युरोप सहल - स्वत:च की कंपन्यांची ग्रुप टूर?

स्वधर्म's picture
स्वधर्म in काथ्याकूट
30 Jan 2018 - 1:16 pm
गाभा: 

यंदा सहकुटुंब (हम दो हमारे दो - वय १४ व १६) युरोप सहलीला जायचे ठरवत अाहे. वेगवेगळ्या कंपन्यांच्या जाहीराती व टूर्स ची माहीती काढली. १०-१२ दिवसांच्या सहलीत साधारण ८-९ शहरे व महत्त्त्वाची अाकर्षणे फिरवतात. अापल्याला फारसे काहीच प्लॅन करावे लागत नाही. फक्त अनुभव घ्यायचा, पहायचं. विमान, जेवण, ठिकाणांचे प्रवेश शुल्क धरून साधारण माणशी पावणेदोन ते दोन लाख खर्च येतो, म्हणजे मराठी कंपन्यांच्या तशा अॉफर्स पाहण्यात अाल्या. इंटरनेटवरच्या कंपन्यांच्या अॉफर्स थोड्याशा कमी अाहेत, पण त्यात काही दिवस अापले अापण फिरायचे अाहे, तसेच काही खर्च अापला अापण करायचा अाहे. स्वत: जाण्याचा एक पर्यायही अाहे, पण मग ८-१० शहरांना भेटी देण्यापेक्षा एक अाठवडा ल्यूसर्न (स्विझर्लंड) व एक अाठवडा रोमला राहून फक्त तिथल्या जवळपासच्या ठिकाणांना भेटी देऊन १५ दिवसांची सेल्फ प्लॅन्ड ट्रीप करण्याचा पर्याय कसा वाटतो?टू र कंपनीपेक्षा स्वत: जाणे, airbnb वर बुकींग करून अपार्टमेंटमध्ये राहणे व लोकल पब्लीक ट्रान्सपोर्टचा पास काढून फिरणे कदाचित स्वस्तही पडेल, पण त्यात इतके फॅक्टर अाहेत, की ते काही वेळा महागही पडू शकते, किंवा दिवस वायाही जाऊ शकतो असे वाटते. मिपाकरांचा काही अनुभव असेल, तर जरूर सांगा.
टीप: कुटुंब असल्याने खूप शिस्तीने, काटेकोर प्लॅन करून पाळणे कदाचित जमणार नाही, मुले असल्याने थोडे इकडे तिकडे होऊ शकते. पण अनुभव कोणता चांगला राहील, याचा विचार महत्वाचा!

प्रतिक्रिया

प्रचंड लिहीण्यासारखा विषय.. लगेच लिहीता येत नाहीये. कदाचित लिहीन वेळ मिळेल तसं.

जवळ जवळ दरवर्षी तिकडे एक टूर असतेच.

स्वधर्म's picture

30 Jan 2018 - 1:26 pm | स्वधर्म

३१ जानेवारीच्या अात बुकींग केले तर चांगल्या अॉफर्स अाहेत, असे कंपन्यांचे म्हणणे.

तुम्ही यापूर्वी युरोपला गेला आहात का?

अन्य आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे का? यावर बरंच काही अवलंबून आहे.

बजेट हा महत्वाचा भाग आहे का? हेही सांगा. मग आणखी नीट सांगता येईल.

शिवाय कोणत्या महिन्यात (सीझनमधे) जाण्याचा बेत आहे तेही कळलं तर बरं होईल.

तुम्हाला युरोप 'करायचंय' की 'बघायचंय' यावर हे सगळं अवलंबून आहे. म्हणजे, बेसिकली तुम्हाला त्यातून काय साध्य करायचं आहे त्यावर अवलंबून आहे.

प्रत्येक कुटुंबाच्या आणि त्यातल्या घटक पदार्थांच्या आवडीनिवडी वेगळ्या असू शकतात / असतात. युरोप 'करवणार्‍या' टूर कंपन्यांमध्ये या आवडीनिवडींची सरासरी काढून जे येतं ते समाविष्ट केलेलं असतं. तुमच्या / तुमच्या कुटुंबाच्या आवडीनिवडी सरासरीच्या जवळ असतील तर बिन्धास्त टूर कंपनीकडे जा आणि युरोप 'करून टाका'.

मला स्वतःला ही 'कराकरी' जमत नाही. एखाद्या गावाशहरात जावं आणि तिथे शक्य तितकं स्थानिक माणसासारखं राहावं ही कल्पना मला आकर्षित करते. हे 'चलाचलापळापळाहेबघाटुरिस्टॅट्रॅक्षन' सहलींत कसं साध्य होणार?

मला स्वतःला ही 'कराकरी' जमत नाही. एखाद्या गावाशहरात जावं आणि तिथे शक्य तितकं स्थानिक माणसासारखं राहावं ही कल्पना मला आकर्षित करते.

प्रचंड सहमत.

दीपक११७७'s picture

31 Jan 2018 - 7:37 pm | दीपक११७७

सहमतं
एक ठिकाण निवडावं तिथ जाऊन रहावं आणि खुप अरामात आजूबाजूच्या टूरिस्ट पाँईंट ला भेट द्यावी. जवळ असलेल्या पैश्याच्या प्रमाणात.

स्वधर्म's picture

30 Jan 2018 - 3:45 pm | स्वधर्म

गवि: मी पूर्वी युरोपला २-३ वेळा गेलोय, पण कामासाठी गेल्याने तिकिटे, व्हीसा, हॉटेल वगैरे कंपनीने अॅरेंज केले होते. खूप काम असल्याने फार काही माहीती घेता अाली नव्हती. परदेशात बिअॅण्ड बी असं स्वत: कधी बुक केलं नाही. तसेच काही गोंधळ झाला तर, कंपनीचे लोकल लोक असतातच. अशी कुटुंबाची जबाबदारी घेऊन जाण्याचा अनुभव नाही. बजेट महत्वाचे अाहे, पण उगीच ५-७ दिवसांची टूर करून कमी करणे योग्य नाही असे वाटले, म्हणून ते इतके झाले अाहे. मेच्या पहिल्या अाठवड्यात जात अाहे. ऊगीचच सगळं सोप असताना टूर कंपनीच्या नादाला लागावे का असा प्रश्न अाहे.

अादूबाळ: तुमचा मुद्दा एकदम बरोबर अाहे. मला कंपन्यांची टूर ही बबल टूर वाटतेय. सगळं पहायचं, पण स्थानिक लोकांशी कसला व्यवहार, संपर्क येणार नाही, टूर मॅनेजर असतो. म्हणजे काचेच्या गोलात बसून गेल्यासारखं अाहे. अगदी जेवणही भारतीय देतो हा त्यांचा यूएसपी अाहे. मला हे सिनियर सिटीझन किंवा एकदम लक्झरीयस वाटतंय. जर बरेच लोक स्वत: मॅनेज करू शकत असतील, तर शक्य अाहे असं वाटतं. अमेरिकेतही गेलोय, पण युके सोडून भाषेची अडचण कितपत येइल हे माहीत नाही.

अगदी जेवणही भारतीय देतो हा त्यांचा यूएसपी अाहे.

हो, आणि गुर्वारी साबुदाण्याची खिचडी वगैरे!

भाषेची अडचण कितपत येइल हे माहीत नाही

येते ना भाषेची अडचण. अगदी यूकेमध्येही येते. (सराव नसेल तर स्कॉटिश अ‍ॅक्सेंट घंटा कळत नाही. वेल्श लोकांची तर भाषाच वेगळी आहे.) पण त्यातही एक सॉलिड मज्जा असते.

-------
बादवे गवि, ही टिप द्यायची काय भानगड आहे? फैनडैनिंग रेस्टॉरंट्स वगळता टिप द्यायचं ऑब्लिगेशन मला तरी कुठे वाटलं नाही. अर्थात 'रडवे माझे वदन बघोनी' लोक मागत नसावेत हीही एक शक्यता आहे.

बादवे गवि, ही टिप द्यायची काय भानगड आहे?

नॉन यूके युरोपात जवळ जवळ सगळीकडे कस्टमरी.

ड्रायव्हर्स (सॉरी, कोच कॅप्टन्स), टूर गाइड्स, बोट चालक इ.इ.

आणि टिप कुठे कुठे द्यावी लागते किंवा कुठे द्यावी लागत नाही हा इथे मुद्दा नसून ते नेमकं ठिकाणवार माहिती नसणं यातून येणारा साशंकपणा हा फर्स्ट टाइमर प्रवासी फॅमिलीचा (वन ऑफ द) मानसिक प्रॉब्लम असू शकतो.

ग्रुप टूरसोबत जाण्यातले तोटे:

१. अत्यंत वरवरची फारच घिसीपिटी आणि निवडक ठिकाणं.
२. झापड बांधलेल्या घोड्याप्रमाणे "चलो चलो, पळा पळा" करत छाती फुटेस्तोवर टूर मॅनेजरच्या (टूर गाईडच्या) मागे गर्दीसकट धावत राहाणं. या प्रकारच्या स्थलदर्शनात प्रत्यक्ष समरस होऊन काहीही अनुभवणं अशक्य असतं.
३. कमीतकमी पैशात जास्तीत जास्त स्थलदर्शन या मध्यमवर्गाला आवश्यक वाटणार्‍या पॉलिसीनुसार केसरी, वीणावर्ल्ड वगैरे यांच्या पॉलिसीज ठरवलेल्या असतात. त्यामुळे रात्रभर आलोचन जागरण करुन फ्लाईट पकडून दहा पंधरा तासांनी पॅरिस किंवा म्युनिच किंवा झुरिचला वगैरे पोचल्यावर तिथेच एअरपोर्टवर मुखप्रक्षालन आणि प्रातर्विधी उरकून लगेच बसमधे चढणं आणि झोंबत्या डोळ्यांनी आणि आंबलेल्या अंगाने पूर्ण दिवस घपाघप परस्पर साईटसीईंग "मारुन" थेट रात्री डिनरनंतर हॉटेलात चेक इन करवणं असा प्रकार असतो. बिलीव्ह मी अशा स्थलदर्शनात अजिबात आनंद मिळत नाही.

ग्रुप टूरसोबत जाण्याचे फायदे:

१. पहिल्यांदाच परदेश प्रवास असेल तर एकूण मानसिक ताण कमी करण्यासाठी आणि निर्धास्त जाण्यासाठी सोबत टूर मॅनेजर असतो. तो एअरपोर्टवर पूर्ण गाईड करुन चेक इन, इमिग्रेशन वगैरे प्रोसेस करुन देतो. परदेशात पोहोचल्यावरही आपल्याला नेमकं कुठे जायचंय, कोण घ्यायला येणार, ते दिसलेच नाहीत तर? गेट नंबर चुकला तर? आपली फसवणूक तर होणार नाही ना? नेमकी कोणाला किती टिप द्यायची? प्युअर व्हेज खाणं मिळेल का? समोर दिसतंय त्या पदार्थात बीफ तर नसेल ना? इथला कायदा किंवा पद्धत आपल्याकडून मोडली जाणार नाही ना? असे सर्व प्रश्न मागे पडून निवांत फिरता येतं.

२. सर्व दिवशी सर्व ठिकाणी वेळेवर पोचणं आणि परत येणं याची जबाबदारी सोबत असलेल्या टूर मॅनेजरवर असल्याने प्रथमच परदेश प्रवास करणार्‍यांचं दडपण कमी होतं.

३. सोबत आपल्यासारखेच फॅमिलीवाले लोक (एक ग्रुप म्हणून एकमेकांना कंपनी, खेळ, करमणूक, सह अनुभव इत्यादि), ग्रुपमधल्या कुटुंबांची लहान मुलं (आपल्या पोरांना कंपनी) असा माहोल अगदी दोघांनी / तिघांनीच परमुलखात पहिल्यांदा जाण्यापेक्षा जास्त कंफर्टेबल वाटतो.

आता...

या टूर ऑपरेटर कंपन्यांमधेही प्रत्येकाचा आपापला स्वभाव आहे. अगदी पुणे ते पुणे, मुंबई ते मुंबई बोट हाती धरुन नेऊन आणणारे काही. हे अगदी बांधून घालून पळवतात आणि तिथेही सर्व जेवणं, तीही शुद्ध भारतीय वगैरे अरेंज करतात.) (हे अर्थात खूप जास्त महाग असतात)

आणि प्रवास आपला आपण करुन युरोपात पोचल्यावर एअरपोर्टवर आपल्याला भेटणारा टूर मॅनेजर अशी व्यवस्था असलेल्या काही कंपन्या (या स्वस्त असतात आणि काही प्रमाणात आपल्याला तिथे फिरताना स्वातंत्र्यही मिळू शकतं. उदा. लंच आपलं आपण करायचं, त्यासाठी तिथली लोकल रेस्टोरण्ट्स भटकून आजमावून पाहणे वगैरे)

(टु बी कंटिन्यूड)

स्वधर्म's picture

30 Jan 2018 - 6:05 pm | स्वधर्म

कंपन्या खरंचंच घिसीपीटी ठिकाणं लिहीत अाहेत त्यांच्या प्लॅनमध्ये. माउंट टिटलीस हे असेच एक वाटतंय. अाणि सगळीकडे त्यांची बस. कदाचित त्यांना ते स्वस्त पडत असेल किंवा वेळ वाचत असेल. अापण करू शकतो, त्यापेक्षा खूप जास्त ठिकाणं करण्यासाठीही हे त्यांना सोईचं वाटत असेल.
मला स्विझर्लंडमध्ये फारसा प्रॉब्लेम वाटत नाही, पण इटलीत पाकीटमार, चोरी होणे वगैरे होते असे ऐकून अाहे. तसेच, तिथली हॉटेल्स स्विझर्लंडपेक्षा खूपच स्वस्त वाटतायत. कशामुळे? इंटरनेटवर रेल्वेचे लोकल ट्रान्सपोर्टचे पण पुष्कळ प्रकारचे पासेस अाहेत.
तुंम्ही शेवटी सांगितलेला पर्याय मेकमायट्रीप सारखा अाहे. वीणाचा मात्र अादूबाळ म्हणाले तसा खचाखच प्लॅन अाहे. इंटरनेट कंपन्यांच्या प्लॅनमध्ये २-३ दिवस फ्री अॉप्शनल अाहेत, पण फ्री दिवसातले तिथले साइट सिईंग खर्च धरले, तर फक्त थोडासाच कमी खर्च अाहे. अापण स्वत: ट्रीप केली, तर प्रचंडच फरक पडेल (माणशी पावणेदोन, दोन लाखापेक्षा खूप कमी) असं वाटतंय का?

चौकटराजा's picture

30 Jan 2018 - 6:42 pm | चौकटराजा

स्वीस हे माहागडे प्रकरण आहे. लूसर्न मधे आम्ही एक थाळी पार्सल घेतले ते २५०० रू. पडले. पण फळे, दूध व ब्रेड त्या मानाने स्वस्त आहेत. फळे खाण्याची आवड असल्याने आमचे भागले . प्यारिसात पॅसेज ब्रॅडी नावाची एक गल्ली आहे इथे वडापाव शाही थाळी सर्व काही आहे. स्वीस पेक्षा दर कमी. मसाला डोसा ४५० रू.

चौकटराजा's picture

30 Jan 2018 - 5:53 pm | चौकटराजा

मी जेंव्हा युरोप हा प्राधान्याने पहायाचा ठरवला त्यावेळी अनेक लेख वाचले.१४ रात्री १५ दिवस असा इटाली ,स्विस व पेरिस असा प्रवास पत्नीसह करून आलो. आमच्याच गाढवापणामुळे एक दोन अडचणी जरुर आल्या पण यात्रा कंपनी पेक्षा सहल मस्त व ४५ टक्के खर्चात झाली . स्विस ला माझ्या मते मी एक दिवस आणखी द्यायला हवा होता. मी ५ दिवस दिवस दिले . एअर बी एन बी बेस्ट ! स्विस पास बेस्ट. प्यारीसात दोन दिवसाचे कुठेही फिरा चे तिकीट मिळते. युरोपियन लोकांमध्ये मिसळण्याचा आनंद मिळतो.गल्ली बोळातून फिरता येते. रम्य ठिकाणी रहाता येते. मुलाना नेणार असाल तर यात्रा कंपनी तून बिलाकूल जाऊ नका ! नीट शोध घेतला तर प्यारिस माथेरान पेक्षा रहायाला स्वस्त आहे. खरे तर इटाली हा देश पहायला महिना अपुराच आहे . नुसते युरोप खंड गुगल अर्थ मध्ये पाहिले तरी डोळे तृप्त होतात .
मी मुंबई - अबुधाबी मार्गे रोम- फ्लोरेन्स -व्हेनिस -मिलान -तीरानो -लुसरन-इंटरा लाकेन - झेरमाट- जिनेवा - मान्त्रू - शामोनि - प्यारीस - मुंबई असा प्रवास केला पैकी खराब वातावरणामुळे शामोनि शिखर रद्द करावे लागले . प्रत्येकी विसा -विमा -प्रवास -निवास -खाणेपिणे ई धरून प्रत्येकी १ लाख ५ हजार खर्च आला. याच १४ दिवस १५ रात्री साठी प्रत्येकी कमीतकमी २ लाख ४५ हजार खर्च ग्रुप सहलीत येतो.

चौकटराजा's picture

30 Jan 2018 - 6:03 pm | चौकटराजा

आपण गेल्याने जी एस टी , विमान तिकीट काढण्यासाठी दिलेले कामिशन, विसा सल्ला आकार , आपल्याच बोडक्यावर अखेर पडणारा कम्पनीच्या पान पाना जहिरातीचा खर्च,ई वाचतो .युरोपला जाताना युरोप आपल्या स्टेटस पेक्षा मोठा आहे हे लक्षात घेऊन गेले की स्टेटस वर होणारा फजूल खर्च वाचतो .मला कुठे ही टीप द्यावी लागली नाही.

स्वधर्म's picture

30 Jan 2018 - 6:12 pm | स्वधर्म

हेच विचारत होतो, तेवढ्यात तुमचा प्रतिसाद दिसला. मुलं कंपनीच्या टूरमध्ये बोअर होतील काय? तुमचा खर्च बराच म्हणजे बराच कमी झालाय. ही ट्रीप नक्की कधी केली होती? म्हणजे सिझन/ अॉफ सिझन असे काही अाहे का?

चौकटराजा's picture

30 Jan 2018 - 6:35 pm | चौकटराजा

मी एप्रिल २५ २०१७ ते १० मे २०१७ या कालात गेलो. त्याची तयारी २३ नोव्हे. २०१६ ला एअर तिकिट काढण्यापासून झाली. माझ्या मते १० मे ते २५ मे हा काळ अधिक चांगला. तसा युरोपातील पाउस "येडा" सदरात मोडणारा ! कम्पनीच्या टूर मधे बहुतेक प्रौढ सामील होतात. कम्पनीच्या टूरने मुलाना जवळ जवळ आपल्याइतकाच खर्च आकारला जातो पण निवास एयर बी एन बी चा वापर करून केला निवास चौपट खर्चाचा होत नाही. दुप्पट होईल. दोघांचा मिळून एक असा स्वीस पास काढल्यास त्यात १५ टक्के सवलत आहे .स्वीस पासात माउट रिगी पूर्ण मोफत आहे. पिलाट्स साठी ५० टक्के सवलत आहे. आपण जाण्याचे धाडस हाच खरा प्रश्न. भारतीय लोक जपान, यू एस, कोरिया यांचे पेक्षा या बाबत्तीत भित्रे आहेत. भाषेचा प्रश्ण मात्र इटाली व फ्रान्स मधे येतो. ते लोक जवळ जवळ इन्ग्रजीचा द्वेषच करतात .तो प्रश्न स्वीस मधे नाही.

चौकटराजा's picture

31 Jan 2018 - 10:56 am | चौकटराजा

श्रेष्ठ मध्ययुगीन वास्तुकला , चित्रे , विशाल बागा , लोकजीवन जर आवडीचे नसेल तर मात्र यात्रा कंपनी बरोबरच जा ! खवय्ये असाल , फळे ई आवडत नसतील तर यात्रा कंपनीच बरी ! कारण युरोप मध्ये आपल्यासारखे शाकाहार अन्न मिळणे अवघड आहे. आम्ही मात्र शिरा , पोहे, ढोकळा , सूप , भात , वरण, दही भात यांची सोय आमच्या निवासात करू शकलो. मी डोके हललेला शिनीयर शिटी नसल्याने जमले. कुटुंबाला चालण्याची आवड व क्षमता नसेल तर युरोपला जाउच नका कारण यात्रा कंपनीबरोबर गेले तरी चालावे हे लागतेच !

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jan 2018 - 6:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्विससाठी www.myswitzerland.com या संस्थळावर चौकशी करा आणि तुमचे सर्व पर्याय (उदा: वेळ, बजेट, पहायच्या आवाडी, इ सकट) बिनधास्तपणे सांगा आणि बेस्ट इटिनिररी विथ बेस्ट प्राईस मागवा.

संस्थळ सरकारी आहे पण जगातल्या कोणत्याही उत्तम खाजगी टूर कंपनीच्या थोबाडीत मारेल अशी माहिती आणि सेवा (खोली/स्विसपास/इ बुकिंग) विनाशुल्क मिळेल.

उपेक्षित's picture

30 Jan 2018 - 6:27 pm | उपेक्षित

स्वधर्म साहेब,

जाहिरात नाही करत पण मी स्वतः १० वर्षांपासून याच फिल्ड मध्ये आहे आणि गेल्या दीड वर्षापासून आंतरराष्ट्रीय काम करण्याचा अनुभव आहे त्याआधारे सांगू इच्छितो.

१) ग्रुप टूर वाल्यांच्या नदी लागू नका कारण .... वरकरणी पैसे कमी वाटतात पण अक्षरशः पळवतात ती लोक आणि सगळे वरवरचे दाखवतात. { सगळ्यात महत्वाचे म्हणजे इटली मध्ये जर तुम्हाला कोणी वरण-भात आणि आळूवडी देणार असे म्हणत असाल तर त्याचा सारखा शहाणा तोच :) }

तुम्हाला खरच युरोप explore करायचे असेल तर इथून फ़क़्त विसा / हॉटेल बुकिंग / ट्रान्स्फर्स आणि travel इन्शुरन्स करून जावा कारण स्विस मध्ये तुम्हाला इथून लोकल ट्रान्सपोर्ट चा पास काढता येतो जो लोकल बस/ रेल्वे दोन्हीला चालतो
त्याच प्रमाणे पॅरिस मध्ये तुम्हाला हॉप on आणि होप ऑफ बस पास काढता येऊ शकतो जो जास्त परवडेबल तर आहे शिवाय खर्या अर्थाने तुम्हाला युरोप फिरण्याचा फील येऊ शकतो.

इतके दिवस मी मुद्दाम माझ्या व्यवसायाबद्दल लिहायचे तालात होतो उगाच जाहिरात केल्या सारखे वाटते म्हणून पण आत्ता राहवले नाही म्हणून लिहिले.

अजून काही लागले तर बिनधास्त व्यनी करा.

सुबोध खरे's picture

30 Jan 2018 - 6:28 pm | सुबोध खरे

आपल्या लेखातच फाटा फोडतोय त्याबद्दल क्षमस्व.
एप्रिल अखेर किंवा मे सुरुवातीला सात दिवस ऍमस्टरडॅमला जायचा बेत ठरवत आहे.मी आणि पत्नी फक्त. ( एका वेळेस एकच देश/ प्रांत शांतपणे पाहणे असल्यामुळे सहल कंपन्याच्या मार्गाला न जायचे ठरवले आहे.
तेथे जाऊन आलेले कुणी मला मार्ग दाखवेल का?
व्यनि केला तर उपकृत होईन.

चौकटराजा's picture

30 Jan 2018 - 6:53 pm | चौकटराजा

एकाच देशाला जाणे व ते ही सात दिवस ! मजा आहे डॉक ! माझ्या मते मजाच करायचीच असेल तर तिथून एक रिव्हर क्रूझ कलोन पर्यन्त येते. बाकी ७ दिवस अ‍ॅम साठी मला जास्त वाटताहेत. कालवे व रेड लाईट एरिया हे मात्र अ‍ॅम मधे जबरा आहे. सायकलीचे शहर आहे.

उपेक्षित's picture

30 Jan 2018 - 6:58 pm | उपेक्षित

जल्ला मेला नशीबवान आहात डॉक... :)

आदूबाळ's picture

30 Jan 2018 - 8:39 pm | आदूबाळ

एप्रिल अखेर किंवा मे सुरुवातीला सात दिवस ऍमस्टरडॅमला जायचा बेत ठरवत आहे.

मीही त्याच वेळेस तिथे असण्याची घनदाट शक्यता आहे. ठरलं की तुम्हाला व्यनि करेनच. (शिवाय मी तिथला ग्रामस्थ आहे.)

सांगलीचा भडंग's picture

31 Jan 2018 - 6:13 pm | सांगलीचा भडंग

व्यनि पाठवला आहे . बरेच दिवसांनी मिपा वर लॉगिन झालो आणि हा लेख वाचत होतो

नंदन's picture

1 Feb 2018 - 7:15 am | नंदन

डॉक्टरसाहेब, तुम्ही नेमक्या ट्युलिपच्या मोसमातच जात असल्याने हे ठिकाणही भेट देण्याजोगे वाटू शकेलः
https://keukenhof.nl/en/discover-the-park/open-2018/#plan-your-visit

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Feb 2018 - 6:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

अ‍ॅमस्टरडॅममध्ये वस्ती करून सगळा हॉलंड पालथा घालता येईल इतक्याच आकाराचा नेदरलँड्स (हॉलंड हा त्यातला केवळ एक प्रांत आहे ;) ) देश आहे. छोटा असला तरी सुंदर देश आहे. पर्यटनाच्या दृष्टीने खूप छान सोई आहेत. बघायलाही बरेच आहे. एक-अर्ध्या दिवसाच्या सहली जालावरून बुक करता येतात. तसेच हॉटेलमध्ये बेल डेस्कवरूनही बुक करता येतात.

https://www.tripadvisor.in/Attractions-g188553-Activities-The_Netherland... इथल्या यादीतून आणि जालावर असलेल्या तश्याच इतर संस्थळांवरची माहिती अभ्यासून तुमच्या आवडीच्या जागांची / सहलींची निवड करा.

टुलीप सिझनमध्ये जात आहात तर (सिलसिला फेम) Keukenhof Gardens, एखादी मोठी फुलांच्या जागतिक लिलावांची जागा, चीज मार्केट, मदुरोडाम (मिनिएचर्स म्युझियम), असंख्य म्युझियम्सपैकी तुमच्या आवडीची काही, (आवडत असल्यास) कसिनो, संध्याकाळची कॅनॉल क्रूझ, इत्यादींना जरूर भेट द्या. सगळेच टिक मार्क्स करण्याच्या नादात दमछाक करण्यापेक्षा (तसेही, बहुतेक पर्यटनस्थळांवर बरेच निष्फळ टिकमार्क्स असतातच) आपल्या पसंतीची निवडक ठिकाणे पाहिल्यास एक आठवडा भरगच्च मजेत घालवून (न दमता पण) भरपूर सुखद आठवणींबरोबर परतता येते... मात्र यासाठी जाण्यापूर्वी जालावर काही काळ संशोधन करणे आवश्यक आहे :)

अ‍ॅमस्टरडॅममध्ये उत्तम डच, काँटिनेंटल आणि भारतिय रेस्तराँ आहेत. एखाद-दुसर्‍या (किंवा जास्त) संध्याकाळी त्यांना राजाश्रय देता येईल !

आनंददायक सफरीसाठी अनेक शुभेच्छा !

गीथूर्न उर्फ नेदरलँड्सचं व्हेनिसही मस्त जागा आहे. (https://en.wikipedia.org/wiki/Giethoorn)

सप्तरंगी's picture

7 Feb 2018 - 9:03 pm | सप्तरंगी

गीथूर्न नाही खिथॉर्न असा उच्चार करतात, आदूबाळ अहो तुम्ही ग्रामस्थ आहात ना !?:))

@ सुबोध खरे - तुम्हाला माहिती मिळालेली दिसतेय पण काही स्पेसिफिक माहिती हवी असल्यास मला message करू शकता. ८ दिवसात छोटेसे ऍमस्टरडॅम खूपच आरामात फिरता येईल.

:) तो दिलीपकुमारचा ख उच्चार येत नाही मला. उदा० मी सरळ 'गौडा' म्हणतो. 'खाव्डा' नाही.

सप्तरंगी's picture

8 Feb 2018 - 5:49 pm | सप्तरंगी

आणि मी कितीही घसा फोडून actually खाकरून हा आमचा खाव्डा मसाला असे जरी म्हणलं तरी कोणाला कळत नाही:))

राजेंद्र मेहेंदळे's picture

9 Feb 2018 - 1:15 pm | राजेंद्र मेहेंदळे

मी अ‍ॅमस्टरडॅमला काहि दिवस राहिलो होतो त्या आधारे (बाकि आंजा वरुन बघाच माहिती)
१. के. एल. एम ही डच विमानकंपनी असल्याने तिकिटे स्वस्त पडतील ( मुंबई- अ‍ॅमस्टरडॅम).
२.अ‍ॅमस्टर डॅमला शिपोल एअरपोर्ट्ला उतरा. खालीच मेट्रो स्टेशन आहे (बहुतेक ठिकाणी असतेच, साले मुंबईला का नाहि काय माहित)

३. ४ स्टेशन पुढे अ‍ॅमस्टरडॅम सेंट्रल स्टेशन आहे (आपल्या सी. एस. टी. सारखे) तिकडे उतरा. आणि एखादे छान हॉटेल बघुन राहा. इथे हॉटेल थोडी महाग पडतील. मी ४ स्टेशने अलीकडे विबाउट्स्त्रात ला राहिलो होतो. तिथे स्वस्त पडतील. खाली मी जिथे राहिलो ते हॉटेल

https://www.expedia.co.in/Amsterdam-Hotels-Aalborg-Hotel-Amsterdam.h1124...

४. सरदारजी किंवा ईंडीयन हॉटेल बरीच आहेत, त्यामुळे खाण्यापिण्याची चिंता अ‍ॅमस्टरडॅमला विशेष्तः सेंट्रल ला नाही. शिवाय पिझ्झा, फ्राईज वगैरे चाल णार असतील तर बरेच आहे. फळे दुध एकदम मस्त मिळते, जेवणात सुद्धा दुध पितात लोक. ते चालेल का बघा.

५. एक दिवस सेंट्रल च्या आसपास फिरा. यात कॅनॉल क्रुझ, अ‍ॅन फ्रँक म्युझियम, वॉर म्युझियम, मादाम तुसा म्युझियम( हे सगळीकडे असतेच त्यामुळे आपला पास) आणि डॅम स्क्वेअर , व्हॅन गॉग म्युझियम वगैरे येइल.
६. ट्रेन आणि ट्राम मिळुन आठवड्याचा पास काढा. मनसोक्त भटकता येईल. हा पास सुद्धा साधारण ५० युरो पर्यंत सेंट्र्ल स्टेशन ला मिळेल. खाली लिंक आहे
https://en.gvb.nl/ontdek-amsterdam/gvb-dag-meerdagenkaart

६. एक दिवस वॉलेंडाम आणि आउट स्कर्ट ला फिरा . पवनचक्क्या, बुटाची फ्टॅक्टरी ग्रामीण जीवन, ट्युलिप गार्डन बघा.

रविवारी पाईप मार्केट असते, (वरती लिंक देलेय त्या हॉटेलजवळ) तिकडे चक्कर मारा.

बाकी टुर कंपन्यांचा प्लॅन बघा आणि अजुन काय बघता येइल ते ठरवा.

राजेंद्र मेहेंदळे's picture

9 Feb 2018 - 1:22 pm | राजेंद्र मेहेंदळे

हा प्रतिसाद डॉक्टरांसाठि होता

अन्य यूरोपीय शहरांप्रमाणेच Amsterdam चीही मजा शक्य तितकी उपभोगली आहे. खऱ्या अर्थाने फ्री कल्चर काय ते तिथे दिसलं. Cannabis आणि त्यासंबंधी पेयं खुल्ला उपलब्ध. वेश्यावस्तीची टूर इथपासून मनुष्यदेहाची टूर इथपर्यंत टूर्स इथेच पहिल्या. पण फ्रांस असो वा नेदरलैंड, एकमेव मोठ्ठा प्रॉब्लम येतो तो 'उच्चार' कसे करायचे हा.

सतिश पाटील's picture

30 Jan 2018 - 6:38 pm | सतिश पाटील

फोरेन टूर बद्दल माहित नाही, पण डोमेस्टिक बद्दल नक्कीच सांगू शकतो.

विना कटकट पुरेपुर आनंद घ्यायचा असेल अणि दिलेला सगळा पैसा वसूल करायचा असेल तर केसरी ग्रुप टूर ला पर्याय नाही. ( विणा बद्दल मला माहित नाही )
ग्रुप टूर मधे भरपूर पळवले जाते हे थोड्फार खरे आहे. त्याला कारण देखिल तसेच आहे. २५-३० लोकांच्या ग्रुपला संपूर्ण प्रोग्राम समजव्लेला असतो तरी देखिल ग्रुप मधील ३-४ जण हमखास निघायला उशीर करतातच ( भारतीय मानसिकता ). हा होणारा उशीर टाळन्यासाठीच सकाळी लवकर तुम्हाला बेड टी देण्यासाठी टूर म्यानेजर स्वतः दारात हजर असतो. कारण एकही व्यक्तीला जर सकाळी उठायला उशीर झाला तर निघायला उशीर अणि नंतर संपूर्ण दिवसाचे वेळापत्रक कोलमडते. अणि उशीर झालेल्या व्यक्तीला टाकुन जाता येत नाही. त्यात येणारी सर्व पर्यटक आम्हाला इतक्या रुपयात किती ठिकाणे दाखवणार ? ही अपेक्षा ठेउन आलेली असतात. त्यामुळ इतक्या पैशात तुम्हाला जास्तीत जास्त ठिकाण दाखवावेच लागतात.
ग्रुपटूरला सगळ्या लोकांना सांभाळवे लागते

जेवणाबद्दल म्हणाल तर स्थानिक जेवण हे सुरुवातीला २ दिवस छान वाटते नंतर मात्र घरच्या जेवणाची आठवण बेचैन करते. रोज ३ वेळ इडली डोसा किंवा पनीर अणि पराठे , कल्पना करुण बघा. अणि मराठी जेवण नसेल तर आम्हाला हे जेवण जात नाही, चपाती भाजी भात हवा असाही हट्ट करतात. आपल्याकडे उपवास करणारे बरेच लोक आहेत त्यांना जर शाबुदान्याची खिचड़ी दिली तर ते काही गैर नाही.
त्यामुळ आपले मराठी जेवण रोज दिले जाते परंतु ते खावेच अशी सक्ती नसते. टूर म्यानेजरला विचारल्यास तो तुम्हाला जवळचे चांगले रेस्टोरंट सुचवतो त्यात तुम्ही स्थानिक पदार्थ चाखू शकता.

अणि बाकी तर वरती गवि साहेबांनी सांगितलेच आहे. जबाबदार अणि अनुभवी टूर म्यानेजर सोबत असल्याने आपण निर्धास्त असतो, अणि बऱ्याच ठिकाणी होणारी फसवणूक बऱ्याच वेळेला टाळता येते. बऱ्याच स्पॉटला केसरीला स्थानिक लोक अणि प्रशासनाकडून प्रायोरिटी दिली जाते.
होटलमधे केसरीने ठेवलेल धमाल प्रोग्राम एन्जॉय करताना स्वतंत्र आलेले पर्यटक आम्हालाही तुमच्यात घ्या ना म्हणून आर्जव करताना पाहिले आहेत. अगदी केसरी कडूनच FIT बुकिंग करुण आलेले सुद्धा.

स्वतंत्र किंवा ग्रुपटूर, फायदे तोटे हे दोन्हीकडे आहेत, शेवटी निवड तुम्हाला करायची असते.
ग्रुपटूर मधे चांगला अनुभव आला नाही तर तुम्ही ते खापर टूर कंपनीवर फोडून काही अंशी पैश्याचा परतावा मागू शकता अणि स्वतंत्र जाऊन जर धमाल आली नाही तर तो तुमच्यासाठी एक अनुभव ठरतो. ( हलकेच घ्या )

एक माजी केसरी डोमेस्टिक टूर म्यानेजर-
अणि हो, ही जाहिरात न्हवे.

सुबोध खरे's picture

31 Jan 2018 - 9:48 am | सुबोध खरे

आपण जर ज्येष्ठ नागरिक ( वयाने किंवा मनाने) तर केसरी सारख्या सहल कंपन्यांतर्फेच जा. कारण दीड पट महाग पडले तरी जेवणाखाण्याची अजिबात कटकट होत नाही. सामान उचलणे हॉटेल शोधणे इ चा त्रास होत नाही. सर्व तर्हेची आरक्षणे करून दिलेली असतात. समवयस्क ( वयाने किंवा मनाने) भरपूर भेटतात. त्यांनी दिलेली ठिकाणे व्यवस्थित दाखवतात. आम्ही केसरी तर्फे काश्मीरला गेलो होतो. तेथे ज्येष्ठ नागरिक पहाटे साडे पाचला अंघोळ वगैरे करून तयार असत ते सुद्धा दल लेकच्या शिकाऱ्यात ७ " सेल्सियस तापमानात. वर सकाळी सहापर्यंत चहा आला नाही म्हणून तक्रार करत. एवढे करून सकाळी आठ च्या बसला यायला त्यांना उशीर होत असे. एके दिवशी बस निघायची वेळ झाल्यावर एका आजींना आपली कवळी शिकार्यात राहिली याची आठवण झाली. मग आजोबा होडक्याने आपल्या शिकार्यात गेले आणि कवळी घेऊन आले. यात अर्धा तास गेला. (केसरीत इतके सुग्रास भोजन मिळते ते फुकट जाऊ नये अशी इच्छा असते). काश्मीरच्या मरणाच्या थंडीत रात्री गरम गरम वरण भात मिळाल्यावर तृप्त होणारे अनेक जण आहेत. (आणि न मिळाल्यास किरकिर करणारे हि). सहा दिवसात मी तक्रार केल्याने शेवटच्या दिवशी त्यांनी आम्हाला "काश्मिरी" जेवण दिले. टूर मॅनेजरची दया यावी अशीच स्थिती असते एकंदर.
( वयाने किंवा मनाने) तरुण असाल किंवा थोडेसे साहस करण्याची तयारी असेल तर सहल कंपन्यांच्या ऐवजी स्वतः स्वतः ला पाहिजे तशी सहल आयोजित करा. एखादे ठिकाण जास्त काळ पाहायचे एखाद्या ठिकाणी जास्त राहायचे असेल तर तसे ठरवता येते.
स्वानुभव म्हणून सांगतो ताज महाल पाहायला लागोपाठ दोन दिवस गेलो तेंव्हा दुसऱ्या दिवशी ताज महाल खऱ्या अर्थाने पहिला. पहिला दिवस क्लिकक्लिकाटात च गेला. दुसऱ्या दिवशी कॅमेरा नेलाच नव्हता तेंव्हा ताजमहाल डोळे भरून पाहता आला. सहल कंपन्यांच्या बरोबर गेलात तर वेळापत्रकाप्रमाणेच जावे लागते. कारण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त स्थळे दाखवायची असतात. ( किमान शब्दात कमाल अपमान सारखे)
असो.

काहीतरी वेगळेच करा कारण जगात देश आणि स्थळे भरपूर आहेत आणि ते सर्व 'करणे' अजिबात शक्य नाही. हेच कुटुंबाला पटवा अन्यथा "एवढे छवळ गेलो अन हे पाहिलच नाही"कुरकुर सुरू राहिल.

मुक्त विहारि's picture

31 Jan 2018 - 10:46 pm | मुक्त विहारि

मग भलेही त्यासाठी २७-२८ दिवस लागू देत.असे माझे मत.

गेली ४० वर्षे महाराष्ट्रात राहून पण अद्याप वेरूळ बघता आलेले नाही. मग, माझ्याकडून तरी, १५ दिवसांत युरोप कसा काय बघून होणार?

डॉ.सुहास म्हात्रे ह्यांचे लेख वाचा आणि मग त्यांना व्यनि करा.त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष भेट झाली तर फार उत्तम.

कुसुमिता१'s picture

1 Feb 2018 - 1:23 am | कुसुमिता१

खुप सुखद होते सहल स्वत: अरेंज केल्यावर.. आम्ही सप्टेंबर महिन्यात १० दिवसांची सहल(जर्मनी व स्वित्झर्लंड) माझ्या १० महीन्यांच्या मुलीला घेऊन केली होती. खुप मेमोरेबल अनुभव आले.. नविन लोक भेटली. ओळखी झाल्या. स्थानिक लोक मदत करायला अगदी तत्पर असतात तसेच होटेल च्या मदतीने साइट सीईंग साठी लोकल गाईड देखिल मिळू शकतो. आमच्या ट्रीप मधे माझ्या बाळाची कुठे ही हेळसांड न करता आम्ही पूर्ण मजा लुटली.

स्मिता.'s picture

1 Feb 2018 - 4:55 am | स्मिता.

वर अनेकांनी लिहीले असल्याने नवीन लिहीण्यासारखे काही नाही पण शक्य असल्यास ट्रिप स्वतःच ठरवा. टूरवाले फक्त पळवतात, 'दाखवत' काहीच नाही.

पश्चिम युरोपात फिरणे फारसे अवघड नाही, पूर्वाभ्यास मात्र गरजेचा आहे. (पूर्व युरोपाचा अनुभव नाही)
स्विझर्लॅडसारखा travel friendly देश दुसरा नाही. तेथे राहणार असाल तेवढ्या दिवसांचा 'स्विस पास' घेतल्यावर संपूर्ण देशात कितीही फिरू शकता. तसेच पॅरीस, अॅमस्टरडॅम, बार्सलोना, इ. सारख्या मोठ्या शहरांत उत्तम सार्वजनीक वाहतूक व्यवस्था आहे. सगळे नकाशे ऑनलाइन उपलब्ध असल्याने तुम्हाला आधीच थोडा अंदाज घेता येईल.
बर्याच वेळा रेल्वेपेक्षा बस किंवा विमान स्वस्त पडते, तसे बघून घ्या.

सर्व पर्यटन ठिकाणी इंग्रजी बोलत असले तरी भाषेचा थोडासा त्रास होवू शकतो. त्या-त्या देशात hello आणि thank you ला काय म्हणतात हे बघून तेवढे शब्द स्थानिक भाषेत वापरले तरी पुढचे काम इंग्रजीत निभावले जावू शकते. शुद्ध शाकाहारी असाल तर युरोपात चीज-ब्रेड आणि सलाद खावून जगावे लागेल. मांसाहार चालत असेल आणि जीभेला पाश्चिमात्य चवींची सवय असेल तर काही विचारायलाच नको!

राहण्यासाठी विश्वसनीय वेबसाईट्सवरूनच बूकिंग करा.

नंदन's picture

1 Feb 2018 - 7:18 am | नंदन

स्वधर्मजी, वरील प्रतिसादांत जवळपास सगळी माहिती कव्हर झाली आहेच. त्याशिवाय अधिक माहितीसाठी Rick Steves ह्या टूर ऑपरेटरचे विनामूल्य यूट्यूब व्हिडिओज वा पॉडकास्ट्स पहा/ऐका, असं सुचवेन. युरोपातली ट्रिप प्लॅन करताना बर्‍यापैकी मदत होते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Feb 2018 - 9:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचतोय.

-दिलीप बिरुटे

स्वधर्म's picture

2 Feb 2018 - 9:35 am | स्वधर्म

सर्वांनी खूप चांगली माहिती दिली अाहे. मी अजूनपर्यंत भारतात कोणत्याही ग्रुप टुर बरोबर गेलेलो नाही. जे काही थोडेफार फिरलो, ते सगळं स्वत:च केल. काही वेळा मजा अाली, तर काही वेळा घोटाळेही झाले.
गेले दोन दिवस कामावरपण विचार चालूच होते. कुटुंबाला ‘मजा’ करण्यात रस अाहे. ते Explore वगैरे तुझं तू बघ असा अॅप्रोच. काही प्रमाणात ते ठीक अाहे, पण अापण कुठलं अाव्हान वगैरे घ्यायला चाललेलो नसून मजा करायला चाललो अाहोत हे नक्की. दुसरा एक मुद्दा असा की १३-१५ दिवसांच्या टूरमध्ये सतत चौघेच बरोबर. दोघांच्या रोमॅंटीक ट्रीपसाठी स्वत:च जाणे, हे वरचे प्रतिसाद वाचून पटले अाहे. मुले अापअापली फिरण्यासारखी नाहीत. ती पण बोअर होईल काय असे विचारत होती. कधी कधी गोष्टी ठरवण्यातच वेळ जाईल असे त्यांना वाटते.
ग्रुप वाल्यांनी मधल्या काळात पैसे वाढवले अाहेत. हे scarcity निर्माण करून मार्केटींग करणं अाज्जिबात अावडत नाही. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. ठरलं कि ईथं टाकतोच.

जास्तीत जास्त लोकांनी स्वतःचे स्वतः करायचा सल्ला दिला आहे पण जो planning करतो त्याला खूप सगळी माहिती काढणे , मॅप बघत , direction घेणे अशी खूप कामे करावी लागतात, काय must see आहे, काय नाही बघितले तरी चालेल वगैरे विचार करताना, फोटो बघताना मग कधी कधी काही जागा बघण्यात तेवढा रस उरत नाही, किंवा बघितल्यासारखी वाटायला लागते, नावीन्य ओसरते. टूर केली तर काहीही काम नसल्यामुळे हि मजा टिकून राहते, आरामात बॅक स्टेप घेऊन आनंद घेता येतो. जेवणाचे म्हणाल तर टूरमध्ये असतानासुद्धा एखाद्या वेळेस आपले आपण बाहेर खाण्याचे ठरवूच शकतो. प्रोज -कॉन्स दोन्हीकडे आहेतच.

स्वधर्म's picture

8 Feb 2018 - 12:39 pm | स्वधर्म

अगदी बरोबर. ईथल्या बहुतेकांनी स्वत: करण्याचा सल्ला दिला असूनही मी ग्रुप टूर करणार अाहे. वीणासारखी एकदम पॅक टूर न करता, २-३ दिवस अापले अापल्याला फिरता येईल असा मध्यममार्ग निवडतो अाहे. मी एक पाहिलं की, टूर स्वत: केली तर मजा येईल पण पुढे काय करायचं असे सतत निर्णय घेत रहावे लागतील व एकजण (म्हणजे मीच) स्वच्छंदी निर्धास्त असणार नाही. प्रोज कॉन्स दोन्हीकडे अाहेतच.

चांगला निर्णय घेतला आहे!

स्वधर्म's picture

8 Feb 2018 - 12:39 pm | स्वधर्म

अगदी बरोबर. ईथल्या बहुतेकांनी स्वत: करण्याचा सल्ला दिला असूनही मी ग्रुप टूर करणार अाहे. वीणासारखी एकदम पॅक टूर न करता, २-३ दिवस अापले अापल्याला फिरता येईल असा मध्यममार्ग निवडतो अाहे. मी एक पाहिलं की, टूर स्वत: केली तर मजा येईल पण पुढे काय करायचं असे सतत निर्णय घेत रहावे लागतील व एकजण (म्हणजे मीच) स्वच्छंदी निर्धास्त असणार नाही. प्रोज कॉन्स दोन्हीकडे अाहेतच.

मी २०२० किवा २०२१ मधे १५ / २० दिवसाचा युरोप चा प्रवास करु इछितो.
२ कुटु॑बे असतील. माझा १२ वर्षाचा मुलगा असेल. एकुण ६ जणा॑चा ग्रुप असेल.

आम्हाल केवळ अशिच ठिकाणे पहायची आहेत जी ऑफ बीट असतील. तशी बरिच मोठी लिस्ट आहे. कारण लोकाना महित नसलेली परन्तु निसार्ग सौ॑दर्याने भरलेली अनेक ठिकाणे युरोपमधे आहेत. आम्हि कोणत्याही क॑पनीकडुन जणार नाहि आहोत. आम्हा सर्वा॑ची चालण्याची भरपूर तयारी आहे.
व्हिसा , तिकिटे , प्लान , सर्व आम्हि करणार आहोत. जो होगा सो देखा जायेगा.
महत्वाचे म्हणजे आम्हि सर्व याच पठडितले आहोत. आम्हि गार्दिची ठिकाणे टाळतो. छोटे ट्रेक करतो. त्यामुळे आम्हला थोडा ऑफ द ट्रअ‍ॅक प्रवास आवडेल.

शक्यतो लोकल होस्टेल / होम स्टे / लोकल ट्रान्स्पोर्ट वापरुन हि ट्रिप करायाची आहे. कमीत कमी खर्च करुन.

हि ट्रिप अरेन्ज करायला काहि सूचना / मदत हवी आहे. धन्यवाद.

निशाचर's picture

10 Feb 2018 - 5:14 am | निशाचर

मळलेली वाट सोडून प्रवास करण्याची कल्पना चांगली आहे. पण त्यासाठी खूप तयारी करावी लागू शकते, विशेषतः सार्वजनिक वाहतुकीची साधनं वापरायची असल्यास.

कारण लोकाना महित नसलेली परन्तु निसार्ग सौ॑दर्याने भरलेली अनेक ठिकाणे युरोपमधे आहेत.

याच्याशी सहमत. परंतु पर्यटनासाठी प्रसिद्ध जागांमधे बहुतेक वेळा काही खास असतं म्हणून त्या लोकप्रिय होतात, असंही वाटतं.

तुमच्या प्रवासाच्या आराखड्याविषयी वाचायला आवडेल.

चौकटराजा's picture

10 Feb 2018 - 7:06 am | चौकटराजा

एक उदाहरण देतो .. त्रूमेलबाख फोल्स इन्टरलाकेन स्वीस हा एक टूरिस्ट ट्रॅप आहे. काही विशेष नाही. असे अनेक टूरिस्ट ट्रॅप आहेत युरोपात. आयफेल टोवर पाहून यात काय पाहायचे असे मला झाले. या सर्व ट्रॅपची माहिती घ्या !! जो डर गया वो मर गया या न्यायाने जा ! भाषा व अन्न या समस्या आहेत पण त्यावर मात करता येते. यासाठी युरोपातील इंटरनेट प्लान ही घ्या !