*पद्मावतीच्या भ्रमाचा भोपळा अन् वर"करणी" धुडगूस*

ss_sameer's picture
ss_sameer in काथ्याकूट
28 Jan 2018 - 10:19 am
गाभा: 

अखेरीस सर्व (तथाकथित) संस्कृती रक्षकांच्या विरोधास न जुमानता "पद्मावती" चे थेटरात आगमन झालेच.

माफ करा, टंकलेखनाच्या चुकांकडे कानाडोळा करावा, संपूर्ण लेखात "पद्मावती" छापण्यात आले असले तरीही (तथाकथित) संस्कृती रक्षकांनी आणि मा. श्री. श्री. संजय लीळा भन्साळी यांनी ते "पद्मावत"(च) आहे असे समजून लेख वाचण्याची विनंती.

(विनाकारण) उत्सुकता वाढवणारा क्षण आल्यासरशी तमाम रसिकजनांनी त्यावरती उड्या हाणल्या. चित्रपटाच्या प्रदर्शनपूर्व (जास्तीचे) पैसे भरून चित्रपट पाहण्याची संधी पूर्ण करता आली. या सर्व घटनांबद्दल सर्व (तथाकथित) संस्कृती रक्षकांचे मा. श्री. श्री. संजय लीळा भन्साळी यांचेकडून आभार.

या सकल घटनांचे रुपरंग पाहता, आम्हास १९३० ते १९४७ दरम्यान च्या निवडणुकांचे दिवस आठवले. "मुस्लिम लीग" नामक एक पक्ष ज्यांच्याकडे लोकसभा वा राज्यसभेत पूर्ण राहू द्या परंतु अर्धे देखील बहुमत नव्हते, त्या ठिकाणी त्यांची मंत्रिमंडळात पन्नास टक्के मंत्रिपदाची मागणी होती. अर्थातच या मागणीस सभ्य भाषेत "हेकटपणा" म्हटले जाऊ शकते किंवा शेलक्या शब्दात "बिनडोक" म्हणता येईल. करणी सेनेच्या मागणीस काय म्हणायचे ते वाचक आपसूक ठरवतीलच.

भ्रमाचा भोपळा अन भ्रमाचा फुगा दोन्ही फार काळ टिकाव धरू शकत नाहीतच. (जोवर त्यास झाकपाक संस्कृतीची लागण होत नाही.) सत्य हे आज नाही तर उद्या बाहेर येतेच. कोट्यवधी रुपयांच्या नाक आणि डोक्याची मूल्ये आजपासून कवडीमोल झालीत याचे आम्हास दुःख वाटत आहे. (आमच्या पेक्षा अधिक दुःख मा. श्री. श्री. संजय लीळा भन्साळी अन कु. दिपीकेस वाटत असावे.) खिलजीच्या ज्या प्रणय प्रसंगाबाबत चर्वितचर्वण केले जात होते, अन ज्या प्रसंगाच्या बळावर (तथाकथित) संस्कृतीरक्षकांची धुडगूस चालू होता असा कोणताही प्रसंग संपूर्ण चित्रपटात नाहीच आहे हे वर"करणी" तरी प्रेक्षकांना समजलेच आहे. (परन्तु प्रणयप्रसंग चित्रपटात नसल्याने तमाम "शौकीन" निराश झालेत. तेव्हा भो संजया - पुढील चित्रपटात प्रणय प्रसंग असूच द्या अशी अपेक्षेवजा मागणी.)

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने झाकलेलीं कु. दीपिकाची कंबर यामुळे पुनःश्च आपण आपल्या संस्कृतीचे रक्षण केल्याचा कोण अभिमान त्या चित्रपट गृहात ओसंडून वाहत होता याचे वर्णन आम्ही कोणत्या शब्दात करू! (येथे पुन्हा एकदा "शौकीन" निराश झालेत हे आम्ही नमूद करू इच्छितो.)

भारतीय संस्कृती ही केवळ सहनशील नाही तर वेळप्रसंगी त्यात शस्त्र हाती धरून संस्कृती नाश करणाऱ्या गोष्टींस मुळापासून उपटून टाकण्याचे सामर्थ्य देखील आहे आणि अशाही प्रकारे आपण संस्कृतीतील हिंसेचे प्रदर्शन या निमित्ताने भरवू शकलो, घडवू शकलो, ही या संजयाची "करणी".

वाघाने एकदा सावज हेरले की तो ते मारण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. सावजास एकदा माहीत पडले की आपली शिकार होणार, तेव्हा सावज चौखूर उधळत धावते म्हणून वाघास (बडेजाव माजविणेकरिता तरी ) सावजाचा पाठलाग करावा लागतो. तैसेच झाले असावे. प्रथम (तथाकथित) संस्कृतीरक्षकांनी सावज हेरले पण गवसत नाही असे लक्षात आले. चित्रपटात आक्षेपार्ह काही नाही याची जाणीव झाली तसे हेकटपणे चित्रपट पाहणे नाकारले. आता मात्र भन्साळींनी चौखूर उधळले म्हणून हे (तथाकथित) संस्कृतीरक्षक बडेजाव माजविणे करीता हिंसाचार करतांना दिसत आहेत. मुदलात आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे सापच नाही परंतु काठ्या आपटणे सुरुच ठेवावे लागले करण एका असत्यास लपविणे करिता असत्याची माळ उघडावी लागते. भोके असणाऱ्या वस्त्रांतून हवा लागून थंडी वाजतेच तशीच यांना हुडहुडी भरली. त्या थंडीवर उपचार म्हणून यांनी हिंसाचाराच्या शेकोट्या पेटवल्या. नुकताच यांच्यातील परमपुरुष नरवीरांनी भविष्यात अत्यंत धोकादायक असणाऱ्या लहान अजाण बालकांच्या गाडीवर लक्ष्यभेदी हल्ला केलाय. प्रसिद्धधी साठी अमाप खर्च करूनही जे शक्य झाले नसते त्याची सिद्धता झाली. याबद्दल संजयाचे अंतः"करणी" आनंदाचे धुमारे फुटले आहेतच. खाजगीत एक गोष्ट म्हणजे, या घटनेनंतर संजयाच्या भ्रमणध्वनीवर 'किती सांगू मी सांगू कुणाला...!' चे गाणेही वाजते आहे. सकल गोष्टी अंती.....

सुज्ञांच्या मनास एक प्रश्न विचारावासा वाटतो की हे जे संस्कृती नामक अगम्य गोष्टीवरती चतुरस्त्र आणि हिणकस प्रदर्शन चालले आहे ते पटते आहे का?
नवसाकरिता असो वा खाण्याकरिता - हिंसा ही अखेरीस हिंसाच असते. ती गाय वा बकरी वा घोडा अशी वेगवेगळी वाटण्यात आणि त्यावरून धार्मिक राजकारण करण्यात कितपत तथ्य आहे? धार्मिक किनार वाढवण्याच्या प्रयत्नात माणुसकीचा दृष्टिकोण संकुचित होतो आहे यावर कुणी विचार का करत नाही?असल्याच संकुचित दृष्टीकोनातून बेगडी सामाजिक रचना अस्तित्वात येते आणि मानवीय सह-संबंधांचे धागे उसवत जातात.

धार्मिकतेच्या नावावर पोळी भाजणारी मंडळी - मग ती लाल हिरव्या भगव्या निळ्या काळ्या कोणत्या का झेंड्या खाली असेना, त्यांना पाठिंबा तुम्हा आम्हा सारख्या सामान्यांतूनच मिळतो. जोवर आपण ही लक्तरे झुगारणार नाही तोवर आपले अस्तित्व चमकून दिसणार नाही.

आणि आम्हास सध्यातर "हर शाख पर उल्लू बैठा" दिसतोय. त्यामुळे भविष्यातही असेच पद्मावतीचे भ्रमाचे भोपळे फुटत राहणार आणि वर"करणी" धुडगूस वाढत राहणार.

प्रतिक्रिया

manguu@mail.com's picture

28 Jan 2018 - 10:48 am | manguu@mail.com

चित्रपट मस्त आहे.

३ डी बघा

शूर वीर संस्कृती रक्षकांना विनंती आहे कि संस्कृतीच्या रक्षण करण्यासाठी त्यांनी स्वखर्चाने "रंगीला खिलजी" म्हणून चित्रपट बनवून सत्य परिस्थिती काय होती हे जास्त चांगल्या पद्धतीने सांगावे. नाही तर घरी बसावे उगाच रस्त्यावर येऊन धिंगाणा घालू नये.

पगला गजोधर's picture

28 Jan 2018 - 2:01 pm | पगला गजोधर

आम्ही पद्मावत पाहिला, लागलीच मिपावरील एका धाग्यात लिहीलं, की काहीच आक्षेपाहार्य नव्हतं चित्रपटात.
एकतर चित्रपट कल्पनेतल्या कथेवर /पात्रांवर, पण त्यावर वास्तवातल्या सत्तेसाठी, अस्मितेवर राजकारण करणारे सो कॉल्ड संस्कृती रक्षक....
मागे बाजीराव मस्तानीच्या वेळेस मिपावरील धाग्यात मी प्रतिक्रिया दिलेली,
यांचं (संस्कृती रक्षकांचं) खररखरं दुखणं वेगळंच...
पण ते उघडपणे सांगता येत नाही, म्हणून भलत्याच गोष्टीकडे अंगुलीनिर्देश करत कांगावी विरोध करायचा... असो.
या चित्रपटा बाबत पण हेच...
या काल्पनिक कथेतील पात्रांच्या अस्मिता तेवढ्या सोयीने वापरायच्या.. पण त्याच कथेतील काल्पनिक पात्रांनी केलेली येडच्यापगिरी मात्र अडचणीची ठरत असल्याने.... विरोध.
असो चालायचंच...
या कथेतील राजब्राह्मण राघव चेतन, ह्याला पीपिंग टॉम वोयेऊरीजम छापचा मानसिक विक्षिप्तपणा असावा,
पद्मावती व तिचा पती रावळ राणा, राजमहालात रात्री प्रणयोत्सुक मनस्थितीत असताना जवळ येतात, तेव्हा भिंतीच्या छिद्रां आडून हा राजब्राह्मण प्रणय पाहण्याचा प्रयत्न करतो, प्रमाद करतो,
त्यासाठी तो पकडला गेला असता, रावळ त्याला 'मी ब्रम्हहत्या करू शकत नाही' या सूत्रानुसार राज्याबाहेर तडीपार करतो (मला तर या प्रसंगी शिवाजी महाराजांच्या मराठी सिरीयल मधील अफझल खानाच्या छावणीतील प्रसंग आठवला, राजे सुद्धा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या खानाच्या वकिलाने तलवारीने वार केला असता, मोठ्या मुश्किलीने स्वतःच्या तलवरीस रोखून धरतात व क्रोधाने म्हणतात 'तुम्ही दूर जा ब्रम्हहत्येचे पातकाचे आम्हांस धनी व्हायचे नाही')
असो चित्रपटात राघव चेतनचे लांब केसं नेहमीच मोकळी दिसतात, त्यामुळे शेंडी बांधणार नाही, अशी प्रतिज्ञा अगदीच अस्थानी दिसली असती, तर तो उर्मटपणे रावळ यालाच पाय धर म्हणतो...
पुढे अल्लाउद्दीन खिलजीला जाऊन मिळतो, व त्याला पद्मावती संदर्भात उत्सुकता निर्माण करून चित्तोडवर आक्रमण करायाला लावतो, व घरभेदयाप्रमाणे पुष्कळ माहिती पुरवतो...
युद्ध जिंकणे एवढीच नीती असणारा, व ब्रम्हहत्या वै सूत्र न पाहणारा, हाच खिलजी पुढे पद्मावती दर्शनाच्या अटी साठी एका सेकंदात राघव चेतनचे मुंडके तलवारीने उडवतो.
... आजच्या भारतात, रामजन्मभूमी व पद्मावतीच्या काल्पनिक कथेतील अस्मितेवर सत्ता घेणारे/घेऊ पाहणारे, एखादया कसलेल्या जादूगाराप्रमाणे, हवेतून गोष्टी आणून दाखवण्यासाठी हातचलाखीचे डिसेप्शन दाखवतातच, यात जनतेची नजर दुसरीकडे खिळवून आपले इप्सित साध्य करतात...
पिंगा डान्स मधेही तसा काहीच प्रॉब्लेम नव्हता, घुमर गण्यातही काही प्रॉब्लेम दिसत नाही, तरी विरोधासाठी या गाण्यांच्या विरोधाचे डिसेप्शन पुढे करून, संस्कृती रक्षक जनतेची नजर गाण्यावर खिळवून, खर्र्याखुऱ्या कारणावरून दूर नेण्याचा प्रयत्न करत आहेत का ?

manguu@mail.com's picture

28 Jan 2018 - 2:03 pm | manguu@mail.com

सहमत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jan 2018 - 11:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भन्साळीने भारतीय लोकांची मानसिकता चांगली ओळखली आहे. बाजीराव मस्तानी, आता पद्मावती, पुढे अजून काही इतिहास पुरुष ज्यांच्यामुळे असे वाद होतील असे कोणतेही पात्र पुढे ते रंगवतील. बक्कळ पैसे कमावतील. दलालांना ते काहीएक टक्केवारी देतील. लोकांच्या मानसिकता इतक्या रिकामचोट झाल्यात की विचारु नका. अशा प्रवृत्तींना आवरणे अवघड आहे. अस्मिता, जात, भाषा, पुरुष, महापुरुष, स्त्रीया, या सर्वांनी वाटून घेतल्या आहेत.

आता आम्ही सांगूच तसेच चित्रपट आले पाहिजेत. आम्ही सांगू तसेच पात्र रंगवले पाहिजेत. आम्ही म्हणू तसेच गाणी चित्रपटात असली पाहिजेत, आम्ही म्हणू तशीच पुस्तके छापली पाहिजेत. आम्ही म्हणू तशीच कविता लिहिली पाहिजे. आम्ही म्हणू तसेच लोकांनी वागले पाहिजे. रस्त्यावर येणारे आणि व्यवस्थेत धुडगुस घालणारे साले, असे फोडून काढले पाहिजेत की आयुष्यभर त्याचे ठसे शरीरभर दिसले पाहिजेत. आणि पुन्हा असले येडेचाळे करण्याची आठवण जरी झाली तरी कापरे भरले पाहिजेत.

बाकी, रणवीर आणि दीपिकासाठी पद्मावत पाहण्यात येईल. :)

-दिलीप बिरुटे
(रसिक)

मुक्त विहारि's picture

28 Jan 2018 - 12:33 pm | मुक्त विहारि

फक्त एक वाक्य सोडून....

"रस्त्यावर येणारे आणि व्यवस्थेत धुडगुस घालणारे साले, असे फोडून काढले पाहिजेत की आयुष्यभर त्याचे ठसे शरीरभर दिसले पाहिजेत. आणि पुन्हा असले येडेचाळे करण्याची आठवण जरी झाली तरी कापरे भरले पाहिजेत."

हे असे इंग्रजांनी केले होतेच की....

ज्या देशात, शिक्षकांचीच जिथे हेळसांड होते, त्या देशातील विद्यार्थी उत्तम संस्कारी निपजतीलच, अशी अपेक्षा धरणेच अयोग्य.नंदराजाच्या काळात पण हे झाले (शिक्षकांची हेळसांड) आणि ब्रिटिशांनी तोच कित्ता गिरवला आणि सध्या पण शिक्षणाचा बाजार सुरु आहेच की....

आणि सिनेमांच्या बाबतीत म्हणाल तर, ह्या क्षेत्रातील आर्थिक गणिते देशाच्या उन्नतीला अजिबात मदत करत नाहीत, त्या पाण्यात डुबकी मारणे मला तरी जमणार नाही.सिनेमाचे पैसे सरळ अनाथाश्रमाला द्यायचे आणि मोकळे व्हायचे.निदान ती अनाथ बालके तरी ४ घास घातील.

असो,

पसंद अपनी-अपनी खयाल अपना-अपना.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jan 2018 - 6:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद आवडला असे कळविल्याबद्दल आभार...!

बाकी आपल्या प्रतिसादातील शिक्षणाच्या बाजाराचा आणि धाग्याचा संबंध काही कळला नाही ? या सर्व गोष्टीला शिक्षण जवाबदार आहे असे म्हणायचे आहे का ?

-दिलीप बिरुटे

हो....

बहूदा, तुम्ही अद्याप "कौटिल्याचे अर्थशास्त्र" हे पुस्तक अद्याप वाचलेले दिसत नाही.कारण "शिक्षणाचा व शिक्षकांचा प्रभाव किती व कसा पडतो? ह्याचे सखोल मार्गदर्शन त्या पुस्तकात आहे.

शिक्षण म्हणजे सर्वांगिण सिक्षण.

मानसिक, सामाजिक, शारिरीक आणि अर्थाजन करण्यासाठी लागते ते शिक्षण.केवळ लिहिता-वाचता येते आणि घोकंपट्टी करून पास होणे, ह्याला मी तरी शिक्षण म्हणत नाही.

पण....

आपण समाजाचे काही देणे लागतो आणि त्यासाठी क्वचित प्रसंगी पदरमोड पण करायला लागते. ह्याची सामाजिक शिकवण किती शिक्षक देतात? कुठल्याही प्रसंगी तारतम्याने वागावे, उगाच भावनेच्या आहारी जावून निर्णय घेवू नये, ह्याचे "मानसिक" शिक्षण पण शाळेत मिळत नाही.व्यायामाची आवड निर्माण होण्यासाठी कुठल्याही शाळेत मनापासून प्रयत्न केले जात नाहीत.मनसोक्त खेळा, तब्येत कमवा आणि मग शिका, हे सामान्य तत्व आहे. "शरीरं आद्यं खलू धर्म साधनं." (इथे विद्यार्थांचा धर्म म्हणजे शिक्षण घेणे आणि पालकांचा धर्म म्हणजे अर्थाजन करतांनाच सामाजिक बांधीलकी जपणे आणि ह्या दोन्ही गोष्टींसाठी सुदृढपणा हा हवाच.)

आजकालच्या शिक्षण पद्धतीत मुलांचा ८० ते ९०% वेळ शिक्षकांबरोबरच जातो.शाळा आणि क्लास सकट.मग ही सामाजिक जबाबदारी बर्‍यापैकी शिक्षकांवरच येवुन पडते.किती शाळेत "सामाजिक भान" हा विषय आस्थेने शिकवला जातो?

शिवाय किती तरी शाळेत शिक्षकांना फक्त "शिकवणे" इतकेच कार्य नसते.मतदारांच्या यादी पासून ते पोलिओचे डोस देइ पर्यंत अशैक्षणिक काम पण शिक्षकांच्याच माथी.ह्यात संस्थेसाठी आर्थिक मदत मिळवण्याचे पवित्र कार्य पण शिक्षकांच्याच माथी.टाळी एका हाताने कधीच वाजत नाही.

सुदृढ पिढी तयारी करण्यासाठी पालकांच्या बरोबरीने शिक्षकांची मदत ही हवीच.केवळ एका घटकाकडे संपूर्ण जबाबदारी देण्यात काय अर्थ?आणि पालक पण फक्त शालेय गुणांनाच महत्व देत असल्याने, ह्या समाजाच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या बाबींकडे कानाडोळाच करतात.

भारतात सुदृढ पिढी का नाही? हा एका चर्चेचा विषय होवू शकतो.पण ह्या आधीच १८६२ (हो अठराशे बासष्ठच्या सुमारास "गोविंद बाबाजी जोशी" हे गावोगावी जावून सभेत मांडत होतेच.) आज जवळपास १५० वर्षे झाली पण अद्यापही ही स्थिती सुधारलेली नाही आणि सर्वांगिण शिक्षणा बाबतीत पाल्यांची जर अशीच आबाळ होत राहिली तर आता ह्या देशात "चाणक्य" पण होणार नाहीत.मग "चंद्रगूप्त" तर मिळणारच नाही.

जमल्यास खालील पुस्तक जरूर वाचा.

"गेल्या ३० वर्षांपासूनचे लोक व त्यांच्या समजूती अथवा माझे प्रवासाची हकीकत (रोजनिशी)"

लेखक : गोविंद बाबाजी जोशी

प्रकाशक : माध्यम प्रकाशन

तुम्ही पुस्तक नक्कीच वाचाल अशा अपेक्षेत आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jan 2018 - 10:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या विचारांचा आदर आहेच. पण ही मतं अवांतर आहेत असे वाटते. शिक्षण कसे असते, शिक्षणाचे उद्देश,अभ्यासक्रम कसे ठरतात, तो वेगळा विषय आहे. बाकी, शिक्षण आणि पद्मावत यांचा सबंध जोडण्याचा प्रयत्न आवडला. म्हणजे, असाच संबंध जोड़ायचा तर कोणत्याही सामाजिक प्रश्नांचा संबंध कुठल्याही ज्ञानशाखेशी जोड़ता येईल. छान. बाकी जोशीबुवाचं पुस्तक मिळालं तर वाचण्यात येईल. आभार.

-दिलीप बिरुटे

त्या त्या देशात हे असले प्रश्र्न कमी प्रमाणात उदभवतात.

उदा.

जर्मनी, जपान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया.ह्या देशांत प्रायमरी टीचरला पण उत्तम पगार असतो आणि शिक्षकांना अशैक्षणिक कामांसाठी वेठीस धरले जात नाही.

जर्मनीत तर "वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छता कशी राखायची? रस्ता केंव्हा ओलांडायचा?" ह्या सारखे समाजाला उपयुक्त शिक्षण पण शाळेतच देतात.

अर्थात, तुम्ही अद्याप तरी "कौटिल्याचे अर्थशास्त्र" पुस्तक न वाचल्याने, उत्तम समाज जर घडवायचा असेल तर शिक्षक उत्तमच हवेतच आणि ज्ञानासारख्या कामात राजकीय हस्तक्षेप नको, ही संकल्पना तुम्हाला पटणार नाही.

मना घडवी संस्कार

manguu@mail.com's picture

29 Jan 2018 - 1:24 am | manguu@mail.com

इथे शिक्षकाना पगार कमी आहेत का ?

उगा काहीतरी विचरून टाइमपास करू नका. गृहपाठ करून मग प्रश्न विचारा.

गृहपाठ - साहना यांचे सगळे धागे.

मुक्त विहारि's picture

29 Jan 2018 - 1:45 am | मुक्त विहारि

काही जण अर्धवट प्रतिसाद वाचतात.

"ह्या देशांत प्रायमरी टीचरला पण उत्तम पगार असतो आणि शिक्षकांना अशैक्षणिक कामांसाठी वेठीस धरले जात नाही."

ह्यापैकी त्यांनी " शिक्षकांना अशैक्षणिक कामांसाठी वेठीस धरले जात नाही." हा मूद्दा मात्र लक्षांत घेतला नाही.

मोगा, सचिन, उद्दाम. चंपाबाई आणि पोटे इत्यादी मंडळी पण असेच करता-करता हेवनवासी झाले.

"manguu@mail.com" ह्या आय.डी.च्या प्रतिसादांना मी तरी जास्त महत्व देणार नाही.

manguu@mail.com's picture

29 Jan 2018 - 8:54 am | manguu@mail.com

अशैक्षणिक कामे रोज असतात का ?

manguu@mail.com's picture

29 Jan 2018 - 9:37 am | manguu@mail.com

आजचा काळ हा नोकरीत पडेल ते काम करा , अन्यथा घरी जा / कारवाईस सामोरे जा , असा आहे. प्रत्येक म्यानेजमेंट सरकारी वा खाजगी , कॉस्ट कटिंगच्या मागे आहे.. एका शिक्षकाने दोन् शाळा बघणे , एक डॉक्टरने दोन् वॉर्ड बघणे , पोलिसानी एक्स्ट्रॉ ड्युटी करणे , पैसे न मिळता ओव्हरटाइम करणे .. हे सर्वच लोक फेस करत आहेत.

तरीही कामात क्वालिटी देणे भागच आहे.

स्वत: महामहीम त्यांचे प्रधानसेवकाचे काम संभाळून दोन तीन डिपारमेंटचा ॲडिशनल चार्ज धरून असतात ना ?

गृहपाठ - साहना यांचे सगळे धागे. >> I hope mangu has better choice than that!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jan 2018 - 6:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या अवांतर प्रतिसादामुळे मूळ धाग्याकडे दुर्लक्ष होत आहे. भन्साळीने कोणती पुस्तके वाचायला पाहीजे त्याचं प्राथमिक शिक्षण कुठे व्हायला पाहिजे होतं, कोणत्या महाविद्यालयात त्याने शिकायला पाहिजे होतं ? त्याच्या संसारावर आणि संस्कारावर कोणाच्या प्रभाव पड़ायला पाहिजे होता ? त्याच बरोबर मिपाकरांनी कोणत्या शाळा महाविद्यालयात शिक्षण घ्यायला पाहिजे होते हे सर्व येऊ द्या. उत्तम समाजासाठी कोणत्या पौष्टिक (विचारांचा) आहाराची गरज आहे. उशाला कोणती पुस्तके घेऊन झोपलं पाहिजे हे सर्व तिकडे घेऊ.

अवघड आहे हे सर्व !! :)

अवांतर : आपली जालशेती काय म्हणते ? भारत देश सोडून जाणार होता त्याचं काय झालं ? ;)

-दिलीप बिरुटे

अजिबात नाही...

सामाजीक स्तर जर उंचावायचा असेल तर, सर्वांगिण शिक्षणाला पर्याय नाही.तसे झाले नाही तर, हे असे समाजाला घातक प्रसंग वेळोवेळी येणारच.

"भन्साळीने कोणती पुस्तके वाचायला पाहीजे त्याचं प्राथमिक शिक्षण कुठे व्हायला पाहिजे होतं, कोणत्या महाविद्यालयात त्याने शिकायला पाहिजे होतं ? त्याच्या संसारावर आणि संस्कारावर कोणाच्या प्रभाव पड़ायला पाहिजे होता ?"

ह्यात भन्साळींचा काय संबंध?दंगे काही त्यांनी घडवले नाहीत.

"त्याच बरोबर मिपाकरांनी कोणत्या शाळा महाविद्यालयात शिक्षण घ्यायला पाहिजे होते हे सर्व येऊ द्या. उत्तम समाजासाठी कोणत्या पौष्टिक (विचारांचा) आहाराची गरज आहे. उशाला कोणती पुस्तके घेऊन झोपलं पाहिजे हे सर्व तिकडे घेऊ."

मिपाकरांनीच कशाला पण पालकांनी कुठली पुस्तके वाचली पाहिजेत ह्याचा उल्लेख, "मुलांची शेती" ह्या लेखमालेत केला आहेच.

अवांतर : आपली जालशेती काय म्हणते ? भारत देश सोडून जाणार होता त्याचं काय झालं ?

हे थोडे वैयक्तिक आहे.शिवाय शेती बाबत म्हणाल तर आर्थिक पाठबळ थोडे कमी पडत आहे. एकाच वेळी ४-४ आर्थिक आघाड्या सांभाळणे मला जमत नाही.शिवाय
वडीलोपार्जित शेती नसल्याने, येत्या २-३ वर्षात ते नक्कीच शक्य होईल.जिथे शेती आहे तिथे मत्स्य-शेती आणि मोत्यांची शेती करायची असल्याने आर्थिक बळ मिळाले की, सुरु करीनच. भारत देश सोडण्याबाबत म्हणाल तर, प्रयत्न सुरुच आहेत.सोडला की कळवीनच.चिंता नसावी.

अरविंद कोल्हटकर's picture

29 Jan 2018 - 9:14 am | अरविंद कोल्हटकर

बहूदा, तुम्ही अद्याप "कौटिल्याचे अर्थशास्त्र" हे पुस्तक अद्याप वाचलेले दिसत नाही.कारण "शिक्षणाचा व शिक्षकांचा प्रभाव किती व कसा पडतो? ह्याचे सखोल मार्गदर्शन त्या पुस्तकात आहे.

इति मुक्तविहारी.

ह्या विधानासाठी आधार म्हणून अधिकरण/अध्याय/प्रकरण असा सन्दर्भ दाखविलात तर कौटिल्याने नक्की काय म्हटले आहे ते आम्हास पडताळता येईल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jan 2018 - 12:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कौटिल्य वरील आपल्या सन्दर्भीय प्रतिसादानुसार त्या बाबतीत काय म्हणतो ते थोडक्यात समजेल असे इथेच लिहावे असे सुचवतो. म्हणजे वाचकांना आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे ते समजून येईल.

-दिलीप बिरुटे

मुक्त विहारि's picture

29 Jan 2018 - 12:38 pm | मुक्त विहारि

पुस्तका बद्दल लिहायला हवेच...कारण बर्‍याच जणांना पुस्तके वाचायला वेळ मिळत नाही....

manguu@mail.com's picture

29 Jan 2018 - 12:59 pm | manguu@mail.com

तसे डिटेल सांगणे काही लोकांच्या परंपरेला धरून होत नाही.

कुणी काही विचारले की

वाचन वाढवा

इतके लिहून अंतर्धान पावायचे असते.

त्यात असंख्य प्रकरणे आहेत.केवळ शिक्षणच नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाची कर्तव्ये पण उत्तम सांगीतलेली आहेत.

शिवाय पुस्तकाचे किंवा कुठल्याही कलाकृतीचे परीक्षण करतांना, परीक्षक थोडा-फार भेदभाव करणे शक्य होवू शकते.पण पुस्तकाची आणि लेखकाची तोंड ओळख मात्र जरूर करून देईन,

तरी पण एक करा, पुस्तक एकदा तरी जरूर वाचा.एक उत्तम पालक तर नक्कीच होवू शकाल. ही १००% खात्री.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jan 2018 - 4:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मालक, चर्चेत कौटिल्य तुम्ही आणला. त्याचे शैक्षिणिक विचार आणि धाग्याचा सबंध जोडून पाहिला,आता त्याचा आणि धाग्याचा कसा सबंध आहे तितके सांगा ? की फक्त तुम्हाला मी कौटील्याचे अर्थशास्त्र हा ग्रंथ वाचला आहे इतकं सांगायचं होतं ? आणि तेवढेच सांगायचं असेल तर तुमचं काम झालं आहे.

-दिलीप बिरुटे

manguu@mail.com's picture

28 Jan 2018 - 7:18 pm | manguu@mail.com

सिनेमाची आर्थिक गणिते देशाला मदत करत नाहीत ..

मग सिनेमाऐवजी संगीत नाटके पाहिली तर आपला ( आणि देशाचा ) उद्धार होईल का ?

आनन्दा's picture

28 Jan 2018 - 10:05 pm | आनन्दा

शॄंगार पुरे.
नाहीतर डुआयडीचं पितळ उघडं पडेल.

आनन्दा's picture

28 Jan 2018 - 10:03 pm | आनन्दा

याबाबतीत सहमत आहे..
आता पुरोगामी हा चित्रपट म्हणजे त्यांचे पुरोगामित्व मिरवण्याची संधी म्हणून या चित्रपटाला गर्दी करणार..
कुंपणावरचे नेमके आहे तरी काय म्हणून बघायला जाणार
आणि संस्क्रुतीरक्शक गुपचुप सगळे बघतात तर एकदा बघायला काय हरकत आहे दीपिकाचं पोट?

एकंदरीत १०० कोटी कुठेच जात नाहीत.. बाकी सरकारच्या नावाने गळे काढायला आहेतच विरोधी पक्ष.. त्यांच्याकडून पण मिळेलच काहीतरी चंदा. हा का नाका..

बादवे, करणी सेना काँग्रेसला पाठिंबा देणार अहे असे ऐकतो.. खरे आहे का ते? कोंग्रेसवर इतके वाईट दिवस आले?

तर्री's picture

28 Jan 2018 - 12:13 pm | तर्री

आणि पुन्हा असले येडेचाळे करण्याची आठवण जरी झाली तरी कापरे भरले पाहिजेत. डायरेक्ट हिंसाचार ? काय आहे काय ?

ते किशोरकुमार , संजय गांधी आणि आणि आणीबाणी प्रकरण एकंदरीत बरेच सौम्य असावे नाही ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jan 2018 - 6:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रस्त्यावर येऊन धुडगुस घालणारी ही जी माथेफिरु पब्लिक आणि त्यांचे नेते बेबंद होऊन कृती करतात, जेव्हा आदेश नसतो तेव्हा पोलिस निमुटपणे या प्रकाराकडे दुर्लक्ष करते, पण जेव्हा पोलिसांना आदेश असतात तेव्हा सौम्य लाठीमार होतो त्या ऐवजी ''निब्बर'' ठोकून काढले पाहिजेत. इतकेच म्हणने आहे.

-दिलीप बिरुटे

manguu@mail.com's picture

28 Jan 2018 - 2:05 pm | manguu@mail.com

त्या काळात सामान्य लोकांच्या स्त्रीया राजाम्हाराजांसमोर नाचायच्या , त्याना वारं घालायच्या , पाय चेपायच्या , आंघोळ घालायच्या ...

आज षिनेमात कुठल्या जुन्या ऐतिहासिक किंवा काल्पनिक राण्यांच्या नावाने नाचल्या २-४ नट्या , तर इतके काय आकाश कोसळते ?

गामा पैलवान's picture

28 Jan 2018 - 9:04 pm | गामा पैलवान

वादग्रस्त चित्रण दाखवून भावना भडकावायच्या आणि नंतर गळे काढायचे. संजय लीला भन्साळ्याला बाजीराव मस्तानीच्या वेळेस चापटवला असता तर ही हिंमत केली नसती. भले पद्मावती काल्पनिक कथा असेल, पण राजपुतांना ती खरी वाटते. कोणी जर प्रेषित महमंदांच्या स्वर्गारोहणावर चित्रपट बनवला तर त्याची किती शकलं उडतील !

-गा.पै.

manguu@mail.com's picture

28 Jan 2018 - 10:07 pm | manguu@mail.com

चित्रपटात राजपूत स्त्री व पुरुषांबाबत गौरवोद्गारच आहेत

टवाळ कार्टा's picture

29 Jan 2018 - 4:06 am | टवाळ कार्टा

पिच्चर काढला तर चापटवायचे....मग गडकिल्ल्यांच्या पायथ्यापर्यन्त असलेली बांधकामे दिसत नाहीत?

पगला गजोधर's picture

29 Jan 2018 - 7:23 am | पगला गजोधर

पिच्चर काढला तर चापटवायचे....मग गडकिल्ल्यांच्या पायथ्यापर्यन्त असलेली बांधकामे दिसत नाहीत?

टका सहमत, नुसतं चापटवन्यात पुरुषार्थ दाखवणारे, लहान मुलांच्या बसला टार्गेट करतात, कुजबूजी यंत्रणा लगेचच, 'ते मुस्लिम तरुण होते दगडफेक करणारे', अश्या अफवा पसरवतात...
बाकी गडकिल्ल्याबाबतीत तर आनंदी आनंद आहे,
गडाच्या पायवाटेवर तर काचेच्या चपट्या बाटल्यांचा खच असतो... दुर्दैव...

टवाळ कार्टा's picture

29 Jan 2018 - 2:50 pm | टवाळ कार्टा

कुजबूजी यंत्रणा लगेचच, 'ते मुस्लिम तरुण होते दगडफेक करणारे', अश्या अफवा पसरवतात...

हे मला माहित नव्हते, अशी कुजबुज मी तुमच्याकडूनच ऐकली :)

पगला गजोधर's picture

29 Jan 2018 - 3:42 pm | पगला गजोधर

टक्या तु नै बे कुजबुजी...
उगा कुजबुजी लोकांचं बालंट स्वतावर नको घेऊ....
बाकी तुझ्या माहिती साठी

Viral Msg Indicating Muslims Attacked Gurugram School Bus is Fake
By Pratik Sinha, Alt News
January 25, 2018 at 8:40 PM

https://www.thequint.com/news/webqoof/message-claiming-muslims-attacked-...

टवाळ कार्टा's picture

29 Jan 2018 - 4:07 am | टवाळ कार्टा

कोणी जर प्रेषित महमंदांच्या स्वर्गारोहणावर चित्रपट बनवला तर त्याची किती शकलं उडतील !

याबाबतीत सहमत

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

28 Jan 2018 - 9:53 pm | झपाटलेला फिलॉसॉफर

कोणी जर प्रेषित महमंदांच्या स्वर्गारोहणावर चित्रपट बनवला तर त्याची किती शकलं उडतील !

१००% सहमत

करणी सेनेने अशी करणी करावे की रस्त्यावर जाळपोळ अथवा हिंसक प्रदर्शने करण्या ऐवजी एकदाच त्या भुस्नळ्याची तंगडी तोडून टाकावी . पुन्हा कुणा फुर्रोगाम्याची हिम्मत व्हायची नाहे संस्कॄती अन इतिहासावर थुंकण्याची !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jan 2018 - 9:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संस्कृती आणि इतिहासावर परंपरावाद्याचा कॉपीराइट आहे का ??:)

तसे असेल तर हे सर्वात धोकादायक आहे असे वाटते.

-दिलीप बिरुटे

कॉपीराईट नाहीये, पण म्हणून कोणालाही अस्मितांशी खेळ करण्याचं परमिट पण मिळत नाही.

(हा प्रतिसाद जनरल अहे, प्रत्यक्षात पद्मावतीत काय झालंय हे आता मला तो चित्रपट टीव्हीवर आल्यावरच कळेल)

टवाळ कार्टा's picture

29 Jan 2018 - 4:07 am | टवाळ कार्टा

तुम्ही पिच्चर बघितला का? का त्याची गरज नाही :)

पगला गजोधर's picture

29 Jan 2018 - 7:34 am | पगला गजोधर

शार्ली हेब्दो च्या पुरोगामी पत्रकारांनी दिलेली जीवाची आहुती आठवत असेन, तर त्यांच्यावर भ्याड हल्ला करणारे धर्म मार्तंड प्रवृत्ती बोकाळु नये इथेही,
तंगडी मोडायची तर् असल्या धर्म मार्तंडांची....

बबन ताम्बे's picture

28 Jan 2018 - 11:20 pm | बबन ताम्बे

आवडला. भावना दुखावण्यासारखं काहीच नाहीये.
उलट राजपुतांचा गौरवच केलाय सिनेमामध्ये. राणी पद्मावतीच्या पात्रालाही संयत दाखवलंय. आक्षेपार्ह काहीच वाटले नाही. बरं ही काल्पनिक कथा आहे असा प्रारंभीच डिस्क्लेमर आहे. मग विरोध कशासाठी ?

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

29 Jan 2018 - 12:36 pm | झपाटलेला फिलॉसॉफर

उद्या डिस्क्लेमर टाकुन आदरणीय थोरल्या महाराजाना त्यांच्या पत्नीबरोबर डान्स करताना भुस्नळ्याने दाखवले तर हिन्दू/मराठे सहन करतील का?
किंवा PBUH प्रेषितास सहा वर्‍षाच्या भाचीबरोबर डान्स करताना भुस्नळ्याने दाखवले तर शान्तताप्रिय समाज त्याला जिवन्त सोडील का?

काल डिस्क्लेमर चं बोलताय राव ?

बबन ताम्बे's picture

29 Jan 2018 - 2:23 pm | बबन ताम्बे

मगच तुम्ही बोला.

manguu@mail.com's picture

28 Jan 2018 - 11:45 pm | manguu@mail.com

In the film, Jalaluddin Khilji is portrayed as an arrogant, cunning and cruel man. He was actually popular for being a mild mannered and humble monarch.

म्हणजे ( हे खरे असेल तर ) थयथयाट खिल्जीच्या वारसानी / चाहत्यानी करायला हवा !
https://en.m.wikipedia.org/wiki/Padmaavat

खर आहे, म्हणूनच हिंदूंच्या कोणत्याही मेनस्ट्रीम संघटना यात उतरली नव्हती. करणी सेना, ज्यांनी हे सगळे केले, ते आता कॉंग्रेसच्या गोटात दाखल होतायत..
राजपूतांची आधीच आरक्षणाची मागणी आहेच.

बहुधा हा सगळा पटेल आरक्षण आणि मराठा मोर्चा सारखा प्रकार दिस्तोय.. ज्यात नॉन पोलिटिकल प्रकरणात हवा भरून ते आधी तापवून मग आपल्या पोळीवर तूप ओढण्याचा प्रयत्न कोंग्रेस करतेय. अश्या प्रकारे जातीयवादी प्रकार वाढीला लागणे तितकेसे चांगले वाटत नाही. यामध्ये परवापरवा झालेले कोरेगाव भीमा प्रकरण पण येते.

manguu@mail.com's picture

29 Jan 2018 - 8:26 am | manguu@mail.com

म्हणजे करणीसेना वगळता मेनस्ट्रीममधील इतर हिंदू संघटनाना खिल्जीबद्दल बंधुभाव आहे की काय ?

पाकिस्तानात शिनेमा बिनाकट रिलीज झाला, गनिमी काव्याने दुश्मन मारला, नायतर क्रुरकपटी, गचाल, स्त्रिलंपट असा मुसलमानी पात्र पाकिस्तानात! आणि वर हिंदू राजाची उदो उदो

पाकिस्तानात शिनेमा बिनाकट रिलीज झाला, गनिमी काव्याने दुश्मन मारला, नायतर क्रुरकपटी, गचाल, स्त्रिलंपट असा मुसलमानी पात्र पाकिस्तानात! आणि वर हिंदू राजाची उदो उदो

अंतु बर्वा's picture

29 Jan 2018 - 7:38 am | अंतु बर्वा
अंतु बर्वा's picture

29 Jan 2018 - 7:38 am | अंतु बर्वा
अंतु बर्वा's picture

29 Jan 2018 - 7:40 am | अंतु बर्वा

भारत एक खोज मधला पद्मावतीचा एपिसोड पाहिला... एक तर त्यातही पद्मावतीची कंबर दाखवलेली आहेच. मग त्यावर कुणाला काहिच आक्षेप कसा नाही? दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट दिसली ती म्हणजे भारत एक खोज च्या एपिसोडच्या एडिटिंग करणार्यांमध्ये एक नाव... आदरणिय भन्साळी साहेब असल्याच दिसलं...

दिगोचि's picture

29 Jan 2018 - 12:03 pm | दिगोचि

या सर्व विरोधकाना एक सान्गावेसे वाटते की एका ४-५ शे वर्षापूर्वी होऊन गेलेल्या एका राणीसाठी हे जे कार्य करत आहात तसाच उत्साह मुलीवरचे व बायकावरचे अत्याचार थाम्बवायला करा.

manguu@mail.com's picture

29 Jan 2018 - 2:41 pm | manguu@mail.com

व्हाट्सप आले.

*दिल्ली की कब्र में दफन है वो सुल्तान अलाउद्दीन खिलजी, जिसे आज की गंदी राजनीति ने बना दिया शैतान*

पुरे देश और विदेश में उनके नाम पर हंगामा मचा है, लेकिन उनकी कब्र के करीब से लोगों का कारवां ऐसे ही गुजर जाता है. कब्र के पास खड़े लोग दिल्ली सल्तनत के इस शहंशाह के साथ सेल्फी लेने में ब्यस्त हैं, किसी को इस बात का एहसास नहीं है कि वो अलाउद्दीन खिलजी अपनी कब्र में आराम फारमा रहे है जिन्हें आज की गन्दी राजनीती का शिकार होना पड़ रहा है.
दिल्ली के दक्षिड़ में स्थित महरौली इलाके में कुतुब मीनार है गुलाम वंश के सुलतान कुतुबुद्दीन ऐबक ने इसको बनवाया था. कुतुब मीनार को देखने देश-विदेश  से हजारों लोग रोजाना आते हैं. कुतुब मीनार से सटे परिसर में ‘अलाउद्दीन खिलजी का मदरसा’ है.
मदरसे के बाहर पुरातत्व सर्वेक्षण विभाग ने एक पथर लगाया है जिस पर लिखा है, “ये चौकोर अहाता जो ऊंची दीवारों से घिरा है, यह मूल रूप से एक मदरसा था जिसका प्रवेश द्वार पश्चिम में है. इसका निर्माण तालीम देने के लिए अलाउद्दीन खिलजी (ईसवी 1296 -1316 ईसवी) द्वारा करवाया गया था. अहाते के दक्षिणी हिस्से के बीच में  खिलजी का मकबरा है. मदरसे के साथ ही मकबरे के चलन का यह हिंदुस्तान में पहला नमूना है.

इतिहासकार आर वी स्मिथ अलाउद्दीन खिलजी के बारे में कहते है  “अलाउद्दीन खिलजी औरतबाज नहीं थे, जैसा कि आजकल उनके चरित्र को पेश किया जाता है. फ़र्ज़ी इतिहास ने एक ऐसे बादशाह की छवि को बिगाड़ कर रख दिया है जिसने मंगोलों से हिंदुस्तान की हिफाजत की. अगर अलाउद्दीन खिलजी नहीं होते  तो आज हिंदुस्तान की नस्लें बर्बाद हो गई होती.

‘दिल्ली दैट नो वन नोज’ और ‘दिल्ली : अननोन टेल्स आफ ए सिटी’ जैसी किताबों के लेखक आर वी स्मिथ कहते हैं, “खिलजी ने अपने साम्राज्य के विस्तार के लिए चितौड़ पर हमला किया था, पद्मावती को जीतने के लिए नहीं, और चितौड़ के राजा रतन सिंह को हराने के बाद जब उन्होंने रानी पद्मिनी की खूबसूरती के चर्चे सुने तो वह उत्सुकतावश उसे देखना चाहां.” जैसा कि सब किस्सों कहानियों में सुनते आए हैं कि राजपूत रानी एक विशाल आईने के सामने आकर खड़ी हो गई और खिलजी ने उस आईने में केवल रानी पद्मिनी का अक्स देखा था.

स्मिथ कहते हैं कि खिलजी की मौत के करीब ढाई सौ साल बाद भक्तिकाल की निर्गुण प्रेमाश्रयी धारा के कवि मलिक मुहम्मद जायसी ने ‘पद्मावत’ की रचना की और उसे रोचक बनाने के लिए उसमें बहुत-सी काल्पनिक बातें जोड़ी. वह इस आम धारणा को भी गलत बताते हैं कि अलाउद्दीन खिलजी के हाथों में पड़ने से बचने के लिए रानी पद्मावती ने जौहर किया था. वह राजपूत राजा रतन सिंह के जंग में हार जाने के बाद रवायत के चलते महल की बाकी महिलाओं के साथ चिता में कूद गई थी.

अहाते के पास खड़े गार्ड को भी यह नहीं पता की जहाँ पर वो दिन-भर खड़े होकर नौकरी करता है वो किसकी कब्र है. जवाहर लाल नेहरू विश्वविद्यालय में इतिहास के प्रोफेसर राकेश बाताबयाल खिलजी की वास्तविकता को लेकर छिड़े विवाद में कहते हैं कि इस विषय में इतिहासकारों के लिए कुछ बोलने की गुंजाइश ही नहीं बची है क्योंकि यह अभिव्यक्ति की आजादी, कलात्मकता और राजनीतिक बहस का रूप ले चुका है.
बाताबयाल कहते हैं, “हिस्ट्री इज प्रोडक्शन आफ नॉलेज, लेकिन आज देश में ऐसी ताकतें पैदा हो गई हैं जो इतिहास को नहीं मानतीं.” उनका कहना है कि इतिहास के ज्ञान के नाम पर जहालत इतनी है कि फिल्मों को ही इतिहास मान लिया जाता है. हमें यह समझना होगा कि फिल्म इतिहास नहीं है.

वह बताते हैं, “खिलजी दिल्ली के ऐसे पहले शासक थे जिन्होंने कालाबाजारी रोकने के लिए वस्तुओं के दाम तय किए, सरकारी मंडी का निर्माण करवाया, भ्रस्टाचार रोकने के लिए जासूसों की एक टीम बनाई, गरीबों, बूढ़ो और विधवाओं के लिए मुफ्त  अनाज देने का नियम बनाया, डिस्कवरी ऑफ़ इंडिया में पंडित जवाहर लाल नेहरू ने भी अलाउद्दीन खिलजी को इतिहास का एक अच्छा प्रशासनिक सुलतान बताया है.

मौजूदा दौर की सरकार संघ की गन्दी मानसिकता को लागू करने के फेहरिस्त में अब इतिहास बदलने को बेताब है. इनको अलाउद्दीन खिलजी की ऐतिहासिक उपलब्धियों से कोई मतलब नहीं है और ना ही सुल्ताल खिलजी के जन योजनाओं से जिन्होंने प्रशासनिक तौर पर देश की दशा एवं दिशा बदल दी. इन असामाजिक तत्वों को सिर्फ एक काल्पनिक किरदार पद्मावती की चिंता है जिसे देश और विदेश के महान इतिहासकार झुठला चुके है. ये सब हंगामा होता देख  दिल्ली सल्तनत के अज़ीमुस्सान शहंशाह की रूह खँडहर मक़बरे में अपनी बेबसी पर आंसू बहा रही होगी.

चिगो's picture

29 Jan 2018 - 5:48 pm | चिगो

'पद्मावत' चित्रपटावर आक्षेप घेण्याचा अधिकार माझ्यामते फक्त 'अल्लाऊद्दीन खिलजी'लाच आहे.. इतका जास्त निगेटीव्ह दाखवलाय त्याला की ब्बास.. मला तर प्रश्नच हा पडला होता की एवढा स्त्री-लंपट, आततायी माणूस २० वर्षांचं 'रिफॉर्मिस्ट' सरकार चालवूच कसं शकतो? आणि ओहोहो, काय ते राजपुतांचं ग्लोरीफीकेशन ! च्यायला, भन्सालीला खरंतर पैसे दिले पाहीजेत करणी सेनेनं राजपुतांचा उदो उदो केलाय म्हणून..

चिगो's picture

29 Jan 2018 - 7:06 pm | चिगो

ह्या चित्रपटाच्या गोंधळावर ही 'स्टँड-अप कॉमेडी' जबराट आवडली आहे..

पद्मावत और तोता..

manguu@mail.com's picture

29 Jan 2018 - 5:59 pm | manguu@mail.com

राजपूत राजवाड्यात राजवाडा भरून स्त्रीया दाखवल्या आहेत. राजपुतांचाही जनानखाना होता का , की त्या किल्ल्याबाहेरील आम जनतेच्या स्त्रीया होत्या ?

बाकी , आम जनता किल्ल्याबाहेर खालच्या पातळीला खुल्या वातावरणात , आणि राजघराणे वर उंचावर मजबूत किल्ल्यात !

लोकाना आजही अशा किल्ल्यांचे भयाण आकर्षण आहे , जणू ह्यांच्या खापरपणजीला तिथे वन बी एच के अलॉट केला होता !

विशुमित's picture

29 Jan 2018 - 6:04 pm | विशुमित

<<<लोकाना आजही अशा किल्ल्यांचे भयाण आकर्षण आहे , जणू ह्यांच्या खापरपणजीला तिथे वन बी एच के अलॉट केला होता !>>>
==>> हाहाहा.!!

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

29 Jan 2018 - 8:58 pm | झपाटलेला फिलॉसॉफर

अल्लाउद्दीन खिलजी ची अधिकृत बायको म्हणजे त्याची चुलत बहीण जिच्या बापाला म्हणजे जलाल-उद-दीन खिलजी याला मारुन तो सुलतान झाला. दुसरी त्याने पळवुन आणलेली गुजराथच्या कर्णावतीच्या राजाची म्हणजे करण घेला याची राणी कमलदेवी. तिसरी महाराष्ट्रातल्या राजा रामदेवराय यादवच्या गळ्यावर सुरी ठेऊन पळवलेली त्याची राजकन्या जेठाई.

अलाउद्दीन खिलजीच बाकीचे सगळे कामजीवन म्हणजे त्याने बाटवलेेला हिंदु गुलाम ज्यांच्याशी त्याचे बळजबरीचे विकृत संबंध होते. ज्यास त्याने खच्चि केले ( castrated ) तो आवडता गुलाम म्हणजे मलिक काफुर, शेवटी यानेच खिलजीला ठार मारले.

आता अशा व्यक्तीमत्वाच्या सुलता्नात भन्साळ्याला प्रेमभावना कुठ दिसल त्यालाच ठाऊक.

तो कट्टा धर्मांध होता. त्याच्या काळात हिंदुंची अत्यंत दयनीय अशी स्थिती झाली होती. मुसलमानी रियासतीचे लेखक रावबहाद्दुर सरदेसाई इतिहासकारांमधले मोठे नाव, बडोद्याच्या गायकवाडांच्या दरबारातले ख्यातनाम इतिहासकार , ते अल्लाउद्दीन खिलजी विषयी लिहितात,

"हिंदूंना हत्यारे,घोडे मिळू नयेत किंवा त्यांनी ते बाळगू नयेत,उंची पोषाख करु नये,छानछोकीने राहू नये असा बंदोबस्त अल्लाउद्दीन खिलजीने केला. हिंदुंना जमिनीचे अर्धे उत्पन्न कर म्हणून भरावे लागे.गाईम्हशींचासुद्धा कर द्यावा लागे.कोणाही हिंदुच्या घरात सोने,चांदी वा सुपारी चा तुकडा सुध्दा उरलाी नाही.हिंदू अंमलदारांच्या बायकांना मुसलमानांच्या घरी चाकरी करावी लागे. हिंदूंना सरकारी नोकर्‍या मिळेनाशा झाल्या. मात्र एखाद्याला दरबारात नोकरी मिळालीच तर त्याला लोक आपली मुलगी लग्नासाठी देत नसत कारण अशा मुलींना मुसलमानांच्या जनानखान्यात नोकरीस रहावे लागे" मुसलमानी रियासत पृ. १४१

आधी तुघलक झाले, टिपु झाला , औरंगजेबाचे उदात्तीकरण चालुच आहे, आता खिलजी असे करत करत महमुद गझनीसुध्दा धर्मनिरपेक्ष होईल आणि त्यांच्या हिंदु राण्या, राजकन्या , स्त्रिया यांच्याबरोबरच्या खोट्यानाट्या प्रेमकथा प्रसृत केल्या जातील.आणि परत हिंदु समाजच रांगा लावुन कोटि कोटीचा सिनेमा चालवत मिटक्हेया मारत आपल्या इतिहासाची आणिि ऐतिहासिक व्यक्तींच्या चरित्राची लत्तरे मिटक्या मारत पॉपकॉर्न अन कोक पित चघळतीलाी.

संदर्भ

तारिख ए फिरोजशाही - लेखक झियाउद्दीन बरनी
तुघलकनामा - अमीर खुस्रो
History of Khalajis by K.S.Lal
History of India by Its own Historians VOL III by Elliot and Dowson
मुसलमानी रियासत- गो.स. सरदेसाई

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jan 2018 - 9:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संदर्भाने लिहिलेल्या प्रतिसादांचं एक महत्व असतं. प्रतिसाद पोहोचला. अल्लाउद्दीन खिलजी व्यक्ती म्हणून कसा असावा ते कळायला मदत होते. आभार.

बाकी, प्रतिसादातील शेवटच्या चार ओळींबद्दल मतभेद होऊ शकतील. बराच काथ्याकूट होऊ शकेल. चर्चा चालू ठेवा.

-दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा's picture

30 Jan 2018 - 3:29 pm | टवाळ कार्टा

पिच्चरमध्ये खिलजी आणि पद्यावती यांचे प्रेम दाखवले आहे ना? नक्की ना?

पगला गजोधर's picture

30 Jan 2018 - 6:05 pm | पगला गजोधर

पिच्चरमध्ये खिलजी आणि पद्यावती यांचे प्रेम दाखवले आहे, परंतु परस्परा बरोबर नाही, तर आपल्या आपल्या रेस्पेक्टिव्ह सामानांशी...☺️

पगला गजोधर's picture

30 Jan 2018 - 8:02 pm | पगला गजोधर

पिक्चरच्या सुरुवातीला दीपिकेकडून शाहिदच्या छातीवर समोरून ह्रिदयाजवळ बाण लागतो, त्यात शाहिद मारत नाही,
पण पिक्चरच्या शेवटाला त्याच्या पाठीत बाण लागतो, त्यात मात्र शाहिद मरतो....

मारवा's picture

31 Jan 2018 - 6:38 am | मारवा

पिक्चरच्या सुरुवातीला दीपिकेकडून शाहिदच्या छातीवर समोरून ह्रिदयाजवळ बाण लागतो, त्यात शाहिद मारत नाही,

तो तीर माशुक चा होता हो त्याने कसा मरणार तो ?
थोड आशिक के पाँइट ऑफ व्ह्यु पण पहा न हो ? ते नाही का तो शेर आहे
कोई मेरे दिल से पुछे तेरे तीर ए नीमकश को
ये खलीश कहा से होती जो जीगर के पार होता
बहुधा खलीश वगैरे साठी सहन केला असावा

बाकी तुम्हाला विसंगतीच शोधायच्या असतील तर रजपुताना शौर्य "दाखवतांना" खुप आहेत.
जसे
शाहिद कपुर सुटका झाल्यावर खिल्जी ला आवर्जुन भेटुन मात्र त्याच्या सैनिकांना टाळुन "गुपचुप" निघुन जातो. (इथे खर त्याचे सैनिक ही असतात पालखीतुन आलेले
पण एक शहीद ही होतो तरी हा काही त्यांच्या बरोबरीने न लढता नेतृत्व न करता उलट वरुन रोक सके तो रोक ले वगैरे डायलॉग मारुन जातो.
नंतर तोच राजपुत बकरा वगैरे मोठ्या शौर्याने मारतो.
बाकी सिनेमा इतका मोठा कचर्‍याचा ढीग आहे एक्सेप्ट सिनेमॅटोग्राफी एडिटींग
की असोच

गामा पैलवान's picture

30 Jan 2018 - 3:20 am | गामा पैलवान

झफि,

परत हिंदु समाजच रांगा लावुन कोटि कोटीचा सिनेमा चालवत मिटक्हेया मारत आपल्या इतिहासाची आणिि ऐतिहासिक व्यक्तींच्या चरित्राची लत्तरे मिटक्या मारत पॉपकॉर्न अन कोक पित चघळतीलाी.

अगदी सहमत. लोकांच्या भावनांना हात न घालणे हाच एकमेव उपाय आहे.

दीपिका पदुकोणेने यापुढे ऐतिहासिक चित्रपटांत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. करणी सेनेने नाक कापून काढण्याची धमकी दिली होती. म्हणूनंच तिला हा निर्णय घ्यावा लागला. याला म्हणतात नाक दाबले की तोंड उघडते.

आ.न.,
-गा.पै.

manguu@mail.com's picture

30 Jan 2018 - 7:02 am | manguu@mail.com

मग नाक कापले का नाही ?

आणि ते कुणीतरी अग्निप्रवेश करणार होते , त्यांचे काय झाले ?

पगला गजोधर's picture

30 Jan 2018 - 7:28 am | पगला गजोधर

अहो त्यांनी वर म्हटलंय नं, की 'धमकी दिली' होती....
नंतर म्हणतील की तो फक्त एक जुमला होता...
प्रत्यक्ष कृतीच्या नावे फक्त बोंबाबोंब

manguu@mail.com's picture

30 Jan 2018 - 11:15 am | manguu@mail.com

आणि समजा कुणी नाक घेऊन गेलाच , तर ते दीपीकाचेच आहे , हे कसे सिद्ध करणार ?

सुबोध खरे's picture

30 Jan 2018 - 2:18 pm | सुबोध खरे

मोगा खान

नाक कापल्यावर तेथे दोन भोकं दिसली की झालं. कुणाला नाक दाखवायची गरजच काय?
बाकी 52 वर्षाच्या प्रेषित महंमद यांच्या 8 वर्षाच्या 13 व्या बायकोबरोबर नाच असलेला चित्रपट सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून हे पुरोगामी लोक मान्य करतील काय?

श्रीगुरुजी's picture

30 Jan 2018 - 2:36 pm | श्रीगुरुजी

असा चित्रपट तयार केला तर जमात-ए-पुरोगामी त्यावर बंदी आणण्यासाठी आकाशपाताळ एक करतील. जमात-ए-पुरोगामी हे जमात-ए-इस्लामी इतकेच (कदाचित जास्तच) जमात-ए-हरामी आहेत.

manguu@mail.com's picture

30 Jan 2018 - 4:43 pm | manguu@mail.com

करणी सेनेकडे नाक नेले , तर ते बोलणार तिचेच आहे कशावरुन ?

तिचा फोटो नेला , तर ते बोलणार - फोटो फोटोशॉप् असेल

त्यामुळे नाकाबरोबर दीपीकेलाही न्यावे लागेल , तिचा आयडी म्हणून आधारकार्डही लागेल !

सुबोध खरे's picture

30 Jan 2018 - 6:00 pm | सुबोध खरे

नाक "करणी सेना"च कापणार आहे ना?
मग तुम्ही कशाला "टेन्शन" घेताय आधार आणि दीपिकाचं ?

नाखु's picture

4 Feb 2018 - 8:42 am | नाखु

त्यांची सर्वच अवतारात "नाक" खुपसण्याची परंपरा आहे, ती त्यागून कसे चालेल त्यांना!!!!!!!

अखिल मिपा गाजर गवत निर्मूलन समितीचे फुटकळ सदस्य नाखु

manguu@mail.com's picture

30 Jan 2018 - 11:21 am | manguu@mail.com

https://en.m.wikipedia.org/wiki/Padmavat

मूळ पद्मावतमध्ये पद्मावतीच्या प्राप्तीसाठी दोन राजपूत राजे लढतात , मरतात आणि पद्मावती सती जाते . ( जोहर नव्हे ). तो दुसरा राजपूत राजा किती शहाणा ! पद्मावतीचा त्या पहिल्याबरोबर विवाह झालेला असताना तिच्या प्राप्तीसाठी युद्ध करतो.

खिल्जीचा कथेमध्ये प्रवेश हा अगदी शेवटी आहे.

मूळ कथा सुरस आणि चमत्कारिक पद्धतीची आहे.

श्रीगुरुजी's picture

30 Jan 2018 - 2:30 pm | श्रीगुरुजी

https://m.timesofindia.com/entertainment/hindi/bollywood/entertainment/h...

Malaysia reportedly became the first country to ban the screening of ‘Padmaavat’ citing communal uneasiness. Malaysia, a Muslim-majority country, has banned the film over concerns regarding ‘sensitivities of Islam’. Malaysia's Film Censorship Board (LPF) put the movie in its 'not approved' list and signed its age rating section as 'not relevant'. According to reports, a movie producer familiar with LPF's ratings told a leading Malaysian news portal that 'not relevant' remark signifies banned movies which are likely to incite communal uneasiness and hatred. Unlike in India, Malaysia's censor board has the ultimate power in terms of allowing or disallowing a film from screening. Their verdict cannot be questioned or upheld by any court of law.

सुबोध खरे's picture

30 Jan 2018 - 6:10 pm | सुबोध खरे

जालावर गप्पा मारल्यावर मला असे लक्षात आले कि माझ्या सारखे बरेच लोक असे आहेत ज्यांना त्या पद्मावतीच्या इतिहासाची काही पडली नाही कि संजय लीला भन्साळी बद्दल काहीहि वाटत नाही. राग वाटतो तो केवळ या पुरोगामी सुडो सेक्युलर लोकांच्या दांभिकपणाचा.
बाकी बॉलिवूड किंवा संजय लीला भन्साळी धंद्यात "बुडाला" तर दुःख होण्याऐवजी आनंदच होईल. स्वतःच्या आईलाही पैशासाठी दावणीला बांधणारे विधिनिषेधशून्य लोक आहेत ते. सिनेमा बघण्याचा प्रश्नच येत नाही. खिशातील पैसे टाकून स्वतःच्या अमूल्य वेळेचा अपव्यय करणे नाहीच.
बाकी करणी सेना, खाप पंचायत, आणि एम आय एम सारखे लोक यांच्या विचारसरणीत फारसा फरक नाही. दहाव्या किंवा पाचव्या शतकातील विचारसरणीचे लोक आहेत.
संताप फक्त फुरोगामी, सुडोसेक्युलर आणि डाव्या लोकांच्या "निवडक" बाजू घेण्याच्या हलकटपणाचा येतो.

अगदी माझ्या मनातलं बोललात..
सवंग प्रसिद्धीसाठी अश्या प्रकारच्या स्टोरी मुद्दाम घेण्याच्या त्याच्या वृत्तीला चाप लागला पाहिजे.

manguu@mail.com's picture

30 Jan 2018 - 7:11 pm | manguu@mail.com

पद्मावतीच्या इतिहासाचं काय घेऊन करायचं ?

पद्मावतीच्या प्राप्तीसाठी दोन राजपूत आपापसात लढून मेले .. पद्मावती व तिची सवत नागमती नवर्याबरोबर सती गेल्या.

या संहारानंतर खिल्जीचे सैन्य तिथे पोचले . उरलेले लोक व खिल्जीचे सैनिक यांच्यात पुन्हा लढाई झाली.

खिल्जीची गडावर सत्ता प्रस्थापित झाली पण त्याला पद्मावतीच्या चितेची राखच मिळाली.

http://kavitakosh.org/kk/पद्मावती-नागमती-सती-खंड_/_मलिक_मोहम्मद_जायसी

http://kavitakosh.org/kk/पद्मावत_/_मलिक_मोहम्मद_जायसी

अख्खे काव्य उपलब्ध आहे.

करणीसेनेला कदाचित भीती असावी की भन्साळीने दोन राजपूत लढून मेले हे दाखविले की काय !

पण भन्साळीच्या सिनेमात तो दुसरा राजा नाही . पद्मावतीचा नवरा व खिल्जी यांची लढाई होते. पण् त्यात खिल्जीचा परममित्र ( चरममित्र ! ) मलिक गफूर कपटाने बाण मारून पद्मावतीच्या नवर्याला ठार करतो, असे भन्साळीने दाखवलेले आहे.

गफूर झालेला तो नट त्याचा चेहरा आणि आवाज त्याचा पहिला सिनेमा 'राबता' मध्ये अगदीच विचित्र वाटला होता. यात मात्र त्याचा रोल चांगला जमलाय.

manguu@mail.com's picture

30 Jan 2018 - 7:15 pm | manguu@mail.com

manguu@mail.com's picture

30 Jan 2018 - 7:16 pm | manguu@mail.com
सुबोध खरे's picture

30 Jan 2018 - 7:22 pm | सुबोध खरे

हे सर्व तुम्ही वाचलं का?
का असंच जालावरच्या दुवे?
स्वतः वाचायचे नाहीत पण पुढे ढकलायचे>

manguu@mail.com's picture

30 Jan 2018 - 7:38 pm | manguu@mail.com

दुवे मी स्वत: शोधले आहेत. शेवटची दोन प्रकरणे वाचलीत.. प्रत्येक खंडाच्या टायटलवरून त्यात असलेले प्रसंग लक्षात येतील .

सदर इतिहास वादातीत आहे.
आम्ही स्वतः 2008-9 मध्ये चितोडगडावर गेलो, same गोष्ट सांगितली तिथल्या guide ने.
त्यामुळे सवंग लोकप्रियता आणि भन्साळी असे आपण म्हणू शकत नाही.
इतिहासाला अनेक पदर असतात, प्रत्येक जण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. सर्व चूक नसते आणि सर्वच बरोबर नसतात,
शिवाजी महाराष्ट्रात राजे असतात आणि सुरत गुजरात मध्ये चोर दरोडेखोर...

पगला गजोधर's picture

31 Jan 2018 - 9:36 am | पगला गजोधर

शिवाजी महाराष्ट्रात राजे असतात आणि सुरत गुजरात मध्ये चोर दरोडेखोर...

सुरत छापा घटना ते आजच्या घडीला....
गुजरातमध्ये अजून असा मायचा पुत आलेला नाही, जो राजेंविषयी असं काही बरंळंल....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jan 2018 - 11:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्हाला शाळेत धडा होता सूरतेची लूट म्हणून....केवळ माहितीस्तव.

-दिलीप बिरुटे

ss_sameer's picture

31 Jan 2018 - 6:57 pm | ss_sameer

महाराज शब्द तर अलीकडचा आहे आणि तोही सगळेच वापरत नाही. इतिहासकार तर अजूनही एकेरी शिवाजी च लिहितात.

पुन्हा सांगावेसे वाटते, इतिहासाला भावना नसतात, भावना या प्रांतीय असतात. इतिहास तटस्थ आणि त्रयस्थ राहून वाचला तर जास्त कंगोरे मोकळे होतात, भावनिक झालात तर काय होते याची उदाहरणे रोज दिसतातच.

manguu@mail.com's picture

31 Jan 2018 - 7:30 pm | manguu@mail.com

तो अनुवादाचा दोष् असतो.

म्हणजे Shivaji was a king . He was very brave.

हे मराठीत .... तो खूप शूर होता ... ( ते खूप् शूर होते , असे करायला हवे ) असे होते.

माहितगार's picture

31 Jan 2018 - 12:13 pm | माहितगार

सदर इतिहास वादातीत आहे.

* वादातीत म्हणजे काय वाद असलेले की नसलेले ?
* मिथक आणि इतिहास यातील फरक काय ?

......आम्ही स्वतः 2008-9 मध्ये चितोडगडावर गेलो, same गोष्ट सांगितली तिथल्या guide ने.

गाईडने सांगीतलेल्या माहिती निवीवाद असतात हे गृहीत धरता येते का ?

इतिहासाला अनेक पदर असतात, प्रत्येक जण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. सर्व चूक नसते आणि सर्वच बरोबर नसतात,

इतिहासाच्या प्रमाणसाधनाच्या बळावर केवळ खिलजीने एक युद्ध केले आणि जिंकला एवढेच सिद्ध करता येते. उर्वरीत मिथके आहेत; 'मिथकांना अनेक पदर असतात, प्रत्येक जण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. सर्व चूक नसते आणि सर्वच बरोबर नसतात' अशी वाज्य रचना अधिक समतोल आणि सयुक्तीक वाटते. मिपावरील धागा लेख चर्चातून असेल अथवा वृत्त माध्य्माम्नी असेल राजपूत समाजाच्या आक्षेपांची अद्याप दखल घेत्लेली नसल्यामुळे पहाणे मुख्यत्वे भंसाळीच्याच दृष्टीकोणातून होत आहे आणि आपला दृष्ष्टीकोण थोपवण्यात भंन्साळी सध्यातरी यशस्वी दिसतो आहे.

माहितगार's picture

31 Jan 2018 - 12:49 pm | माहितगार

पद्मावत चित्रपट - आणि सध्याच्या राजपूत समाजाच्या भूमिके बद्दल आ.ह. साळुंखेंचे काय मत असेल ?

manguu@mail.com's picture

31 Jan 2018 - 2:43 pm | manguu@mail.com

राजा राजस्तानचा. विवाहित होता.
त्याला एक पोपट बोलतो .. पद्मावती सुंदर आहे.

म्हणून तो सिंहलनगरीला जातो , म्हणजे सीलोन / श्रीलंका !! तिच्यासाठी.

एका पोपटावर भरोसा ठेवून राज्य सोडून हजारो मैल , शिवाय समुद्रप्रवास ( नो सेतू , नो पुष्पकविमान ) करुन तो जातो. महिनोनमहिने लागले असणार.

मग लोक खिल्जीच्या अय्याशीला का नावे ठेवतात ?

आणि राजाच महिनेमहिने दूर जात असेल तर परदेशी मंगोल आणि खिल्जी राज्य गिळायला येणारच ना ?

माहितगार's picture

31 Jan 2018 - 3:32 pm | माहितगार

आणि राजाच महिनेमहिने दूर जात असेल तर परदेशी मंगोल आणि खिल्जी राज्य गिळायला येणारच ना ?

खिलजी राजा गावात नसताना आला नाही हे क्षणभर बाजूस ठेऊ. पण घराचा मालक घरी महिनेच नाही वर्षघरातर्षे नसला तरी बाहेरच्यांना घर लुटण्या जोगी परिस्थिती निर्माण होत असेल पण असे घर लुटण्याचा नैतीक किंवा कायदेशीर परवाना मिळत नसतो. राम- लक्ष्मण घरात नाही म्हणून इतरांसाठी सीतेच्या अपहरणाचा परवाना तयार होत नसतो.

म्हणून तो सिंहलनगरीला जातो , म्हणजे सीलोन / श्रीलंका !! तिच्यासाठी.

श्रीलंका एवजी सिंहल शब्दाचा उल्लेख श्री लंकेत सिंहल लोक रहातात याची कल्पना रचणार्‍यास माहिती असण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी. या मिथकांमध्ये दिलेली तत्कालीन श्रीलंकन राजांची नावे जुळत नाहीत. राजस्थान आणि श्रीलंका दोन्हीकडे घटना नोंदींची पुरेशी व्यवस्था असतानाही -विवाह- घटनेच्या अधिकृत नोंदी आतापावेतो उपलब्ध नाहीत . अनेक कवींनी अंषतः पुर्वाश्रमींच्या काव्यांवरून वेगवेगळ्या पद्धतीने उचलेगिरी आणि अंशतः स्वतःच्या कल्पनेचे पतंग सरमिसळ या मिथकांमध्ये झालेली असणार. पद्मावतीच्या बाब्तीत हे एकमेव कथानक नाहीत बर्‍याच लेखक - कविंनी वेगवेगळ्या कल्पना केलेल्या आहे. यातील अनेक काव्यांचा तौलनीक अभ्यास प्रबंध जिज्ञासूंना शोधगंगा डॉटकॉम वर अभ्यासता येऊ शकतील.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Feb 2018 - 9:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

घुमर घुमर हे गाणं बघायला आणि साऊंड सिष्टीमवर ऐकायला लैच भारी आहे.

''आवो जी आवो घूमर खेलबा आवो''
'' आपण साथ साथ घूमर सगळा खेलबा आवो''

''देवरानी, जेठानी खेले
सासू जी घूमर खेले
ननद भोजाई खेले
बैसा घूमर खेले''

तसंच मिपाकरांचा खेळ पाहता ''मिपाकर घूमर खेले'' असं पाहिजे होतं.

-दिलीप बिरुटे
(घुमर घुमर खेळून थकलेला) :)

manguu@mail.com's picture

3 Feb 2018 - 10:55 pm | manguu@mail.com

https://youtu.be/ObJeKhrwbhs

हा जुना पद्मावती सिनेमा.

यात अल्लाउद्दीन खिल्जी त्याच्या पत्नीने केलेल्या कान उघाडणीनंतर पद्मिनीला आपली बहीण मानतो , असे दाखवले आहे !!

तेंव्हा करणी सेना नव्हती का ?

प्रकाश घाटपांडे's picture

4 Feb 2018 - 9:35 am | प्रकाश घाटपांडे

भन्साळी डिवचत नसून तो अस्मितांची टोके बोथट करतो आहे. मनोरंजनासाठी तशाही पुराणकथा वापरत्तात.खरा इतिहास कोणाला माहीत अस्तो? वादग्रस्त झाला कि गल्ला चौपट. न पहाण्याचा पर्याय खुला असला तरी लोक कुतुहलशमनासाठी पहातातच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Feb 2018 - 10:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राजपूतांच्या शौर्याचंच कौतुक चित्रपटात असल्याने करणीसेनेनं आपलं आंदोलन मागे घेतले आहे.
सांगा काय करायचं या लोकांचं....?

-दिलीप बिरुटे

पगला गजोधर's picture

4 Feb 2018 - 5:13 pm | पगला गजोधर

डॉ आपण आधीच सुचवलेला उपचार,
राजकीय इच्छा शक्ती असेल, तर ज्यांनी
धुडगूस घातला, लहान मुलांच्या बसवर दगडफेक केली,
त्यांना शोधून पकडून, निबर ठोकून काढलं पाहिजे,
नाही तर चालू राहू दे जुमलेबाजी.....

श्रीगुरुजी's picture

4 Feb 2018 - 7:56 pm | श्रीगुरुजी

खालील घटनाक्रम पहा.

- राजस्थानमधील २ लोकसभा व १ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी २९ जानेवारी २०१८ मध्ये मतदान होणार होते.
- 'पद्मावती' चित्रपट डिसेंबर २०१७ मध्ये प्रदर्शित होणार होता.
- या चित्रपटाविरूद्ध रजपूतांच्या करणी सेनेने डिसेंबर २०१७ मध्ये आंदोलन सुरू करून चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलायला लावले.
- चित्रपटाविरूद्ध राजस्थान व काही इतर राज्यांमध्ये करणी सेनेने हिंसक आंदोलन केले.
- न्यायालयाने व सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या सुधारीत आवृत्तीला मान्यता दिल्यानंतर २५ जानेवारीला चित्रपट प्रदर्शित केला.
- करणी सेनेने चित्रपटाला विरोध व आंदोलन सुरूच ठेवले.
- पोटनिवडणुकीसाठी करणी सेनेने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला.
- मतदान २९ जानेवारीला पार पडून १ फेब्रुवारीला मतमोजणी झाली व तीनही मतदारसंघात भाजपचा दारूण पराभव होऊन काँग्रेसचा विजय झाला.
- चित्रपट रजपूतांचा सन्माना करणारा आहे असे जाहीर करून करणी सेनेने ३ फेब्रुवारीला आंदोलन मागे घेऊन चित्रपटाला पाठिंबा दिला.

हे सर्व बिंदू जोडले तर या आंदोलनाचा हेतू काय होता व त्यामागे कोण होते हे लक्षात येईल.

पगला गजोधर's picture

4 Feb 2018 - 8:30 pm | पगला गजोधर

आंदोलनाचा हेतू काय होता व त्यामागे कोण होते हे लक्षात घेणे अथवा आणून देणारी जुमलेबाजी होण्यापेक्षा,

जर राजकीय इच्छा शक्ती असेल,

तर ज्यांनी धुडगूस घातला, लहान मुलांच्या बसवर दगडफेक केली, त्यांना शोधून पकडून, निबर ठोकून काढलं पाहिजे.....

श्रीगुरुजी's picture

4 Feb 2018 - 8:39 pm | श्रीगुरुजी

निश्चितच. मुलांच्या बसवर दगडफेक करणार्‍यांना व हिंसक आंदोलन करणार्‍यांना शिक्षा व्हायलाच हवी. पण त्याबरोबरीने आंदोलनाच्या मागे नेमके कोण होते व कशासाठी आंदोलन पेटविले गेले हेसुद्धा शोधणे आवश्यक आहे. या आंदोलनामुळे निवडणुकीत मिळालेले यश पाहून भविष्यात अशी अनेक जातीयवादी आंदोलने वेगवेगळ्या राज्यात पेटविली जातील. महाराष्ट्रात शिवाजी महाराज किंवा आंबेडकरांना पुढे करून जातीय भावना भडकावल्या जातील. कोरेगाव-भीमा मध्ये व गुजरातमध्ये याचा अनुभव आलाच आहे. इतर राज्यात स्थानिक नेत्यांचे निमित्त करून स्थानिक अस्मिता भडकावल्या जातील.

सुखीमाणूस's picture

4 Feb 2018 - 9:11 pm | सुखीमाणूस

नोटाबन्दी केली आणि कदाचित पैसे देऊन मत मिळवण्याचा मार्ग बंद झाला. काही हरकत नाही, जातीपातीच्या राजकारणाने मते मिळवू. कुठूनतरी सत्तेवर येऊ. देश जाऊदे खड्डय़ात. समाज राहुदे जातीत विभागलेला. आणि किती सोप्प आहे परत भाजपा सत्तेवर आहे म्हणुन जातीयता वाढली आहे म्हणत शिमगा करायला सगळे मोकळे.
पण मला जाम आवडली आहे ही राजकीय खेळी. भाजपला पण चांगला धडा आहे. तुमच हिन्दु मुस्लिम राजकारण तर आम्ही हिन्दु धर्म खिळखिळा करून टाकतो. परत मान वर काढता आली नाही पाहिजे.

श्रीगुरुजी's picture

4 Feb 2018 - 10:18 pm | श्रीगुरुजी

भाजपने नोटाबन्दी केली आणि कदाचित पैसे देऊन मत मिळवण्याचा मार्ग बंद झाला. काही हरकत नाही, जातीपातीच्या राजकारणाने मते मिळवू. कुठूनतरी सत्तेवर येऊ. देश जाऊदे खड्डय़ात. समाज राहुदे जातीत विभागलेला. आणि किती सोप्प आहे परत भाजपा सत्तेवर आहे म्हणुन जातीयता वाढली आहे म्हणत शिमगा करायला सगळे मोकळे.

संपूर्ण सहमत

पण मला जाम आवडली आहे ही राजकीय खेळी. भाजपला पण चांगला धडा आहे. तुमच हिन्दु मुस्लिम राजकारण तर आम्ही हिन्दु धर्म खिळखिळा करून टाकतो. परत मान वर काढता आली नाही पाहिजे.

काँग्रेसने देशहिताला तिलांजली देऊन मुस्लिम अनुनय केला नसता तर भाजपला मुस्लिम अनुययाविरूद्ध आंदोलन करण्याची वेळच आली नसती. हाज यात्रा अनुदान, वेगळे व्यक्तिगत कायदे इ. काँग्रेसची देणगी. मोदींनी हाज अनुदान बंद केले तर लगेच काँग्रेसवाले गळा काढायला सुरूवात करतात. तोंडी तलाक रद्द करायला काँग्रेसचा अजूनही विरोध आहे. "तोंडी तलाक हा कुराणचा आदेश आहे व सरकारने त्यात ढवळाढवळ करू नये" असे कालच "पुरोगामी" पवारांनी सुद्धा जाहीरपणे सांगितले आहे. मुल्लामौलवींची दाढी कुरवाळूनच आपण सत्तेत येऊ शकतो या भ्रमात खांग्रेसी अजूनही आहेत.

पगला गजोधर's picture

5 Feb 2018 - 9:52 am | पगला गजोधर

नोटाबन्दी केली आणि कदाचित पैसे देऊन मत मिळवण्याचा मार्ग बंद झाला.

.
आताच्या राजस्थान उपचुनाव व गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, तुम्हाला तुमचे हे विधान कायम ठेवायचे आहें नं ? का पुनर्विचार करून परत तुम्हाला वरील वाक्य चेंज करायला आवडेल...
पहा हं, नीट शांतपणे विचार करून सांगा...

सुखीमाणूस's picture

5 Feb 2018 - 3:31 pm | सुखीमाणूस

आमच ठाम मत आहे भाजपला पैसे वाटायची गरज नाही. ते वाटत पण नसावेत. अहो एवढे मोठे धर्माचे राजकारण करतायत ते...
भाजपात कुठे गर्भश्रीमंत शिक्षण सम्राट किवा साखर कारखानदार आहेत?
हा आता सत्तेची चटक लागली की काय होईल सांगता येत नाही. त्यातुन बाहेरून पक्षात आलेले आहेतच घाण करायला.....
बाकी पद्मावतच्या प्रदर्शनाच्या वेळेस खूप आशा वाट्त होती की कॉन्ग्रेस भन्साळी ला पाठिंबा देईल.
नथुराम गोडसे चे प्रयोग बंद पाडायला जसे लोक पाठवले तसेच आता पद्मावती चालू ठेवायला फुल्ल मदत करतील. पुरोगामी काँग्रेस पण गप्प राहीली
या सगळ्या लोकांचे आवाज पण फक्त 3 टक्के वाला विरुद्ध मोठे असतात.
बघा कोणी कौतुक केल का बाजीराव मस्तानी ला किती शांततामय विरोध केला ३ टक्क्यानी

पगला गजोधर's picture

5 Feb 2018 - 3:47 pm | पगला गजोधर

आमच ठाम मत आहे भाजपला पैसे वाटायची गरज नाही. ते वाटत पण नसावेत. अहो एवढे मोठे धर्माचे राजकारण करतायत ते...
भाजपात कुठे गर्भश्रीमंत शिक्षण सम्राट किवा साखर कारखानदार आहेत?

एकदमच लॉळ....

आवल्डी हा, तुमची विनोदबुद्धी....

manguu@mail.com's picture

5 Feb 2018 - 6:05 pm | manguu@mail.com

ते पैसे कोण अन कुठे वाटतात म्हणे ?

वयात येऊन वीस वर्षे झाली , इतक्या निवडणुका झाल्या , , पण कुणी आम्हाला दोन रुपयेही दिले नाहीत.

सुबोध खरे's picture

5 Feb 2018 - 7:17 pm | सुबोध खरे

तुम्ही मुळात काँग्रेसवालेच आहात तेंव्हा तुमचे मत गृहीत धरलेले आहे शिवाय तुम्ही पांढरपेशे.
झोपडपट्टीत राहायला जा. एका मतासाठी १००० रुपये पर्यंत मिळतील.
माझ्या भावाच्या मोलकरणीला काँग्रेस उमेदवाराने महापालिका निवडणुकी साठी माणशी ५०० रुपये दिले होते.
राष्ट्रवादीच्या उमेदवाराने सगळ्यांना खूण केलेल्या १० रुपयाच्या नोटा(४० A सिरीज च्या) वाटल्या होत्या.
निवडून आल्यावर नोट घेऊन यायचं आणि १००० रुपये घेऊन जायचं. पडले ती गोष्ट वेगळी. पण मोठा खर्च वाचला.
आहे कि नाही शकुनीचे डोके.

manguu@mail.com's picture

5 Feb 2018 - 11:36 pm | manguu@mail.com

गंमतच की.

आणि इतके असून भाजपाने काँग्रेस , राष्ट्रवादीचे उमेदवार आयात करुन त्याना तिकिटेही दिली..

आता हे लोक नव्या नोटा वाटतात की जुन्या ?

अशा लोकानी आता पैसे वाटले तर ते पाप क्वानग्रेसच्या खात्यात की भाजपाच्या ?

सुबोध खरे's picture

6 Feb 2018 - 1:11 am | सुबोध खरे

नव्या नोटा तुम्हाला कोणी देणार नाही
आणि
जुन्या नोटांचा तुम्हाला काही उपयोग नाही
बसा ठणाणा करत भाजप च्या नावाने

पुंबा's picture

9 Feb 2018 - 3:04 pm | पुंबा

तळेगाव दाभाडे इथे नगर पालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक मताला ४००० रू ते देखिल डिमॉनेटायझेशन फुल्ल स्विंगमध्ये असताना नव्या नोटात दिले गेले डॉक. ते पण झोपडपट्टीत राहणार्‍यांना नव्हे, सोसायटीत राहणार्‍या मध्यमवर्गिय मतदारांना. सदर उमेदवार भाजपाचा होता.
ही घटना पूर्णपणे खरी आहे.

विशुमित's picture

9 Feb 2018 - 3:45 pm | विशुमित

पंचक्रोशीत झालेल्या ४ ग्रामपंचायत निवडणुकीत ३.५ -४ कोटी वाटले/खर्च झाल्याची माहिती आहे. ते सुद्धा नोटबंदी नंतर. सगळे वाटप गुलाबी नोटेत होत होते.

सोसायटीत राहणारे मध्यमवर्गिय झोपडपट्टी वाल्यांपेक्षा जास्त लुच्चे झाले आहेत हे माझे निरीक्षण आहे. अपवाद वगळू शकता.

कपिलमुनी's picture

9 Feb 2018 - 5:47 pm | कपिलमुनी

बरेच मिपाकर तळेगावात रहातात. कोण उमेदवार सांगा की !
कुठल्या सोसायटीत वाटल्या तिचे नाव सांगा ? पुढच्या वेळी मागता येतील =))

सुबोध खरे's picture

9 Feb 2018 - 6:53 pm | सुबोध खरे

ते पैसे कोण अन कुठे वाटतात म्हणे ?
हे त्या मोगा खानला सांगा.
उगाच पिचक्या टाकत असतंय

manguu@mail.com's picture

4 Feb 2018 - 9:21 pm | manguu@mail.com

एक सिनेमा आणि एक लोकल जातीय संघटना यांच्यापुढे भाजपा नांगी टाकत असेल तर मग पाकिस्तानसमोर भाजपा कसा काय टिकणार ओ गुर्जी ?

सुखीमाणूस's picture

4 Feb 2018 - 11:20 pm | सुखीमाणूस

गप केल्या ना की पाकिस्तान विरुद्ध कारवाई करण जास्त सोप्प जाईल.
कारण अशाच काही संघटना आहेत ज्या मुस्लिम अतिरेकी लोकांचे उदात्तीकरण करत आहेत.

आता तर खात्री वाटते आहे की धर्मांधता आणि जातीयता ही कोन्ग्रेस लाच हवी आहे कारण त्यामुळेच ते सत्तेवर येऊ शकतात.
मुस्लिम जितके मागास राहतील तितके राजकारणास चांगले.

या सगळ्या राजकारण्यांची फे फे उडेल जर ओवेसी व प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर.

शब्दबम्बाळ's picture

5 Feb 2018 - 10:00 am | शब्दबम्बाळ

छान!
म्हणजे घटनाक्रम चांगला आहे पण मग मला सांगा भाजपचे साक्षात मुख्यमंत्री इतके आटापिटा का करत होते चित्रपटावर बंदी घालण्याचा?
ते पण करणी सेनेमध्ये होते कि काय?
इथे मिपावर पण काही "संस्कृतीरक्षक" भलतेच खुश झालेले करणी सेनेचे आंदोलन बघून!
"भन्साळ्याला" (आवडता शब्द संस्कृती जपणाऱ्यांचा) कशी अद्दल घडवली चित्रपट पुढे ढकलावा लागला वगैरे...
जर खरंच चित्रपट प्रदर्शित झाला नसता तर वर तोंड करून बोलले असते "बघा आमच्यामुळे संस्कृती वाचली" पण श्या! कोर्टाने कोणाचं ऐकलं नाही.
आता चित्रपटात आक्षेपार्ह काही दिसत नाही कळल्यावर हवाच गेली!

कोण कुठली करणी सेना, तिला आवरायला किंवा प्रमुख लोकांवर कारवाई करायला जमत नसेल तर काय उपयोग इतक्या ठिकाणी शासन असून?
आणि आता निवडणुकीत अपयश आले कि इतर ठिकाणी खापर फोडून रिकामे! जणू काही फक्त आम्हीच सज्जन...

माहितगार's picture

4 Feb 2018 - 11:28 pm | माहितगार
माहितगार's picture

4 Feb 2018 - 11:31 pm | माहितगार

हि माझी मते नाहीत, केवळ वेगळ्या बाजूचीही माहिती असावी म्हणून वरील २ युट्यूब जोडले आहेत.

manguu@mail.com's picture

5 Feb 2018 - 10:23 am | manguu@mail.com

पद्मावत आला तेंव्हा मोदीजी का गाव , असा एक पिक्चर आला होता ना ? त्याचे काय झाले ?

manguu@mail.com's picture

5 Feb 2018 - 10:26 am | manguu@mail.com

पद्मावत आला तेंव्हा मोदीजी का गाव , असा एक पिक्चर आला होता ना ? त्याचे काय झाले ?

manguu@mail.com's picture

5 Feb 2018 - 10:27 am | manguu@mail.com