पुण्याची मुंबई आता झाली की राव...

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जे न देखे रवी...
12 Feb 2018 - 10:56 pm

आजकाल आपले पुणे सुध्दा..
रात्रभर जागे राहून धडधडत असते!
कारण आपली सुध्दा मुंबई झाल्याचे..
स्वप्न जागेपणी त्याला पडत असते!

पुण्यातील पीएमटी खचाखच गर्दीने भरून..
केविलवाणी धावत रडत असते!
मुंबईतील लोकल ट्रेनचा हात हातात धरून..
ती सुद्धा मैत्रीला जागत असते!

मुंबईतील मराठीपणा हद्दपार झाल्याचं..
दुःख मुंबई पचवत जगत असते!
पुणे सुध्दा तिच्याशी समदुःखी होऊन..
गळ्यात गळा घालून रडत असते!

कशापायी आमच्या मुंबईला ठेवता नाव?
पुण्याची मुंबई आता झाली की राव!
तुमचा आमचा असतो सेम वडा पाव..
दिवसरात्र लोकांची जीवघेणी धावाधाव!

- निमिष सोनार
(आता पुणेकर पण भूतकाळातील मुंबईकर)

मुक्तक

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

13 Feb 2018 - 1:21 am | चांदणे संदीप

पहिलं कडवं अप्रतिमच झालेलं आहे... पुढचे... असो! :)

Sandy

नंतर विस्तार केला.

प्राची अश्विनी's picture

13 Feb 2018 - 9:46 am | प्राची अश्विनी

पटेश.

सुखीमाणूस's picture

13 Feb 2018 - 11:56 am | सुखीमाणूस

असेच व्ह्ययचे
तरी अजून मुम्बै इतके पुण्यात बुरखे आणि दाढ्या दिसत नाही.

काही वर्षानी मुंबईचे लाहोर/कराची होणार आहे आणि पुण्याचे पण....

मेघपाल's picture

14 Feb 2018 - 12:40 pm | मेघपाल

किती तो इस्लामोफोबिया....

पद्मावति's picture

13 Feb 2018 - 2:13 pm | पद्मावति

मस्तं.