सहज विचार करतांना उतरलेले हे काही शब्द..
============
सांगायचं कसं अन् लिहायचं कसं..
मनांतलं शब्दांत मांडायचं कसं?
त्या अग्नीपंखाचा तुटक्या पंखांना सवाल, "आता उडायचं कसं?"
============
लहान मुलं आणि त्यांची निरागसता..
वेड लावणारं त्यांचं निष्पाप मन..
पारिजाताच्या फुलांसारखं नितळ विश्व!
============
प्रयत्नांची कास सोडू नये.. कामनांची आस धरू नये..
ईच्छा अर्पण करावी.. निष्काम कर्म करावं..
गुंतागुंत आणि परस्परविरोध ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात!
============
केवढाली कपाटं आणि पुस्तकांची आरास..
तर्काचे इमले आणि अनुभवहीन चढते-ढासळते बुरुज!
अनेक मांडवांखालून गेलोय पण लग्नाचा पत्ता नाही अजून...
============
राघव
प्रतिक्रिया
17 Feb 2018 - 10:13 am | प्राची अश्विनी
"लग्नाचा पत्ता नाही...."
:)
17 Feb 2018 - 10:22 am | पैसा
सुटे सुटे विचार आवडले.
21 Feb 2018 - 11:06 am | राघव
@प्राची अश्विनी: :-)
@पैसातै: होय, साधारण तेच!
21 Feb 2018 - 8:47 pm | पद्मावति
रचना आवडल्या. वेगळा प्रकार. पै म्हणाली तसं हायकु सारखे.
21 Feb 2018 - 9:07 pm | नाखु
एक वेगळा प्रकार
चंद्र तारे प्रेम किंवा तिथ्या यांच्या दावणीतून सुटलेली ही छोटी वासरे भारीच आहेत
मिपावरील आपलीच माणसं आणि त्यांनी केलेली (कवितेची) माती या लोकप्रिय कार्यक्रमातून साभार
22 Feb 2018 - 10:49 am | राघव
@पद्मावति: हायकू सारखं आहे खरं, पण मिपावर नवीन नाही. आधीही त्रिवेणी धागे निघालेले आहेत.
@नाखु: धन्स! बादवे - आणि त्यांनी केलेली (कवितेची) माती ----- हे भारी!! =))