✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

*पद्मावतीच्या भ्रमाचा भोपळा अन् वर"करणी" धुडगूस*

S
ss_sameer यांनी
Sun, 01/28/2018 - 10:19  ·  लेख
लेख
अखेरीस सर्व (तथाकथित) संस्कृती रक्षकांच्या विरोधास न जुमानता "पद्मावती" चे थेटरात आगमन झालेच. माफ करा, टंकलेखनाच्या चुकांकडे कानाडोळा करावा, संपूर्ण लेखात "पद्मावती" छापण्यात आले असले तरीही (तथाकथित) संस्कृती रक्षकांनी आणि मा. श्री. श्री. संजय लीळा भन्साळी यांनी ते "पद्मावत"(च) आहे असे समजून लेख वाचण्याची विनंती. (विनाकारण) उत्सुकता वाढवणारा क्षण आल्यासरशी तमाम रसिकजनांनी त्यावरती उड्या हाणल्या. चित्रपटाच्या प्रदर्शनपूर्व (जास्तीचे) पैसे भरून चित्रपट पाहण्याची संधी पूर्ण करता आली. या सर्व घटनांबद्दल सर्व (तथाकथित) संस्कृती रक्षकांचे मा. श्री. श्री. संजय लीळा भन्साळी यांचेकडून आभार. या सकल घटनांचे रुपरंग पाहता, आम्हास १९३० ते १९४७ दरम्यान च्या निवडणुकांचे दिवस आठवले. "मुस्लिम लीग" नामक एक पक्ष ज्यांच्याकडे लोकसभा वा राज्यसभेत पूर्ण राहू द्या परंतु अर्धे देखील बहुमत नव्हते, त्या ठिकाणी त्यांची मंत्रिमंडळात पन्नास टक्के मंत्रिपदाची मागणी होती. अर्थातच या मागणीस सभ्य भाषेत "हेकटपणा" म्हटले जाऊ शकते किंवा शेलक्या शब्दात "बिनडोक" म्हणता येईल. करणी सेनेच्या मागणीस काय म्हणायचे ते वाचक आपसूक ठरवतीलच. भ्रमाचा भोपळा अन भ्रमाचा फुगा दोन्ही फार काळ टिकाव धरू शकत नाहीतच. (जोवर त्यास झाकपाक संस्कृतीची लागण होत नाही.) सत्य हे आज नाही तर उद्या बाहेर येतेच. कोट्यवधी रुपयांच्या नाक आणि डोक्याची मूल्ये आजपासून कवडीमोल झालीत याचे आम्हास दुःख वाटत आहे. (आमच्या पेक्षा अधिक दुःख मा. श्री. श्री. संजय लीळा भन्साळी अन कु. दिपीकेस वाटत असावे.) खिलजीच्या ज्या प्रणय प्रसंगाबाबत चर्वितचर्वण केले जात होते, अन ज्या प्रसंगाच्या बळावर (तथाकथित) संस्कृतीरक्षकांची धुडगूस चालू होता असा कोणताही प्रसंग संपूर्ण चित्रपटात नाहीच आहे हे वर"करणी" तरी प्रेक्षकांना समजलेच आहे. (परन्तु प्रणयप्रसंग चित्रपटात नसल्याने तमाम "शौकीन" निराश झालेत. तेव्हा भो संजया - पुढील चित्रपटात प्रणय प्रसंग असूच द्या अशी अपेक्षेवजा मागणी.) आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने झाकलेलीं कु. दीपिकाची कंबर यामुळे पुनःश्च आपण आपल्या संस्कृतीचे रक्षण केल्याचा कोण अभिमान त्या चित्रपट गृहात ओसंडून वाहत होता याचे वर्णन आम्ही कोणत्या शब्दात करू! (येथे पुन्हा एकदा "शौकीन" निराश झालेत हे आम्ही नमूद करू इच्छितो.) भारतीय संस्कृती ही केवळ सहनशील नाही तर वेळप्रसंगी त्यात शस्त्र हाती धरून संस्कृती नाश करणाऱ्या गोष्टींस मुळापासून उपटून टाकण्याचे सामर्थ्य देखील आहे आणि अशाही प्रकारे आपण संस्कृतीतील हिंसेचे प्रदर्शन या निमित्ताने भरवू शकलो, घडवू शकलो, ही या संजयाची "करणी". वाघाने एकदा सावज हेरले की तो ते मारण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. सावजास एकदा माहीत पडले की आपली शिकार होणार, तेव्हा सावज चौखूर उधळत धावते म्हणून वाघास (बडेजाव माजविणेकरिता तरी ) सावजाचा पाठलाग करावा लागतो. तैसेच झाले असावे. प्रथम (तथाकथित) संस्कृतीरक्षकांनी सावज हेरले पण गवसत नाही असे लक्षात आले. चित्रपटात आक्षेपार्ह काही नाही याची जाणीव झाली तसे हेकटपणे चित्रपट पाहणे नाकारले. आता मात्र भन्साळींनी चौखूर उधळले म्हणून हे (तथाकथित) संस्कृतीरक्षक बडेजाव माजविणे करीता हिंसाचार करतांना दिसत आहेत. मुदलात आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे सापच नाही परंतु काठ्या आपटणे सुरुच ठेवावे लागले करण एका असत्यास लपविणे करिता असत्याची माळ उघडावी लागते. भोके असणाऱ्या वस्त्रांतून हवा लागून थंडी वाजतेच तशीच यांना हुडहुडी भरली. त्या थंडीवर उपचार म्हणून यांनी हिंसाचाराच्या शेकोट्या पेटवल्या. नुकताच यांच्यातील परमपुरुष नरवीरांनी भविष्यात अत्यंत धोकादायक असणाऱ्या लहान अजाण बालकांच्या गाडीवर लक्ष्यभेदी हल्ला केलाय. प्रसिद्धधी साठी अमाप खर्च करूनही जे शक्य झाले नसते त्याची सिद्धता झाली. याबद्दल संजयाचे अंतः"करणी" आनंदाचे धुमारे फुटले आहेतच. खाजगीत एक गोष्ट म्हणजे, या घटनेनंतर संजयाच्या भ्रमणध्वनीवर 'किती सांगू मी सांगू कुणाला...!' चे गाणेही वाजते आहे. सकल गोष्टी अंती..... सुज्ञांच्या मनास एक प्रश्न विचारावासा वाटतो की हे जे संस्कृती नामक अगम्य गोष्टीवरती चतुरस्त्र आणि हिणकस प्रदर्शन चालले आहे ते पटते आहे का? नवसाकरिता असो वा खाण्याकरिता - हिंसा ही अखेरीस हिंसाच असते. ती गाय वा बकरी वा घोडा अशी वेगवेगळी वाटण्यात आणि त्यावरून धार्मिक राजकारण करण्यात कितपत तथ्य आहे? धार्मिक किनार वाढवण्याच्या प्रयत्नात माणुसकीचा दृष्टिकोण संकुचित होतो आहे यावर कुणी विचार का करत नाही?असल्याच संकुचित दृष्टीकोनातून बेगडी सामाजिक रचना अस्तित्वात येते आणि मानवीय सह-संबंधांचे धागे उसवत जातात. धार्मिकतेच्या नावावर पोळी भाजणारी मंडळी - मग ती लाल हिरव्या भगव्या निळ्या काळ्या कोणत्या का झेंड्या खाली असेना, त्यांना पाठिंबा तुम्हा आम्हा सारख्या सामान्यांतूनच मिळतो. जोवर आपण ही लक्तरे झुगारणार नाही तोवर आपले अस्तित्व चमकून दिसणार नाही. आणि आम्हास सध्यातर "हर शाख पर उल्लू बैठा" दिसतोय. त्यामुळे भविष्यातही असेच पद्मावतीचे भ्रमाचे भोपळे फुटत राहणार आणि वर"करणी" धुडगूस वाढत राहणार.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
35706 वाचन

💬 प्रतिसाद (125)

प्रतिक्रिया

च्यामारी, भन्साल्याला आस्कर द्या

भंकस बाबा
Mon, 01/29/2018 - 01:55 नवीन
पाकिस्तानात शिनेमा बिनाकट रिलीज झाला, गनिमी काव्याने दुश्मन मारला, नायतर क्रुरकपटी, गचाल, स्त्रिलंपट असा मुसलमानी पात्र पाकिस्तानात! आणि वर हिंदू राजाची उदो उदो
  • Log in or register to post comments

भारत एक खोज मधला पद्मावतीचा

अंतु बर्वा
Mon, 01/29/2018 - 07:38 नवीन
  • Log in or register to post comments

भारत एक खोज मधला पद्मावतीचा

अंतु बर्वा
Mon, 01/29/2018 - 07:38 नवीन
  • Log in or register to post comments

भारत एक खोज मधला पद्मावतीचा

अंतु बर्वा
Mon, 01/29/2018 - 07:40 नवीन
भारत एक खोज मधला पद्मावतीचा एपिसोड पाहिला... एक तर त्यातही पद्मावतीची कंबर दाखवलेली आहेच. मग त्यावर कुणाला काहिच आक्षेप कसा नाही? दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट दिसली ती म्हणजे भारत एक खोज च्या एपिसोडच्या एडिटिंग करणार्यांमध्ये एक नाव... आदरणिय भन्साळी साहेब असल्याच दिसलं...
  • Log in or register to post comments

पद्मावतचे विरोधक

दिगोचि
Mon, 01/29/2018 - 12:03 नवीन
या सर्व विरोधकाना एक सान्गावेसे वाटते की एका ४-५ शे वर्षापूर्वी होऊन गेलेल्या एका राणीसाठी हे जे कार्य करत आहात तसाच उत्साह मुलीवरचे व बायकावरचे अत्याचार थाम्बवायला करा.
  • Log in or register to post comments

व्हाट्सप आले.

manguu@mail.com
Mon, 01/29/2018 - 14:41 नवीन
व्हाट्सप आले. *दिल्ली की कब्र में दफन है वो सुल्तान अलाउद्दीन खिलजी, जिसे आज की गंदी राजनीति ने बना दिया शैतान* पुरे देश और विदेश में उनके नाम पर हंगामा मचा है, लेकिन उनकी कब्र के करीब से लोगों का कारवां ऐसे ही गुजर जाता है. कब्र के पास खड़े लोग दिल्ली सल्तनत के इस शहंशाह के साथ सेल्फी लेने में ब्यस्त हैं, किसी को इस बात का एहसास नहीं है कि वो अलाउद्दीन खिलजी अपनी कब्र में आराम फारमा रहे है जिन्हें आज की गन्दी राजनीती का शिकार होना पड़ रहा है. दिल्ली के दक्षिड़ में स्थित महरौली इलाके में कुतुब मीनार है गुलाम वंश के सुलतान कुतुबुद्दीन ऐबक ने इसको बनवाया था. कुतुब मीनार को देखने देश-विदेश  से हजारों लोग रोजाना आते हैं. कुतुब मीनार से सटे परिसर में ‘अलाउद्दीन खिलजी का मदरसा’ है. मदरसे के बाहर पुरातत्व सर्वेक्षण विभाग ने एक पथर लगाया है जिस पर लिखा है, “ये चौकोर अहाता जो ऊंची दीवारों से घिरा है, यह मूल रूप से एक मदरसा था जिसका प्रवेश द्वार पश्चिम में है. इसका निर्माण तालीम देने के लिए अलाउद्दीन खिलजी (ईसवी 1296 -1316 ईसवी) द्वारा करवाया गया था. अहाते के दक्षिणी हिस्से के बीच में  खिलजी का मकबरा है. मदरसे के साथ ही मकबरे के चलन का यह हिंदुस्तान में पहला नमूना है. इतिहासकार आर वी स्मिथ अलाउद्दीन खिलजी के बारे में कहते है  “अलाउद्दीन खिलजी औरतबाज नहीं थे, जैसा कि आजकल उनके चरित्र को पेश किया जाता है. फ़र्ज़ी इतिहास ने एक ऐसे बादशाह की छवि को बिगाड़ कर रख दिया है जिसने मंगोलों से हिंदुस्तान की हिफाजत की. अगर अलाउद्दीन खिलजी नहीं होते  तो आज हिंदुस्तान की नस्लें बर्बाद हो गई होती. ‘दिल्ली दैट नो वन नोज’ और ‘दिल्ली : अननोन टेल्स आफ ए सिटी’ जैसी किताबों के लेखक आर वी स्मिथ कहते हैं, “खिलजी ने अपने साम्राज्य के विस्तार के लिए चितौड़ पर हमला किया था, पद्मावती को जीतने के लिए नहीं, और चितौड़ के राजा रतन सिंह को हराने के बाद जब उन्होंने रानी पद्मिनी की खूबसूरती के चर्चे सुने तो वह उत्सुकतावश उसे देखना चाहां.” जैसा कि सब किस्सों कहानियों में सुनते आए हैं कि राजपूत रानी एक विशाल आईने के सामने आकर खड़ी हो गई और खिलजी ने उस आईने में केवल रानी पद्मिनी का अक्स देखा था. स्मिथ कहते हैं कि खिलजी की मौत के करीब ढाई सौ साल बाद भक्तिकाल की निर्गुण प्रेमाश्रयी धारा के कवि मलिक मुहम्मद जायसी ने ‘पद्मावत’ की रचना की और उसे रोचक बनाने के लिए उसमें बहुत-सी काल्पनिक बातें जोड़ी. वह इस आम धारणा को भी गलत बताते हैं कि अलाउद्दीन खिलजी के हाथों में पड़ने से बचने के लिए रानी पद्मावती ने जौहर किया था. वह राजपूत राजा रतन सिंह के जंग में हार जाने के बाद रवायत के चलते महल की बाकी महिलाओं के साथ चिता में कूद गई थी. अहाते के पास खड़े गार्ड को भी यह नहीं पता की जहाँ पर वो दिन-भर खड़े होकर नौकरी करता है वो किसकी कब्र है. जवाहर लाल नेहरू विश्वविद्यालय में इतिहास के प्रोफेसर राकेश बाताबयाल खिलजी की वास्तविकता को लेकर छिड़े विवाद में कहते हैं कि इस विषय में इतिहासकारों के लिए कुछ बोलने की गुंजाइश ही नहीं बची है क्योंकि यह अभिव्यक्ति की आजादी, कलात्मकता और राजनीतिक बहस का रूप ले चुका है. बाताबयाल कहते हैं, “हिस्ट्री इज प्रोडक्शन आफ नॉलेज, लेकिन आज देश में ऐसी ताकतें पैदा हो गई हैं जो इतिहास को नहीं मानतीं.” उनका कहना है कि इतिहास के ज्ञान के नाम पर जहालत इतनी है कि फिल्मों को ही इतिहास मान लिया जाता है. हमें यह समझना होगा कि फिल्म इतिहास नहीं है. वह बताते हैं, “खिलजी दिल्ली के ऐसे पहले शासक थे जिन्होंने कालाबाजारी रोकने के लिए वस्तुओं के दाम तय किए, सरकारी मंडी का निर्माण करवाया, भ्रस्टाचार रोकने के लिए जासूसों की एक टीम बनाई, गरीबों, बूढ़ो और विधवाओं के लिए मुफ्त  अनाज देने का नियम बनाया, डिस्कवरी ऑफ़ इंडिया में पंडित जवाहर लाल नेहरू ने भी अलाउद्दीन खिलजी को इतिहास का एक अच्छा प्रशासनिक सुलतान बताया है. मौजूदा दौर की सरकार संघ की गन्दी मानसिकता को लागू करने के फेहरिस्त में अब इतिहास बदलने को बेताब है. इनको अलाउद्दीन खिलजी की ऐतिहासिक उपलब्धियों से कोई मतलब नहीं है और ना ही सुल्ताल खिलजी के जन योजनाओं से जिन्होंने प्रशासनिक तौर पर देश की दशा एवं दिशा बदल दी. इन असामाजिक तत्वों को सिर्फ एक काल्पनिक किरदार पद्मावती की चिंता है जिसे देश और विदेश के महान इतिहासकार झुठला चुके है. ये सब हंगामा होता देख  दिल्ली सल्तनत के अज़ीमुस्सान शहंशाह की रूह खँडहर मक़बरे में अपनी बेबसी पर आंसू बहा रही होगी.
  • Log in or register to post comments

मी चित्रपट पाहीलाय..

चिगो
Mon, 01/29/2018 - 17:48 नवीन
'पद्मावत' चित्रपटावर आक्षेप घेण्याचा अधिकार माझ्यामते फक्त 'अल्लाऊद्दीन खिलजी'लाच आहे.. इतका जास्त निगेटीव्ह दाखवलाय त्याला की ब्बास.. मला तर प्रश्नच हा पडला होता की एवढा स्त्री-लंपट, आततायी माणूस २० वर्षांचं 'रिफॉर्मिस्ट' सरकार चालवूच कसं शकतो? आणि ओहोहो, काय ते राजपुतांचं ग्लोरीफीकेशन ! च्यायला, भन्सालीला खरंतर पैसे दिले पाहीजेत करणी सेनेनं राजपुतांचा उदो उदो केलाय म्हणून..
  • Log in or register to post comments

एपिक..

चिगो
Mon, 01/29/2018 - 19:06 नवीन
ह्या चित्रपटाच्या गोंधळावर ही 'स्टँड-अप कॉमेडी' जबराट आवडली आहे.. पद्मावत और तोता..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

पद्मावत और तोता

चिगो
Mon, 01/29/2018 - 19:08 नवीन
पद्मावत और तोता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

....

manguu@mail.com
Mon, 01/29/2018 - 17:59 नवीन
राजपूत राजवाड्यात राजवाडा भरून स्त्रीया दाखवल्या आहेत. राजपुतांचाही जनानखाना होता का , की त्या किल्ल्याबाहेरील आम जनतेच्या स्त्रीया होत्या ? बाकी , आम जनता किल्ल्याबाहेर खालच्या पातळीला खुल्या वातावरणात , आणि राजघराणे वर उंचावर मजबूत किल्ल्यात ! लोकाना आजही अशा किल्ल्यांचे भयाण आकर्षण आहे , जणू ह्यांच्या खापरपणजीला तिथे वन बी एच के अलॉट केला होता !
  • Log in or register to post comments

<<<लोकाना आजही अशा

विशुमित
Mon, 01/29/2018 - 18:04 नवीन
<<<लोकाना आजही अशा किल्ल्यांचे भयाण आकर्षण आहे , जणू ह्यांच्या खापरपणजीला तिथे वन बी एच के अलॉट केला होता !>>> ==>> हाहाहा.!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

अल्लाउद्दीन खिलजी ची अधिकृत

झपाटलेला फिलॉसॉफर
Mon, 01/29/2018 - 20:58 नवीन
अल्लाउद्दीन खिलजी ची अधिकृत बायको म्हणजे त्याची चुलत बहीण जिच्या बापाला म्हणजे जलाल-उद-दीन खिलजी याला मारुन तो सुलतान झाला. दुसरी त्याने पळवुन आणलेली गुजराथच्या कर्णावतीच्या राजाची म्हणजे करण घेला याची राणी कमलदेवी. तिसरी महाराष्ट्रातल्या राजा रामदेवराय यादवच्या गळ्यावर सुरी ठेऊन पळवलेली त्याची राजकन्या जेठाई. अलाउद्दीन खिलजीच बाकीचे सगळे कामजीवन म्हणजे त्याने बाटवलेेला हिंदु गुलाम ज्यांच्याशी त्याचे बळजबरीचे विकृत संबंध होते. ज्यास त्याने खच्चि केले ( castrated ) तो आवडता गुलाम म्हणजे मलिक काफुर, शेवटी यानेच खिलजीला ठार मारले. आता अशा व्यक्तीमत्वाच्या सुलता्नात भन्साळ्याला प्रेमभावना कुठ दिसल त्यालाच ठाऊक. तो कट्टा धर्मांध होता. त्याच्या काळात हिंदुंची अत्यंत दयनीय अशी स्थिती झाली होती. मुसलमानी रियासतीचे लेखक रावबहाद्दुर सरदेसाई इतिहासकारांमधले मोठे नाव, बडोद्याच्या गायकवाडांच्या दरबारातले ख्यातनाम इतिहासकार , ते अल्लाउद्दीन खिलजी विषयी लिहितात, "हिंदूंना हत्यारे,घोडे मिळू नयेत किंवा त्यांनी ते बाळगू नयेत,उंची पोषाख करु नये,छानछोकीने राहू नये असा बंदोबस्त अल्लाउद्दीन खिलजीने केला. हिंदुंना जमिनीचे अर्धे उत्पन्न कर म्हणून भरावे लागे.गाईम्हशींचासुद्धा कर द्यावा लागे.कोणाही हिंदुच्या घरात सोने,चांदी वा सुपारी चा तुकडा सुध्दा उरलाी नाही.हिंदू अंमलदारांच्या बायकांना मुसलमानांच्या घरी चाकरी करावी लागे. हिंदूंना सरकारी नोकर्‍या मिळेनाशा झाल्या. मात्र एखाद्याला दरबारात नोकरी मिळालीच तर त्याला लोक आपली मुलगी लग्नासाठी देत नसत कारण अशा मुलींना मुसलमानांच्या जनानखान्यात नोकरीस रहावे लागे" मुसलमानी रियासत पृ. १४१ आधी तुघलक झाले, टिपु झाला , औरंगजेबाचे उदात्तीकरण चालुच आहे, आता खिलजी असे करत करत महमुद गझनीसुध्दा धर्मनिरपेक्ष होईल आणि त्यांच्या हिंदु राण्या, राजकन्या , स्त्रिया यांच्याबरोबरच्या खोट्यानाट्या प्रेमकथा प्रसृत केल्या जातील.आणि परत हिंदु समाजच रांगा लावुन कोटि कोटीचा सिनेमा चालवत मिटक्हेया मारत आपल्या इतिहासाची आणिि ऐतिहासिक व्यक्तींच्या चरित्राची लत्तरे मिटक्या मारत पॉपकॉर्न अन कोक पित चघळतीलाी. संदर्भ तारिख ए फिरोजशाही - लेखक झियाउद्दीन बरनी तुघलकनामा - अमीर खुस्रो History of Khalajis by K.S.Lal History of India by Its own Historians VOL III by Elliot and Dowson मुसलमानी रियासत- गो.स. सरदेसाई
  • Log in or register to post comments

प्रतिसाद माहितीपूर्ण वाटतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 01/29/2018 - 21:21 नवीन
संदर्भाने लिहिलेल्या प्रतिसादांचं एक महत्व असतं. प्रतिसाद पोहोचला. अल्लाउद्दीन खिलजी व्यक्ती म्हणून कसा असावा ते कळायला मदत होते. आभार. बाकी, प्रतिसादातील शेवटच्या चार ओळींबद्दल मतभेद होऊ शकतील. बराच काथ्याकूट होऊ शकेल. चर्चा चालू ठेवा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झपाटलेला फिलॉसॉफर

पिच्चरमध्ये खिलजी आणि

टवाळ कार्टा
Tue, 01/30/2018 - 15:29 नवीन
पिच्चरमध्ये खिलजी आणि पद्यावती यांचे प्रेम दाखवले आहे ना? नक्की ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झपाटलेला फिलॉसॉफर

पिच्चरमध्ये खिलजी आणि

पगला गजोधर
Tue, 01/30/2018 - 18:05 नवीन
पिच्चरमध्ये खिलजी आणि पद्यावती यांचे प्रेम दाखवले आहे, परंतु परस्परा बरोबर नाही, तर आपल्या आपल्या रेस्पेक्टिव्ह सामानांशी...☺️
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

पिक्चरच्या सुरुवातीला

पगला गजोधर
Tue, 01/30/2018 - 20:02 नवीन
पिक्चरच्या सुरुवातीला दीपिकेकडून शाहिदच्या छातीवर समोरून ह्रिदयाजवळ बाण लागतो, त्यात शाहिद मारत नाही, पण पिक्चरच्या शेवटाला त्याच्या पाठीत बाण लागतो, त्यात मात्र शाहिद मरतो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

गजोधर भैय्या

मारवा
Wed, 01/31/2018 - 06:38 नवीन
पिक्चरच्या सुरुवातीला दीपिकेकडून शाहिदच्या छातीवर समोरून ह्रिदयाजवळ बाण लागतो, त्यात शाहिद मारत नाही, तो तीर माशुक चा होता हो त्याने कसा मरणार तो ? थोड आशिक के पाँइट ऑफ व्ह्यु पण पहा न हो ? ते नाही का तो शेर आहे कोई मेरे दिल से पुछे तेरे तीर ए नीमकश को ये खलीश कहा से होती जो जीगर के पार होता बहुधा खलीश वगैरे साठी सहन केला असावा बाकी तुम्हाला विसंगतीच शोधायच्या असतील तर रजपुताना शौर्य "दाखवतांना" खुप आहेत. जसे शाहिद कपुर सुटका झाल्यावर खिल्जी ला आवर्जुन भेटुन मात्र त्याच्या सैनिकांना टाळुन "गुपचुप" निघुन जातो. (इथे खर त्याचे सैनिक ही असतात पालखीतुन आलेले पण एक शहीद ही होतो तरी हा काही त्यांच्या बरोबरीने न लढता नेतृत्व न करता उलट वरुन रोक सके तो रोक ले वगैरे डायलॉग मारुन जातो. नंतर तोच राजपुत बकरा वगैरे मोठ्या शौर्याने मारतो. बाकी सिनेमा इतका मोठा कचर्‍याचा ढीग आहे एक्सेप्ट सिनेमॅटोग्राफी एडिटींग की असोच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

दीपिकेचं नाक

गामा पैलवान
Tue, 01/30/2018 - 03:20 नवीन
झफि,
परत हिंदु समाजच रांगा लावुन कोटि कोटीचा सिनेमा चालवत मिटक्हेया मारत आपल्या इतिहासाची आणिि ऐतिहासिक व्यक्तींच्या चरित्राची लत्तरे मिटक्या मारत पॉपकॉर्न अन कोक पित चघळतीलाी.
अगदी सहमत. लोकांच्या भावनांना हात न घालणे हाच एकमेव उपाय आहे. दीपिका पदुकोणेने यापुढे ऐतिहासिक चित्रपटांत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. करणी सेनेने नाक कापून काढण्याची धमकी दिली होती. म्हणूनंच तिला हा निर्णय घ्यावा लागला. याला म्हणतात नाक दाबले की तोंड उघडते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

हो का ?

manguu@mail.com
Tue, 01/30/2018 - 07:02 नवीन
मग नाक कापले का नाही ? आणि ते कुणीतरी अग्निप्रवेश करणार होते , त्यांचे काय झाले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

अहो त्यांनी वर म्हटलंय नं, की

पगला गजोधर
Tue, 01/30/2018 - 07:28 नवीन
अहो त्यांनी वर म्हटलंय नं, की 'धमकी दिली' होती.... नंतर म्हणतील की तो फक्त एक जुमला होता... प्रत्यक्ष कृतीच्या नावे फक्त बोंबाबोंब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

...

manguu@mail.com
Tue, 01/30/2018 - 11:15 नवीन
आणि समजा कुणी नाक घेऊन गेलाच , तर ते दीपीकाचेच आहे , हे कसे सिद्ध करणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

मोगा खान

सुबोध खरे
Tue, 01/30/2018 - 14:18 नवीन
मोगा खान नाक कापल्यावर तेथे दोन भोकं दिसली की झालं. कुणाला नाक दाखवायची गरजच काय? बाकी 52 वर्षाच्या प्रेषित महंमद यांच्या 8 वर्षाच्या 13 व्या बायकोबरोबर नाच असलेला चित्रपट सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून हे पुरोगामी लोक मान्य करतील काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

असा चित्रपट तयार केला तर जमात

श्रीगुरुजी
Tue, 01/30/2018 - 14:36 नवीन
असा चित्रपट तयार केला तर जमात-ए-पुरोगामी त्यावर बंदी आणण्यासाठी आकाशपाताळ एक करतील. जमात-ए-पुरोगामी हे जमात-ए-इस्लामी इतकेच (कदाचित जास्तच) जमात-ए-हरामी आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

....

manguu@mail.com
Tue, 01/30/2018 - 16:43 नवीन
करणी सेनेकडे नाक नेले , तर ते बोलणार तिचेच आहे कशावरुन ? तिचा फोटो नेला , तर ते बोलणार - फोटो फोटोशॉप् असेल त्यामुळे नाकाबरोबर दीपीकेलाही न्यावे लागेल , तिचा आयडी म्हणून आधारकार्डही लागेल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

नाक "करणी सेना"च कापणार आहे

सुबोध खरे
Tue, 01/30/2018 - 18:00 नवीन
नाक "करणी सेना"च कापणार आहे ना? मग तुम्ही कशाला "टेन्शन" घेताय आधार आणि दीपिकाचं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

डॉ

नाखु
Sun, 02/04/2018 - 08:42 नवीन
त्यांची सर्वच अवतारात "नाक" खुपसण्याची परंपरा आहे, ती त्यागून कसे चालेल त्यांना!!!!!!! अखिल मिपा गाजर गवत निर्मूलन समितीचे फुटकळ सदस्य नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

...

manguu@mail.com
Tue, 01/30/2018 - 11:21 नवीन
https://en.m.wikipedia.org/wiki/Padmavat मूळ पद्मावतमध्ये पद्मावतीच्या प्राप्तीसाठी दोन राजपूत राजे लढतात , मरतात आणि पद्मावती सती जाते . ( जोहर नव्हे ). तो दुसरा राजपूत राजा किती शहाणा ! पद्मावतीचा त्या पहिल्याबरोबर विवाह झालेला असताना तिच्या प्राप्तीसाठी युद्ध करतो. खिल्जीचा कथेमध्ये प्रवेश हा अगदी शेवटी आहे. मूळ कथा सुरस आणि चमत्कारिक पद्धतीची आहे.
  • Log in or register to post comments

https://m.timesofindia.com

श्रीगुरुजी
Tue, 01/30/2018 - 14:30 नवीन
https://m.timesofindia.com/entertainment/hindi/bollywood/entertainment/hindi/bollywood/photo-features/padmavati-incidents-that-made-headlines-about-the-deepika-padukone-ranveer-singh-shahid-kapoor-film/Padmaavat-row-Malaysia-becomes-the-first-country-to-ban-the-Sanjay-Leela-Bhansali-directorial/photostory/62705429.cms Malaysia reportedly became the first country to ban the screening of ‘Padmaavat’ citing communal uneasiness. Malaysia, a Muslim-majority country, has banned the film over concerns regarding ‘sensitivities of Islam’. Malaysia's Film Censorship Board (LPF) put the movie in its 'not approved' list and signed its age rating section as 'not relevant'. According to reports, a movie producer familiar with LPF's ratings told a leading Malaysian news portal that 'not relevant' remark signifies banned movies which are likely to incite communal uneasiness and hatred. Unlike in India, Malaysia's censor board has the ultimate power in terms of allowing or disallowing a film from screening. Their verdict cannot be questioned or upheld by any court of law.
  • Log in or register to post comments

जालावर गप्पा मारल्यावर मला

सुबोध खरे
Tue, 01/30/2018 - 18:10 नवीन
जालावर गप्पा मारल्यावर मला असे लक्षात आले कि माझ्या सारखे बरेच लोक असे आहेत ज्यांना त्या पद्मावतीच्या इतिहासाची काही पडली नाही कि संजय लीला भन्साळी बद्दल काहीहि वाटत नाही. राग वाटतो तो केवळ या पुरोगामी सुडो सेक्युलर लोकांच्या दांभिकपणाचा. बाकी बॉलिवूड किंवा संजय लीला भन्साळी धंद्यात "बुडाला" तर दुःख होण्याऐवजी आनंदच होईल. स्वतःच्या आईलाही पैशासाठी दावणीला बांधणारे विधिनिषेधशून्य लोक आहेत ते. सिनेमा बघण्याचा प्रश्नच येत नाही. खिशातील पैसे टाकून स्वतःच्या अमूल्य वेळेचा अपव्यय करणे नाहीच. बाकी करणी सेना, खाप पंचायत, आणि एम आय एम सारखे लोक यांच्या विचारसरणीत फारसा फरक नाही. दहाव्या किंवा पाचव्या शतकातील विचारसरणीचे लोक आहेत. संताप फक्त फुरोगामी, सुडोसेक्युलर आणि डाव्या लोकांच्या "निवडक" बाजू घेण्याच्या हलकटपणाचा येतो.
  • Log in or register to post comments

अगदी माझ्या मनातलं बोललात..

आनन्दा
Tue, 01/30/2018 - 18:52 नवीन
अगदी माझ्या मनातलं बोललात.. सवंग प्रसिद्धीसाठी अश्या प्रकारच्या स्टोरी मुद्दाम घेण्याच्या त्याच्या वृत्तीला चाप लागला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

..

manguu@mail.com
Tue, 01/30/2018 - 19:11 नवीन
पद्मावतीच्या इतिहासाचं काय घेऊन करायचं ? पद्मावतीच्या प्राप्तीसाठी दोन राजपूत आपापसात लढून मेले .. पद्मावती व तिची सवत नागमती नवर्याबरोबर सती गेल्या. या संहारानंतर खिल्जीचे सैन्य तिथे पोचले . उरलेले लोक व खिल्जीचे सैनिक यांच्यात पुन्हा लढाई झाली. खिल्जीची गडावर सत्ता प्रस्थापित झाली पण त्याला पद्मावतीच्या चितेची राखच मिळाली. http://kavitakosh.org/kk/पद्मावती-नागमती-सती-खंड_/_मलिक_मोहम्मद_जायसी http://kavitakosh.org/kk/पद्मावत_/_मलिक_मोहम्मद_जायसी अख्खे काव्य उपलब्ध आहे. करणीसेनेला कदाचित भीती असावी की भन्साळीने दोन राजपूत लढून मेले हे दाखविले की काय ! पण भन्साळीच्या सिनेमात तो दुसरा राजा नाही . पद्मावतीचा नवरा व खिल्जी यांची लढाई होते. पण् त्यात खिल्जीचा परममित्र ( चरममित्र ! ) मलिक गफूर कपटाने बाण मारून पद्मावतीच्या नवर्याला ठार करतो, असे भन्साळीने दाखवलेले आहे. गफूर झालेला तो नट त्याचा चेहरा आणि आवाज त्याचा पहिला सिनेमा 'राबता' मध्ये अगदीच विचित्र वाटला होता. यात मात्र त्याचा रोल चांगला जमलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

....

manguu@mail.com
Tue, 01/30/2018 - 19:15 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

सती खंड

manguu@mail.com
Tue, 01/30/2018 - 19:16 नवीन
सती खंड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

हे सर्व तुम्ही वाचलं का?

सुबोध खरे
Tue, 01/30/2018 - 19:22 नवीन
हे सर्व तुम्ही वाचलं का? का असंच जालावरच्या दुवे? स्वतः वाचायचे नाहीत पण पुढे ढकलायचे>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

..

manguu@mail.com
Tue, 01/30/2018 - 19:38 नवीन
दुवे मी स्वत: शोधले आहेत. शेवटची दोन प्रकरणे वाचलीत.. प्रत्येक खंडाच्या टायटलवरून त्यात असलेले प्रसंग लक्षात येतील .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

.....

manguu@mail.com
Tue, 01/30/2018 - 19:21 नवीन
http://kavitakosh.org/kk/पद्मावत_/_मलिक_मोहम्मद_जायसी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

इतिहास किती खरा किती खोटा

ss_sameer
Tue, 01/30/2018 - 21:28 नवीन
सदर इतिहास वादातीत आहे. आम्ही स्वतः 2008-9 मध्ये चितोडगडावर गेलो, same गोष्ट सांगितली तिथल्या guide ने. त्यामुळे सवंग लोकप्रियता आणि भन्साळी असे आपण म्हणू शकत नाही. इतिहासाला अनेक पदर असतात, प्रत्येक जण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. सर्व चूक नसते आणि सर्वच बरोबर नसतात, शिवाजी महाराष्ट्रात राजे असतात आणि सुरत गुजरात मध्ये चोर दरोडेखोर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

शिवाजी महाराष्ट्रात राजे

पगला गजोधर
Wed, 01/31/2018 - 09:36 नवीन
शिवाजी महाराष्ट्रात राजे असतात आणि सुरत गुजरात मध्ये चोर दरोडेखोर...
सुरत छापा घटना ते आजच्या घडीला.... गुजरातमध्ये अजून असा मायचा पुत आलेला नाही, जो राजेंविषयी असं काही बरंळंल....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ss_sameer

शाळेत धडा होता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 01/31/2018 - 11:04 नवीन
आम्हाला शाळेत धडा होता सूरतेची लूट म्हणून....केवळ माहितीस्तव. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

सत्यवचन

ss_sameer
Wed, 01/31/2018 - 18:57 नवीन
महाराज शब्द तर अलीकडचा आहे आणि तोही सगळेच वापरत नाही. इतिहासकार तर अजूनही एकेरी शिवाजी च लिहितात. पुन्हा सांगावेसे वाटते, इतिहासाला भावना नसतात, भावना या प्रांतीय असतात. इतिहास तटस्थ आणि त्रयस्थ राहून वाचला तर जास्त कंगोरे मोकळे होतात, भावनिक झालात तर काय होते याची उदाहरणे रोज दिसतातच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

...

manguu@mail.com
Wed, 01/31/2018 - 19:30 नवीन
तो अनुवादाचा दोष् असतो. म्हणजे Shivaji was a king . He was very brave. हे मराठीत .... तो खूप शूर होता ... ( ते खूप् शूर होते , असे करायला हवे ) असे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ss_sameer

वादातीत म्हणजे काय ?

माहितगार
Wed, 01/31/2018 - 12:13 नवीन
सदर इतिहास वादातीत आहे.
* वादातीत म्हणजे काय वाद असलेले की नसलेले ? * मिथक आणि इतिहास यातील फरक काय ?
......आम्ही स्वतः 2008-9 मध्ये चितोडगडावर गेलो, same गोष्ट सांगितली तिथल्या guide ने.
गाईडने सांगीतलेल्या माहिती निवीवाद असतात हे गृहीत धरता येते का ?
इतिहासाला अनेक पदर असतात, प्रत्येक जण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. सर्व चूक नसते आणि सर्वच बरोबर नसतात,
इतिहासाच्या प्रमाणसाधनाच्या बळावर केवळ खिलजीने एक युद्ध केले आणि जिंकला एवढेच सिद्ध करता येते. उर्वरीत मिथके आहेत; 'मिथकांना अनेक पदर असतात, प्रत्येक जण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. सर्व चूक नसते आणि सर्वच बरोबर नसतात' अशी वाज्य रचना अधिक समतोल आणि सयुक्तीक वाटते. मिपावरील धागा लेख चर्चातून असेल अथवा वृत्त माध्य्माम्नी असेल राजपूत समाजाच्या आक्षेपांची अद्याप दखल घेत्लेली नसल्यामुळे पहाणे मुख्यत्वे भंसाळीच्याच दृष्टीकोणातून होत आहे आणि आपला दृष्ष्टीकोण थोपवण्यात भंन्साळी सध्यातरी यशस्वी दिसतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ss_sameer

आ.ह. साळुंखेंचे काय मत असेल ?

माहितगार
Wed, 01/31/2018 - 12:49 नवीन
पद्मावत चित्रपट - आणि सध्याच्या राजपूत समाजाच्या भूमिके बद्दल आ.ह. साळुंखेंचे काय मत असेल ?
  • Log in or register to post comments

...

manguu@mail.com
Wed, 01/31/2018 - 14:43 नवीन
राजा राजस्तानचा. विवाहित होता. त्याला एक पोपट बोलतो .. पद्मावती सुंदर आहे. म्हणून तो सिंहलनगरीला जातो , म्हणजे सीलोन / श्रीलंका !! तिच्यासाठी. एका पोपटावर भरोसा ठेवून राज्य सोडून हजारो मैल , शिवाय समुद्रप्रवास ( नो सेतू , नो पुष्पकविमान ) करुन तो जातो. महिनोनमहिने लागले असणार. मग लोक खिल्जीच्या अय्याशीला का नावे ठेवतात ? आणि राजाच महिनेमहिने दूर जात असेल तर परदेशी मंगोल आणि खिल्जी राज्य गिळायला येणारच ना ?
  • Log in or register to post comments

कै च्या कै?

माहितगार
Wed, 01/31/2018 - 15:32 नवीन
आणि राजाच महिनेमहिने दूर जात असेल तर परदेशी मंगोल आणि खिल्जी राज्य गिळायला येणारच ना ?
खिलजी राजा गावात नसताना आला नाही हे क्षणभर बाजूस ठेऊ. पण घराचा मालक घरी महिनेच नाही वर्षघरातर्षे नसला तरी बाहेरच्यांना घर लुटण्या जोगी परिस्थिती निर्माण होत असेल पण असे घर लुटण्याचा नैतीक किंवा कायदेशीर परवाना मिळत नसतो. राम- लक्ष्मण घरात नाही म्हणून इतरांसाठी सीतेच्या अपहरणाचा परवाना तयार होत नसतो.
म्हणून तो सिंहलनगरीला जातो , म्हणजे सीलोन / श्रीलंका !! तिच्यासाठी.
श्रीलंका एवजी सिंहल शब्दाचा उल्लेख श्री लंकेत सिंहल लोक रहातात याची कल्पना रचणार्‍यास माहिती असण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी. या मिथकांमध्ये दिलेली तत्कालीन श्रीलंकन राजांची नावे जुळत नाहीत. राजस्थान आणि श्रीलंका दोन्हीकडे घटना नोंदींची पुरेशी व्यवस्था असतानाही -विवाह- घटनेच्या अधिकृत नोंदी आतापावेतो उपलब्ध नाहीत . अनेक कवींनी अंषतः पुर्वाश्रमींच्या काव्यांवरून वेगवेगळ्या पद्धतीने उचलेगिरी आणि अंशतः स्वतःच्या कल्पनेचे पतंग सरमिसळ या मिथकांमध्ये झालेली असणार. पद्मावतीच्या बाब्तीत हे एकमेव कथानक नाहीत बर्‍याच लेखक - कविंनी वेगवेगळ्या कल्पना केलेल्या आहे. यातील अनेक काव्यांचा तौलनीक अभ्यास प्रबंध जिज्ञासूंना शोधगंगा डॉटकॉम वर अभ्यासता येऊ शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

बाय द वे गाणं मस्तय सालं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 02/03/2018 - 21:04 नवीन
घुमर घुमर हे गाणं बघायला आणि साऊंड सिष्टीमवर ऐकायला लैच भारी आहे. ''आवो जी आवो घूमर खेलबा आवो'' '' आपण साथ साथ घूमर सगळा खेलबा आवो'' ''देवरानी, जेठानी खेले सासू जी घूमर खेले ननद भोजाई खेले बैसा घूमर खेले'' तसंच मिपाकरांचा खेळ पाहता ''मिपाकर घूमर खेले'' असं पाहिजे होतं. -दिलीप बिरुटे (घुमर घुमर खेळून थकलेला) :)
  • Log in or register to post comments

जुना सिनेमा

manguu@mail.com
Sat, 02/03/2018 - 22:55 नवीन
https://youtu.be/ObJeKhrwbhs हा जुना पद्मावती सिनेमा. यात अल्लाउद्दीन खिल्जी त्याच्या पत्नीने केलेल्या कान उघाडणीनंतर पद्मिनीला आपली बहीण मानतो , असे दाखवले आहे !! तेंव्हा करणी सेना नव्हती का ?
  • Log in or register to post comments

भन्साळी डिवचत नसून तो

प्रकाश घाटपांडे
Sun, 02/04/2018 - 09:35 नवीन
भन्साळी डिवचत नसून तो अस्मितांची टोके बोथट करतो आहे. मनोरंजनासाठी तशाही पुराणकथा वापरत्तात.खरा इतिहास कोणाला माहीत अस्तो? वादग्रस्त झाला कि गल्ला चौपट. न पहाण्याचा पर्याय खुला असला तरी लोक कुतुहलशमनासाठी पहातातच.
  • Log in or register to post comments

घ्या करणीसेनेला सुचलं शहाणपण....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/04/2018 - 10:22 नवीन
राजपूतांच्या शौर्याचंच कौतुक चित्रपटात असल्याने करणीसेनेनं आपलं आंदोलन मागे घेतले आहे. सांगा काय करायचं या लोकांचं....? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

डॉ आपण आधीच सुचवलेला उपचार

पगला गजोधर
Sun, 02/04/2018 - 17:13 नवीन
डॉ आपण आधीच सुचवलेला उपचार, राजकीय इच्छा शक्ती असेल, तर ज्यांनी धुडगूस घातला, लहान मुलांच्या बसवर दगडफेक केली, त्यांना शोधून पकडून, निबर ठोकून काढलं पाहिजे, नाही तर चालू राहू दे जुमलेबाजी.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा