तुझी आठवण, साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली
गंध मनाचा उडाला नभी
थेम्ब बनुनी खाली कोसळली
तुझी आठवण साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली
झिजूनी काय मिळवले, माउली ?
चूल मोकळीच राहिली
हात जरी असले मदतीस हजार
तुझी चव मात्र आतच राहिली
उत्तरे न मिळती कोड्याची
सर्व दडले या अंतरी
मनी साठले भंगार सारे
अंगार बनुनी जाळी जीवा
ज्वाला जिथे तिथे पोहोचली
तुझी आठवण, साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली
चूक घडली , क्षमा नाही , अक्षम्य अपराध हा
आम्ही काशी नाही दाविली
उभी हयात चिंतेत गेली
चितेवरी ती लोपली
गेली मित्रा, सोडूनि आम्हा
कायमची माझी माउली
सिद्धेश्वर विलास पाटणकर C
प्रतिक्रिया
9 Feb 2018 - 3:33 pm | पद्मावति
आईंना भावापूर्ण श्रद्धांजली. या दु:खातून सावरायला तुम्हाला शक्ती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना __/\__