घनदाट तमाच्या तीरी
दीपांच्या लक्ष ओळी
नाजूक, मोहक ज्योती
तेजाने उजळती |
सुख, प्रकाश देती
आकाशदीप घरोघरी
रंग रांगोळीचे खुलती
येई आनंदा भरती |
फुलांची होई पखरण
रंग-गंधां चे मीलन
हास्याचा नाद भरे
घराघरातून --मनामनातून |
येईल प्रकाश पहाट
आपल्या या जीवनी
दु:ख, दैन्य हरेल सारे
ही दिवाळी ... ही दिवाळी |
शुभ दीपावली !!!!
प्रतिक्रिया
24 Oct 2008 - 8:24 pm | वेताळ
दिवाळी पुर्वी ,लहानपणी अशीच वाटत होती. पण आज हे स्वप्न झाले आहे.
वेताळ
24 Oct 2008 - 9:26 pm | ईश्वरी
छान कविता. आवडली.
फाँट चा रंग मात्र खूपच फिका झालाय. जरा गडद असता तर वाचायला छान वाटले असते
ईश्वरी
24 Oct 2008 - 9:25 pm | प्राजु
दिवाळी सुंदर उजळली आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
25 Oct 2008 - 1:41 am | अथांग सागर
मस्त कविता, घरची आठवण आली...
'सकाळ' च्या दिवाळीत सामील व्हा http://www.esakal.com/diwali08/index.html
--अथांग सागर
(पहिल्यांदा दिवाळीला घरापासून दूर असणारा)
25 Oct 2008 - 4:42 am | मीनल
आवडली दिवाळी.
मीनल.
25 Oct 2008 - 7:25 am | विसोबा खेचर
वा! सुंदर आहे कविता...
25 Oct 2008 - 8:48 am | श्रीकृष्ण सामंत
कविता छान लिहिली आहे .आवडली.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
25 Oct 2008 - 6:33 pm | अनिल हटेला
छान कविता !!!
आणी सर्वाना दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा !!!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..