पुन्हा नव्या दमाने जातो कधी हसाया
दुखणे जुनेच पुन्हा मग लागते दुखाया
करून फस्त कणसे उडून गेले पक्षी
होतील चालू आता ह्या गोफणी फिराया
येतील न ते नक्की घेवून लिंबूपाणी
उंची उपोषणाची जाया नको ही वाया
सांभाळ लक्तरे तू धडूते तुझ्या कुडीची
अभ्यास चालू आहे त्याची गोधडी शिवाया
क्रांतीचे गीत आता ओठात घे तुझ्याही
झाल्या अति या गझला झाल्या पुऱ्या रुबाया
- नितीन अण्णा
प्रतिक्रिया
22 Feb 2018 - 4:43 pm | चांदणे संदीप
छानच डॉ. साहेब!
मिपावर बरेच डॉ. सक्रिय झाल्याचे निरीक्षण नोंदवतो! ;)
Sandy
22 Feb 2018 - 4:57 pm | डॉ.नितीन अण्णा
आम्ही पुस्तकी डॉक्टर