक बँकामधून इलेक्ट्रोरल बॉंड ची विक्री सरकार करणार होत ज्याद्वारे राजकीय पक्षांना देणग्या मिळणार होत्या.

झाली का विक्री सुरू?

>>> आता विचारा, “ यवडे पैशे कुठून आले ब्वा “

तेच परत विचारतो. चपलांना पैसे नाहीत, कर्ज परतफेडीला पैसे नाहीत, वापरलेल्या स्वस्त विजेचे बिल भरायला पैसे नाहीत . . . पण मग ३०-४० हजार टोप्या, ३०-४० हजार झेंडे, मोठ्या पडद्याचा चतुर भ्रमणध्वनी, कंठपट्टी इ. साठी "यवडे पैशे कुठून आले ब्वा"?

manguu@mail.com's picture

14 Mar 2018 - 3:18 pm | manguu@mail.com

https://www.nagpurtoday.in/revealed-rss-is-already-registered-organisati...

हो का ? संघाच्या देणगी पावतीवर नंबर असतो का ?

आयुक्ताकडून ऑडिट होते का ?

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2018 - 3:23 pm | श्रीगुरुजी

>>> संघाच्या देणगी पावतीवर नंबर असतो का ?

नसतो का?

>>> आयुक्ताकडून ऑडिट होते का ?

नाही होत का?

श्रीगुरुजी's picture

15 Mar 2018 - 4:57 pm | श्रीगुरुजी

पोस्टमार्टेमवाले डॉक्टर कोठे गेले?

कंचा कंपांउंडर पोस्ट मार्टम करतो ब्वा तुमच्याकडं?

>>छत्तीसगड: नक्षलवाद्यांचा हल्ला; ९ जवान शहीद

दहशतवाद्या विरोधात राबवतात तशी मोहिम नक्षलवाद्यांचा विरोधात राबवायला हवी.

अहो, किती सोहराबुद्दीन टाईपच्या केसेस अमित शहा नि मोदी एका आयुष्यात झेलू शकतात? कुणाला काही हात लावला तर बोंबलायला इतके डावे आहेत कि कुणाला हात न लावणंच योग्य होईल.
=========================
काल एका काँग्रेसच्या उमेदावारानं ३.३० वाजता दिल्लित मिळालेलं प्रमाणपत्र निर्वाचन आयोगाला गुजरातेत त्याच दिवशी ३.०० वाजता दिलं!!!!! हे टाईम ट्रॅव्हल कसं काय शक्य आहे म्हणून चर्चा चालू होती. काँग्रेसच्या प्रतिनिधिला खोटारडेपणा केल्याचा काही गम नव्हता. आमची चोरी तुम्ही पकडू शकला नाहीत (प्रमाणपत्र दिलंच कसं आणि घेतलंच कसं) हाच तुमचा खोटारडेपणा असं काहीतरी तो बरळत होता.
=================
काश्मिरमधल्या हत्यांपेक्षा नक्षलवाद्यांनी केलेल्या हत्या कितीतरी पट आहेत इतकी मूलभूत माहीत भारतातल्या लोकांना नाही. डाव्यांच्या प्राणप्रिय अशा नक्षल्यांना कोणीही हात लावू आणि स्वतःवर खटले दाखल करून घेऊ नये.

श्रीगुरुजी's picture

13 Mar 2018 - 4:22 pm | श्रीगुरुजी

फडणविसांनी पुन्हा एकदा अत्यंत प्रगल्भतेने शेतकरी मोर्चा शांतपणे हाताळून बंडोबांचा थंडोबा केला व फडणवीस सरकार घालविण्यासाठी देव पाण्यात घालून बसलेल्या व फक्त आपणच शेतकर्‍यांचे कैवारी आहोत असे दाखवून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणार्‍या सर्व पक्षांच्या हातात वाटाण्याच्या अक्षता दिल्या.

मागील ३-४ वर्षात फडणविसांना अडचणीत आणण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातील निर्भया प्रकरणाचे निमित्त करून मराठ्यांना राखीव जागांसाठी सर्व जिल्ह्यातून मोर्चे काढण्यात येऊन फडणविसांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न झाले. परंतु फडणविसांनी सर्व मागण्यांना पाठिंबा देऊन मोर्चेकर्‍यांचे छुपे हेतू हाणून पाडले.

शिवसेनेने पाठिंबा काढून घ्यावा म्हणून सातत्याने शिवसेनेला डिवचले जात आहे. परंतु पाठिंबा काढण्याची सेनेच्या पार्श्वभागात हिंमत नाही हे फडणवीस चांगलेच ओळखून आहेत व त्यामुळे ते सेनेच्या दबावाला अजिबात भीक घालत नाहीत.

२०१५ मध्ये अवर्षणाचे व डाळींच्या भावाचे निमित्त करून फडणविसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. तोही फोल ठरला.

मागील वर्षी कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांच्या संपाचे निमित्त करून जनतेला वेठीस धरून नासधूस करण्यात आली. ते आंदोलन सुद्धा फडणविसांनी शांतपणे हाताळले. कर्जमाफीची योजना जाहीर करून त्यातून धनदांडग्यांना व लबाड कर्जदारांना बाजूला ठेवल्यामुळे आंदोलनाचे निमित्त करून कर्ज बुडविणार्‍यांना चाप लागला.

नंतर भीमा-कोरेगावचे निमित्त करून महाराष्ट्रात जातीय तणाव पेटविण्याचे जोरदार प्रयत्न झाले. ते प्रयत्न सुद्धा फोल ठरले.

काही महिन्यांपूर्वी अडगळीत पडलेल्या यशवंत सिन्हांनी महाराष्ट्रात येऊन शेतकर्‍यांना पेटविण्याचा प्रयत्न केला. फडणविसांनी प्रगल्भतेने त्यांचाही थंडोबा केला.

आता या शेतकरी मोर्चाच्या निमित्ताने भाजप वगळता इतर सर्व पक्षांनी मोर्चाला पाठिंबा देऊन आपली राजकीय पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न केला. फडणविसांनी तो प्रयत्नसुद्धा फोल ठरविला. जर या प्रकरणाचे श्रेय कोणाला मिळणार असेल तर ते मोर्चा आयोजित करणार्‍या उजव्या कम्युनिस्ट पक्षाला व भाजपलाच जाईल. आशाळभूतपणे वाट पहात असलेल्या इतर सर्व पक्षांना याचे कणभरही श्रेय मिळणार नाही. उजवा कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या मृतवत असल्याने त्यांना याचा काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे अंतिमतः भाजपच लाभार्थी ठरेल.

ठाकरे बंधू, , पवार (थोरली व दोन्ही धाकटी पाती), अशोक चव्हाण, विखे पाटील अशा अनेकांचे मनसुबे फडणविसांनी मागील ३-४ वर्षात आपल्या प्रगल्भतेने उधळून लावलेले आहेत व त्यांना हात चोळत बसावे लागले आहे. आपली राजकीय कारकीर्द फडणविसांच्या वयापेक्षाही मोठी असून आपल्याला अशी प्रगल्भता का दाखविता येत नाही याची खंत विशेषतः पवारांना नक्की वाटत असेल.

चरफडत बसलेले विरोधी पक्ष पुढील एकदीड वर्षात महाराष्ट्रात जातीय दंगली भडकावण्याचे व पुन्हा एकदा शेतकर्‍यांना पेटविण्याचे जोरदार प्रयत्न करणार हे नक्की. परंतु त्यातून फडणवीस नक्की मार्ग काढतील याची खातरी आहे.

manguu@mail.com's picture

13 Mar 2018 - 6:55 pm | manguu@mail.com

तसेही आता आश्वासन देवून त्याची पूर्तता करायला पुढची निवडणूक येईलच. गाजर दाखवायला जातय काय !

manguu@mail.com's picture

13 Mar 2018 - 7:44 pm | manguu@mail.com

आपले सरकार - गाजर दमदार !

विशुमित's picture

14 Mar 2018 - 8:17 am | विशुमित

संपूर्ण प्रतिसाद
LLRC

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2018 - 9:32 am | श्रीगुरुजी

तुमच्या साहेबांप्रमाणेच तुम्हीसुद्धा खजील होऊन ओशाळवाणे हसण्यापलिकडे दुसरे काहीही करू शकणार नाही.

विशुमित's picture

14 Mar 2018 - 10:09 am | विशुमित

LLRC

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2018 - 10:27 am | श्रीगुरुजी
चिर्कुट's picture

14 Mar 2018 - 10:54 am | चिर्कुट

अहो असे हसू नका ओ आमच्या प्रगल्भ मुमंना...

त्यांनी नदीच्या गाण्यात किती प्रगल्भ अभिनय केलाय पाहिलं नाही का? :)

विशुमित's picture

14 Mar 2018 - 11:23 am | विशुमित

पपेट शो..
फ्रॅकली सांगतो मला फक्त मा. मंगुटीवारांचाच अभिनय आवडला.
मा.मु. ना नाही जमले. अभिनय येत नसल्याने त्या विडियोसाठी काम नव्हते करायला पाहिजे होते असे माझे वैयक्तिक मत आहे.

बिटाकाका's picture

13 Mar 2018 - 5:28 pm | बिटाकाका

त्या पब मारामारी प्रकरणातून ते श्रीराम सेनावाले सुटले म्हणे. ज्याचे विडिओ फुटेज आहेत अशा प्रकारांत असे होत असेल तर अजून काय बोलायचे? कसा व्हायचा न्याय?
https://www.ndtv.com/india-news/mangalore-pub-attackers-let-off-despite-...

श्रीगुरुजी's picture

13 Mar 2018 - 5:58 pm | श्रीगुरुजी

भांडारकर हल्ल्याची जाहीर कबुली देऊन सत्कार करून घेणारे जसे निर्दोष सुटले तसेच हे.

विशुमित's picture

14 Mar 2018 - 8:18 am | विशुमित

तडिपार...??

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2018 - 12:49 pm | श्रीगुरुजी

हार्पिक पटेल?

चिर्कुट's picture

14 Mar 2018 - 1:52 pm | चिर्कुट

येदीयुराप्पा???

नरेंद्र मोदी??

विशुमित's picture

14 Mar 2018 - 1:59 pm | विशुमित

प्रज्ञा?

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2018 - 2:44 pm | श्रीगुरुजी

पप्पू?
सोनिया?
पवार?

बाय द वे, तडिपार करायचा निर्णय राजकिय होता का न्यायिक?

manguu@mail.com's picture

13 Mar 2018 - 7:43 pm | manguu@mail.com

पुणे: माहिती आणि तंत्रज्ञाचे हब बनत चाललेल्या पुण्यात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सच्या उपस्थितीतच एका आजारी महिलेवर जादूटोणा करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

संध्या गणेश सोनवणे या २४ वर्षीय महिलेची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना डॉ. सतीश चव्हाण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात करण्यात आले होते. परंतु तिथेही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे या महिलेच्या कुटुंबीयांनी एका मांत्रिकाला थेट रुग्णालयात बोलावून जादूटोणा केला. या मांत्रिकाने डॉक्टर आणि नर्सच्या समोरच मंत्र पुटपुटत महिलेच्या अंगावरून उतारा काढला. दरम्यान, आजार अधिकच बळावल्याने या महिलेचं निधन झालं आहे. जादूटोण्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

श्रीगुरुजी's picture

13 Mar 2018 - 8:53 pm | श्रीगुरुजी

मांत्रिकाकडून उपचार करून घेणे आणि एखाद्या धनगराकडून उपचार करून घेणे यात फरक नाही.

डँबिस००७'s picture

13 Mar 2018 - 10:07 pm | डँबिस००७

सही आहे गुरुजी !!

manguu@mail.com's picture

13 Mar 2018 - 11:24 pm | manguu@mail.com

देशी पारंपारिक उपचारांबद्दल इतका नकारात्मक विचार !

बायदिवे , रामदेवबाबा डॉक्टर आहेत की फार्मासिस्ट ?

धनगर उपचारावरुन धनगर आरक्षण आठवले.
तुमचे लाडके आपल्या सुपीक डोक्यातून आरक्षण लगेच देण्याची हमी दिली होती. अभ्यास झाला का?
की ह्या टर्मला गॅप घेणार?

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2018 - 10:35 am | श्रीगुरुजी

आरक्षण, अनुदान, कर्जमाफी, वीजबिलमाफी, सवलती, मोफत गोष्टी, नुकसानभरपाई इ. च्या पलिकडे कधी तरी जायचा प्रयत्न करा.

विशुमित's picture

14 Mar 2018 - 10:45 am | विशुमित

आठवण करून दिली. स्मृतीभ्रंश झाला होता.

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2018 - 12:52 pm | श्रीगुरुजी

आरक्षण, आंदोलन, अनुदान, कर्जमाफी, वीजबिलमाफी, सवलती, मोफत गोष्टी, नुकसानभरपाई . . . फक्त याच गोष्टी कशा आठवतात?

विशुमित's picture

14 Mar 2018 - 11:16 am | विशुमित

मी तर बाबा या सगळ्यांच्या पलिकडे गेलो आहे. आता फक्त मोक्षच बाकी आहे.

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2018 - 12:54 pm | श्रीगुरुजी

पण तुमचे साहेब अजूनही सत्तेच्या आशेवर आहेत.

विशुमित's picture

14 Mar 2018 - 2:01 pm | विशुमित

त्यात गैर काय आहे?

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2018 - 2:46 pm | श्रीगुरुजी

आशेवर असणे गैर नसून त्यासाठी पेटवापेटवी करणे गैर आहे.

मांत्रिक कुटूंबियांनी नाही आणला. डॉ. चव्हाण यांनी आणला:
http://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-deenanath-mangeshkar-h...

चव्हाण मुहूर्तावर करायचे शस्त्रक्रिया
मृत संध्या सोनवणे यांच्यावर छातीतील गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यासाठी 20 फेब्रुवारी रोजी रात्री आठची वेळ दिली होती; परंतु सध्या ग्रह चांगले नसून "यमाची घंटा' असल्याचे सांगत नऊ किंवा दहा वाजण्याचा मुहूर्त चांगला असल्याचे सांगितले व रुग्णाला त्रास होत असतानादेखील त्यांनी उशिराने शस्त्रक्रिया केली. त्यानंतर अतिरक्तस्राव झाल्यानंतर तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये हलविण्यास सांगितले. त्यानंतर डॉ. सतीश चव्हाण यांनी सोनवणे कुटुंबीय व जगताप कुटुंबीयांना "देवावर विश्‍वास ठेवा सर्व काही ठीक होईल' असे सांगत दीनानाथ रुग्णालयात मांत्रिकाद्वारे मंत्रोच्चार केले. डॉ. चव्हाण पंचांग पाहून मुहूर्तावर सर्व शस्त्रक्रिया करीत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणानंतर मंगळवारी स्वारगेट येथील चव्हाण नर्सिंग होम दिवसभर बंद ठेवण्यात आले होते. रुग्णालयाच्या मुख्य दरवाजावर कोहळा, घोड्याचा नाल आणि देवतांच्या तसबिरी असल्याचे निदर्शनास आले.

श्रीगुरुजी's picture

13 Mar 2018 - 9:03 pm | श्रीगुरुजी

https://www.loksatta.com/desh-videsh-news/rbi-directed-to-stop-using-lou...

पीएनबीला 13 हजार कोटींचा चुना लावणाऱ्या LoU च्या वापरावर आरबीआयची बंदी

मांत्रिकाकडून उपचार करून घेणे आणि एखाद्या धनगराकडून उपचार करून घेणे यात फरक नाही.

हा हा हा ,

एका डॉ ने धनगराच्या औषधाची सांगीतलेली गोष्ट आठवली !!

सुबोध खरे's picture

14 Mar 2018 - 9:55 am | सुबोध खरे

सामान्य माणसाने धनगराकडून उपचार घेणे आणि एका आधुनिक वैद्यकशास्त्राच्या पदवीधराने (स्वतःच्या शास्त्रात ठोस आणि पुराव्याने सिद्ध झालेले उपचार उपलब्ध असताना) धनगराकडून स्वतःला चुना लावून घेणे यात काय फरक आहे तो लोकांनीं स्वतः जाणून घ्यावा.

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2018 - 9:57 am | श्रीगुरुजी

आधुनिक वैद्यकशास्त्राचा पदवीधर??????

विशुमित's picture

14 Mar 2018 - 8:13 am | विशुमित

शेतकरी अंदोलन झाले आता नवीन विषय...

https://googleweblight.com/i?u=https://www.loksatta.com/desh-videsh-news...

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2018 - 9:59 am | श्रीगुरुजी

नवीन विषयांचा उपयोग नाही. शेतकरी आंदोलने सतत सुरू असतात.

https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/the-farmers-will-...

विशुमित's picture

14 Mar 2018 - 10:20 am | विशुमित

ही चालतच राहणार. कोणत्या ही सत्ताधारीला आता सुट्टी नाहीच.

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2018 - 10:32 am | श्रीगुरुजी

कोणाच्या तरी राजकीय फायद्यासाठी कितीही आंदोलने करा. आंदोलन पेटविणा-यांना व करणा-यांना काहीही फायदा होणार नाही.

म्हणजे तुमच्या लाडक्या मा.मु. नी ह्या वेळेस पण वेळ मारून नेली असे म्हणायचे आहे का?

सुबोध खरे's picture

14 Mar 2018 - 11:33 am | सुबोध खरे

आता काकासाहेब कोणती नवी खेळी करायची याचा विचार करत असतील.
जितके बार काढत आहेत सगळेच फुसके निघाले.

म्हणजे शेतकर्यानी लाल झेंडे घेऊन मोर्चा काढला ते 'यांच्या' मुळे??
एक म्हण वापरली असती पण ह्या फोरमवर नको.

सुबोध खरे's picture

14 Mar 2018 - 12:40 pm | सुबोध खरे

नाही आमचे काकासाहेब मुख्यमंत्री असताना ५०,००० चा गोवारी आदिवासींचा मोर्चा नागपूरला (२३ नोव्हेंबर १९९४) आला होता तेंव्हा त्यांना भेटण्याची साधी तसदी सुद्धा (सौजन्य हा शब्द मोठा वाटतो) साहेबानी घेतली नव्हती त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ लोकांचा बळी गेला होता आणि ५०० जण जखमी झाले होते.
पण साहेबाना प्रगतीची आणि कल्याणाची जास्त काळजी होती.
याची आठवण झाली

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2018 - 1:03 pm | श्रीगुरुजी

तीच का काकांनी मागील वर्षा वापरलेली म्हण?

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2018 - 1:14 pm | श्रीगुरुजी

सर्व विरोधकांचे सर्व बार फुसके निघत आहेत.

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2018 - 12:57 pm | श्रीगुरुजी

वाटेल ते हट्ट करणा-या लहानांना मधाचे बोट चाटवून समजूत काढावीच लागते.

विशुमित's picture

14 Mar 2018 - 11:48 am | विशुमित

मला तर शंका ( संशय ) आहे की ही अंदोलनं सरकार पुरस्कृत तर नाहीत ना.
बंद दरवाज्यातून लगेच तोडगा निघतो आहे आणि प्रश्न सोडवले म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतली जाते
सरकार ने मोर्चा सुरू झाला तेव्हा पासूनच रुग्णवाहिका आणि ईतर सोयी पुरविल्या होत्या.
दाल मे जरूर कुछ काला है.

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2018 - 1:02 pm | श्रीगुरुजी

फडणविसांच्या चातुर्याला लाल सलाम!

सुबोध खरे's picture

14 Mar 2018 - 1:18 pm | सुबोध खरे

काकासाहेब मुख्यमंत्री असतात गोवारी आदिवासींचा ५०,००० चा मोर्चा नागपूरला गेला होता (२३ नोव्हेंबर १९९४). काकासाहेबांनी त्यांना भेटण्याची तसदी सुद्धा घ्यावीशी वाटली नव्हती.ते तातडीने मुंबईला परतले होते. तेथे झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ जणांचा बळी गेला आणि ५०० च्या वर जखमी झाले होते. पण "कल्याण आणि प्रगती" जास्त महत्त्वाची होती.

विशुमित's picture

14 Mar 2018 - 1:50 pm | विशुमित

गोवारी अंदोलनातील चेंगराचेंगरी एक दुर्दैवी घटना होती यात माझ्या मनात काही दुमत नाही.
गोवारी अंदोलनातील चेंगराचेंगरी मध्ये दाणी आयोगाने तात्कालिन सरकारला क्लीनचीट दिली होती ती सुद्धा युती सरकारच्या काळात.
बाकी या संदर्भातील सगळे धागेदोरे माझ्या पेक्षा तुमच्या पिढीला जास्त माहिती आहे.
तरी देखील आजोबांना विचारून आणखी मुद्दे मांडतो.

सुबोध खरे's picture

14 Mar 2018 - 6:16 pm | सुबोध खरे

गोवारी आदिवासींचा ५०,००० चा मोर्चा नागपूरला गेला होता (२३ नोव्हेंबर १९९४). काकासाहेबांनी त्यांना भेटण्याची तसदी सुद्धा घ्यावीशी वाटली नव्हती
साहेबाना क्लीन चिट मिळेल यात कोणता मोठा मुद्दा आहे. त्यांनी काही आदिवासींचे हत्याकांड केले असे कुणाचेही म्हणणे नाही.
एवढे सगळे आदिवासी तेथे येऊन त्यांना साधे भेटण्याचे किंवा मागण्या ऐकून घेण्याचे "सौजन्य" साहेबाना नव्हते एवढेच मला म्हणायचे आहे.
पुढे काय काय झाले हे सर्वाना माहित आहेच

विशुमित's picture

14 Mar 2018 - 1:31 pm | विशुमित

माझा संशय / अंदाज बरोबर आहे असेच म्हणावे लागेल मग.

हा धागा (ताज्या घडामोडी वाले जवळपास सगळेच ) = ९०% अक्षरशः सरकारी नळ आहे + १० % ताज्या बातम्या ;) lol

माहितगार's picture

14 Mar 2018 - 12:41 pm | माहितगार

पण पाणि बहुतेक सगळे लालसर आहे ;) (ह. घ्या. )

प्रतिसाद हि चर्चा मुख्यत्वे कम्यूनिस्ट मोर्चाविषयी झाली तेवढ्याच अर्थाने घेण्यात यावा हे. वे.सांनल

प्रसाद_१९८२'s picture

14 Mar 2018 - 1:36 pm | प्रसाद_१९८२

सुरु करायची वेळ आली आहे, या धाग्यावर २०० + प्रतिसाद झालेत.

गोरखपूर आणि फुलपुर मध्ये झटका बसण्याची दाट शक्यता दिसतेय!
==========================
स्वतःला राष्ट्रीय राजकारणात (खासकरून पंतप्रधानपदाच्या दावेदारीत) प्रस्थापित करण्याची घाई तोंडावर पडण्यास (पडल्यास) कारणीभूत असेल काय?
==========================
जातीय गणिते घालून भाजपला रोखले जाऊ शकते हे परत एकदा सिद्ध होण्याच्या मार्गावर, माझे वैयक्तिक मत!

विशुमित's picture

14 Mar 2018 - 2:33 pm | विशुमित

3 साठी- काही महिन्यांमधेच विकासाला मतदान करणारा मतदार (राजा) अचानक जातीपातीचा विचार कसा काय करायला लागला?
मला तर बाबा EVM चा प्रताप वाटतोय.

विशुमित's picture

14 Mar 2018 - 2:33 pm | विशुमित

3 साठी- काही महिन्यांमधेच विकासाला मतदान करणारा मतदार (राजा) अचानक जातीपातीचा विचार कसा काय करायला लागला?
मला तर बाबा EVM चा प्रताप वाटतोय.

बिटाकाका's picture

14 Mar 2018 - 3:50 pm | बिटाकाका

तीनदा लिहिले तरी मी लिहिलेल्या वाक्याचा अर्थ तुम्हाला कळला नाही हेच लक्षात येते. विकासाला मतदान करणाऱ्यांच्या संख्येपेक्षा जातीला मतदान करणारे (सर्वच पक्षांचे) जास्त आहेत. यातील फुटून प्रत्येकाची वोट बँक बनलेले एकत्र आणले तर भाजपाची वोटबँक आणि विकासावर मतदान करण्यासाठी त्यांच्याकडे वळलेला मतदार यांना धोबीपछाड दिला जाऊ शकतो असा त्याचा अर्थ आहे.
==============================
अगदी विरोधी विचारधारा असणारे पक्ष (निदान) मोदीविरीधासाठी तरी एकत्र ये आहेत हेही नसे थोडके.
==============================
फडणवीस मध्ये म्हणाले होते कि विरोधी पक्ष पोटनिवडणुकांपुरतेच राहिले आहेत. संपूर्ण भारतातच पोटनिवडणूक लावता येते कि कसं ते बघायला पाहिजे :).

विकासाला मतदान करणाऱ्यांच्या संख्येपेक्षा जातीला मतदान करणारे (सर्वच पक्षांचे) जास्त आहेत.

तसे असते तर आधीच मतदान त्याप्रमाणे केले असते की.

कोल्ह्याला द्राक्षे आंबट , तसे भाजपे हरले की लोकाना विकास नको , जात हवी असते , असे बोलतात.

बिटाकाका's picture

15 Mar 2018 - 8:18 am | बिटाकाका

मध्ये ते भाजप जिंकला की ख्रिश्चनांनी मते दिली वगैरे म्हणणारे कोण होते हो?
======================
पण मी काय म्हणतो, जर भाजपच्या विकासलाच लोकांना नाकारायचे आहे तर ते बुआ-बबूआ कशाला? लोकांनी तसंही हरवलंच असतं की!
======================
बादवे, ते भाजप एव्हीममध्ये घोळ घालून जिंकतंय वगैरे झालं का सेटल?

विशुमित's picture

14 Mar 2018 - 2:34 pm | विशुमित

3 साठी- काही महिन्यांमधेच विकासाला मतदान करणारा मतदार (राजा) अचानक जातीपातीचा विचार कसा काय करायला लागला?
मला तर बाबा EVM चा प्रताप वाटतोय.

manguu@mail.com's picture

14 Mar 2018 - 3:05 pm | manguu@mail.com

अशा झटक्यांची आता सवय व्हावी लागेल

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे केंब्रिजमध्ये निधन झाले. बातमी

manguu@mail.com's picture

14 Mar 2018 - 3:29 pm | manguu@mail.com

राम मंदिर आंदोलनाशी निगडीत भाजपाचे पाच वेळचे खासदार विनय कटियार यांचे राज्यसभेचे तिकीट यंदा कापण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिरप्रश्नी आंदोलन जिवंत ठेवण्यात कटियार यांची महत्वाची भूमिका आहे. सन १९८४ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपा दोन लोकसभा मतदारसंघावरून १९८९ मध्ये ८५ जागांवर पोहोचवण्यामध्ये त्यांचेही मोलाचे योगदान आहे. पण यंदा उत्तर प्रदेशमधून रिकाम्या झालेल्या राज्यसभेच्या १० जागांसाठी भाजपाने त्यांना उमेदवारी दिली नाही. कटियार यांच्यापेक्षा कनिष्ठ सहकाऱ्यांना यावेळी प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे कटियार समर्थकांमध्ये आता चर्चा रंगली आहे. राम मंदिर निर्मितीसाठी नरेंद्र मोदींवर दबाव आणणे आणि अडवाणी यांना पाठिंबा देण्याची किंमत कटियार यांना चुकवावी लागल्याचे त्यांचे निकटवर्तीय दबक्या आवाजात म्हणत आहेत.
ज्या आठ नेत्यांना भाजपा उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर पाठवत आहे, ते सर्व कटियार यांच्यापेक्षा कनिष्ठ आहेत. यामध्ये अरूण जेटली, विजयपालसिंह तोमर, सकलदीप राजभर, कांता कर्दम, अनिल जैन, जीव्हीएल नरसिम्हा राव, हरनाथसिंह यादव, अशोक वाजपेयी. जेटली आणि राव हे राष्ट्रीय स्तरावरील चर्चित नेते आहेत. तर अशोक वाजपेयी हे समाजवादी पक्ष सोडून भाजपात आले आहेत. उर्वरित पाच नेते हे उत्तर प्रदेशमध्येच जास्त परिचित नाहीत.

माहितगार's picture

14 Mar 2018 - 3:53 pm | माहितगार

या केसचे माहित नाही पण मोदी टप्प्या टप्प्याने कोणाच्या डोळ्यात येणार नाही असे बरेच लोक बदलत असावेत असा माझा व्यक्तिगत कयास आहे.

manguu@mail.com's picture

14 Mar 2018 - 5:11 pm | manguu@mail.com

. बारमध्ये लवकरच एमआरपीमध्ये दारु विकत घेणं शक्य होणार आहे. राज्य सरकार याबाबतचा परवाना देण्याच्या विचारात आहे.

राज्यातील बारना FL 2 परवाना जारी करण्याचा विचार फडणवीस सरकार करत आहे. महसूल वाढवण्याच्या दृष्टीने ही पावलं उचलण्याची तयारी आहे. यामुळे उत्पादन शुल्कात दहा टक्के वाढ होण्याचा सरकारचा अंदाज आहे.

एफएल 2 परवाना मद्य विक्रीची परवानगी देतो, मात्र परिसरात मद्यपान करता येत नाही. सध्या बार आणि परमिट रुम्सना एफएल 3 परवाना दिला जातो. म्हणजेच फक्त अल्कोहोल सर्व्ह करण्याचं लायसन्स.

'आता मद्यप्रेमी बारमधून दारु एमआरपीमध्ये विकत घेऊ शकतात. त्यानंतर हवं त्या ठिकाणी मद्यपान करु शकतात.' असं महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.

वाईन शॉपमालकांना मात्र या निर्णयाची धास्ती वाटत आहे. आपल्या व्यवसायावर परिणाम होण्याची भीती वाईन शॉपधारकांनी व्यक्त केली आहे. वाईन शॉप संघटनांनी याविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे.

चालू आर्थिक वर्षात राज्य सरकारने एक्साईज ड्युटीतून 15 हजार कोटी रुपये मिळवण्याचं लक्ष ठरवलं होतं. जानेवारी अखरेपर्यंत 23 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत.

'प्रस्ताव विचाराधीन असून अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. अवैध मद्यविक्री कमी करुन राज्य सरकारचं महसूल वाढवण्याचं उद्दिष्ट आहे' अशी माहिती उत्पादन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

सध्या बार दारुवर 5 टक्के व्हॅट आकारतात. एफएल 2 परवाना दिल्यावर व्हॅट नाहीसा होईल, असं बावनकुळे म्हणाले.

समाजवादी पक्षाचे अभिनंदन. २०१९ मधे बसपाशी युती करावी आणि २०२२ पर्यंत निभावावी.

फुलपूर व गोरखपूर मतदार संघात भाजपाचा ओव्हर कॉंन्फिडन्स त्यांना नडला. देशात आजपर्यंत झालेल्या सर्व पोटनिवडणुकात भाजपाचा सातत्याने पराभव होत आहे. २०१९च्या निवडणुकीत समजा एनडीएने निवडणुक जि़कलीच तरिही नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायची आशा आता अंधूक होत आहे. सातत्याने सर्वसामन्य व मध्यम वर्गातील जनतेच्या विरोधी घेतलेले निर्णय (मग ते कितीही लोकउपयोगी असले तरी) भाजपाला खूप महाग पडणार आहेत.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

14 Mar 2018 - 7:24 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

कर चुकवू पाहणारा व्यापारी वर्ग,उच्च-मध्यमवर्ग मोदींवर नाराज आहे असे दिसते आहे. नोटाबंदींनंतर सोन्या-चांदीचे व्यापारी बरेच नाराज झाले होते असे वाचले होते. २०१९ मध्ये भाजपाला ह्या वर्गाचा मोठा फटका बसायची शक्यता वाटते. त्यात राम-मंदीर वगैरे मुद्दे भाजपावाल्यांनी ताणले तर बघायलाच नको.

बिटाकाका's picture

14 Mar 2018 - 9:23 pm | बिटाकाका

फुलपुरचे माहीत नाही पण गोरखपूर मध्ये योगी आदित्यनाथांनी दिलेले उमेदवार डावलून शहांनी स्वतःचा उमेदवार दिला होता. ही नाराजी भोवली असण्याची शक्यता आहे, अर्थात योगी यांना ही नाराजी हाताळता आली नसेल तर तोही त्यांचाच पराभव आहे म्हणा!!