गडद
निसर्गाला :
निष्कारण एके ठिकाणी सुंदर फुले
फुलवण्याची कला असते
दूरवर निरंतर आवाजाचे निर्मम साज
लावण्याची कला असते
पसरलेल्या लाखो लाखो तारकांना दिशा
देण्याची कला असते
क्षणभर परिघापलीकडल्या काजव्यांना
चमकवण्याची कला असते
इतिहासातल्या पानांमध्ये संस्कृतींना
गाडण्याची कला असते
आपल्यासारखी त्याला मान्य-अमान्यतेची कसली सक्ती नसते
:-)
; )
छान.
धन्यवाद