जपून खेळायचे असतात
शब्दांचे खेळ
चुकतो ठोका हृदयाचा जेव्हा
त्यात घालताच येत नाही भावनांचा मेळ
जर नेहमीच मन हलके
शब्दांनीच केले असते
अंतरीच्या अबोल भावनांचे अर्थ
नयनांच्या भाषेने कोणी सांगितलेच नसते
म्हणे रुचतात गोड बोल,
सात्विक चेहेरे
मनाला सर्वांत आधी
पण प्रेम तर त्यावरही करतो
ज्याला पहिलेच नाही कधी
गमावलेल्या गोष्टी शोधण्यातच
आनंदाचे गुपित जर दडलेले असते
जे नव्हतेच कधी आपले
ते शोधण्यासाठी जीव झुरलेच नसते
वाटते सोबत सर्वांना
असावी प्रियजनांची
नेहमी दुःखच विरहाचे
स्वप्नांतही नकोसेच असते
जर रोजच चांदण्यांचा साथीने चंद्रप्रकाशाने
मनास न्हाऊ घातले असते
तर सांगा ना तेव्हा
कलेकलेने वाढलेल्या पुनवेच्या चांदव्यास
औक्षण कोणी केले असते ?
- प्रणया
प्रतिक्रिया
23 Feb 2018 - 5:48 am | प्रणया
हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तरी चु. भू. द्या. घ्या.
23 Feb 2018 - 12:14 pm | चांदणे संदीप
कवितेला जरा लय किंवा मीटर देता आले तर अजून चांगली होईल.
पुलेशु!
Sandy
23 Feb 2018 - 7:24 pm | प्रणया
प्रतिसादासाठी धन्यवाद. मी प्रयत्न करेन.
25 Feb 2018 - 11:06 am | शार्दुल_हातोळकर
आशय छान आहे !!
अजुन येऊ द्या !!
27 Feb 2018 - 8:31 pm | प्रणया
धन्यवाद, नविन कविता लवकरच प्रकाशित करेन
27 Feb 2018 - 8:41 pm | देशप्रेमी
छान आहे. भावनांचा सुरेख मेळ..