म्हणूनच म्हटलं "अरे, आतातरी 'खो' दे ।"
भरधाव गाडीने उडवून दिल्यावर
विव्हळत होता तिथेच -तसाच
ओलांडला देह त्याचा,
गाडीइतक्याच
वेगाने पळणा-या देहांनी,
माणसांनी नव्हेच....
म्हणूनंच म्हटलं 'खो' दे आता,
डोळे असून आंधळे असलेल्यांना!
बघ,हात बटबटलेत तिचे मातीने
त्याच हाताने वेचतेय शिते
कोँबड्यांना घातलेली
तिच्या पोटात जात नाही काही
पण तीच्यामूळे पोट भरतंय डासांचं
उघड्या देहावर बसलेली कीटकांची पालं
अरे, दिसतात ना तुला ते
जास्त खाऊन ओकणारे
मग दे 'खो' त्यांनाही
बघ,बघ चुरगळली की तिला
जग हसलं तीलाच
विचारत फ़िरले 'रेट'
झालं मेल्याहून मेल्यागत
चुरगळणारे पाय मात्र हींडले
अजून एखादं फूल धुंडाळत
ती मात्र अशुदध राहीली
हजारदा आंघोळ करूनही.
आता दे 'खो' त्यांना
ज्यांनी डोळे विस्फारून करून दिली,
तिला तिच्या नग्नतेची जाणीव...
राब-राब राबतो रे तो रात्रंदिवस
तरीही रोज झुरतो प्रत्येक रात्री
बाळाच्या उपाशी पोटाची ओरड ऐकून
अरे,बघ तूला नाही ऐकू येत?
दे ना 'खो' त्यांना
ज्यांनी राबवंलं त्याला
दे 'खो' ह्याला, त्याला
अगदी मलाही,
निश्चल बसलेल्या प्रत्येकाला....
हर्षदा....
प्रतिक्रिया
24 Oct 2008 - 12:40 pm | हर्षदा विनया
अरे ही तीन तीनदा कशी पोस्ट झाली?
ज्यांना जमत असेल त्यांनी क्रूपया डीलीट करा..
24 Oct 2008 - 2:00 pm | विजुभाऊ
लेख लिहिणाराला दृश्य आणि सम्पादन असे दोन स्क्रीन दिसतात. त्यात सम्पादन स्क्रीन च्या तळाला " काढुन टाका" असे बटन आहे तेथे क्लीक करा
अथवा विसोबा खेचर याना व्यनी लिहुन विनन्ती करा
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
24 Oct 2008 - 5:31 pm | हर्षदा विनया
आभारी आहे विजुभाऊ
24 Oct 2008 - 7:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजून येऊ द्या, अशाच सुंदर कविता !!!
24 Oct 2008 - 9:30 pm | पक्या
छान कविता. येऊ देत अजून.
25 Oct 2008 - 9:16 am | श्रीकृष्ण सामंत
कविता आवडली.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
29 Oct 2008 - 8:45 am | हर्षदा विनया
थन्क्स पक्या :)
आणि श्रीकृष्ण सामंत