आपातकालीन प्रसंगात लगेच मदत मिळावी या हेतूने शासनाने १०० हा क्रमांक दुरध्वानिवर उपलब्ध करुन दिला आहे. परंतु आजवर कधी मी याचा वापर केला नाही, बहुधा तशी वेळच आली नसावी. एकदा घरात विषारी साप शिरल्यावर मी अग्निशमन दलाला संपर्क साधला होता, २० मिनिटात हजर होउन साप घेउन गेले होते. एकंदरीत चांगला अनुभव होता.
१०० क्रमांकावर उपलब्ध असलेल्या सोयीबद्दल थोडीशी माहिती हवी होती. उदाहरनार्थ १०० क्रमांक आपल्याला कोण कोणत्या विभागाशी जोडून देतो?
पोलिसांसोबतच हा क्रमांक आपण रुग्णवाहिका, अग्निशमन, प्राण्यांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी याचा वापरू शकतो का?
या क्रमांकावर आपण पोलिसाना कोणत्या तक्रारी देऊ शकतो?
त्याचसोबत पोलिस तक्रारदराकडून त्याची व्येयाक्तिक माहिती घेत्तात का ( नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक ) अणि तक्रारीवर उचित कारवाई झाली हे कसे जाणुन घ्यायचे.?
एकंदरीत १०० हा क्रमांक कश्या प्रकारे काम करतो हे जाणुन घ्यायला आवडेल.
तसेच यासंबंधी आपल्याला काही स्वानुभव असतील तर जाणुन घ्यायला आवडेल
प्रतिक्रिया
23 Jan 2018 - 3:06 pm | सतिश पाटील
एकही प्रतिसाद नाही....???
23 Jan 2018 - 3:22 pm | कपिलमुनी
श्या ! तुमचा कंपू नाही आणि तुमच्या धाग्यात त्यांचा नाव नाही :)
( मला १०० नंबरचा अनुभव नाही त्यामुळे पास )
23 Jan 2018 - 3:54 pm | सतिश पाटील
हे माहित न्हव्ते, संगितल्याबद्दल आभार.
25 Jan 2018 - 12:50 pm | चांदणे संदीप
कंट्रोल रूम
कंट्रोल रूम - २
बाकी, माझा अनुभव सांगायचा झालाच तर, बऱ्याचदा रस्त्यावर अपघात झाल्याची माहिती देण्याकरीता तसेच कुठे मारामारी, दंगलसदृश परिस्थिती दिसल्यावर त्याची सूचना देण्याकरीता मी १०० नंबरला फोन केलेला आहे आणि त्यांच्याकडून त्वरित कारवाईही झालेली आहे.
Sandy
23 Jan 2018 - 6:34 pm | shashu
एक किस्सा:
साल १९९९-२००० असावे. आमच्या घरी नवीनच बीएसएनएल चा दूरध्वनी जोडणी करून घेतला होता.
आमचे काही अतरंगी भावंडे (सक्खी-चुलत) १०० नंबर बद्दल बोलत असायची. एका लहान चुलत बहिणीने (वय वर्ष ८-९ असावे) ते ऐकले होते. एक दिवस तिने घरात कोणी नसताना १०० नंबर वर कॉल केला. (सम्भाषण काय झाले ते आम्हाला अजूनपर्यन्त कळाले नाही) तिने घाबरून फोन ठेवून दिला. पण समोरून पोलिसांनी पुन्हा आमच्या नंबर वर वारंवार फोन केला पण घरात कोणीच नसल्याने त्याना काही उत्तर मिळत नव्हते आणि माझी बहिण घाबरून फोन उचलत नव्हती. काही वेळाने पुन्हा फोन आला त्या वेळेस आई घरात होती. तिने फोन उचलला. समोरून विचारणा झाली की काही प्रोब्लेम झाला आहे का? काही अडचण आहे का? तुम्हाला कोणी त्रास देत आहे का? वगैरे.....वगैरे......
पोलिसांशी बोलणे झाल्यानंतर आईला उमगले की नक्की कोणी कॉल केला ते. आईने बहिणीला १०० नंबर बद्दल समजावून सांगितले.
त्या दिवसापासून आम्ही तीला नंबर-१०० म्हणून चिडवू लागलो.
23 Jan 2018 - 6:36 pm | अर्जुन
मकरसंक्रातीला आमच्या घराच्या बाजुच्या शाळेच्या सभाग्रुहामधे कारेक्रम होता. आवाज खुपच जास्त होता. मी १०० नं. ला तक्रार केली. प्रथम त्यांनी मकर संक्रातीच्या शुभेच्च्या दिल्या. व लगेच पोलिस पाठवतो, असे सांगितले. काही वेळ वाट पाहीली. आवाज तेव्हधाच होता. परत तक्रार केली. परत मकर संक्रातीच्या शु भे च्च्या दिल्या. व लगेच पोलिस पाठ वतो, असे सांगितले. पाच मिनीटात पोलिस आले. व तेथील कार्यकर्त्याना समज दीली. आवाज लगेच कमी झाला. तरी तुम्ही हा नं. अत्यावश्यक सेवा म्हणून नक्की वापरु शकता. विशेष म्हणजे नाव सांगण्याची गरज नाही..
आप त का लीन फोन नं ब र खा लील प्र माणे आहेत.
१०० पोलीस
१०२ रुग्णवाहिका
१०१ फायर
१०८ आपत्ती व्यवस्थापन
१८१ महिलांच्या हेल्पलाइन
१०९७ एड्स हेल्पलाइन
१०९८ बाल शोषण हॉटलाइन
+९१ ९५४०१६१३४४ एअर एम्बुलेंस
आता केवळ ११२ हा सर्व आपत्कालीन मदतीसाठी आहे. आपण दुसर्या कारणासाठी नंबरवर कॉल केल्यास, तो गैरवापर (आपण हे हेतुपुरस्सर करत असल्यास) किंवा गैरवापर मानले जाते (जर आपण चुकून असे केले तर). आणीबाणीच्या नंबरचा गैरवापर फौजदारी गुन्हा आहे. गैरवापर केल्यास प्रौढांना दंड किंवा तुरुंगात शिक्षा ठोठावण्यात येते. 112 गैरवापर करणारे मुले देखील दंडनीय आहेत. पोलीस मुलाच्या पालकांना एक चेतावणी पत्र पाठवते.. त्याचा उपयोग होत नसल्यास, मुलाला किशोरवयीन फौजदारी कायद्यांतर्गत बालकाची शिक्षा सुनावण्यासाठी पोलिस देखील मुलांच्या जजांना विचारू शकतात.
24 Jan 2018 - 5:40 pm | नन्दादीप
१०८ हा मुख्वत्वे आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेसाठी आहे. ही सेवा पुर्णपणे मोफत असून रुग्णवाहिकेमध्ये आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे शिक्षण घेतलेले डॉक्टर्स असतात तसेच सोबतीला ईमर्जन्सी असिस्टन्ट (ड्राईव्हर ला देखील आपत्कालीन परिस्थिती हाताळायचे शिक्षण दिलेले असते) देखील असतात.
१०८ या टोल फ्री क्र.वर कॉल केल्यावर जर अजुन काही ईमर्जन्सी असल्यास (जसे की आग - अग्निशमन दल, पोलिस ई. ) थेट कॉल्सेन्टर मार्फतच त्या त्या यंत्रणांना सूचित केले जाते.
23 Jan 2018 - 6:36 pm | अर्जुन
मकरसंक्रातीला आमच्या घराच्या बाजुच्या शाळेच्या सभाग्रुहामधे कारेक्रम होता. आवाज खुपच जास्त होता. मी १०० नं. ला तक्रार केली. प्रथम त्यांनी मकर संक्रातीच्या शुभेच्च्या दिल्या. व लगेच पोलिस पाठवतो, असे सांगितले. काही वेळ वाट पाहीली. आवाज तेव्हधाच होता. परत तक्रार केली. परत मकर संक्रातीच्या शु भे च्च्या दिल्या. व लगेच पोलिस पाठ वतो, असे सांगितले. पाच मिनीटात पोलिस आले. व तेथील कार्यकर्त्याना समज दीली. आवाज लगेच कमी झाला. तरी तुम्ही हा नं. अत्यावश्यक सेवा म्हणून नक्की वापरु शकता. विशेष म्हणजे नाव सांगण्याची गरज नाही..
आप त का लीन फोन नं ब र खा लील प्र माणे आहेत.
१०० पोलीस
१०२ रुग्णवाहिका
१०१ फायर
१०८ आपत्ती व्यवस्थापन
१८१ महिलांच्या हेल्पलाइन
१०९७ एड्स हेल्पलाइन
१०९८ बाल शोषण हॉटलाइन
+९१ ९५४०१६१३४४ एअर एम्बुलेंस
आता केवळ ११२ हा सर्व आपत्कालीन मदतीसाठी आहे. आपण दुसर्या कारणासाठी नंबरवर कॉल केल्यास, तो गैरवापर (आपण हे हेतुपुरस्सर करत असल्यास) किंवा गैरवापर मानले जाते (जर आपण चुकून असे केले तर). आणीबाणीच्या नंबरचा गैरवापर फौजदारी गुन्हा आहे. गैरवापर केल्यास प्रौढांना दंड किंवा तुरुंगात शिक्षा ठोठावण्यात येते. 112 गैरवापर करणारे मुले देखील दंडनीय आहेत. पोलीस मुलाच्या पालकांना एक चेतावणी पत्र पाठवते.. त्याचा उपयोग होत नसल्यास, मुलाला किशोरवयीन फौजदारी कायद्यांतर्गत बालकाची शिक्षा सुनावण्यासाठी पोलिस देखील मुलांच्या जजांना विचारू शकतात.
23 Jan 2018 - 7:50 pm | मराठी कथालेखक
१०० कधीकधी उपयोगी पडतो.. नेहमी नाही.
खासकरुन आवाजाचा त्रास होत असेल तर १०० वर कॉल केला जातो. पण नेहमीच योग्य दखल घेतली जाते असे नाही.
झालंच तर उत्सवाच्या काळात कधी कधी १०० पण लवकर लागत नाही.
23 Jan 2018 - 10:53 pm | अर्जुन
माझा अनुभव मी लिहीला आहे. ज र १०० वर तक्रार करुन दखल घेतली नाही तर आणि तरच, पोलीस उपायुक्तांचा क्रमांकावर तक्रार करावी. नक्कीच उपयोग होईल.
24 Jan 2018 - 11:32 am | सतिश पाटील
आपला अनुभव आपण कुठे लिहलय त्याची लिंक दयाल का?
आणि पोलिस उपायुक्तांचा देखिल १०० सारखा क्रमांक आहे ?
24 Jan 2018 - 11:29 am | सतिश पाटील
मी नवीन रहायला आलेल्या सोसायटीत एका विशिष्ट समाजाचे लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. दर १५ दिवसाला यांच्या दारात डीजे, बैंजो रात्री १० नंतर देखील दणक्यात सुरु असतो, का्य मोठेपणा वाटतो यांना का्य माहित. या १०० नंबरचा एकदा प्रयोग करुन पहायला हवा.
24 Jan 2018 - 4:25 pm | मराठी कथालेखक
नक्कीच करा..
लोकांच्या गप्प रहाण्यानेच अशा लोकांचे फावते.
शिवाय जवळ राहणार्या व्यक्तीने पोलीस तक्रार केली की पोलीसही नीट दखल घेवू शकतात कारण तक्रारकर्ता त्यांना आवाजाचे उगमस्थान नेमकेपणाने सांगू शकतो. याउलट काही वेळेस काहीशा दुरुन आवाज येत असतो अशा वेळी पोलिसात तक्रार केली तरी तक्रारकर्ता (म्हणजे मी) पोलीसांना आवाजचे उगमस्थान नेमकेपणाने सांगू शकत नाही. यामुळे काही वेळेस कारवाई होत नाही तर काही वेळेस कारवाईस खूप विलंब लागतो. अशा वेळी मला नेहमी वाटते की जिथून आवाज येत आहे त्याच्या अगदी जवळ राहणारे का तक्रार करत नाहीत.
24 Jan 2018 - 8:05 pm | दुर्गविहारी
लहानपणी एकद हुक्केरीच्या नातेवाईंकाकडे गेलेलो असताना, त्यांच्या घरी फोन पाहिला. कुतुहल म्हणून सहज नंबर फिरवला तर नेमका पोलिस स्टेशनला लागला. आयुष्यातला पहिलाच फोन पोलिस स्टेशनला, मी घाबरलो, पण फौजदार प्रेमळ असावा. गंमतीचे बोलुन त्याने मला फोन ठेवायला सांगितले.
नंतर या नंबरचा संदर्भ आला तो मुंबई दुरदर्शनवर एक शुन्य शुन्य या मालिकेच्या निमीत्ताने. मस्त होती हि मालिका. नंतर मात्र या नंबरचा काहीही संबध सुदैवाने आला नाही.
26 Jan 2018 - 6:44 pm | manguu@mail.com
१०० नंबर ... १०० नंबरी काम होते.
आम्ही पोलिसांची तक्रार करायला वापरतो.
कधी कधी हा अपघात आमच्या एरियात नाही, हा दुसर्य स्टेशनचा एरिया आहे, वगैरे भानगडी होऊन एम एल सी टाळली जाते. सगळ्याच पोलिस स्टेशनांचे आमच्याकडे नंबर नसतात . १०० नंबरला फोन केला, की ते तिथून योग्य त्या पोलिस स्टेशनला सूचना देतात.