म्हणे माणूस प्रगत झालाय
व्हेजवाल्याला शेजारी म्हणून नॉनव्हेजखाणारा नको
आमच्या सणात त्यांची लुडबुड नको
विविधता में एकता खरं पण अशी ??
नोकरीत 'ते'नको
आमच्या बँकेत आमचेच जातवाले
जात धर्माच्या लेबलला प्राधान्य देणारा आमचा देश सर्वात पुढे ...
गावात ठीक होत पण शहर तरी सुधारलेली ना
आज तिथेच उंचच उंच टॉवर आहेत जाती धर्मांचे...
माणुसकी गाडली गेलीय बहुधा पाया खणताना...